Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बरेच दिवस झाले मी झ दर्जाचे
बरेच दिवस झाले मी झ दर्जाचे चित्रपट पाहण्याचा सपाटा लावलेला आहे. साधारण निकश असा की त्यात एखादा नावाजलेला कलाकार आहे पण चित्रपट पार फसलेला आहे. या लिस्टित खालील सिनेमे अगदी फिट बसले :
१. गुड बाय (जयकाल महाकाल वाला सिनेमा. अमिताभ मुख्य भूमिकेत)
२. सुखी (शिल्पा शेट्टी मुख्य रोल)
३. एक लडकी को देखा तो ऐसा लगा (राजकुमार राव, जुही चावला, अनिल कपूर, सोनम कपूर)
४. द ग्रेट इंडियन फॅमिली (विकी कौशल)
५. ड्रीम गर्ल २ (आयुष्मान खुराणा)
६. धक धक (तापसी पन्नु, दिया मिर्झा, रत्ना शाह पाठक)
७. YZ (मराठी) (यात फार नावाजलेले कोणीही नाही).
असे सिनेमे का बघतेय हे माहीत नाही.
पण आता थांबवणार आहे :facepalm:
एक लडकी को देखा तो ऐसा लगा
एक लडकी को देखा तो ऐसा लगा
>>>>
पाहिला आहे या लिस्ट मधील..
आम्हाला आवडलेला
सॅम बहादुर - सिनेमा आवडला.
सॅम बहादुर - सिनेमा आवडला. मला तरी फातिमाने केलेले, इन्दिरा गांधींचे काम आवडले. पण त्या सिनेमात तो प्रसंग का वगळलाय - जेव्हा सॅम माणिकशॉ म्हणतात -ह्याह्या खानने माझे पैसे दिले नाहीत म्हणुन मी त्याचा अर्धा देशच घेउन टाकला.
जोर्रम बघ्तिला
जोर्रम बघ्तिला
ज्यान आर आर आर छाप मारामारी आवड्ती त्याना आवड्नार नाही पण छान आहे ,
पियू
पियू
YZ मध्ये मुक्ता बर्वे आहेना नावाजलेली.
मुक्ता होती का त्यात? मला सई
मुक्ता होती का त्यात? मला सई होती ते आठवते आहे.
मला वाटतंय मुक्ताला त्यात
मला वाटतंय मुक्ताला त्यात बघितल्यासारखं, tv वर लागलेला.
मुक्ता बर्वे YZ मध्ये पाहुणी
मुक्ता बर्वे YZ मध्ये पाहुणी कलाकार म्हणता येईल. छोटा रोल आहे. सई आणि पर्ण पेठे पण आहेत.
बाकी, YZ मला खूप आवडलेला.
एनिमल मधील रणबीर ची एंट्री
एनिमल मधील रणबीर ची एंट्री एका जुन्या चित्रपटातील गाणे आहे… कोणाला माहीत होते? मला आज कळले.. ए आर रहमान चे गाणे आहे .. तीस वर्ष पूर्वीचे.. चिन्नी चिन्नी आशा असे गाणे आहे.. नक्की गुगल करा…
>>>>>
हिंदी मध्ये ते 'दिल है छोटासा ' असे होते
ऐकल्या ऐकल्या लगेच कळाले
About time बघतो आहे. छान
About time बघतो आहे. छान सिनेमा आहे.
ते झ दर्जाच्या सिनेमात वर
ते झ दर्जाच्या सिनेमात वर कोणीतरी उल्लेख केलाय तो जॅकी श्रॉफ आणि निना गुप्ताचा ' मस्त में रेहने का ' हा सिनेमा पण घाला ८ नंबरला .
मला ओके वाटला.फक्त नीना
मला ओके वाटला.फक्त नीना गुप्ता ला तो विचित्र मस दिला आहे आणि ती नेहमीपेक्षा वेगळ्या स्टाईल ने मध्ये मध्ये ओठ मुडपत बोलते. साईडकथा पण ओके आहे.त्यात टेलर ने मुलीला पहिल्यांदा दिलेला लाल पिवळा ड्रेस बघून चक्कर आली.ऐसा(भयंकर रंग, भयंकर कापड, भयंकर फॅशन) ड्रेस(अगदी त्याने आयटम सोंग साठी शिवला असला तरी) कोई दुष्मन को भी ना दे.
'पहेली' - काय मस्त सिनेमा आहे
'पहेली' - काय मस्त सिनेमा आहे. खूप आवडला. भूत वगैरे अद्भुत रस आहे. शिवाय मस्त प्रेमकथा आहे.
