चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे काय हे… खूप दिवसांनी मी एक मराठी पिक्चर थिएटरला जाऊन बघणार होते. तुम्ही पिसंच काढली ना राव पिक्चरची>>>>> हो ना
Uhoh Sad

बाई पणाच्या अमितव आणि सर्वांच्या पोस्टी लय भारी. हसून हसून मेले.
मी बघावा अस एकदा ही वाटत नव्हतंच ते शिक्का मोर्तब झालं . असच होतं जाहिरात अफाट करतात पण सिनेमा किंवा मराठी नाटक ही हातात धरवत नाही असा असतो. मुळात कथाच अशक्त असते . त्यामुळे सैराट च कौतुक वाचून ही मी कित्ती दिवस बघितला नव्हता पण तो अपवाद निघाला. फारच मस्त होता.

लस्ट स्टोरीज - २ (नेटफ्लिक्स)>>>>
१. नीना गुप्ताची स्टोरी दहा मिनटं बघून पळवली.
२.अम्रुता सुभाष, तिलोत्तमा वाली चांगली वाटली.
3.तमन्ना वाली ट्वीस्ट- प्रेडिक्टेबल.
४.काजोलवाली ठिक आहे.
ओव्हरॉल दुसरी गोष्ट आवडली.. बाकी काही खास नाही..त्यामानाने पार्ट वन जास्त आवडलेला.

पहिली म्रूणाल ठाकूर नि नीना गुप्तासाठी बघायची. एकंदर विषय असा आहे कि मजा येते. दुसरी जबरदस्त आहे. स्टोरी टेलिंग नि कास्टींग एकदम परफेक्ट आहे नि पूर्णपणे को़कणाचा टच जाणवतो. शेवटच्या दोन बळंच घुसवल्या आहेत.

लस्टो १ पण नाही पाहिलेली, आता ही नाही पाहणार. अमृता सुभाषची नेमकी आजच मुलाखत वाचली. सेक्रेड गेम्स बद्दल सांगितलंय. त्यातले तिचे ते सीन्स किळसवाणे होते. सॉरी कुणी फॅन असेल तर. Sad

मी वाटच बघत होते, हे इथं चिकटवायची. Happy

लस्ट स्टोरीज २ तितकं विशेष वाटलं नाही.
१. नीना गुप्ता सतत बोलणारी , स्वतः ची इन्टिमेट सिक्रेट सांगणारी आजी असते. जिचे केस पांढरे व त्वचा तुकतुकीत आहे. केस आजीचे त्वचा मावशीची. मृणाल ठाकूर सतत बबली हसत रहाते, ती टिनेजरसारखी वाटते. लग्नाळू वाटत नाही. तिच्या वाग्दत्त वराला एकही संवाद नाही, काही तरी गुळमुळीत एकदोनदा बोलला आहे. हाच हॉरर स्टोरीतही तिचा नवरा होता का ? ह्यात नवीन काही वाटलं नाही कारण शुभमंगल सावधान मधे होऊन गेले आहे. विनोदही साधारण वाटले. खूप काही हसू आलं नाही. नेहा धुपियाच्या आयडिया प्रमाणे , शेवटी ट्विस्ट म्हणून आजोबा नाही तर काय असं म्हणून आजी ड्रॉवर मधून व्हायब्रेटर काढते की काय वाटलं होतं पण तेही झाले नाही.

२. अमृता सुभाष आणि तिलोत्तमा शोम.
ही तर ओंगळवाणी वाटली. हाय लिबिडो मोलकरीण आणि तिला चोरून बघणारी मालकीण. मला आवडली नाही कारण कुठल्याही उंचीला गेली नाही, शेवटी सूचकपणे थ्रीसम दाखवला असता तर खरंच धक्का बसला असता. पुणे ५२ च्या उज्ज्वल परंपरेनुसार मराठी भाषकांचे इन्टिमेट प्रसंग अनाकर्षक आहेत. लस्ट ऐवजी लोचट स्टोरी वाटली.
तिलोत्तमा शोमचं पात्र लोचटच वाटत राहतं, तिच्या लोचटपणामुळे मोलकरणीचा अहंकार सुखावतो. अमृताचं पात्र माझ्याकडे असं काही आहे जे माझ्या मालकीणीकडे सुद्धा नाही ह्याने तात्पुरती सुखावते, साधारण असाच मेसेज वाटला. लैंगिकतेपेक्षा अहंकारावर फोकस होता तोही कणभरच. दोन्ही पात्रांकडे सेल्फ एस्टिम नाही व कथेच्या शेवटीही येत नाही, तसेच असुरक्षित रहातात ते, म्हणून माझी निराशा झाली.
ही कथा बऱ्याच जणांना आवडली आहे तरी मला काही पोचलीबिचली नाही.

