Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हा थिएटरवर्दी आहे का >> मी
हा थिएटरवर्दी आहे का >> मी बघितलेला नाही. पण अणुबॉम्ब फुटताना (सॉरी, स्पॉयलर) छोट्या स्क्रीनवर बघितला तर तो लवंगी वाटेल ना? थिएटरवर यायची वर्दी देऊन टाक असं परस्पर उंटावरून सांगतो.
नोलनच्या मनाने फ्लो समजण्यास
नोलनच्या मनाने फ्लो समजण्यास सोप्पा होता >> हेच मनात आहे सिनेमाचे ट्रेलर पाहिल्यापासुन, की समजायला सोपा असेल का? कॉमी, तुम्ही सांगितलंत बरं झालं. असो, गावातले रेकॉर्ड ब्रेकिंग टेम्परेचर कमी झाले की घराबाहेर पडणार सिनेमा पहायला. (तरीही गावातले शो भरले आहेत).
जान्हवी कपूर आणि शिखर धवनचा
जान्हवी कपूर आणि शिखर धवनचा बवाल
>>
वरून धवन
बवाल, पंधरा मिनिटं पाहिला..
बवाल, पंधरा मिनिटं पाहिला...पुढं पाहणार नाही.. जान्हवी कपूरची ऐक्टिंग बघवत नाही तशीपण..
फर्मी यांच्याविषयी इंटरेस्ट
फर्मी यांच्याविषयी इंटरेस्ट असेल >> एन्रिको फर्मी बद्दल इंटरेस्ट आहे.
जान्हवी कपूर आणि शिखर धवनचा
जान्हवी कपूर आणि शिखर धवनचा बवाल पाहिला का कोणी?
प्राईमवर..
चांगला आहे असे एका दोघांकडून ऐकलेय.. -
>>> चांगला आहे... जानवी ने वरून ला कच्चा खाल्लाय ऍक्टिंग मध्ये...
ओपनहायमर थिएटरमधेच बघायचा
ओपनहायमर थिएटरमधेच बघायचा पिक्चर आहे. तुमचं होम थिएटर अंबानीसारखं असेल तर गोष्ट वेगळी…
जानवी ने वरून ला कच्चा
जानवी ने वरून ला कच्चा खाल्लाय ऍक्टिंग मध्ये... >>> कच्चं कसं खातात ?
ला नावाचे पुल्लिंगी फळ आणायचे
ला नावाचे पुल्लिंगी फळ आणायचे. आणि त्याला वरच्या बाजूने तसाच खायचा.
(No subject)
काल टिव्हीवर डियर जिंदगी
काल टिव्हीवर डियर जिंदगी पाहिला. माझा ऑल टाईम फेवरेट सिनेमा. पूर्वी थिएटरमधे पाहिला होता. टिव्हीपेक्षा त्यावेळेस अजून जास्त छान वाटलेला.
प्रत्येक फ्रेम न् फ्रेम आवर्जून दखल घ्यावी अशी आहे. रंगसंगती, फर्निचर, कपडे यावर जाणीवपूर्वक लक्ष दिलेय.
एकदा तर मी फक्त फर्निचरसाठी हा बघणार आहे.
अलिया खूssssssssssप गोड दिसलीय. कुठेच अॅक्टींग करतेय असे वाटत नाही, ती कायराच वाटते.
कधीही कुठेही बघावा असा सिनेमा..
काल टिव्हीवर डियर जिंदगी
काल टिव्हीवर डियर जिंदगी पाहिला. माझा ऑल टाईम फेवरेट सिनेमा. पूर्वी थिएटरमधे पाहिला होता
>>>>>>>>
अशक्य योगायोग..
मी सुद्धा काल हा Netflix वर पाहिला.
आणि मी सुद्धा या आधी हा थिएटरला पाहिला होता. ते सुद्धा एकटाच गेलो होतो.
आणि हो काल मला हा पिक्चर
आणि हो काल मला हा पिक्चर जास्त आवडला.
त्यातले शाहरूख आलियाचे सगळे सीन भारी गोड झालेत. ते सेपरेट करून पुन्हा पुन्हा बघावेत आणि ऐकावेत असे आहेत.
Hi i have written a review of
Hi i have written a review of this movie . Please read and write there also
अमा, डियर जिंदगी का?
अमा, डियर जिंदगी का?
नाही सापडला तुमच्या लेखनात..
बवाल बघितला शेवटी, हिंदी
बवाल बघितला शेवटी, हिंदी ,प्राईमवर
स्टेटसच्या मागे असलेला हायस्कूल टिचर, गावातल्या सुंदर,हुशार मुलीशी चारचौघात मिरवायला म्हणून लग्न करतो..लग्नाच्या दिवशी तीला फिट्स येतात.. तिथूनच त्यांचं नातं फिस्कटतं.. जान्हवी कपूर भयंकर अभिनय करते..वरूण धवन सगळ्या सिनेमात सारखीच ऐक्टिंग करतो..विनोदी असो वा गंभीर..
