चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सान्वी, अगदी. ती गाणी एकेकाळी फार आवडती होती.

धन्यवाद, आचार्य व कॉमी.
भारतात दाखविली नाहीयेत म्हणजे बरंच आहे, controversial झाली असती.

भारतातल्या शाळेत इतिहासाला वर्ल्ड वॉर वैगरे एवढ डिटेल मधे आहे >>> हो असते. हे सगळं आम्हाला शिकवून का पकवत आहात असा प्रश्न अनेकदा शाळेत पडल्याने हे चांगले लक्षात आहे Happy

आले आले, ओपेनहायमर आयमॅक्समध्ये पाहून आले! डोळे विस्फारून, आ वासून बाहेर आले! कॉमी, तुम्हाला स्पेशल धन्यवाद - थिएटरमध्येच पाहायचा सल्ला दिल्याबद्दल!

माझेमन, हाहा! यावेळी सिनेमा आधी पाहिला - आता मागाहून अभ्यास करणार, पण करणार हे नक्की! Happy

नोलन डझ नॉट डिसअपॉइंट! नीदर डू एनी ऑफ द अ‍ॅक्टर्स!
किलिअन मर्फीने तर कमाल केली आहे! सिनेमाभर त्याचे डोळे आणि प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून त्याचे भारावलेले खांदे काय बोलतात, माय गुडनेस!!
थिअरॉटिकल फिजिक्समध्येच इन्टरेस्टेड आहे म्हणणार्‍या शास्त्रज्ञाने प्रॅक्टिकल जगाचा चेहरामोहराच बदलून टाकणारा प्रोजेक्ट लीड करणं यासारखी आयरनी नसेल!

गीतेतला श्लोकही नेमका उचलला आहे नोलनने!
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धोलोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः।
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः।।११:३२।।

ओपेनहायमर प्रेसिडेन्ट ट्रूमनला भेटायला जातो तेव्हा प्रेसिडेन्ट त्याला नेमकं हेच ऐकवतो! 'इतक्या प्रचंड संहाराचा करविता धनी तू नाहीस, मी आहे. तू युद्धाला उभा राहिला नसतास तरी हे सगळे मेलेच असते!!' आणि ओपेनहायमरच का, खरंतर ट्रूमनच्या जागीदेखील दुसरा कोणीही असता तरी बहुधा घडायचं ते टळलं नसतंच.

ओपेनहायमर सतत अर्जुनासारखाच संदेहाने ग्रासलेला आहे. अर्जुनासारखाच त्याच्या क्षेत्रातील अग्रणी, आणि अर्जुनासारखाच विजयाच्या राखेने तोंड पोळलेला योद्धा! तो हुशार आहे, बहुश्रुत आहे, गीतेपासून दास कापितालच्या तिन्ही खंडांपर्यंत काहीही त्याच्या ज्ञानपिपासेतून सुटलेलं नाही. देशाटने, पंडितमैत्री आणि विविध सभांत संचार केलेला आहे. आणि किंबहुना त्यामुळेच तो त्याचा स्वतःचा धर्म (रिलिजन नव्हे, गीतेत येतो त्या अर्थी धर्म - श्रेयस) निश्चित करण्यासाठी धडपडतो आहे. एका इंटिमेट क्षणी याही दुखर्‍या अंगावरची प्रावरणं गळून पडलेली दिसणं हे नोलनचं कौशल्य!

तो डोळे दिपवणारा सहस्र सूर्यांचा प्रकाश त्याला एकदा दिसतो, आणि मग ठायीठायी दिसतच राहातो. आता त्यापासून सुटका नाही! ही चेन रिअ‍ॅक्शन त्यानेच तर सुरू केली होती!

थँक्यू थँक्यू! Happy
एकदम ओव्हरव्हेल्मिंग प्रकरण आहे हा सिनेमा म्हणजे, आणि सगळ्या खाचाखोचा नीट ॲप्रिशिएट करता येण्यासाठी पुन्हा काही वेळा पाहावा लागेल.
उदाहरणार्थ कुठला काळ/स्टोरीलाइन रंगीत दिसते आणि कुठली कृष्णधवल हा पॅटर्न मला खात्रीने कळला असं म्हणता येत नाही.
मला असं वाटतंय की कालमानानुसार बॉम्बच्या ट्रायलच्या आधीचे प्रसंग कलर्ड आहेत, आणि नंतरचे ब्लॅक&व्हाइट - बहुधा disillusionment दाखवण्यासाठी? - पण हा अंदाज आहे, खात्री नाही. कोणाला आठवतंय का?

