Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
१२ वी फेल फार सुन्दर सिनेमा
१२ वी फेल फार सुन्दर सिनेमा आहे....युपिएससी च्या स्ट्रगलवर बरच काही बघायला मिळाल इतक्यात तरी हा फार भिडला, खरा वाटला, विक्रान्त मेसी भुमिका अक्षरशः जगलाय...शेवटी त्याच सिलेक्शन होत तेव्हा नकळत आपलाही कन्ठ दाटुन येतो.
मलाही पहायचाय १२ वी फेल. पण
मलाही पहायचाय १२ वी फेल. पण त्याचे सिलेक्शन होते हे फोडलत तुम्ही प्राजक्ता.
सामो रियल लाइफ स्टोरी आहे..
सामो रियल लाइफ स्टोरी आहे...मनोज कुमार शर्मा याने कस अत्यत गरिबितुन येवुन आय पि एस क्लियर केल त्याची...त्याच्यावर पुस्तक पण आले आहे मुव्ही पुस्तकावरच बेस्ड आहे.
ओके प्राजक्ता. धन्यवाद.
ओके प्राजक्ता. धन्यवाद.
१२ वी फेल फार सुन्दर सिनेमा
१२ वी फेल फार सुन्दर सिनेमा आहे >> +१११. फार आवडला. आता इतर सीरीज वगैरे बघून या परीक्षा आणि त्या विद्यार्थ्यांच्या स्ट्रगल ची साधारण कल्पना असली तरीही हा सिनेमा खूप आवडला. इन्स्पायरिंग स्टोरी आहे. इतक्या अपयश आणि खडतर परिस्थितीत कसे या माणसाने पॉझिटिविटी टिकवली असेल असे वाटते!
विक्रान्त मेसीने खूप सुंदर काम केले आहे. इतर सगळेच लहान मोठ्या रोल मधले कलाकार मस्त.
रात अकेली है पाहिला
रात अकेली है पाहिला
नवाजुद्दीन , राधिका आपटे, tigmanshu धुलिया असलेला. एका मोठ्या हवेलीत एका वयस्कर नवरोबाचा खून झालाय लग्नाच्या दिवशीच. त्या खुनाची शोधकथा.
खूप वेगवान नाही. स्लो पेस मुव्ही.
अतिश्रीमंत असलेले लोकं, कधी काळची असलेली अंगात मुरलेली राजसत्ता, राजकारणी आणि त्यांचे साटेलोटे, त्यांच्या कलाने वागणारे उच्च पोलिस अधिकारी, आणि ह्या सगळ्यात अजिबात स्थान नसलेले, इज्जत नसलेले,फक्त वापर करून घेतले जाणारे गरीब लोकं असा सगळा मसाला हळुवार मिक्स होत जातो. लीलया खोटे बोलणारे, अर्धसत्य सांगणारे, लपवाछपवी करणारे लोकं ह्या तपास कामात येत आहेत. मला आवडला. सस्पेन्स चांगला राखलाय. UP च्या backdrop वर चित्रपट घडतो.
12 वी फेल पाहिला
12 वी फेल पाहिला
अप्रतिम चित्रपट.
विक्रांत मासी सह सर्वांनीच छान काम केलंय.
छोटे छोटे character देखील भारी, गाव, तिथले लोकं, प्रामाणिक आणि भ्रष्ट लोकं, गावातील वातावरण, तिथलं दुकान सगळं डिटेलिंग जबरदस्त आहे.
मूळची कथा आणि संघर्ष देखील अस्सल, त्यावर ह्या गोष्टी म्हणजे सोने पे सुहागा
एबीपी माझा वर 12 वी फेल चे
एबीपी माझा वर 12 वी फेल चे लेखक आणि त्यांची बायको म्हणजे मनोजकुमार शर्मा आणि श्रद्धा शर्मा या दोघांची माझा कट्टा वर मागे कधीतरी झालेली मुलाखत आज सकाळी योगायोगाने मला youtube वर दिसली, थोडा वेळ बघितली, पूर्ण बघायची आहे पण जेवढी बघितली, त्यावर रीस्पेक्ट आणि दंडवत हे म्हणावंसं वाटतं.
