Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गोदावरी - मला आवडला.
गोदावरी - मला आवडला.
जि.जो.चं काम आवडलं.
त्याच्या बायकोचं काम केलेली कोण आहे? खूप छान अॅक्ट्रेस वाटली ती.
सिनेमात दिसणारं नाशिक आवडलं.
फक्त - सिनेमाची टॅगलाइन - अश्रद्धेकडून श्रद्धेकडचा प्रवास (किंवा या आशयाचं जे आहे ते) - ही टॅगलाइन मिसलीडिंग वाटली.
द फ्लॅश बघितला. मेह.
द फ्लॅश बघितला. मेह.
कुठे बघितला गोदावरी?
कुठे बघितला गोदावरी?
त्याच्या बायकोचं काम केलेली
त्याच्या बायकोचं काम केलेली कोण आहे? >>>>>>>गौरी नलावडे. बहुतेक स्टार प्रवाहची सिरीअल कलाकार आहे.
डायल १०० पाहिला. दिग्दर्शन
डायल १०० पाहिला. दिग्दर्शन, पटकथा एकदम सही. मनोज वाजपेयीने कमाल केली आहे. मराठी नंदू माधव दिसले. नीना गुप्ताच्या वाटेला चांगला रोल आला आहे. सफाईदार केला आहे. पण अजून चांगला करू शकली असती. निव्वळ थरार पटापेक्षाही जास्त काही तरी आहे. जास्त काही लिहीणे हे स्पॉयलर होऊ शकेल.
गोदावरी - सोनी लिव्हवर बघितला
गोदावरी - जिओ सिनेमावर बघितला.
-----
प्राइमवर 'मिडियम स्पायसी' बघितला. एकदा बघण्यासारखा आहे.
मी ललित प्रभाकरची फॅन आहे. त्यामुळे मला बघायचाच होता. शिवाय पटकथा मनस्विनी लता रविंद्रची, हा पण एक अॅडेड मुद्दा.
मराठी सिनेमाच्या मानाने फ्रेश ट्रीटमेंट, चांगलं स्क्रिप्ट-कॅमेरावर्क. मुंबईचे काही शॉट्स छान आहेत. पार्श्वसंगीत सुद्धा छान आहे. ल.प्र. आणि सई ता.ने छान काम केलंय.
पर्ण पेठेचं पात्र अधांतरी वाटलं. आणि मुळात ती मला अजिबात आवडत नाही, हा पण एक अॅडेड मुद्दा.
सुरुवातीच्या भागात पात्रं एस्टॅब्लिश होत असताना वेगवेगळ्या सीन्समध्ये एक-एक पात्र कॅमेराकडे बघून स्वगत टाइप बोलतं, ते छान वाटतं. या डिव्हाइसचा सिनेमाभर आणखी चांगला उपयोग करून घेता आला असता. पण तो मध्येच सोडून दिल्यासारखा वाटला.
गौरी नलावडे. बहुतेक स्टार
गौरी नलावडे. बहुतेक स्टार प्रवाहची सिरीअल कलाकार आहे. >>> अच्छा... 'फाइन अॅक्ट्रेस' म्हणतात तशी वाटली मला ती.
Bulbbul हिंदी बघितला
Bulbbul हिंदी बघितला नेटफ्लिक्सवर.
गोष्ट आहे १८८१, बंगालमधील.
एक बालवधू-बुलबुल एका जमिनदाराच्या घरी लग्न करून मोठी सून म्हणून येते पण कारभार सगळा धाकट्या जावेच्या जी वयाने मोठी असते तीच्या हातात असतो...वीस वर्षांनंतर गावातील पुरूषांचे खून व्हायला लागतात..अफवा असते कि उलट्या पायांची चुडैल करतेय सगळं..काय असतो प्रकार नेमका ? पहा सिनेमात...
स्केअरी नाहीऐ सिनेमा, थोडा सस्पेन्स आहे..चांगला आहे.
डार्क फेअरीटेल, पीरोडिक हॉरर ड्रामा..