बाकी हा सिनेमा ज्या पुस्तकावर आधारीत आहे, त्याचं नाव ‘अमेरिकन प्रॉमिथ्यूस’.
प्रॉमिथ्यूस हे ग्रीक मिथककथांतील एक पात्र. आपल्या भगीरथाने जशी गंगा पृथ्वीवर आणली, तसा याने अग्नी स्वर्गातून चोरून मर्त्य जगात आणला. त्याची शिक्षा म्हणून झ्यूसने त्याला चिरंतन वेदनेचा शाप दिला. त्याला शिळेला बांधून ठेवण्यात आलं आणि रोज त्याचं यकृत त्याच्या जिवंत शरीरातून ओरबाडून काढण्याच्या कामावर गरुडाची नेमणूक करण्यात आली. रोज रात्री ते यकृत पुन्हा उगवून शरीर पूर्ववत् होत असे आणि रोज तोच भोग नव्याने भोगावा लागे.
या प्रॉमिथ्यूसचा सिक्यूरिटी क्लिअरन्स काढून घेऊन आणि तो कम्युनिस्ट आणि रशियाधार्जिणा असल्याच्या अफवा पसरवून अमेरिकन बाल्ड ईगलनेही त्याच्या पतप्रतिष्ठेचे आणि आधीच डळमळीत झालेल्या मनाचे लचके तोडताना मागेपुढे पाहिलं नाही!

स्वाती, मी पण सल्ला दिला होता अनाहूत. पण उंटावरून दिल्यामुळे पोहोचला नाही बहुतेक.

गीतेतला श्लोकही नेमका उचलला आहे नोलनने! >> बहुतेक तोच श्लोक खऱ्या आयुष्यात ओपनहायमरने उद्धृत केला होता. त्यामुळे खरं श्रेय त्याला.

https://www.atomicarchive.com/media/videos/oppenheimer.html

अर्र सॉरी सॉरी! मिसलाच की मी तो! Happy
परवा त्या ब्रह्म-अंड्यावरही हसायचं राहिलं - गडबडीत पोस्ट पाहिली आणि पोच द्यायला हाताला सवड मिळाली तोवर धागा बराच पुढे निघून गेला होता!
पुन्हा एकदा खरंच सॉरी!
(आता त्रिवार झालं!) Happy

>>> बहुतेक तोच श्लोक खऱ्या आयुष्यात ओपनहायमरने उद्धृत केला होता. त्यामुळे खरं श्रेय त्याला.
हो का? मग I stand corrected! Happy
धन्यवाद! Happy

मी तो सहस्र सूर्यांच्या प्रकाशाचं वर्णन करणारा श्लोक त्याला ट्रायलच्या वेळी आठवला असं वाचलं होतं (म्हणून पोस्टमध्ये त्याचा उल्लेख केला.)

दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता।
यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः॥११.१२॥

कदाचित ते दोन्ही निरनिराळ्या वेळी उद्धृत केले असतील. Happy

स्वाती 'कलर्ड' फ्रॉम स्ट्रॉस पर्स्पेक्टिव्ह आणि ब्लॅक & व्हाइट फ्रॉम ओपनहाइमर्स पर्स्पेक्टिव्ह. असे मी वाचले.

दृश्य भारतात तरी काही इतकी आक्षेपार्ह वगैरे वाटली नाहीत.यापेक्षा जास्त वेब सिरीज मध्ये दाखवतात.त्या गीतेतला श्लोक वाचत xxx करण्याच्या सीन ने कदाचित भारतात दंगा होऊ शकेल.मला विशेष आक्षेपार्ह वाटला नसला तरी 'खरंच इतके गोंधळ जगात चालू आहेत, त्यात काही नडलं होतं का' असं नक्कीच वाटलं.(पुढचा मनात डिफॉल्ट येणारा विचार 'हेच हॉली कुराण हातात धरून केलं असतंत का लेको' हाही आला.)
गीतेच्या श्लोकांशी जुळणी आवडली.
एकंदर इंग्लिश पिक्चर बघण्याची सवय कमी असल्याने मध्ये मध्ये मोबाईल बघत होते.पण आवडला.हा नट दिसण्यात बेनेडिक्ट चा आते किंवा चुलत भाऊ वाटतो, तेच डोळे, तेच सपाट गाल आणि चीक बोन्स.ओपेनहायमर अकसेंट मध्ये जेरेमी ब्रेट जाणवला आणि आठवला.

