चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मी स्क्विड गेम्स पाहिले नाहीये, पण द प्लॅटफॉर्म पाहिला आहे. भारी आहे तो सिनेमा.

मृणाली, प्लॅटफॉर्म बघेन.
प्राईम वर तारा व्हर्सेस बिलाल शोधल्यावर काय आले बघा.आणि पोस्टर बॉईज शोधल्यावर अजूनच भलते..हा अल्गोरिदम माझ्या समजेबाहेरचा आहे Happy
Screenshot_2023-07-07-16-08-23-684_com.amazon.avod_.thirdpartyclient.jpgScreenshot_2023-07-07-15-59-36-557_com.amazon.avod_.thirdpartyclient.jpg

लस्ट स्टोरिज भाग 2 बघितला. पहिल्या दोन गोष्टी बऱ्या आहेत, शेवटच्या दोन गोष्टी भंकस आहेत.

मृणाली आणि ललिता दोन्ही सिनेमे लिस्टीत टाकतो. धन्यवाद. >>> तूम्ही बघितलाय कि प्लॅटफॅार्म, दोन वर्षापूर्वी Happy पुन्हा बघू शकता पण मला आठवले म्हणून सांगितले : ) मेटॅफरंच मेटॅफरं आहेत त्यात.

ओह्ह. हो! Lol आत्ता ट्रेलर बघितल्यावर आठवला. परत नाही बघवणार. आत्ताच पोटात ढवळू लागलंय!

मला लस्ट कथा क्र. 2 ठीक वाटली.
शेवटी सूचकपणे थ्रीसम दाखवला असता तर खरंच धक्का बसला असता.>>> They were already having a threesome. Not everything has to be physical. Malkin was happy to be a voyeur. She got sufficient kick in it without having a real partner and the baggage that comes with it. Bai loved being an exhibitionist. This charade was only working while they were both pretending to think the other person is unaware that 'they know'(शिवाय क्लास डिफरेन्स वगैरे आहेच). बाईच्या नवऱ्याला माहित असतं तर तो conscious होऊन अपेक्षित 'शो' देऊ शकला नसता. तर पालीने घाण करेपर्यंत सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. त्यानंतर त्या(मोस्टली बाई) बावचळून एकमेकींना अद्वातद्वा बोलतात but neither of them meant it. बाई लिबिडीनस असते हे सुध्दा बरोबर नाही. सुरवातीला हे केवळ तिच्या घरात एकांत मिळत नसल्यामुळे चाललेलं असतं हे एका शॉटमधून क्लियरली दाखवलं आहे.
बाकीच्या कथा फालतू आहेत हे सांगणाऱ्यांचे धन्यवाद. वेळ वाचला.

बाईपण बघितला. मै, चंपा, अमित ह्यांच्या रिव्ह्युशी १००% सहमत. वाईट डायरेक्षन आणि स्क्रिप्ट. ६ बहिणींची एकमेंकीशी काहीही केमिस्ट्री नाही, काही बाँडींग, प्रेम, माया नाही. ६ बाया दाखवायच्या म्हणून दाखवल्या आहेत झालं. आणि शिर्षकात बाईपण भारी का आणि पिक्चरच्या स्टोरीशी त्याचा काय संबंध हे ही नाही कळलं.

अमितव , तुमची पोस्ट वाचून पोट धरून हसलो. चार लोकांना ती कॉपी पेस्ट करून पाठवली.

मराठी चित्रपटांसाठी वेगळा धागा आहे तरी बाईपण इथे का?

फेसबुकवर चित्रपटाचे प्रोमोज अक्षरशः आदळताहेत. पैठणीवाले भावजी प्रश्नांत बळंच भारी हा शब्द घुसवतात. वंदना गुप्ते पी जे मारतात.आणि त्यावर सुकन्या मोने हसत सुटतात.