मृणाली, तुझं वाचून मी पण
मृणाली, तुझं वाचून मी पण पाहिला बुलबुल.व्हिज्युअल्स जबरदस्त आहेत.जरा चक्कर आल्यासारखं झालं काही सीन्स बघून.
एकंदर त्रिप्ती दिमरी जिथे असेल तिथे ब्रूटल प्रकार होतातच.
इतक्या सुंदर मुलीला आता एखादा छान विनोदी रोल मिळावा.सारखे डार्क रोल्स करून करून मनावर परिणाम होईल.
व्हिज्युअल्स जबरदस्त आहेत.जरा
व्हिज्युअल्स जबरदस्त आहेत.जरा चक्कर आल्यासारखं झालं काही सीन्स बघून.>>>> +11
त्रिप्ती दामरी , मी पाहिलेला हिचा हा पहिला सिनेमा आणि कोणते सिनेमे आहेत?
यात भारी केलंय काम.
कला (स्पेलिंग ने क्वला) आहे
कला (स्पेलिंग ने क्वला) आहे.कला ची गाणी मस्त आहेत.व्हिज्युअल्स पण छान.
The call कोरियन, हिंदीत
The call कोरियन, हिंदीत नेटफ्लिक्सवर बघितला..
एका घरात एक मुलगी राहायला जाते, तीथे कॉर्डलेसवर तीला भुतकाळातून वीस वर्षापूर्वीचे कॉल यायला लागतात..भुतकाळातून एक मुलगी स्वतःचं भविष्य बदलवायला भविष्य काळातल्या मुलीकडून माहिती घेऊन, त्या मुलीचं आयुष्य पणाला लावून, भुतकाळात काय काय करते, पहा सिनेमात..
सिनेमा इथून तिथे तिथून इथे येत जात राहतो. कोरियन नावं पटकन लक्षात राहत नाहीत आणि चेहरे पण म्हणून जरा गोंधळ होतो पण एकदा लक्षात आल्यावर सोपं होतं समजायला.. वेगवान सिनेमा.. थ्रीलर, सायकॉलॉजीकल, टर्न्स एन्ड ट्वीस्ट्स..जबरदस्त सिनेमा..आवडला...
Qala काय..नाही पाहिला..टाकते
Qala काय..नाही पाहिला..टाकते यादीत.
अरे तृप्ती दिमरी असेल तर
अरे तृप्ती दिमरी असेल तर बघितला पाहिजे. बघतो बुलबुल.
बुलबुल जबरदस्त आहे , मागे
बुलबुल जबरदस्त आहे , मागे लिहिलं होतं मी. ठाकूर कुटुंब, जुळ्यांमधला एक मंद व विकृत, मित्रासारखा लहान दीर, त्यावरून संशय घेऊन मारून पांगळं करणं, काही दृश्ये अंगावर येतात. तृप्ती तेव्हा माहितीही नव्हती, पण काम जबरदस्त वाटलेलं. वरून सुरेख बंगाली ठकुरायन आतून पूर्णपणे एकटी, दुखावलेली. शेवट तर अकल्पनीय हॉरर आहे.
बुलबुल दोनेक वर्षांपूर्वी
बुलबुल दोनेक वर्षांपूर्वी पाहिलाय.
लेखक दिग्दर्शक सुद्धा बहुदा
लेखक दिग्दर्शक सुद्धा बहुदा कला मधलेच आहेत.
मला कोणी कोणाशी लग्न केलंय
मला कोणी कोणाशी लग्न केलंय दोघींपैकी हे बराच वेळ बघून पण कळलं नाही.नंतर कोरा वर वाचल्यावर कळलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यातला डॉक्टर कहानी मधला शात्योकी आहे ना?
राहुल बोस चा अभिनय सॉलिड.त्रिप्ती तर बेस्टच.
'मिडियम स्पायसी' >>> याबद्दलच
'मिडियम स्पायसी' >>> याबद्दलच लिहायला आले होते.