(स्वाती, विश्लेषण छान लिहिलंय.मला व्यक्तिगत रित्या त्याला अजून थोडा ट्रॉमा जाणवलेला दाखवायला हवा होता(व्हिजिबली) असं वाटलं.पण हॉलिवूड चित्रपटात के ड्रामा किंवा हिंदी पिक्चर सारखं खूप भावनिक न दाखवता जास्त परिणामकारक व्हायला सटली दाखवत असावेत.)

>>> 'कलर्ड' फ्रॉम स्ट्रॉस पर्स्पेक्टिव्ह आणि ब्लॅक & व्हाइट फ्रॉम ओपनहाइमर्स पर्स्पेक्टिव्ह

खुद्द नोलन काय म्हणतो पाहा:
"I wrote the script in the first person, which I'd never done before. I don't know if anyone has ever done that, or if that's a thing people do or not… The film is objective and subjective. The color scenes are subjective; the black-and-white scenes are objective. I wrote the color scenes from the first person. So for an actor reading that, in some ways, I think it'd be quite daunting."

बहुतेक तोच श्लोक खऱ्या आयुष्यात ओपनहायमरने उद्धृत केला होता. त्यामुळे खरं श्रेय त्याला. >>>>
छान माहिती.
ती प्रॉमिथ्यूसची गोष्ट सुरवातीला गडबडीत वाचली होती. तरीही ऑपनहायमर निरागस वाटत नाही, आपल्या आत्मविश्वासाची, पॅशनची - आंतरिक ऊर्मीची किंवा जबरदस्त कॉलिंगची सांगड घालताना जो विध्वंस होणार आहे याची त्याला नेहमीच कल्पना होती, ते आऊटकम नीतिमूल्याशी अलाईन होत नाहीये म्हणून तो गोंधळलेला आहे. मग त्या सुपरपावरवर ते सगळं कर्म सोपवून तो heal होतो हळूहळू.

सामो, रोचक आहे हे. मी आपलं वर्तमानकाळात कृष्णधवल व भूतकाळात रंगीत दाखवलं आहे असं समजलं.

मी काही सिनेमाविषयी इतकं खरंतर काहीच वाचलं नव्हतं एक डॉक्युमेंटरी सुरू केली होती ती max ने अचानक काढून टाकली. आयमॅक्स नसल्याने की काय बरेचसे संवादही muffled वाटले होते. बरेच संदर्भही नवीन होते, शिवाय तीन तास असूनही ऑपनहायमरचं सगळं आयुष्य त्यात बसवल्याने तो lot to process होऊन जातो. ओटीटीवर आल्यावर पुन्हा बघेन, पुस्तक वाचण्याची शक्यता नाहीचे. पुस्तक न वाचता सिनेमा बघितल्यावर सिनेमा पूर्ण कळत नाही, पुस्तक वाचून सिनेमा बघितला की सिनेमा अर्धवट वाटतो असा अनुभव आहे.

स्वाती , तू वाचलेस तर याचाही PS कर. ऑपनहायमर मधे तर खरोखरंच आतषबाजी आहे. Lol

एकदम इन्साईटफुल्ल चर्चा.
मी वर्षभरापूर्वी पुस्तकं वाचायला चालू केलेले, पण इतके डिटेल हेवी पुस्तक वाचणे मला झेपले नाही. पुस्तकं अगदी म्हणजे अगदी तपशिलात आहे. ओपनहायमर बर्कली मध्ये असताना नैराश्यात गेला होता ते वाचून अचंबा वाटतो. काही गोष्टी त्याच्या हातातून घडल्या ज्यातून बाहेर पडणे अवघड असते. सिनेमात सफरचंद किस्सा दाखवलाय, तसे आणखी एक दोन किस्से पण आहेत. तेव्हाचे त्याचे सेक्शुअल फ्रस्ट्रेशन सुद्धा पुस्तकात ठळकपणे मांडले आहे. जर्मनीत गोटिंगम संस्थेत त्याला त्याचे फुटिंग सापडले.

पण जसा तो कॅल्टेक आणि बर्कली मध्ये प्राध्यापक म्हणून शिकवू लागला, त्यात पुस्तकं मुख्यत्वे त्याच्या राजकीय विचारांच्या जडणघडणीवर फोकस करते. हा भाग अर्थात रोचक आहे, पण त्यात इतक्या लोकांची नावे येतात की मी थकून गेलो. हा कोण आता, आधी आलेला का ? असे झालेले. त्यामुळे तिथे पुस्तक बॅकूटवर गेले आणि शेवटी माझ्या DNF यादीत गेले.