एका सीनमध्ये जान्हवी कपूर त्याला लेक्चर देते कि लोकं कसे असमाधानी असतात..लोकांना फक्त मिरवायचं असतं वगैरे..पुढच्याच सीनला स्वतः ही तेच करते..काय ते पहा सिनेमात..
हायस्कूल विद्यार्थ्यांकडे शाळेत स्मार्ट फोन्स असतात.
दुसऱ्या महायुद्ध विषयाबद्दल थोडी माहिती, थोडे सीन्स आहे..एन फ्रैंकचं घर,छळछावणी वगैरे..
कन्सेप्ट/विषय चांगला आहे सिनेमाचा पण बर्याच सिंपल चूका आहेत..ठिक आहे सिनेमा,बघू शकता.
१. The invitation इंग्रजी,
१. The invitation इंग्रजी, नेटफ्लिक्सवर
आई-वडिल कुणीही नातेवाईक नसलेली एव्ही डिएनए टेस्ट करून दुरचे कुणी नातेवाईक शोधून काढते..एका लग्नाला म्हणून नव्या कुटुंबाला भेटायला जाते पण प्रत्यक्षात तिच्या स्वागतासाठी तिथे असतात भयंकर आणि स्ट्रेंज थींग्ज...ठिक आहे सिनेमा..
हॉरर,थ्रीलर.
२.Army of dead नेटफ्लिक्सवर बघितला.
झोंबीपट.. वायोलंस,ऐक्शन सिनेमा.
एकटाच का बघू ?
एकटाच का बघू ?
The Out-Laws - नेटफ्लिक्स वर
The Out-Laws - नेटफ्लिक्स वर पाहिला. टाइमपास आहे. अॅडम सँडलर जॉनरातील स्लॅपस्टिक कॉमेडी आवडत असेल तर बघायला हरकत नाही.
एकटाच का बघू >>>>> ऐश्वर्या
एकटाच का बघू >>>>> ऐश्वर्या राय अभिनीत जीन्स सिनेमातील तमिळ हिरो प्रशांत..दोन तीन सिनेमांनंतर परत पुढे सिनेमांमध्ये दिसलाच नाही तो..
प्रशांथ चं ज्वेलरी स्टोअर आहे
प्रशांथ चं ज्वेलरी स्टोअर आहे मोठं कुठेतरी.
तो अजून एक यांच्या सारखाच दिसतो त्याने आत्महत्या केली मध्ये.(kunala)आणि दुसरा एक अब्बास आहे तो न्यूझीलंड ला पेट्रोल पंप वर काम करतो.
यांच्या मध्ये माझा खूप गोंधळ व्हायचा.
जाह्नवीचा अभिनय असताना वेगळी
जाह्नवीचा अभिनय असताना वेगळी छळछावणी दाखवायची काय गरज होती. कुणालने आत्महत्या केली, बापरे!
-----
ऑपनहायमर बघून आले, सर्वांची कामं उत्तम झाली आहेत. व्यक्तिशः भूतकाळ-वर्तमानकाळ अशा कथेतल्या उड्या मला त्रासदायक वाटतात. तरीही समजला. Are you a commie ? विचारल्यावर मला तुम्ही आठवलात कॉमी .
आईनस्टाईनचे पात्र मुद्दाम डिटॅच वाटले. कोर्टरूम ड्रामा भलता लांबला आहे. मला हिरोशिमा आणि नागासाकी मधला हल्ला दाखवतील असं वाटलं होतं पण न्यू मेक्सिको मधली चाचणी तपशीलवार दाखवली आहे. नंतर फक्त डॉ ऑपनहायमर यांच्या हावभावावरून घटनेची तीव्रता पोचवली आहे. तो असह्य ताण त्याने फार चित्रदर्शी दाखवला आहे. सुरवातीला दिसणारी निरनिराळे दृष्टांत/ व्हिजन्स याने तो इतरांपेक्षा वेगळा आहे हे लक्षात येते. मॅट डेमन मला ओबडधोबड वाटतो पण इथे सूट झालाय. दोन्ही नग्न दृश्यं थोडी अनावश्यक वाटली व तेव्हाच गीतेतले संहारावरचे श्लोक म्हणायचे प्रयोजन कळले नाही. रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरचं कामही अप्रतिम झाले आहे. स्त्रियांना विशेष कामच नाही. एमिली ब्लंटने चांगले काम केले आहे. प्रेसिडेंट त्याला "रडके बाळ" म्हणतो तो सीन व एकंदर गिल्टमुळं कुठेतरी स्वतःलाही नृशंस संहारासाठी जबाबदार मानायला लागतो आणि आपल्या विरोधात साक्ष देणाऱ्यांचा त्याला रागही येत नाही.. तो काहीसा नम्ब होतो, हे फारच चपखल दाखवले आहे.