पिक्चर बघायचा आहे अजून.
१२वी फेल फार सुंदर आहे.
१२वी फेल फार सुंदर आहे. बघण्यापूर्वी बॅकग्राऊंड अजिबात माहित नसल्ताने जास्त एन्जॉय केला.
मलाही बॅकग्राऊंड काल परवाच
मलाही बॅकग्राऊंड काल परवाच समजलं, कोण लेखक कुठे posting etc. योगायोगाने सकाळी युट्युबवर एबीपीची ती मुलाखत दिसली.
बारावी फेल (मी सुद्धा आहे )
बारावी फेल (मी सुद्धा आहे
)
खो गये हम कहा (शेवट खूपच छान वाटला)
हे दोन पिक्चर बघून मन भरल्या नंतर आज
अन्नपूर्णा पाहिला.. म्हटले तर टिपिकल पण तितकाच मनोरंजक.. आणि नयनतारा तर बदाम बदाम बदाम.,<3
या सगळ्यात मुलीने लावल्यामुळे शास्त्री विरुद्ध शास्त्री सुद्धा पूर्ण बघून झाला. आधी संथ वाटला. नंतर फार वेगवान झाला असे नाही, पण तरी बरेपैकी आवडला. पिक्चर इमोशनल पण विषय मजेशीर होता. आजी आजोबांना नातू सांभाळायला दिला असतो. करिअरवर फोकस करण्यासाठी.. पण नंतर आजोबा नातवाला सोडायला तयारच नसतात. डायरेक्ट कोर्टात केस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सजनी शिंदे पाहिला. नाही आवडला
सजनी शिंदे पाहिला. नाही आवडला. नावापासून मला प्रॉब्लेम आहे. सगळे तिला सजनी म्हणतात, देवनागरीतही तसंच नाव आहे, मग रोमन लिपीत स्पेलिंग सजिनि असं का केलंय? बाकी सगळे मराठी कलाकार आहेत आणि मराठी हिंदी बोलतात, पण शिंद्यांची मुलगी सजिनी की सजनी ही दिल्लीच्या अॅक्सेंटमध्ये बोलते. तिथे मराठी अभिनेत्री का नाही घेतली? बरं अश्या चित्रपटांत हे लोक मराठी पार्श्वभूमी दाखवताना इतके मराठी संवाद का घेतात शंकाच आहे! भौगोलिक पार्श्वभूमी आणि एकंदर राहणीमान वगैरे बघून साधारण कळतं की ही मंडळी हिंदी नाहीत. पण आता तुम्ही हिंदीत काढलाय ना सिनेमा, मग नीट हिंदीत बोलू दे की त्यांना. मान्य आहे की आजकाल आपण धेडगुजरीच भाषा बोलतो. पण त्यांनी घेतलेले संवाद हे धड तसेही नाहीत. अर्ध वाक्य शुद्ध मराठी आणि अर्ध वाक्य शुद्ध हिंदी - हे जास्त विचित्र वाटतं ऐकायला. तुला इतकं चांगलं मराठी येत असेल तर तू पूर्ण मराठीतच बोलत असणार, किंवा तुला इतकं चांगलं हिंदी येत असेल तर तू पूर्ण हिंदीतच बोलत असणार. (हा प्रॉब्लेम तुंबाड बघताना अजिबात आला नाही. पूर्ण हिंदीत असूनही बघून झाल्यावर मी मराठीच सिनेमा बघितला की काय असं वाटावं - अशी जादू आहे. मध्ये एखद-दुसरे मराठी संवाद येऊनही गेले असतील, पण ते कुणाचं मराठीपण एस्टॅब्लिश करण्यासाठी नक्कीच नव्हते आणि तसं काही येऊन गेल्याचंही लक्षात राहिलं नाही.)
