चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हे परत मिळालेलं लँड झालेलं विमान चालवत कोण होतं?पायलट सांगाडा होता, विमान ऑटो पायलट ला होतं की जिवंत होता तो?

दुसऱ्या विमानात सगळे सांगाडे होते. आज तक चा क्राईम रिपोर्टर शम्स युट्यूबवर आहे. त्यात डिटेल स्टोरी आहे. आता नीट आठवत नाही. पण त्याने फॅक्टस चेक केले होते.

पॅन अॅम च्या या विमानातले सगळे जिवंत होते. सिनेमात पण तसेच घेतले आहे.

दोन्हीही कथा अफवा वाटतात.

बर्म्युडा ट्रँगल मध्ये गायब होणारी जहाजं अजून रहस्य आहे.विमानं कोणत्यातरी अति मॅग्नेटिक झोन मध्ये वीज पडत असताना सापडली आणि त्यांना वेळ गोठवता आली असं संशोधन पुढेमागे होऊही शकेल.

सोनी लिव्हचं सबस्क्रीप्शन नाहीये. सध्या झी ५ वरचे पेंडिंग चित्रपट बघायचेत. पण मुहूर्तच लागत नाही.

धकाधकीच्या या जीवनात डोकं न शिणवणारा एखादा मनोरंजक पण वेगळा चित्रपट पहायला मिळावा एव्हढीच माफक अपेक्षा आहे.
जत्रेत दोन भाऊ हरवतात. त्यातला एक पोलीस होतो तर दुसरा चोर. यात वेगळेपण म्हणजे दोघे एकमेकांसारखे दिसायला नसतात. त्यांचे आवाज सुद्धा वेगवेगळे असतात. विशेष म्हणजे त्यांच्या खांद्यावर कोणताही तीळ नसतो किंवा बचपनका गोंदवण सुद्धा नसते. तरीही ते एकमेकांना ओळखत असतात.

मध्यंतरापर्यंंत प्रेमकहाण्या वगैरे झाल्यावर लक्षात येतं कि जो चोर आहे तो खरा चोर नसून चोराच्या वेशातला पोलीस आहे आणि जो पोलीस आहे तो पोलिसात राहून एका देशद्रोही सिंडीकेटचा एजंट आहे. इथून पुढे दोघा भावात संघर्ष सुरू होतो. पण... इथे ट्विस्ट आहे.

दोघेही मायबोलीवर येतात आणि इथल्या राजकीय धाग्यांवर मतं मांडू लागतात. एक शिवसेनेचा असतो आणि एक भाजपाचा. दोघांमधे बिनसते. मग शिवसेनेचा जो असतो तो आधी राष्ट्रवादीला शिव्या देत असतो तो आता तिकडे जाऊन भाजपला शिव्या देऊ लागतो. त्यामुळे भाजपवाल्या भावाला राग येतो. आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा भाऊ यांची गाढ मैत्री होते. पण भाजपवाला भाऊ राष्ट्रवादीला आपल्या सोबत आणतोच शिवाय शिवसेनेतले त्याचे साथीदार आपल्याकडे आणतो.

यामागे सिंडीकेटची खोकी असतात असा शिवसेनेतल्या भावाला संशय असतो. आता असे उघड होते कि जो पोलीसात सिंडीकेटचा एजंट असतो तो खरे तर सिंडीकेटची माहिती काढायलाच त्यांचा एजंट झालेला असतो तर जो चोर खरा तर पोलीस असतो , तो चोराचे काम करताना चोरांसाठीच काम करायला लागलेला असतो. तो पोलिसांना धोका देत असतो...

आता यातला शिवसेनेचा कोण आणि भाजपचा कोण हे प्रेक्षकांना शोधून काढायचे आहे. ते दुसर्‍या भागात उघड होईल.

र.आ. Lol ते धरमवीर मधल्या बाळ एक्स्चेंज सारखे झाले. पण इथे सौदागर अँगल पण हवा. म्हणजे सेना व भाजपवाले भाऊ जो काय गोधळ घालतात त्या "मायक्रोइकॉनॉमिक कंडिशन्स" व्यतिरिक्त काही "मॅक्रोइकॉनॉमिक फॅक्टर्स" असतात. म्हणजे त्या त्या वेळेस सेना व भाजप पक्षांचे एकमेकांत गळ्यात गळे आहेत की ते हाडवैरी आहेत यावर सुद्धा गुंतागुंत वाढते.