तेव्हाच गीतेतले संहारावरचे
तेव्हाच गीतेतले संहारावरचे श्लोक म्हणायचे प्रयोजन कळले नाही>>>
तेव्हा नाही पण पहिल्या यशस्वी चाचणीनंतर ऑपेनहायमरने गीतेतला एक श्लोक म्हटल्याचे फार पूर्वी एका मराठी पुस्तकात वाचले होते. हिरोशिमा, नागासाकीच्या संहारावरचे पुस्तक होते ते.
आईनस्टाईनचा शेवटच्या सीनपर्यंत दिग्दर्शकाने एक प्रेमळ म्हातारा करून टाकला आहे. शेवटच्या संवादात चुणूक दिसते आईनस्टाईन काय चीज आहे ते.
दोन्ही नग्न दृश्यं थोडी
दोन्ही नग्न दृश्यं थोडी अनावश्यक वाटली व तेव्हाच गीतेतले संहारावरचे श्लोक म्हणायचे प्रयोजन कळले नाही.>>> हे भारतात कट केले असेल बहुतेक पुढच्या शनिवारी बघेन
हो माझेमन, तसं मधे एकदा चाचणी
हो माझेमन, तसं मधे एकदा चाचणी यशस्वी झाल्यानंतरच्या जल्लोषात व अजून एकदा शेवटी दाखवलं आहे. पण हे भगवद्गीता हातात धरून वाचत %*#$ केलेलं दाखवलं आहे. ही खाजगी दृश्ये तर काल्पनिक असतात, त्यामुळे याचं प्रयोजन कळलं नाही. मला राग वगैरे आला नाही पण , is that really a right time to do this असं मात्र वाटलं.
अस्मिता, लोकांना कधी काय
अस्मिता, लोकांना कधी काय एक्झॉटिक वाटेल याचा नेम नाही…
आणि नोलनचा चित्रपट अख्खाच्या अख्खा समजतोय या आनंदात माझं दूर्लक्षच झालं याकडे.
बाकी @स्वाती_आंबोळे अभ्यास काय म्हणतोय पुस्तकावरचा? आम्ही वाट पाहतोय.
अस्मिता
अस्मिता निरीक्षणे छान, पटली.
नाही भारतात कट नाही केली आहेत. फक्त झूम इन केले आहे बहुदा... नग्न दृश्य नाहीयेत, पण गीतेचा सीन आहे.
बवाल बद्दल म्रुणाल +१ थोडा
बवाल बद्दल म्रुणाल +१ थोडा फार रन्ग दे बसन्ती सारख करण्याचा प्रयत्न केलाय पण मुव्हि ठिकठाकच वाटला, सगळच वरवरच वाटत राहत कुठेही ते आत पोहोचत नाही उगाच आपल काहितरी वेगळ म्हणून वर्ल्ड वॉरचा सदर्भ ओढुन ताणुन आणलाय.
जानुबेबिचा (न) अभिनय पाहुन परत एकदा पु.लची "ढ गोदी" आठवली....जान्व्हवी साक्षात ढ आहे, तिचे डोळे बघुन श्री ची आठवण आली.. अभिनय येत नसला तरी आइविना पोर म्हणून मला तिच्याविषयी उगाच एक सॉफ्ट कॉर्नर वाटतो.
वरुण धवन सगळीकडे सारख्याच पाट्या टाकतो, भारतातल्या शाळेत इतिहासाला वर्ल्ड वॉर वैगरे एवढ डिटेल मधे आहे ? मला जेन्युईम प्रश्न पडलाय.
मृणाली आणि मी अनु, धन्यवाद
मृणाली आणि मी अनु, धन्यवाद माहितीबद्दल.
Submitted by अस्मिता. on 22 July, 2023 - 23:54
Submitted by MazeMan on 22 July, 2023 - 22:46
छान पोस्टस.
आज मुलं आणि बायको गेलेत ऑपनहायमरला. त्यामुळे एकट्याचं राज्य आहे.
चांगलाच मोठा आहे कि , तीन तासाचा इंग्रजी मूव्ही ! डबल जवळपास.
नग्न दृश्ये आहेत म्हटल्यावर काळीज चरकलं. पण आता मुलांपासून काही लपवण्याचा केविलवाणा खटाटोप करण्यापेक्षा विचार न केलेला बरा.
तो अजून एक यांच्या सारखाच
तो अजून एक यांच्या सारखाच दिसतो त्याने आत्महत्या केली मध्ये.(kunala) >> ओह, याबद्दल थोडं गुगलून पाहिल्यावर कळलं की हा त्या दिल ही दिल मे सिनेमाचा हीरो आहे. मूळ तमिळ सिनेमाचं हिंदिकरण केलेला सिनेमा. सोनाली बंद्रे आहे त्यात, आणि माझ्या खूप आवडीचं "ए नाजनीं सूनो ना" हे गाणं आहे, त्या कुणाल ने वयाच्या ३१ व्या वर्षी आत्महत्या केले हे वाचून वाईट वाटलं. अजून एक " इंतेहा हम प्यार का देके राह देखे क्या है नतीजा" हे पण त्यातलच एक. अर्थात A R रेहमान चं music आहे त्यामुळे गाणी सुंदर आहेतच.
Pages