Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
त्याचाही योग्य वापर
त्याचाही योग्य वापर चेन्नईमध्येच झाला.
शोधून आणू का त्यानेही कसे याबद धोनीचे आभार मानले ते
>>
माझा प्रश्न होता की आत्ता गांडलेल्या फॉर्म मधे धोनी त्याला टच का करत नाही, तर तू म्हणतोस की पूर्वी केलाय...
एकदा वापर झाला की मिडास टच परत वापरता येत नाही हे नव्हतं माहिती
अँकी तुला मिडास ट्च आहे बाबा
अँकी तुला मिडास ट्च आहे बाबा
>>
तू का मास्टर स्ट्रोक खेळतो आहेस? तू धोनी आहेस का शर्मा???
असे तुशार देशपांडे सारखे
असे तुशार देशपांडे सारखे खोऱ्याने खेळाडू आहेत डोमेस्टीकमध्ये. आपल्याला आपल्या राज्याचे माहीत असतात. वरच्या लेव्हलला खेळल्याशिवाय बाहेर कोण ओळखत नाही.
आयपीएल मोठा प्लॅटफॉर्म आहे. पण ईथेही तो कोणाच्या खिजगणतीत नव्हता. २०२० ला त्याचे आयपीएल पदार्पण आहे. कोणाला तो ठाऊक नव्हता. कारण माहीत होण्यासारखे काही विशेष केले नव्हते. या सीजननंतर मात्र जगाला लक्षात राहील
ते कॉमेंटेटर धोनीचे कौतुक करत
ते कॉमेंटेटर धोनीचे कौतुक करत असल्याने दुय्यम दर्ज्याचे आणि जोकर असतात हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. भले ते माजी क्रिकेटर का असेना
>>
परत तू व्यक्तीपूजेच्या चष्म्यातून बघतो आहेस
धोनी चं कौतुक करतात म्हणून दुय्यम / जोकर वगैरे मी काहीच म्हणालो नाहीये. धोनी चं अती कौतुक होत असेल तर तो अजेंडा आहे असं मी म्हणालो.
आणि विविध भाषांमधील कमेंट्री ही लोकांची करमणूक व्हावी या उद्देशाने हे सुरू केली आहे. याच कारणास्तव कॅमेंटेटर्स ओव्हर द टॉप बोलतात. इतर भाषा आत्ता आल्या असल्या तरी हा प्रकार पूर्वीपासून चालू आहे.
सिद्धू माजी क्रिकेटर होता का? - हो
सिद्धू ओव्हर द टॉप अलंकारिक अतरंगी कोट्या करायचा का? - हो
सिद्धू च्या या कोट्या लोकांची करमणूक करायच्या का? - हो
वर्क होतंय ना, मग करा ती आयाडिया परत यूज... हा साधा बिझनेस कॉल आहे
आत्ता गांडलेल्या फॉर्म मधे
आत्ता गांडलेल्या फॉर्म मधे धोनी त्याला टच का करत नाही, तर तू म्हणतोस की पूर्वी केलाय..
>>>
अश्या फॉर्म गंडलेल्या प्लेअरबाबतही धोनी त्यांना त्याचा रोल डिफाईन करून त्यांच्यावर विश्वास दाखवत आलाय नेहमीच. पुढे जाऊन ते विश्वास सार्थ ठरवतात. उगाच चार आयपीएल जिंकला आहे का. टीम काही वर्षांनी बदलत राहते. तो दरवेळी विनिंग कॉम्बिनेशन बरोबर बनवतो. म्हणूनच सर्वाधिक वेळा ते प्लेऑफला पोहोचतातच
धोनी चं अती कौतुक होत असेल तर
धोनी चं अती कौतुक होत असेल तर तो अजेंडा आहे असं मी म्हणालो.
>>>
अति कौतुकाच्या अजेंड्याला धोनीच का?
दुसरा खेळाडू का नाही?
कारण ईतर कोणाचे अति कौतुक हास्यास्पद होईल.