३. तमन्ना आणि विजय वर्मा.
सुरवातीच्या आकाशाचा रंग इतका दैवी होता की तिथंच संशय यायला लागला होता. विजय वर्मा कंटाळल्या सारखा पर्व्हर्ट वाटला. एकच दहाड किती वेळा काढू..! झालं. अचानक ही इतकी मादक कशी होते याचा आणि रहस्याचा लावलेला संबंध तर ओढूनताणून. कुणीकडूनही इन्टिमेट सिन दाखवून नावाला जागणार टाईप. तमन्ना भाटियाचे अंगप्रत्यंग दाखवून त्याला कथा म्हटले आहे.

४.काजोलला सुजॉय घोषने कमी संवाद देऊन भावना डोळ्यांनी व्यक्त करायला सांगितल्यात ते बरं वाटलं. पण कुमुद मिश्राचं काम सर्वात सरस आणि सहज झालं आहे. तो पर्फेक्ट सेक्शुअल प्रिडेटर, घरात नाही दाणा आणि ठाकूरपणा वगैरे वाटला आहे. नवऱ्याला एड्स व्हावा म्हणून जो नवरा तुमच्यावर रोज बलात्कार करतो, त्याची बायको घरी HIV positive कामवाली का ठेवेल. हे लॉजिक काही कळलं नाही.

मला एकुण पॅकेज सवंग व उथळ वाटलं.
लस्ट स्टोरीज मधे सुप्त भावनांचा निचरा, एकुण पावर प्ले काहीच नाही, कथांची काही आर्कच नाही फक्त लस्ट दाखवायची म्हणून आजूबाजूला कथा काढली आहे. कथांना उंची किंवा खोली काहीही नाही. मागच्या वेळी यापेक्षा बरेच होते. विनोदी अंगाने जाणाऱ्या म्हणावं तर विनोदही जमला नाही. काही बाजू चांगल्या होत्या पण अजून चांगलं दाखवता आलं असतं असं वाटतं. लैंगिकतेतून भावभावनांचे आविष्कार किंवा भावभावनांच्या गुंतागुंतीतून उरलेली वासना यापैकी एकही प्रेक्षकांपर्यंत नीट पोचत नाही. रासवट सेक्स सीन्सची आफ्टरटेस्ट तेवढी उरते जे पुरेसं वाटलं नाही. शिवाय सुरवात ज्या लो रेंजवर होते, त्याच लो रेंजवर शेवट होतो. 'मेरी सहेली' टाईप एनर्जी आहे.

पुणे ५२ च्या उज्ज्वल परंपरेनुसार मराठी भाषकांचे इन्टिमेट प्रसंग अनाकर्षक आहेत. >>> Lol

सुरवातीच्या आकाशाचा रंग इतका दैवी होता की तिथंच संशय यायला लागला होता >>> हो काहीतरी वेगळीच रंगसंगती वाटत होती.

मलाही कुमुद मिश्राचे काम आवडले. बाकी कथा जनरली बोअरच झाल्या.

घरात <इथे "दे आर हॅविंग सेक्स" चे अनाकर्षक न वाटणारे मराठी वर्णन घाला> सुरू असताना बाहेरून लोक लॅच वगैरे उघडून घरात येतात. लाकडी/लोखंडी दारे बंद होतात पण आतील लोकांना पत्ताही लागत नाही हा जागतिक नियम इथेही पाळला गेला आहे - अगदी दारातून थेट लाइन ऑफ साइट असली तरी. अमृता सुभाषने त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पण तिच्या नवर्‍यालाही पत्ता नसतो.

अस्मिताला अनुमोदन. पहिला भाग बराच बेटर होता. या दुसर्‍या भागातल्या पहिल्या दोन कथा कश्याबश्या रेटत पाहिल्या, तिसरी पाहायचा पेशन्स राहिला नाही. कम्प्लीट लेट डाऊन!