काल पाहिला आयपीटिव्हीवर. मस्त आहे. एका बॅचलरचे आयुष्याबद्द्ल, करियरबद्दल, नातेसंबंधाबद्दल असलेले कन्फ्युजन ललित प्रभाकर ने मस्त दाखवलं आहे. तो कसाही असलेला आवडतोच मला. रेशीमगाठीपासून फॅन झाले आहे त्याची. यात पण काम छान केलंय. त्याच्या आयुष्यात असलेली वेगवेगळी नाती निभावताना त्याची जी तारांबळ उडते ती बघताना खरंच एखाद्या होतकरू लग्नाळूचं असंच असेल का लाईफ असं वाटायला लागतं. आई बाबांची काळजी, बहिणीशी असलेले बंध, त्यच्या आत्याशी असलेला सॉफ्ट कॉर्नर, कलिग मित्र यांच्याबरोबर असणारा तो मस्त कॅरेक्टर उभं केलंय.
सई - नाही आवडली. तिला तामिळ का दाखवलंय कोण जाणे. ना तिला त्या भाषेचा लहेजा जमलाय, ना अॅक्टींग. अमराठी दाखवण्याच्या प्रयत्नात ती जे काय बोलते ते एकदमच विचित्र वाटलंय.
पर्ण - ओके ओकेच. नॉट सो ग्रेट रोल. काहीच वाव नाहीये.
रविंद्र मंकणी/नीना कुलकर्णी - सरप्राईज पॅकेज. परफेक्ट आई-बाबा दाखवलेत. रविंद्र मंकणींना खूप दिवसांनी स्क्रीनवर पाहिलं. थोडं सिगरेटी फुंकणं कमी दाखवलं असतं तर चाललं असतं. घरात बायकोपुढे फारसं काही से नसलेला नवरा, घरचे (स्पेशली बायको) त्यांच्या बहिणीच्या विरोधात गेले असले तरी तिला जाऊन भेटणारा भाऊ, मुलाची काळजी असणारा बाबा, मुलीच्या बाळंतपणात बाळाला हातात धरायला घाबरणारे आजोबा असं थोडंसं अबोल कॅरेक्टर छान केलंय.
नीना कुलकर्णींबद्दल तर काय बोलणार. आपल्या घरातलीच आई जणू. बरीचशी त्रागा करणारी, मुलाच्या लग्नाबद्दल कायम काळजी असणारी, नवरा आपल्या विरोधात त्याच्या बहिणीला जाऊन भेटतो कळल्यावर आपणही फॅमिलीसाठी कमी खस्ता खाल्या का असं असुयेने वाटणारी, तिला नात झाल्यावर उचलून घेताना मुलीची सासू पण तेव्हाच तिथे येते तेव्हाचे चेहेर्यावरचे बारीक बारीक एक्स्प्रेश्न्सही बघण्यासारखे आहेत.
ओव्हरॉल थोडा लेंथी आहे मुव्ही. मधेच फार संथ वाटतो. काही काही चुकाही आहेत. पण एकूण आहे बघण्यासारखा.
चांगलाय होय बुलबुल? मग पहायला
चांगलाय होय बुलबुल? मग पहायला हवा.
कला मात्र मी अर्धवटच टाकला.
आज स्पायडरमॅन सिनेमा अर्धवट टाकुन घरी परतले. हल्ली अॅनिमशन आवडत नाहीत असं लक्षात आलंय त्यात हा फारच वेगबंबाळ, रंगबंबाळ , आवाजबंबाळ होता.
इंसेडिअस, काँज्युरिंगचे पुढचे भाग यावर्षी येतील.
एक 5-10 मिनिटांचा भाग थोडा
एक 5-10 मिनिटांचा भाग थोडा डिस्टर्ब करणारा आहे.
>>>>>वेगबंबाळ, रंगबंबाळ ,
>>>>>वेगबंबाळ, रंगबंबाळ , आवाजबंबाळ होता.
हाहाहा
झी फाईव्ह घेतलंच आहे म्हणून
झी फाईव्ह घेतलंच आहे म्हणून काल तो आपला हा पाहिला. ताश्कंद फाईल्स.