नोलनने मात्र पटकथा एकदम सकींटली रचली आहे. no fat, all meat Happy

भारतात दाखविली नाहीयेत म्हणजे बरंच आहे
>>> दाखवलीत भारतात…
आणि या दृश्यावरून बवाल सुरू झाला भारतात तर नवल नाही. पण या निमित्ताने सगळ्यांनी पिक्चर पाहिला तर आवडेल मला.

अत्युच्च इंटीमेट क्षणी त्याला खर्या स्वचे दर्शन होते, गीतेचे श्लोक आठवतात असं काहीसं म्हणायचंय का नोलनला?

स्वाती सगळ्या पोस्ट मस्त.., तुमचे रिव्यू वाचून परत एकदा पहावासा वाटतोय..

बरं तिकडे तो नोलन म्हणतोय की हा चित्रपट मी जगाला एआय संदर्भात वॉर्न करण्यासाठी काढला.

ब्रिलिअंट! शब्दच नाही दुसरे.
काल साध्या थेटरमध्ये नो रेक्ललायनर नो आयमॅक्स साध्या खुर्चीच्या थेटरात बघुन आलो ते पण रात्री १०च्या शो ची तिकिटं होती. नेहेमी सारख्या रिक्लायनर इ. कंडिशन ठेवल्या असत्या तर आठवडा थांबायला लागणार होतं इतके हाऊसफुल्ल शो आहेत इथे! ते असो.

कृष्पाधवल सीन्स हे डॉक्युमेंटेड भूतकाळ दाखवतात .. म्हणजे स्टॉसचं सेनेट कन्फर्मेशन हिअरिंग तर रंगीत ऑपनहायमरचे सिक्युरिटी हिअरिंग जे बंद दाराआड झाले. त्यातला किती भाग शब्दशः खरा, किती इंटरप्रिटेशन्स.. शेवटी रॉब ऑपनहायमरला विचारतो की तू हे थांबवलं का नाहीस, हायड्रोजन बॉंबचं काय... तेव्हा सगळा पडदा पांढरा पांढरा होत जातो, जग संपू लागतं. आणि अंगावर काटा येतो. तो भाग कदाचित ऑपनहायमरच्या डोक्यातीलच असेल..
शेवटी आईनस्टाईन आणि ऑपनहायमरचा सीन परत येतो. आता त्यातील आवाज ऐकू येतात.... (आवाज नंतर ऐकू येणे, हा तर आणखी एक महा ब्रिलियंट भाग आहे. ट्रिनिटीचा आवाज किती नंतर ऐकू येतो. हिरोशिमा आणि नागासाकी चा _आवाज_ तर डोकं झिणझिण्या आणत कितीतरी वेळ ऐकू येत असतो. पायांचे आवाज... आवज नुसते आवाज. पण ते घटना घडून गेल्यावर कितीतरी काळाने ऐकू येणारे. या एका आवाज मेटॅफरला धरुन फक्त परत बघायचा आहे. ) तर आईनस्टाईन जर्मनी सोडून, आपल्या मदर (रादर फादर) लॅंड कडे पाठ फिरवून येतो. तो ऑपनहायमरला तेच सांगतोय.... नोट: हा सीन बाँब स्फोटा नंतर लगेचचा/ काही वर्षातील आहे... सिक्युरिटी हिअरिंग फार नंतर झालं. पण ऑपनहायमर मदरलॅंडच्या प्रेमापोटी त्या हिअरिंगला जायची खरंतर गरज नसताही जातो. जात रहातो.

मला ऑपनहायमरचा प्रश्न अर्जुनापेक्षा कठिण वाटला. अर्जुनाला सगळे मरणारेत, काळ सगळ्यांना मारणारे, रादर त्याने आधीच मारलेलं आहे, तू फक्त तुझं कर्म कर इ. सगळं विश्वरुप दर्शन झाल्यावर दिसतं. अर्जुनाला तो सगळा विध्वंस आपल्या मित्र सखा पुरुषोत्तम साक्षात काल असलेल्या कृष्णावर सोपवून अनेक योगदर्शन करण्याची बैठक/ फिलॉसॉफी होती. इथे ऑपनहायमर तो काळ झाला. आईनस्टाईन आधी झालेला.. तो आज ऑपनहायमर झाला, तो अजुनही सूप्त काल सगळं विश्व गिळंकृत करायला बसलेलाच आहे. उद्या शत्रूने आधी केलं तर काय म्हणून मी केलं ह्या तर्कटावर तरी काय आणि किती विसंबून रहायचं. रेस टू डिझास्टर आहे.