सौदागर अँगल म्हणजे नेत्यांची दिलजमाई झाली तरी कार्यकर्त्यांपर्यंत ते न पोहोचल्याने त्यांच्यात मारामारी चालूच राहते. मग दिलजमाई झाली हे कळाल्यावर कड्यावरून कोणाला तरी फेकायला निघालेला मग त्यालाच हात देऊन आजा मेरे भाई करत वर काढतो.

सौदागर अँगल म्हणजे नेत्यांची दिलजमाई झाली तरी कार्यकर्त्यांपर्यंत ते न पोहोचल्याने त्यांच्यात मारामारी चालूच राहते. मग दिलजमाई झाली हे कळाल्यावर कड्यावरून कोणाला तरी फेकायला निघालेला मग त्यालाच हात देऊन आजा मेरे भाई करत वर काढतो.
>>> Lol Lol

"मायक्रोइकॉनॉमिक कंडिशन्स" व्यतिरिक्त काही "मॅक्रोइकॉनॉमिक फॅक्टर्स" असतात. >>> Lol

नेत्यांची दिलजमाई झाली तरी कार्यकर्त्यांपर्यंत ते न पोहोचल्याने त्यांच्यात मारामारी चालूच राहते. मग दिलजमाई झाली हे कळाल्यावर कड्यावरून कोणाला तरी फेकायला निघालेला मग त्यालाच हात देऊन आजा मेरे भाई करत वर काढतो>> हे एकदम भारी होतं Lol

लेफ्ट बिहाईंड नावाचा निकोलस केजचा सिनेमा पाहिला. बहुतेक कुणीच पाहिला नसेल. देऊळबंद्चा हॉलीवूडी अवतार आहे. Lol

मागे तीन महीने समुद्रावर असंख्य इंग्लीश सिनेमे पाहिले होते. तेव्हां हॉलीवूडचा कचरा सुद्धा लक्षात आला होता.
थोडक्यात हे सगळीकडे सारखेच !

Tau इंग्रजी नेटफ्लिक्सवर.
एक स्त्री-ज्युलीया, तीच्या घरातून किडनैप होते..डोळे उघडते तेव्हा एका घरात असते जे AI ने कंट्रोल केले जातेय..तिथून बाहेर पडण्यासाठी Tau नावाच्या मशिनची मदत घ्यायच्या वेगवेगळ्या युक्त्या ज्युलीया लढवतेय..ती बाहेर पडू शकेल कि नाही पहा सिनेमात.
चांगला आहे..

२.Bird box barcilona नेटफ्लिक्सवर spanish- इंग्रजी.
जे काय आहे ते क्रिएचर बघितलं कि माणूस सुसाईड करतो..सेम कन्सेप्ट बर्ड बॉक्स सारखी, मांडणी वेगळी.
हॉरर,थ्रीलर,वायोलंस सिनेमा.

३.Deep थाई सिनेमा नेटफ्लिक्सवर.
चार मेडिकल स्टुडंट्स पैसे मिळताएत म्हणून एका रिसर्चसाठी स्वतः वर एक्सपीरीमेंट करू द्यायला तयार होतात..नंतर नंतर गोष्टी कंट्रोल च्या बाहेर व्हायला लागतात आणि हि मुलं त्या प्रयोगातून बाहेर पडू शकतात का ? पहा सिनेमात..
बोअर आहे..थ्रीलींग नाही.. नाही बघितला तरी चालेल.

सत्यप्रेम कि कथा बद्दल इथे कुणीच काही बोललेलं नाही. हा चक्क सुपरहिट झाला आणि थेटरातून उतरला सुद्धा. आता ओटीटीवर येईल.

हा सिनेमा नाही पण नेफ्ली वरची कोहरा सिरीज एकदम मस्ट वॉच आहे. दोन्ही प्रोटॅगॉनिस्ट सुरूवातीपासून शेवटपर्यंत जबरदस्त ग्रिप ठेवतात. बलबीरचा चेहरा नि विशेषत: डोळे एकदम त्याच्या रोलसाठी सूट होतात. हताश झाल्याचे, वैफल्याचे, सहानुभूतीचे फिलिंग एकदम जेन्युईन वाटते. ह्याउलट गारुंडीचे पात्र साईड किक पासून सुरू होऊन एकदम आपलेसे करते. एकदम सरळसोट कॅरॅक्टर म्हणून सुरू होऊन शेवटी मस्त घडवत नेले आहे. शेवटी तो ' वर्दी उतार दी तो खेती करूंगा' किंवा 'सॉरी यार' म्हणतो ते एकदम मनापासून आल्यासारखे वाटते. कथा, पटकथा कदम घट्ट बांधली आहे नि खूनामागचा एक एक धागा उलगडत जाताना कथेला नवीन नवीन वळणे दिली आहेत. नुसता खुनाचा तपास ह्यावर फोकस केंद्रित न करता दोन्ही कॅरॅक्टर्सच्या बॅक स्टोरीज - त्यांचा पास्ट, करंट उलगडत जातात - त्या तेव्हढ्याच पकड घेणार्‍या आहेत. पोलिस ब्रूटॅलिटी हा भाग पण त्यावर कसलेही भाष्य न करता समर्थपणे हाताळला आहे. एकाच वेळी त्याची 'चीड येणे' नि 'जरुरी असणे' दोन्हीही जाणवते.