पण त्या सिनेमात तो प्रसंग का
पण त्या सिनेमात तो प्रसंग का वगळलाय - जेव्हा सॅम माणिकशॉ म्हणतात -ह्याह्या खानने माझे पैसे दिले नाहीत म्हणुन मी त्याचा अर्धा देशच घेउन टाकला.
>>
आम्हाला दाखवला
टेलर ने मुलीला पहिल्यांदा
टेलर ने मुलीला पहिल्यांदा दिलेला लाल पिवळा ड्रेस बघून चक्कर आली.ऐसा(भयंकर रंग, भयंकर कापड, भयंकर फॅशन) ड्रेस(अगदी त्याने आयटम सोंग साठी शिवला असला तरी) कोई दुष्मन को भी ना दे.
>> Lol अनु.
'पहेली' - आवडला तुम्हाला सामो
'पहेली' - आवडला तुम्हाला सामो..
मला शाहरूख असून बोर झाला.. infact शाहरूखच बोर वाटला असावा त्यातला.. आता फार आठवत नाही. पण शेवट अमिताभ आणि शाहरूखचा सीन सुद्धा गोष्टीतल्या सारखा होता.
शाहरूखने नकळत एक ग्लॅमर येते केरेक्तरला.. इरफान वगैरे असता त्यात तर जमला असता तो चित्रपट. हवे तर अमिताभचा रोल शाहरूखला देता आला असता..
>>>>>आम्हाला दाखवला
>>>>>आम्हाला दाखवला
अरेच्च्या मी मिस केला मग.
पहेलीमध्ये दोन्ही रोलमध्ये
@ऋन्मेष >>>>infact शाहरूखच बोर वाटला असावा त्यातला..
पहेलीमध्ये दोन्ही रोलमध्ये शाहरुख सारखाच दिसतो/वागतो. त्याने त्या रोल्सवरती मेहनत घेतलेली नाही हे जाणवते. एक रसिक व दुसरा अरसिक. मे बी दिग्दर्शकाची मर्यादा असेल. पण अमोल पालेकर सारखे दिग्गज (अर्थ?) दिग्दर्शक - मर्यादा तरी कसे म्हणावे?
>>>>>>इरफान वगैरे असता त्यात
>>>>>>इरफान वगैरे असता त्यात तर जमला असता तो चित्रपट.
होय इरफान तर तगडा कलाकार आहे. शाह रुख फारच सपक वाटला खरा.
पण शाहरूख एकच आहे ना त्यात..
पण शाहरूख एकच आहे ना त्यात..
भूत जर शाहरूखचे रुप घेतो तर सेम तसेच दिसायला हवे ना?
डॉन सारखे एखाद्या हमशकल इन्सानने रूप घेतले असते तर फरक असता...
पहेली एका अंगाने फार सुरेख
पहेली एका अंगाने फार सुरेख सिनेमा आहे. एस्प आर्ट डिरेक्षन आणि कलर. मला त्या तश्या हवेली फारच आव्डतात. त्यात राणी फारच सुरेख दिसली आहे त्या राजस्था नी कपड्यात. अमिताभ उगीचच आहे. राणी व राजस्थानचे ते आर्किटेक्चर, मल्टिपल लेव्हल विहिरी. खरा शाहरुख
हनिमुन किंवा पहिल्या रात्री पण फल फूल गुलाब करत असतो. ते फार मजेशीर आहे. दुसरे म्हणजे व्यक्तिवादी!! नवरा शरीर सुख व कंपनी देउ शकत नसेल किंवा हि इज जस्ट नॉट दॅट इव्हॉल्व्ड भूत ही सही. व ते ही इतके गोड हँडसम. राणी चे कपडे व दागिने म्हणजे मी फ्लॅटच आहे मला तसे एकदा तरी ड्रेस करायला आवडेल. मी राजस्थान हून तश्या भावल्या नवरा नवरी आणल्या होत्या व सुखी संसाराचे प्रतीक म्हणून घरात बरीच वर्शे होत्या. राणी शाहरुख व राजस्थान हेच महत्वाचे आहे ह्या सिनेमात. आय वाँट अ हवेली.
सामो फुल रिव्यु लिहा धागा
सामो फुल रिव्यु लिहा धागा काढून तुमच्या कलात्मक भाशेत वाचायला मस्त वाटेल.
>>>>>>सामो फुल रिव्यु लिहा
>>>>>>सामो फुल रिव्यु लिहा धागा काढून तुमच्या कलात्मक भाशेत वाचायला मस्त वाटेल.