प्लॉट शेवटी शेवटी जास्त पाणचट होत जातो. रहस्य अगदीच फुसकं आहे. बरेच सामाजिक विषय केवळ उल्लेखापुरते येऊन जातात पण त्यामागे सामाजिक विषयाला वाचा फोडल्याचा आव असल्यासारखं वाटत राहतं. कुठल्याच विषयावर धड भाष्य नाही. बरं भाष्य करायचं नसेल तरी हरकत नाही, पण निदान एका विषयातली परिस्थिती जरा नीट पूर्णपणे मांडा तरी! तेही नाही.
बर्याच मोठ्या कलाकारांना घेऊन वाया घालवलं आहे. भाग्यश्रीचं काम अजिबात छाप पाडून जात नाही. सजनीचा भाऊ झालेला तो - तो मी वसंतराव आणि आत्मपॅम्फ्लेटमध्ये आहे तोच आहे का? इतका चांगला कलाकार पण ह्यात ठीकठाक वाटतो. सुभा(सुबोध भावे)ला बरंच काम आहे, पण तेही विचित्र संहितेमुळे निश्छाप वाटतं ;). त्यापेक्षा त्याला नल्ला ठेवलं असतं तर निदान आम्ही सुभा-नल्ला म्हणू शकलो असतो.
अण्णांनी मराठी शब्दांची
अण्णांनी मराठी शब्दांची हिंदीला देणगी दिल्यामुळे मराठी मिश्रित हिंदी समजत असेल असा विचार केला असेल.
मी दहा पंधरा मिनटात बंद केला
मी दहा पंधरा मिनटात बंद केला सजनी शिंदे.
चित्रपट कसा वाटला - ९https:/
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
इथे आहे.
सजनी शिन्दे बद्दल हपा शी सहमत
सजनी शिन्दे बद्दल हपा शी सहमत!! सजनी हे मराठी नाव वाटतच नाही.मुळात एखाद पात्र गरिब, नॉन क्लासी, क्लब वैगरे लाइफ कधी न बघितलेले दाखवायच आहे म्हणजे ते मराठी आहे हेच फार टिपिकली वेगळ्या अर्थाने डेरोगेटरीही वाटल...शिन्दे कदम नाव दिलेले दोन्ही चेहरे मराठी बोलतही नाहीत आणी वाटतही नाही...
त्यापेक्षा त्याला नल्ला ठेवलं
त्यापेक्षा त्याला नल्ला ठेवलं असतं तर निदान आम्ही सुभा-नल्ला म्हणू शकलो असतो.>>> हे कहर आहे महान हसले![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
अशा नावाचा चित्रपट आहे हेच माहित नव्हते.
इथला रिव्ह्यू वाचून 12th fail
इथला रिव्ह्यू वाचून 12th fail पाहिला. छान आहे, विशेषतः कास्टिंग फारच भूमिकापूरक आहे हे आवडलं. त्यामुळे सगळा सिनेमा जास्त भिडतो.अर्थातच विक्रांत मेस्सी जगला आहे त्याची भूमिका, पण इतर सगळी पात्रेही छान वठली आहेत.
अच्छा! बघायलाच पाहिजे मग 12th
अच्छा! बघायलाच पाहिजे मग 12th fail
सजनी हे मराठी नाव वाटतच नाही.
सजनी हे मराठी नाव वाटतच नाही.>> मराठी नाहीच ते. चित्रपटात सुभा सांगतो कि त्याच्या गाजलेल्या नाटक/चित्रपटाच्या नावावरून घरात सगळ्यांशी भांडून त्याने तिचे नाव सजनी ठेवलेले असते.
त्यापेक्षा त्याला नल्ला ठेवलं
त्यापेक्षा त्याला नल्ला ठेवलं असतं तर निदान आम्ही सुभा-नल्ला म्हणू शकलो असतो. >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
निश्छाप असा शब्द पहील्यांदाच
>>>>>>>>>पण तेही विचित्र संहितेमुळे निश्छाप वाटतं ;). त्यापेक्षा त्याला नल्ला ठेवलं असतं तर निदान आम्ही सुभा-नल्ला म्हणू शकलो असतो.
निश्छाप असा शब्द पहील्यांदाच ऐकला.
नवीन धागाhttps://www.maayboli
नवीन धागा
https://www.maayboli.com/node/84513
Pages