कर्मचारी : "सर, तुम्ही या वर्षीही मला प्रमोशन दिले नाही. मिस उफाडकरांनाच पुन्हा प्रमोशन ? कामात तर शून्य आहेत. माझ्यात काय कमी आहे ?"
बॉस : "कमी ? अरे मायबोलीवरच्या चिकवा धाग्यावर कसले कसले सिनेमे आवडतात म्हणून लिहीलंस लेका तू ? कसली हीन अभिरूची ही ? आणि प्रमोशन पाहिजे ? मिस उफाडकर बघ, तिला दर्जेदार सिनेमे आवडतात मग का नको देऊ प्रमोशन ?"
कर्मचारी :" पन सर, किमान इन्क्रीमेंट तरी द्यायचं ना ?"
बॉस : " अरे ते दिलं असतं. पण वेबसिरीजच्या धाग्यावरच्या तुझ्या पोस्टस पाहिल्या, आणि तुला पगार तरी का द्यावा असे वाटू लागलेय"
कर्मचारी : "सर असं असेल तर मायबोली सोडून जातो"
बॉस : " आणि मग तुझं मूल्यमापन कशाच्या जोरावर करू ? एक वेळ कंपनी सोडून गेलास तर बेहत्तर, पण मायबोली सोडून गेलास तर खबरदार"

नेफली वरच जास्त चांगलं कंटेटवाईज असतं का, आमच्याकडे नाहीये, सगळीकडे पैसे तरी किती भरायचे, फार बघूनही होत नाही.

मला हल्ली नेफ्लिवर हिंदी सिरिज वगैरेच जास्त दिसतायत. आणि कोरियन. इंग्लिश वेचून काढावं लागतंय.

सिंगापुर मँचेस्टर सिंगापुर विमानात बरेच सिनेमे बघितले.
ऑटो - प्रचंड आवडला.
किंग्स स्पीच - ऍक्टिंग एक नंबर. लंडन मध्ये फिरताना ह्या राजाचा पुतळा आणि स्टोरी ऐकली होती सो कनेक्ट झाला.
HIT - राजकुमार राव ठीक आहे.
एलिझाबेथ राणीवरची एक डॉक्युमेंटरी पण छान होती.
Smile- थ्रिलर - वन टाईम वॉच
Darkest hour - Churchill वरचा सिनेमा. डायलॉग्स फार छान आहेत. शेवटचं भाषण एकदम मस्त.
किंग चार्ल्स 3- सुरू केला होता पण नंतर कंटाळा आला.
अजुन एक दोन बघितले पण आता नावं लक्षात नाहीत. Happy

मी मागच्या आठवड्यात प्राईम वर तुंबाड बघितला, बरेच दिवस बघायचा होता, आवडला. शेवट फार आवडला, दुसरा सिझन वगैरे नको यायला, केला तो शेवट योग्य आहे.

अंजु +1

काल तमाशा पाहिला
रणबीर दीपिका
सुरुवातीला उगाच भारी पिक्चर बनवायचा आव आणून बोअर करणारा वाटला...
पण कथेला पाहिले वळण मिळताच कसला भारी पिक्चर वाटू लागला. माझ्या पर्सनल लाईफमधील एक मोठे स्ट्रेस त्याने दूर केले असे पिक्चर संपल्यावर वाटले..
पुन्हा बघेन न बघेन.. पण काल हा पिक्चर बघायची बुद्धी देवाने दिली त्याबद्दल आभार..

ओपनहाईमर, थिएटरात पाहीला. सुंदर दिग्दर्शन. किटी, ओपनहाईमरची पत्नी त्याच्याशी स्टाउंच लॉयल दाखवली आहे. तिचेही कॅरॅक्टर आवडले. मॅट डॅमनचे काम आवडले. ओपनहाईमर झालेल्या नटाचे तर सुंदरच. मॅट आल्यानंतर चित्रपट वेगवान होतो.