तर हे सगळं ही बाजुला ठेवू. हे सगळं पडद्यावर दाखवणं. एखाद्याचं मन शब्दातून न दाखवता व्हिजुअल्स मधुन दाखवणे. आणि ते मन ऑपनहायमरचं आहे, त्याच्यात न्युक्लिअर फिजिक्स आहे, वुमनायझर आहे, सोशलिस्ट आहे, भविष्य बघू शकणारा आहे.... ही सगळी भेळ कमीत कमी शब्दांत चित्रातून दाखवायची ही सगळी नोलनची जादू आहे.

म्युझिक, हे वेगवेगळे दृष्य परिणाम, विविध रुपके, संवाद.. अशी एक एक गोष्ट डोक्यात ठेवून परत परत बघण्याची नितांत गरज आहे.

पिक्चरला जायच्या आधी स्वातीची B/W वि. रंगीत पोस्ट वाचुन गेलेलो आणि प्रोमिथिअस बद्दल थोडी माहिती काढून गेलेलो त्याचा खूप फायदा झाला. आणखी बरंच डोक्यात आहे/ होतं पण एक लिहायला चालू केलं की विचार पुढे धावतात आणि बोटातून टाईप होत नाही असं झालंय.

अत्युच्च इंटीमेट क्षणी त्याला खर्या स्वचे दर्शन होते, गीतेचे श्लोक आठवतात असं काहीसं म्हणायचंय का नोलनला?

>>> स्वत्व शोधताना जी ecstasy येते, ती त्याला फिजिकल इंटिमसी मधे गवसते, गवसली असावी. एकदा सहस्ररश्मीचा प्रकाश दिसलेली व्यक्ती परत कधीही नॉर्मल होऊ शकत नाही, कारण स्वत्वाचा शोध बाकी सगळ्या जिज्ञासांवर मात करतो. नंतर एकेकाळी तिच्यात मनाने गुंतलेला तो प्रयासाने बाहेर पडतो, ती मात्र त्याच्या आत्मशोधाच्या प्रवासातले collateral damage ठरते. ते त्याच्या डोळ्यात त्याने बायकोपुढे कबूल करताना दाखवलंय. तुम्ही पॅशनला दाबू शकाल पण कॉलिंगला नाही दाबू शकत. त्याच्या अंतर्मनात आधीही कित्येक अणूस्फोट झालेत , परिस्थितीने व आत्मचिकित्सेने- ग्लानीने त्याच्या मनाचा सर्वनाश झाल्यावर त्याला ध्रुवपद गवसलंय , फना......!

धन्यवाद, हर्पा. Happy

किलिअन मर्फी आणि नोलन फारच उच्च जोडी आहे. स्केअर क्रो, फिशर... ऑपनहायमर तर! मर्फी बद्दल वाचलं तर एकदम हुषार/ खडूस/ आयरिश / पाय जमिनीवर असलेला दिसतोय. Happy
बाकी नेहेमीच्यातला मायकल केन नाही दिसला. हिअरिंग मध्ये तो मागचा सिनेटर का कोण होता ज्याने एक दोन जोक मारलेन तिकडे घेता आला असता काय ?
रॅमी मलिक, गिल्डरॉय लॉकहार्ट असे एकेक ओळखीचे चेहेरे दिसत रहातात आणि गुदगुल्या होत रहातात. Happy

मागचा सिनेटर का कोण होता ज्याने एक दोन जोक मारलेन तिकडे घेता आला असता काय ?
>>> Lol केन जास्तच म्हातारा आहे आता म्हणून नसेल घेतलं.

रॅमी मलिक, गिल्डरॉय लॉकहार्ट असे एकेक ओळखीचे चेहेरे दिसत रहातात आणि गुदगुल्या होत रहातात
>>>
होय. गॅरी ओल्डमन (सिरियस ब्लॅक) बघून मात्र माझ्यासाठी सगळ्यात स्क्रीन कडे बोट दाखवणे मुमेन्ट झाली. नोलनने त्याचे Mcu crossover असल्यासारखे भारी भारी लोक घेतलेत.

Pages