मृणाली, प्लॅटफॉर्म पाहिला.वेगळा अनुभव आहे.बरेच कॉर्पोरेट आणि लीडरशिप लेसन्स आहेत.सुचवल्या बद्दल धन्यवाद. एरवी आवर्जून परदेशी पिक्चर बघण्याची एनर्जी नसते.इथे कोणीतरी सुचवल्याने फॉल पाहिला तो आवडला, आणि आता प्लॅटफॉर्म.
मन घट्ट असलेल्यानेच पहावा. यांच्या पुढे सक्विड(लिहिता येत नाहीये इंडिक वर) गेम आणि हेलबाऊंड अगदी सौम्य वाटले.

भांडवलशाही वर टीका करणारा सिनेमा, पण वेगळ्या दृष्टीने पाहिले तर कॉर्पोरेट व लीडरशिप लेसन्स मिळतात Happy
इंटरप्रिटेशनला भरपूर वाव ही चांगल्या सिनेमा/पुस्तकं/सिरीज/गाणे ह्यांची खूण असते.

अनु, अल्गोरिदम>>> Lol
मला नेहमी जे हवं ते सापडवतात प्राईम, नेटफ्लिक्सवाले वगैरे, अजून असा अनुभव आला नाही Happy
प्लॅटफॉर्म.
मन घट्ट असलेल्यानेच पहावा>>>+११

हा अल्गोरिदम माझ्या समजेबाहेरचा आहे >>> Lol चॅट जीपीटीकडून योग्य उत्तर "काढून" घेण्याकरता कसे प्रश्न विचारावेत याबद्दल तज्ञ आहेत तसे प्राइममधे "हा" पिक्चर हवा असेल तर "तो" शोधा असे तज्ञही असतील. मला असलेच काहीतरी गेसवर्क करून शोधावे लागले होते. पद्मावत नावावरून शोधला की पद्मावत उत्तरांत येत नाही पण बाजीराव मस्तानी नाव वापरून शोधला की येतो असे काहीतरी लक्षात आहे.

पैठणीवाले भावजी प्रश्नांत बळंच भारी हा शब्द घुसवतात. वंदना गुप्ते पी जे मारतात.आणि त्यावर सुकन्या मोने हसत सुटतात. >> Happy Happy

एकदरित "बाई पण" काय भारि नाही असा निष्कर्ष निघतो अस म्हणाव का!!
अमा छान दिसताय..
ते मन्गळागौरीच गाण ,कप्डेपट, लुक छान जुळवल असल तरी गाण्यात मध्यभागी (कमरेच्या खाली) कणभरही न हलता न येणार्‍या रोहिणीला ठेवलय... या बहिणीपेक्षा(दिपा परब सोडून पण तिच्यावर कॅमेराच जात नाहि फारसा ) बाकिच्या साइड डान्सरच उत्तम डान्स करतायत, ज्या थिम भोवती आक्खा पिक्चर फिरतो त्यातल्या मेन इव्हेन्टला इतका लो परफॉर्मन्स???

घरात बायको सोडून बाकि सर्व (महिला) जाऊन आल्या. सर्वांना आवडलाय. आमच्या जुन्या सोसायटीत तर दोन दोनदा बघताहेत बायका. तिकडची गंमत म्हणजे सर्वप्रांतीय महिलांच्या उड्या पडल्यात. परांजपे, कुलकर्णी, पाटील, मग शेट्टी, देसाई, हातवळणे, उधास, शर्मा इत्यादी. कुणी ठरवून नव्हते गेलेले. पण तिथे सगळ्या सोसायटीचं गटग झालं. खालीच चरण्याचे कुरण सुद्धा आहे. Proud

सोमवारी सासू सून (आई आणि बायको) जाणार. आईचा ही दोनदा होणार. वंदना गुप्तेची फॅन आहे ती. आमच्या सोसायटीत सांगली, सातारा, कोल्हापूर वरून आलेले जोडे जास्त आहेत. त्यांना शनिवार, रविवार तिकीटं मिळाली नाहीत. आता बहुतेक या सोसायटीचं गटग सोमवारी होणार असं दिसतंय.