(चुकून जुन्या धाग्यावर टाकला)७
ओपनहायमर बघितला. मस्त सिनेमा. स्क्रीनचा वरचा आणि खालचा भाग आमच्या स्क्रीनमध्ये क्रॉप केला होता (स्मोकिंग इज इंज्युरियस टू युअर हेल्थ पट्टीचा फक्त वरचा पांढरा भाग दिसत होता त्यावरून समजले) तरी सिनेमा दृष्यांदवारे (आणि आवाजाने) चांगलाच परिणाम करत होता. आयमॅक्स मधला अनुभव अनेक पटींनी भारी असेल. खालच्या पट्टीतले सबटायटल गेल्याने मी धसावलो होतो. पण बोललेले काहीच समजले नाही असे जास्त वेळेस झाले नाही.

नोलनचा सिनेमा आहे म्हणल्यावर narrative flow सरळसोट नसणार हे आलेच. इथेही नाही. तरीही नोलनच्या मनाने फ्लो समजण्यास सोप्पा होता. कास्ट खूप भारी आहे. लहान सहान भूमिकांसाठी कित्येक मोठी मोठी नावे आहेत.

आणखी उत्सुकता असणाऱ्यांनी American prometheus हे पुस्तक वाचावे. पुस्तकं कितीतरी तपशिलात जाणारे आहे

>>> आणखी उत्सुकता असणाऱ्यांनी American prometheus हे पुस्तक वाचावे.
येस, तेच डोक्यात आलं - ऑडिबलवर आहे! नोलनचे सिनेमे सहसा आवडतात, पण हा थिएटरवर्दी आहे का, की स्ट्रीमिंगवर यायची वाट बघू?
(तोवर पुस्तक ऐकून अभ्यासही झालेला असेल! Proud )

ओक्के सर! Happy

धन्यवाद कॉमी.
आयमॅक्सची तिकिटं हा आख्खा आठवडा फुल्ल आहेत. तितका थांबायचा पेशंस धरवेल असं वाटत नाही. त्यामुळे आता साधाच बघावा लागेल.

‘ओपेनहायमर’ - हा चित्रपट इतिहास कम बायोपिक आहे. तुम्हाला हायझेनबर्ग, बोहर, फर्मी यांच्याविषयी इंटरेस्ट असेल, मॅनहटन प्रोजेक्ट, लॉस अलमॉस विषयी थोडीफार माहिती असेल तर पिक्चर लगेच पकड घेतो. ज्यांना माहिती नसेल त्यांनाही बघायला आवडेल पण कदाचित छोट्या छोट्या प्रसंग व संवादांचे महत्व समजणार नाही.
स्पॉयलर अलर्ट
ओपेनहायमरची प्रोजेक्ट डिरेक्टर म्हणून नेमणूक ते पहिली यशस्वी नियंत्रित अणूचाचणी इथपर्यंत आपण या सगळ्या शास्त्रज्ञांबरोबर अक्षरशः जगतो. त्यांना पडणारे प्रश्न, हेवेदावे हे आपले वाटत राहतात.
यासाठी व चाचणीचे चित्रीकरण यासाठी क्रिस्तोफर नोलानला १००% दाद द्यायला हवी. मॅकार्थी एराविषयी ऐकून होते त्याचे चित्रीकरणही इफेक्टीव आहे.

शीर्षस्थ भुमिकेत किलीअन मर्फीने वाईड आईड शास्त्रज्ञ ते यशस्वी व प्रसिद्ध प्रोजेक्ट डिरेक्टर हा ग्राफ चांगला मांडला आहे. आहे. मॅट डेमन, रॉबर्ट डाउनी जुनिअर यांचीही कामे चांगली झाली आहेत. एमिली ब्लंटने छोट्याश्या भुमिकेत चांगली साथ दिली आहे.

मी गेले त्या शोला थिएटर बरेचसे रिकामे होते. अर्थात ख्रिस्तोफर नोलान व ओपेनहायमर हे कॉंबिनेशन सर्वांसाठी नाही. ज्यांना इंटरेस्टींग वाटतं त्यांनी जरूर जा, निराशा होणार नाही.

ओपेनहायमर ३डी मधे नाही बघितला तरी चालेल, कारण ३डी स्पेसिफिक दृश्यं मोजकीच आहेत. अर्थात जी आहेत ती २डीमधे एवढी टेरिफिक आहेत तर ३डी अफाट असतीलच.

जान्हवी कपूर आणि शिखर धवनचा बवाल पाहिला का कोणी?
प्राईमवर..
चांगला आहे असे एका दोघांकडून ऐकलेय..

Pages