हे धोनीलाच शोभते आणि धोनीबाबतच पटते. मान्य करा
तू का मास्टर स्ट्रोक खेळतो
तू का मास्टर स्ट्रोक खेळतो आहेस? तू धोनी आहेस का शर्मा??? >> हे डबल स्टँडर्ड आहे अॅम्की
अति कौतुकाच्या अजेंड्याला धोनीच का? >> मागे ब्रँड नेम आहे म्हणून कौतुक होते वगैरे एक महान प्रभुती इथेच म्हणाली होती खरे. कोण होते बरं ते ?
कसला धुतलाय दिल्लीने बंगलोर
कसला धुतलाय दिल्लीने बंगलोर ला... टेबल मस्त गुंतागुंतीचं होणार आहे!
हौ!! फारच मस्त मारली मॅच.
हौ!! फारच मस्त मारली मॅच.
रोहित शर्माचे अवघड झालेय काम.
“ आपल्याला आपल्या राज्याचे
“ आपल्याला आपल्या राज्याचे माहीत असतात.” - स्वतःपुरतंच (फोल) दावे करत जा सर. सगळ्यांचं तसं नसतं.
अँकी - लॉजिकल मुद्दा आहे. पण लॉजिक समजावूनच घ्यायचं नाही असं ठरवल्यावर प्रश्नच मिटतो.
१) आयपीएल स्क्रिप्टेड आहे आणि २) धोनी महान आहे - ह्याव्यतिरिक्त काहीच कॉन्ट्रिब्युशन/मुद्दा नाही.
दिल्ली कुणाकुणाची नैय्या
दिल्ली कुणाकुणाची नैय्या डुबवतात कुणास ठाऊक! पण दिल्ली ची टीम लौकिकाला साजेशी खेळायला लागली ह्याचा आनंद आहे. टूर्नामेंट चुरशीची होते अशानं.
१) आयपीएल स्क्रिप्टेड आहे आणि
१) आयपीएल स्क्रिप्टेड आहे आणि २) धोनी महान आहे - ह्याव्यतिरिक्त काहीच कॉन्ट्रिब्युशन/मुद्दा नाही.
>>
फेफ, शर्मा जी के बेटे को भूल गए क्या. अन् पंत नाही खेळत आहे म्हणून...
दहा अकरा गेम्सनंतरही
दहा अकरा गेम्सनंतरही टूर्नामेंट इज वाइड ओपन...... हीच आयपीएलची मजा आहे
वृद्धिमान चोपतोय लखनौ ला!
वृद्धिमान चोपतोय लखनौ ला!
आज तो मर गये जायंट्स!
आज तो मर गये जायंट्स!
आता काही ब्रेक लावले तर ठीक नाहीतर २५०!
आवेशची मस्त झाली ओवर. गिल थोडा चाचपडत होता आधी पण आता सुटू शकतो. ग्रौंड शॉट्स ठेवले तरी मोठा स्कोअर उभा राहिल.
थोडा कमी झाला पण तरी भरपूर
थोडा कमी झाला पण तरी भरपूर आहे. १५ ओवर नंतर खुप हिटिंग नाही जमलं.
“ शर्मा जी के बेटे को भूल गए
“ शर्मा जी के बेटे को भूल गए क्या” - अरे हो, खरंच की. तो आपल्या कर्तृत्वाने सरांना बोलायची संधी देत नाहीये फारशी.
लखनौची जबरदस्त सुरूवात!!
लखनौची जबरदस्त सुरूवात!!
तो आपल्या कर्तृत्वाने
तो आपल्या कर्तृत्वाने
>>>
५ आयपीएल ट्रॉफी आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार आहेत.
खोऱ्याने धावा आणि सामनावीर आहेत.
एखाद्या खेळाडूचे टिकाकार तो खेळत नसताना सक्रिय होतात. खेळला की पसार होतात. पण ओवरऑल आकडे दाखवून देतातच की खरा हिटमॅन कोण आहे
अँकी, बुल्स आय.
अँकी, बुल्स आय.
Rohit Sharma should change
Rohit Sharma should change his name to ‘No hit Sharma’: Krishnamachari Srikkanth
I will not even play him in XI if I was Captain of MI,” Srikkanth commented.
