Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भगवतगीतेचा संदर्भ संहाराशी
भगवतगीतेचा संदर्भ संहाराशी आहे. अॅट वन पॉइंट ऑफ टाइम आपनहाय्मर थॉट हि इज प्लेइंग गॉड (नाव, आयॅम बिकम डेथ..). इट्स नॉट इझी प्लेइंग गॉड.. म्हणुन त्याची होणारी घालमेल. चित्रपटाचा शेवट इंट्रिगिंग आहे. अॅटॉमिक बाँबमुळे भविष्यात संहार वाढुन जग नष्ट होइल हि भिती त्याकाळी वाजवी होती, पण त्या भितीचं रुपांतर डिटरंट मधे होउन एका प्रकारे शांतताच निर्माण झाली - असं काहिसं चित्रं, जे सध्याचं वास्तव आहे नोलनने दाखवायला हवं होतं. हे माझं मत...
बाय्दवे, रिडली स्कॉटचा "नेपोलियन" (वाकिन फिनिक्स) आणि मार्टिन स्कोर्सेझीचा "किलर्स ऑफ द फ्लॉवर मून" (लिओ) यांचे ट्रेलर्स पाहिले. दोन्हि सिनेमे एपिक वाटतायत...
राज, तुमचं म्हणणं बरोबर आहे.
राज, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण आजचे वास्तव दाखवणे हा सिनेमाचा उद्देश नाही. ओपिला शेवटी काय वाटले हे दाखवणे उद्देश होता.
अमित - भारी लिहीले आहे.
अमित - भारी लिहीले आहे. बघायला जायच्या आधी हे सगळे पुन्हा वाचून जायला हवे.
पण हे सगळे आपल्यापर्यंत नीट पोहोचायचे म्हणजे एकतर फिजिक्स नीट यायला हवे, नाहीतर नोलनस्टाइलचे फिल्ममेकिंग नीट समजावून घ्यायला हवे. हे म्हणजे शाळा बुडवून पिक्चर पाहणार्या एखाद्या पोराला शिक्षकाने एकतर हे नीट शिक नाहीतर ते नीट शिक चॅलेंज दिल्यासारखे वाटते
स्क्रीन कडे बोट दाखवणे
स्क्रीन कडे बोट दाखवणे मुमेन्ट झाली >>> कॉमी - म्हणजे ती डि कॅप्रिओ ची मीम आहे ते का?
बाय द वे, गॅरी ओल्डमन म्हणजे डीसी युनिव्हर्स ना, की एमसीयू मधेही आहे? माझे नॉलेज फार तुटपुंजे आहे दोन्हीतले.
कॉमी - म्हणजे ती डि कॅप्रिओ
कॉमी - म्हणजे ती डि कॅप्रिओ ची मीम आहे ते का? >> तेच
गॅरी ओल्डमन नोलनच्याच बॅटमॅन सिनेमांमध्ये होता. त्यापलीकडे तो MCU किंवा नंतरच्या DCEU मध्ये नाही आला बहुतेक.
गॅरी ओल्डमन नोलनच्याच बॅटमॅन
गॅरी ओल्डमन नोलनच्याच बॅटमॅन सिनेमांमध्ये होता >> हो मला तेच लक्षात आहे. मी डीसी म्हंटलो तरी डोक्यात डार्क नाइट वगैरेच होते
अमित, मस्त लिहिलंयस. साउंड्स!
अमित, मस्त लिहिलंयस. साउंड्स! येस - अमेझिंग वापर आहे साउंड्सचा!!
माझंही काल सिनेमा पाहून आल्यावर अगदी असंच thoughts racing ahead of words असं झालं होतं! पुन्हा बघावा लागणार हा!
कॉमी, गॅरी ओल्डमनबद्दल अनुमोदन!!
धन्यवाद, हर्पा. Happy
धन्यवाद, हर्पा. Happy
Submitted by अस्मिता >> (स्वगत - हे चिडवणं तूच ओढवून घेतलंयस, भोग आता! {कपाळावर हातवाली बाहुली})
अमित, मस्त लिहिले आहे. ते
अमित, मस्त लिहिले आहेस. ते हॉन्टिग-भास-आभास चपखल दाखवलंय. नंतर आवाज येणंही खरोखरच ब्रिलियंट होतं, कारण ती शांतता भेदक झाली त्याने.
फा, खरंच . सिनेमा बघताना ते वरवर सांगितलेलं फिजिक्स समजण्याइतपत सुद्धा बुद्धिमत्ता नाही याचं फार दुःख झालं मला.
कॉमी, 'ओपीच्या नजरेतून सिनेमा' पटलं.