मी, माझा मुलगा, दोन्ही भाऊ या सर्वांनी नम्र नकार दिला. १९२० भूत आता बघायचा होता. पण तो गेला आता. इंडीयाना मधे सगळेच वयस्कर आहेत. सलमान पेक्षाही.

तर जुना पकाऊ सुचवा एखादा.

प्राजक्ता, हे बरोबर आहे.
मंगळागौरीचे खेळ पिक्चरमधे दाखवलेले आहेत, नाही असं नाही. पण प्रत्यक्ष स्पर्धेतला परफॉर्मन्स हा फक्त एका गाण्यापुरता दाखवलाय. ते मलाही खटकलं, पण त्याने खूप काही बिघडलंय असं नाही.

Indiana Jones and the dial of destiny
चांगला आहे. लोकांना अतिशय वगैरे आवडतोय यात नॉस्टॅल्जियाचा भागच जास्ती असावा. स्वतंत्र कलाकृती म्हणूनही बरा आहेच, तरी काही ठिकाणी क्रिंज वाटत रहातो. हॅरिसन फोर्ड 'अवघे पाऊणशे' वयमान असूनही फार चांगला दिसतो. बांधा अजूनही उत्तम. पहिल्या अर्ध्या तासात नाझींना इतिहास बदलण्यासाठी आर्किमिडीजचे ते डायल किंवा टाईम मशीन हवे असते, त्यात AI ने चेहरा तरूण केलेला इन्डी एकदम ग्लोईन्ग कधी खरा कधी खोटा वाटत होता. पण स्पीलबर्गने जे काही होतं ते सफाईदार दाखवलं आहे. कथेचा काळही साठच्या दशकातील आहे. बरेच निरपराध लोक मरून हे पाचव्या मिनिटाला चिल करतात, खासकरून त्याची यातली जी गॉड डॉटर आहे ती. जरा जास्तच कूल आहे ती. ॲन्टोनिओ बॅन्डॅरस दिसला छोट्या रोलपुरता. क्रश होताच एकेकाळी, आता मला ओळखायला आला नाही.

शेवटी गुहा, पोर्टल, नेहमीचे जाळं, पाण्यात पडून प्रवाहासोबत जाऊन योग्य ठिकाणी धडकणं वगैरे करत काळप्रवास करून परत येतात. सुरवातीला अंडरग्राऊंड सबवे ट्रॅक्सवरून यावयात घोडा घेऊन 'टुगडुक-टुगडुक' केलेलं आहे. नुसतं टुगडुकच नाही तर प्लॅटफॉर्म वरून ट्रॅक वर, या ट्रॅकवरून त्या ट्रॅकवर घोड्यासहीत वेड्यावाकड्या उड्या मारलेल्या बघून थोडं अ आणि अ आणि जुना चार्म/नॉस्टॅल्जिया टिकवण्याचा आटापिटा वाटला. पहिला अर्धा तास रेंगाळतो व नंतर पकड घेतो. एकुण चांगला आहे. सोबत एक छोटा मुलगा व एक तरूणी यांचा नियम पाळला आहे. हे कथानक अडकलं आहे, नेहमी काळाच्या मागचे उत्खनन असते. त्यामुळे थोडं जुनाट वाटतं. याच जॉन्राचे
लारा क्राफ्ट वगैरे सारखे सिनेमे यामानाने मला उजवे वाटतात. हा डोरा द सिटी ऑफ गोल्ड व लारा क्रॉफ्ट यांच्या मध्ये कुठेतरी येतो.