थेटरात जाऊन पाहिला नसताच. वाईट नाही. चित्रपट म्हणून बरा आहे. एंगेजिंग आहे. मर्डर मिस्टरी ला एक रूका हुआ फैसला ची ( एलेव्हन अँग्री मेन) ट्रीटमेंट द्यायचा केलेला प्रयत्न आहे. शेवटाला पोहोचताना पूर्ण गंडलाय. इथून पुढे अजेण्डा मूव्ही आहे. कॉन्स्पिरसी ची जोड अजेंड्याला देताना सगळंच हास्यास्पद झालेलं आहे.
चित्रपटातून अजेण्डा राबवायचे प्रयत्न आधी होत नव्हते असे नाही. पण आताचे घातक आहेत. त्यामुळे भारतात तरी सेन्सरशिप असावी याचे महत्व पटले. हे सगळे खरे मानणार्यांची संख्या लक्षणीय आहे. त्याचे होणारे सामाजिक परिणाम भयानक असतील.
Prime वर PS2 हिंदीत आलाय,
Prime वर PS2 हिंदीत आलाय, विकेंडला पाहिला.
धागा सापडला की त्यावरच लिहितो
वेगळाच काढा. हिंदीत वेगळी
वेगळाच काढा. हिंदीत वेगळी स्टोरी असेल![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अफवा: नेटफ्लिक्स.
अफवा: नेटफ्लिक्स.
पोलिटिकल थ्रिलर आहे. नवाजुद्दिन आणि भूमी पेडणेकर आहेत.
निवडणुका, धर्म, मॉब लिंचिंग, सामाजिक उतरंड, राजकीय महत्त्वाकांक्षा, निस्पृहता, बोटचेपेपणा, समुहाची मानसिकता आणि हरवलेली सारासार विकेकबुद्धी .. इ. चं मिश्रण आहे. मला आवडला. सुरुवात क्लिशे झाली तरी तो प्रसंग तसा नाही त्यामुळे बघत रहा. काही अ आणि अ होतंय असं वाटतं, पण भारतात तसं घडून गेलंय अशा बातम्या होत्या. त्याचं दृष्यस्वरुप अंगावर येतं.
शेवटाकडे जाणारा भाग तर फारच आवडला. कोलाहल मनातला आणि बाहेरचा शब्दबंबाळ न करता तरल दाखवायचा कुठेकुठे प्रयत्न केला आहे.
मला आवडला.
धन्यवाद. आला का नेफिवर?
धन्यवाद. आला का नेफिवर? बघायचा आहेच. तो "भीड" ही अर्धाच पाहिला आहे. या आधी साधारण याच विषयावरची एक डॉक्युमेण्टरी ("१२३२ किमी") पाहिल्याने यात नावीन्य वाटले नाही - जरी हा नेहमीच्या पिक्चरसारखा असला तरी. दुसरे म्हणजे या पिक्चर मधे २-३ सामाजिक अन्यायांचे पैलू एकदम एकत्र बसवायचा खटाटोप वाटला.
१२३२ नंबर आठवत नव्हता. २००० माइल्स म्हणून शोधायला गेलो तर "२००० म्यूल्स" दिसला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण
किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुल्कर्णी बघते आहे. चांगला वाटतो आहे.
कट्यार काळजात घुसली - फार आवडला
डायल १०० पहाते आहे - आवडतो आहे.
या आधी साधारण याच विषयावरची
या आधी साधारण याच विषयावरची एक डॉक्युमेण्टरी ("१२३२ किमी") पाहिल्याने यात नावीन्य वाटले नाही >> भीड सेकंड हाफ मधे वेगळ्य अमोड वर जातो रे १२३२ किमीपेक्षा (गरज नसताना)
म्हणजे जास्त बघणेबल होतो की
म्हणजे जास्त बघणेबल होतो की अगम्य होतो? "गरज नसताना" मुळे विचारतोय
पहिल्या तासाभरात "स्क्रीनवर असलेल्या प्रत्येक दोन पात्रांमधे काहीतरी सामाजिक संघर्ष असलाच पाहिजे" अशा हट्टाने स्क्रीनप्ले लिहील्यासारखा वाटतो.
Pages