मला काही कळलं नाही हर्पा , ते तुम्ही लिहिलेल्या ह्या कमेंटला होते. >>
छान चर्चा, स्वाती, सामो, अस्मिता, अनु आणि कॉमी. >>>
पण भोगते माकफ , काही तरी केलंच असेल मी. हाकानाका.
ह्या दोन लिंक्स सापडल्या
ह्या दोन लिंक्स सापडल्या.
Closer look at the father of atomic bomb.
Robert Oppenheimer explains how he recited a line from Bhagvadgeeta. “A few people laughed, a few people cried. Most people were silent. I remembered the line from the Hindu scripture, the Bhagavad Gita; Vishnu is trying to persuade the Prince that he should do his duty and, to impress him, takes on his multi-armed form and says, ‘Now I am become Death, the destroyer of worlds.'” हे त्याच्या खऱ्या व्हिडिओत सांगितले आहे.
Hi please watch a documentary
Hi please watch a documentary by bbc called the bomb. Movie is terrific . Will write from office. Already people are offended by that scene here and media has taken up the issue. Developing story.
डंबडाऊन किंवा टोटल बॅन वगैरे
डंबडाऊन किंवा टोटल बॅन वगैरे होण्याआधी बघून घ्या झालं. त्यात काय आहे आणि ते कसं भावना दुखावणारे नाही या चर्चेच्या पलीकडे पब्लिक गेलेलं आहे. त्यात एनर्जी घालवण्यात अर्थ नाही आणि अजून जास्त काही काळ सोकवण्यासारखं काही राहिलेलं नाही. त्यापेक्षा मूव्हीत काय आवडलं त्यावर बोलू.
हा हा. नाही अस्मिता, ते भो आ
हा हा. नाही अस्मिता, ते भो आ क फ माझं मलाच म्हटलेलं होतं मी - स्वगत. मला वाटलं मी मागे स्वातीला अमुक ठिकाणी धन्यवाद म्हटलं नाही म्हणून तक्रार केली होती, म्हणून मला आता सगळे काही कारण नसताना सेफ म्हणून धन्यवाद म्हणून ठेवत आहेत.
ओपेनहायार अर सर्वांनी छान
ओपेनहायार वर सर्वांनी छान लिहीले आहे. मी पाहिलेला नाही.
वेगळा धागा आहे. तिकडे पुस्तकाबद्दलची विचारणा करतोय.
ओपेनहायमर डिरेक्टर आणि
ओपेनहायमर डिरेक्टर आणि कास्टची ही मुलाखत बघण्यासारखी आहे.
^^^ धन्यवाद.
^^^
धन्यवाद.
Oppenheimer पाहिला असल्यास,
Oppenheimer पाहिला असल्यास, आणि त्यातल्या शेवटच्या सिनच्या प्रभावात असाल तर Doctor Strangelove : or how I learned to stop worrying and love the bomb (१९६४) (नाव आणि उपशीर्षक आणि एकूण सिनेमाच ओपनहायमरचा स्पिरीच्युअल सिक्वेल म्हणून परफेक्ट आहे )
स्टॅन्ली कुब्रिक दिग्दर्शित डार्क कॉमेडी आहे हा. एक माथेफिरु युएस जनरल पूर्णच खिसकेला होतो आणि सिक्युरिटी प्रणालीतल्या लूपहोलचा वापर करून रशियावर अण्वस्त्र दागायचा हुकूम सोडतो. मग युएस प्रेसिडेंट आणि त्यांचे मिनिस्टर आणि जनरल्स हे रोखण्यासाठी कायकाय करतात ह्यावर सिनेमा आहे. विनोदी आणि तितकाच भीतीदायक सिनेमा.
थँक्यू कॉमी (तुमचं नाव बदला
थँक्यू कॉमी (तुमचं नाव बदला आता. त्याच्यामुळे गोत्यात यायला नको ) ! लायब्ररीत होल्डवर ठेवलाय. ताबडतोब बघतो.
....
....
फायरब्रांड नेते श्री अनुरागजी ठाकुरजी ह्यांनी तो सीन कट करण्यास सांगितले आहे. नाहीतर सेन्सर बोर्डाच्या सभासदांवर कारवाई करण्यात येईल असे संकेत दिले.
ओपनहमर मराठी डब आहे का
ओपनहमर मराठी डब आहे का अव्हेलेबल...
द ओमेन काल पुन्हा एकदा पाहिला
द ओमेन काल पुन्हा एकदा पाहिला.