>>>>पहेली एका अंगाने फार सुरेख सिनेमा आहे.
होय. कलात्मक दृष्ट्या, तुम्ही लिहील्याप्रमाणे सुरेख आहेच.
>>>दुसरे म्हणजे व्यक्तिवादी!!
अगदी अगदी!!! असला ठोंब्या नवरा आणि त्याच्याबरोबरची तडजोड. याईक्स.
>>>>>>भूत जर शाहरूखचे रुप
>>>>>>भूत जर शाहरूखचे रुप घेतो तर सेम तसेच दिसायला हवे ना?
दिसणं ठीक आहे पण क्वालिटेटिव्हली खूप फरक असतो. त्याचे डोळे, रसिकपणा, नजर हे सारं दिसायला हवं होतं. तसेच खर्या नवर्याचह माठाडपणा, अरसिकता सुद्धा दिसायला हवी होती.
>>>>>>मी राजस्थान हून तश्या
>>>>>>मी राजस्थान हून तश्या भावल्या नवरा नवरी आणल्या होत्या व सुखी संसाराचे प्रतीक म्हणून घरात बरीच वर्शे होत्या.
किती सुंदर अमा. विस्कॉन्सिनला एक वृद्ध जोडप्याच्या सुरेख लाकडात कार्व्हड बाहुल्या होत्या. मलाही त्या घ्यायच्या होत्या. टु गेट हॅपिली ओल्ड विथ माय हबी. घेतल्या नाहीत पण होय तुमच्यासारखीच अगदी ती इच्छा होती.
घेतल्या नाहीत पण होय
घेतल्या नाहीत पण होय तुमच्यासारखीच अगदी ती इच्छा होती.>> आणा आणि बेडरुम मध्ये छान पैकी ठेवा वी ऑल नीड ऑल ब्लेसिन्ग्ज.
श्रीमंत शाहरुख भुताचे कपडे पण मस्त आहेत.
>>>>>आणा आणि बेडरुम मध्ये छान
>>>>>आणा आणि बेडरुम मध्ये छान पैकी ठेवा वी ऑल नीड ऑल ब्लेसिन्ग्ज.
जरुर अमा. माझी मैत्रिण म्हणायची पेंटिंग्ज, कलाकृती यांनी घरात छान व्हाइब्ज येतात. जे की मला पटते. ती ही चित्रकार आहे. मला तर घरात फुलंही आवडतात. कोमल. बरेचदा वाटतं फुलांमध्ये हीलिंग पॉवर असते. हृदयाशी फुलांचा गुच्छ धरुन काहीतरी वेगळेच वाटते. हा अनुभव आहे. अमा तुम्हाला ईमेल करते. एक पर्सनल गोष्ट कळवते.
>>>>श्रीमंत शाहरुख भुताचे कपडे पण मस्त आहेत.
होय तसेच गळ्यातले वगैरे दागिने.
डंकी आगाऊ पुस्तकणे केले.
डंकी आगाऊ पुस्तकणे केले.
पहेली माझाही भलताच आवडता
'पहेली' माझाही भलताच आवडता सिनेमा आहे. अनेक वेळा बघितला आहे. 'धीरे जलना' हे सोनूचं गाणंही आवडतं. 'काचका सपना गलही ना जाये' म्हटलं की हे संपणार जाणवून मलाच कसंतरी होतं. गच्चीवरचा जादुई रोमान्स तर क्या कहेने..!
छान लिहिले आहे सामो आणि अमा, अनुमोदनच.
आपण आपल्या लेकीचं नाव 'लूनी मा' ठेवूया असं राणी शाहरुखला त्याने बांधलेल्या घाटावर म्हणते तो सीन प्रेमाचा कळस वाटलेला. फल-फूल-गुलाबजल म्हणजे खरोखरच अरसिकतेचा कळस.
माझ्याकडे त्या सुरवातीच्या नसिरुद्दीन शाह आणि रत्ना पाठकचा आवाज दिलेल्या भावल्या आहेत. मूळच्या लोककथेत भूत कापडी पिशवीत अडकवल्या जाते पण अमोल पालेकर यांनी सकारात्मक शेवट करून नवऱ्यालाच गुप्त केले.
मलाही आवडला होता पहेली..
मलाही आवडला होता पहेली...अप्रतिम सुन्दर राजस्थान ..अमासारखी मीही हवेलीच्या प्रेमात...राणी फार सुरेख दिसते, तिचा कपडेपट तर क्या कहने.
टिचभर कथेला फुलवल होत.
Pages