बाईपण भारी देवा पाहिला. आवडला.. एकदा पाहायला हरकत नाही. सगळ्या कलाकारांचा अभिनय छान आहे.. थेअटरमध्ये बायकांचीच खूप गर्दी होती.. आचार्य म्हणतात त्याप्रमाणे इतर भाषिक स्त्रिया सुद्धा चित्रपट पाहायला येताहेत.. आणि चित्रपट संपल्यावर सगळ्याजणी मस्तपैकी हॉटेल वारी सुद्धा करताहेत..माझी साऊथ इंडीयन मैत्रिण होती सोबत.. चित्रपटाच्या पोस्टर जवळ गटागटाने फोटो काढून घेत बायका मस्त enjoy करत होत्या. मी काही अपवाद नव्हते.. मी सुद्धा काढले फोटो.. एक मात्र जाणवलं.. शक्यतो चित्रपट न पाहायला जाणाऱ्या काही ओळखीतल्या स्त्रिया देखील ठरवून ग्रुपने चित्रपट पाहायला आल्या होत्या.. बरं अजून एक म्हणजे बायका एकमेकींत म्हणत होत्या की, पुरुषांनी पण हा चित्रपट पाहायला पाहिजे..

पण प्रत्यक्ष स्पर्धेतला परफॉर्मन्स हा फक्त एका गाण्यापुरता दाखवलाय. ते मलाही खटकलं, पण त्याने खूप काही बिघडलंय असं नाही>>>+१

Chopsticks, हिंदी, नेटफ्लिक्सवर.
नायिकेची नवी कोरी सकाळी घेतलेली आय-१० कार संध्याकाळी चोरीला जाते..पोलिसांकडून मदत मिळेल कि नाही या शंकेतून, ती एका चोराचीच मदत घेते कार शोधायला..एक बकरीप्रेमी गैंगस्टर आणि त्याचा बाहुबली नावाचा बकरा आणि गमतीजमती बघा सिनेमात..
हलकाफुलका सिनेमा... तरीही चार शिव्या का घुसवल्यात मध्येच कुणास ठाऊक..बरा आहे सिनेमा.

आदेश बांदेकर सोबत च्या गप्पांमधे वंदना गुप्ते, सुकन्या प्रमोशन ला आल्यात त्यात वंदना म्हणतात मला लग्नापुर्वी सासू सासरे बघायला आलेले असताना गाणं म्हणायचा आग्रह झाला तर मी पाडाला पिकलाय आंबा गाणं म्हटलं..

मला तर लख्खंपणे कांदे पोहे धागाच आठवला Uhoh त्यात सेम कुणितरी हा किससा लिहिलाय की..य वर्षांपुर्वी ....

ट्विटर वर एक बार्बेन हाय्मर नावाचे मीम पाहिले.

ट्वी टर वर बार्बी/ ओपन हायम र चे टीशर्ट विकत आहेत असे ट्विट आले तर क्लिक करू नका तो स्कॅम आहे असे लेकीने सांगितले आहे. सो वॉच आउट.

ते बाईपण भारी म्हणजे 'अवघड ' या अर्थाने घेतलंय , मस्त या अर्थाने नाही इति माझा तर्क. खाली इंग्लिश सबटायटल्स tough असा शब्द दाखवत होते म्हणून वाटलं. बाकी चित्रपट आवडला, दोन तास करमणूक म्हणून बघायला अजिबात वाईट नाही.

ते बाईपण भारी म्हणजे 'अवघड ' या अर्थाने घेतलंय , मस्त या अर्थाने नाही इति माझा तर्क.
>>>>

अच्छा
हे लक्षातच नाही आले. असेच असू शकते.

झी ५ वर तरला दलाल पाहिला. टीपिकल बायोपिक आहे पण एकदा पाहायला चांगला वाटला.. मुख्य म्हणजे एकही रेसिपी डिटेल नाही दाखवली किंवा छान छान रेसिपी चे चित्रण नाहीं यात.. तरला दलाल चा मूवी आहे पण रेसिपी चं detailing च missing आहे.
हुमा कुरेशी चा अभिनय छान आहे. पण नवरा बायको ची जोडी इतकी काही सूट होत नाही मूवीत.ती खूपच उंच दिसते त्याच्या समोर..

Pages