अलकाला री-रन ला आला होता तेव्हां खूप गाजलेला क्लासिक हॉरर म्हणून गेलो होतो. पण एव्हढं काय आहे यात असं वाटलं होतं. नंतर ओटीटी वर उपलब्ध असताना पाहिलेला. पण तुकड्या तुकड्यात पाहिल्याने काही वाटलं नाही. काल मात्र एका जागी बसून पाहिला आणि किती तरी गोष्टी आधी नीट पाहिल्या नाहीत हे कळलं. काल भयंकर आवडला. तिन्ही वेळा या चित्रपटाची संथ हाताळणी आवडलीच होती. निर्मितीमूल्ये डोळ्यात भरली होती. प्लॉट विस्तृत आहे हे जाणवलेले.
फक्त पहिल्यांदा पाहिला तेव्हां डेव्हील, शैतान या भानगडी काय एव्हढ्या परिचित नव्हत्या. बायबल बद्दल पण अनभिज्ञच होतो. त्यामुळे यातले काहीही अपील झाले नाही. घातसेंचा एखादा मुखवटा घातलेले भूत असते तर आवडला असता.:हाहा:
आता मात्र कुठलाही किळसवाणा प्रकार, हिडीस भूत किंवा लाल डोळे, वीजेची उघडझाप असे काहीही न दाखवता सुद्धा भयाचा अंमल कसा ठेवला आहे याचे नवल वाटले. नॅनी झालेली अभिनेत्री तर कमाल आहे. निव्वळ डोळेच भय निर्माण करतात.
The perfect इंग्रजी
The perfection इंग्रजी नेटफ्लिक्सवर.
अजिबात बघू नका..रानोमाळ पळून गेलेले कथानक...कायच्या कै बकवास सिनेमा.
द ओमेन काल पुन्हा एकदा पाहिला
द ओमेन काल पुन्हा एकदा पाहिला.
अलकाला री-रन ला आला होता तेव्हां खूप गाजलेला क्लासिक हॉरर म्हणून गेलो होतो. पण एव्हढं काय आहे यात असं वाटलं होतं. नंतर ओटीटी वर उपलब्ध असताना पाहिलेला. पण तुकड्या तुकड्यात पाहिल्याने काही वाटलं नाही. काल मात्र एका जागी बसून पाहिला आणि किती तरी गोष्टी आधी नीट पाहिल्या नाहीत हे कळलं. काल भयंकर आवडला. तिन्ही वेळा या चित्रपटाची संथ हाताळणी आवडलीच होती. निर्मितीमूल्ये डोळ्यात भरली होती. प्लॉट विस्तृत आहे हे जाणवलेले.
फक्त पहिल्यांदा पाहिला तेव्हां डेव्हील, शैतान या भानगडी काय एव्हढ्या परिचित नव्हत्या. बायकाह बद्दल पण अनभिज्ञच होतो. त्यामुळे यातले काहीही अपील झाले नाही. घातसेंचा एखादा मुखवटा घातलेले भूत असते तर आवडला असता.:हाहा:
आता मात्र कुठलाही किळसवाणा प्रकार, हिडीस भूत किंवा लाल डोळे, वीजेची उघडझाप असे काहीही न दाखवता सुद्धा भयाचा अंमल कसा ठेवला आहे याचे नवल वाटले. नॅनी झालेली अभिनेत्री तर कमाल आहे. निव्वळ डोळेच भय निर्माण करतात.>> हाय मला फार बघायचा आहे परत एक दा. मी पण अलकालाच बघितलेला. फार आव्डीचा पिक्चर आहे. अजूनही फ्रेम बाय फ्रेम पाठ आहे. एक गंमत म्हणजे माझ्या दत्तक विधानाची तारीख पण ६ जुन. त्यामुळे तो डेमियन मला माझा भाउच वाटायचा. लई ग्वाड पोरगे. अजून ही काळे कुत्रे, कावळे माझ्या आजूबाजूला असतात तेव्हा द ओमेन ची फार आठवण येते. इट वॉज अ वे टु कोप अप विथ माय रिअॅलिटी. आता मला समजते पण अॅज अ मुव्ही पण फेवरिट. फोटो ग्राफ र ची हत्या. व त्याच्या आईचे अॅबॉर्शन सीन किती भयान क आहेत. ली रेमिक सायंटॉलोजिस्ट आहे. व वडील ग्रेगरी पेक. आमचा लाडका मॅकेन्ना. ओमेन २ पण छान आहे पण एक सर्वात बेस्ट. तेव्हा तर वट्ट पुण्यात असल्याने चर्च डेव्हिल गॉड ह्याशी काहीही संबंध नाही व माहिती पण नव्हती. त्यामुळे फार नॉवेल्टी. आता अभ्राहमीक रिलिजन्स चा अभ्यास करून माहिती मिळवली आहे.