>>> पुणे ५२ च्या उज्ज्वल परंपरेनुसार
Lol Lol

पुणे ५२ च्या उज्ज्वल परंपरेनुसार मराठी भाषकांचे इन्टिमेट प्रसंग अनाकर्षक आहेत >> Lol Lol

हो काहीतरी वेगळीच रंगसंगती वाटत होती >> यावरून पुलंचं चतुरंग रंगसंगीत आठवलं. त्यात ते म्हणाले की ह्या कार्यक्रमाची वर्तमानपत्रात जी जाहिरात आली होती, त्यात 'चतुरंग रंगसंगती' छापून आलं होतं.

सगळ्या बाया बाईपण भारी देवा बघायला जात आहेत. मी पण बघणार पण आधी इंडियाना जोन्स बघितला. अफाट आहे सिनेमा. इंडी च्या फॅन्सनी अजिबात चुकवू नये असा.

काल बघितला नेटफ्लिक्सवर
The platform, Spanish सिनेमा,
एक vertical तुरूंग, एका मजल्यावर एक सेल,एक सेल म्हणजे एक लेवल ,प्रत्येक सेलमधे मधोमध एक मोठे होल, अशा अंदाजे 333 लेवल्स,एका सेलमधे दोन कैदी, एक पोषणयुक्त, गुड क्वालिटी अन्नाने भरलेला एक प्लाटफॉर्म, रोज प्रत्येक मजल्यावर दोन मिनटं थांबणार..नंतर खाऊ म्हणून अन्न काढून घेता येणार नाही,घेतलं तर अति उष्णता किंवा अतिथंडी यानं मनुष्य मरणार.. लेवल 51 पर्यंतच अन्न संपून जातंय.. खरं म्हणजे प्रत्येकाने गरजेचं आहे तितकेच अन्न घेतले तर प्रत्येकाला पुरेल...ट्विस्ट म्हणजे, प्रत्येक कैदी एका लेवलमधे एक महिनाच असणार पुढची लेवल कुठली मिळणार माहीत नाही..वरच्या लेवल लोकांची चैन असते..खालच्या लेवलचे लोक भुकेने एक्स्ट्रीम थराला जातात..सोशल मेसेज ओरिएंटेड सिनेमा आहे...हॉरर,थ्रीलर सिनेमा.
*डिस्टर्बींग सीन्स, अडल्ड सीन्स*

मी हा कार्यक्रम बघितलेला नाहीये, पण ह्या टीमचे बाकीचे तीन कार्यक्रम पाहिले आहेत. मला तरी खूप आवडले होते. नक्की जा*. चांगला असेल.

* - इथल्या सारखं I would go असं न सांगता "तुम्ही जा" असं सांगतो आहे Wink

प्रभात ते सैराट या नावाचा, राहुल सोलापूरकर सादर करत असलेला कार्यक्रम>>

कसा होता ते सांग
रविवारी परत ऑफिस एरिया मधे जायला कंटाळा येतो
#BangaloreTraffic

Argentina 1985 - प्राइम

ऑस्कर नॉमिनेटेड सिनेमा म्हणून बरेच दिवस वॉचलिस्टमध्ये पडून होता. शेवटी काल बघितला.
(मूळ स्पॅनिश, मी इंग्रजी डब्ड व्हर्जन पाहिलं.)

१९८३ साली अर्जेंटिनातलं लष्करी सरकार कोसळलं. त्या सरकारने जनतेवर अनन्वित अत्याचार केले होते. त्यामुळे त्या सत्ताधीशांवर खटले चालवावेत अशी मागणी होती. लष्कराने ती मागणी धुडकावून लावली. त्यामुळे नागरी कोर्टात ते खटले दाखल झाले. अत्याचारांना कारणीभूत असणार्‍या लष्करी अधिकार्‍यांना शिक्षा झाल्या. (काही जण निर्दोषही सुटले.) अशा प्रकारचं जगातलं हे एकमेव उदाहरण.
ती खटल्याची प्रोसेस, मुख्य पब्लिक प्रॉसिक्युटरची घालमेल, त्याला आलेल्या धमक्या, त्याच्या कुटुंबियांचा त्याला असणारा पाठिंबा, खटल्यासाठी तो लीगल टीम कशी उभी करतो, अन्याय झेललेल्यांची साक्ष - असं सगळं दाखवलं आहे.
सत्यघटनेवर आधारित असल्याने कोर्टसीन्समध्ये काही प्रत्यक्ष फूटेजही दाखवलं आहे.

सिनेमा मला आवडला.

डिस्टर्बींग सीन्स, अडल्ड सीन्स*>> अ‍ॅडल्ट म्हणायचे आहे का?

स्क्विड गेमस सारखी वाटते स्टोरी. कोरिअन्स डू इट बेटर.

Pages