ग्रेगरी पेक माझाही फेवरिट.
ग्रेगरी पेक माझाही फेवरिट. ओरिजिनल देव आनंद.
ऑपेन हायमर बघितला. खरेतर
ऑपेन हायमर बघितला. खरेतर घरातून बाहेर निघायचा आजिबात मूड नव्हता. पण कौन जाने कब बॅन कर देंगे म्हणून आजच संधी आहे बघून घ्या म्हणून गेले. जबरदस्त मुव्ही आहे. किलिअन व रॉबर्ट डावनी ज्युनिअर ह्यांना ऑस्कर घट्ट आहे. मेन रोल व बेस्ट सपोर्टि ग अॅक्टर. मेरी तरफसे तो दिया. मी इतकी रॉबर्ट डावनी फॅन पण मला तो ओळखला पण नाही इतके त्याने रोल मध्ये स्वतःला घातले आहे. ग्रेट कास्टिन्ग.
तो मैत्री णी बरोबरचा सीन मला व्यक्तिशः आवड ला. जीवनात एखाद दोनदा असे प्रेम होते. जे कधी पूर्णत्वास जात नाही पण आपल्याला function at() { [native code] }ईव सूख देउन जाते. एखाद्या जखमे सारखे आपण ते वागवतो. पण बघितले की आनंद पण होतो आतल्या आत. ती नटी पण फार सुपर दिसते. अगदी सुरेख पॅशनेट ओठ आहेत तिचे. खरे तर कामक्रीडेत अनेक भाषा वापरणे हा एक आनंद वाढवायचा
मार्ग आहे. पण आपल्या इथे डोकी भडकायला वेळ लागत नाही सध्या. त्याबद्दल एन्क्वायरी चालू असते तेव्हा त्याला अगदी पब्लिक मध्ये नग्न झाल्याचे फीलिन्ग येते ते ही अगदी नीट दाखवले आहे.
सीन बाय सीन रिव्यु लिहयचा तर लेख मालिका होईल. एक एक मोठ्या घटना एका वाक्यात घेतल्या आहेत. सफाईदार दिग्दर्शन चे सर्टिफिकेट मी देणे म्हणजे काजव्याने सुर्व्यासमोर च्यमकण्यासारखे आहे. संगीत, बॅक ग्राउंड म्युझिक एक दम टॉप क्लास. सर्वांनी एक दम
बेस्ट काम केले आहे. ती मारिआन कोटिलार्ड नाही ते बरे झाले किटीच्या भूमिकेत.
महायुद्धाचा सर्व तोपरी अभ्यास करुन मग हा एक भाग - जिगसॉ पझल चा तुकडा राहिला होता तो परफेक्ट फिट झाला आहे. ऑव्हरऑल ग्रेट मुव्ही. हायझेन बर्ग नील्स भोर नावे ऐकल्यावर एकदम रोमांच उभे राहात होते.
सेप्रेट धागाच येऊ द्या ना.
सेप्रेट धागाच येऊ द्या ना. मजा येईल.
सेप्रेट धागाच येऊ द्या ना.
सेप्रेट धागाच येऊ द्या ना. मजा येईल.>> बाई काढणार होत्या म्हणून गप्प बसले.
ओरिजिनल देव आनंद >> हे वाचून
ओरिजिनल देव आनंद >> हे वाचून पेस्तन काकांचा हंड्रेड परसेंट तुकाराम आठवला.
मी इतकी रॉबर्ट डावनी फॅन पण
मी इतकी रॉबर्ट डावनी फॅन पण मला तो ओळखला पण नाही इतके त्याने रोल मध्ये स्वतःला घातले आहे. ग्रेट कास्टिन्ग.
>>>अगदी अगदी, मी तर आवाजावरून ओळखले आधी. मी पण जबरदस्त फॅन आहे त्याची. त्याचे डोळे फार बोलके आहेत.
ती नटी पण फार सुपर दिसते. अगदी सुरेख पॅशनेट ओठ आहेत तिचे. >>>
Florence Pugh ब्लॅक विडो मधे स्कार्लेटची धाकटी बहीण आणि लिटल विमेन मधे एमी मार्च होती. ती कामही उत्तम करते. असे तिखट -पॅशनेट रोल तिला फार शोभून दिसतात. अतिशय सुंदर वगैरे नाही पण Strong screen presence मुळे कमालीची आकर्षक वाटते.
मस्त लिहिलंय अमा आणि रघु
मस्त लिहिलंय अमा आणि रघु आचार्य.
Pages