सो वियर्ड!! किती उशिरा पडली
सो वियर्ड!! किती उशिरा पडली बेल!
ह्युज विकेट!
रशिद!!!
छ्या! फारच एकतर्फी झाली शेवटी
छ्या! फारच एकतर्फी झाली शेवटी मॅच.
रॉयल्सनी रूटला खेळवलंय. बोल्ट बाहेर आणि ३ स्पिनर्स खेळवले आहेत. इंटरेस्टींग टीम सिलेक्शन.
छ्या! फारच एकतर्फी झाली शेवटी
छ्या! फारच एकतर्फी झाली शेवटी मॅच.>>>>> अग्रीड! काही सुरवातीला रेझिस्टन्सच ऑफर नाही केला. १५ ओवर नंतर जरा फाईट दिली पण टू लेट बाय दॅट टाईम. रशिदच्या खत्तरनाक कॅच नी पडझड सुरु केली जायंट्सची. नंतर डि कॉकची विकेट वॉज ऑसम!! सो डिसेप्टिव!
रॉयल्सनी रूटला खेळवलंय. बोल्ट बाहेर आणि ३ स्पिनर्स खेळवले आहेत. इंटरेस्टींग टीम सिलेक्शन.>>> इंडीड. परवाच हर्षा आणि अजून कोणीतरी जोकिंगली म्हणत होते. रुट ला घ्या म्हणे इंपॅक्ट प्लेयर म्हणून!
बोल्ट बाहेर हा मात्र फारच इंट्रेस्टिंग निर्णय आहे. ह्यावेळी अॅवरेज फार वाईट आहे असंही नाही त्याचं. पण स्पिनर.. सॉरी चांगले स्पिनर हे गेम चेंजर ठरु शकतात.
सध्या टायटन्स कडे तर सगळच आहे. बलाढ्य वाटते टीम.
“ रुट ला घ्या म्हणे इंपॅक्ट
“ रुट ला घ्या म्हणे इंपॅक्ट प्लेयर म्हणून” - रूटला खेळवलं म्हणून/होल्डरला नाही खेळवलं म्हणून माझा आणि (परागला नाही खेळवलं म्हणून) स्वरूपचा जीव भांड्यात पडलाय.
संजू असा खेळतो तेव्हा प्रश्न पडतो कि त्याला ह्यापेक्षा मोठ्या संधी कशा नाही मिळत?
संजू आणि जॉस, दोघेही ठोकतायत
संजू आणि जॉस, दोघेही ठोकतायत!
संजूला मी एकदा बहुतेक के के
संजूला मी एकदा बहुतेक के के आर विरुद्ध खेळताना पाहिलं होतं मागच्या वर्षी. ऑलमोस्ट सिंगल हँडेडली मॅच ओढून आणली होती त्यानी.
पण ह्या सीजनला कन्सिस्टंट नाहीये. बटलर फारच कन्सिस्टंट आहे. रॉयल्स पण भारी टीम आहे पण गॅप्स जाणवत आहेत बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही मध्ये.
बटलर आणि संजू, दोघंही आज
बटलर आणि संजू, दोघंही आज फॉर्ममधे आले. गूड फॉर रॉयल्स!
संजू सरळ बॅटने इतका अप्रतिम खेळतो तर ते अॅक्रॉस शॉट्स खेळून का संधी वाया घालवतो?
>>संजू सरळ बॅटने इतका अप्रतिम
>>संजू सरळ बॅटने इतका अप्रतिम खेळतो तर ते अॅक्रॉस शॉट्स खेळून का संधी वाया घालवतो?
FOMO/पियर प्रेशर?
संजू सरळ बॅटने इतका अप्रतिम
संजू सरळ बॅटने इतका अप्रतिम खेळतो तर ते अॅक्रॉस शॉट्स खेळून का संधी वाया घालवतो? >>>
संजू ह्या जमान्याचा कार्ल हूपर / रामप्रकाश / अरविंद डीसिल्वा आहे.
कमालीचा टॅलेंट पण आत्मघातकी फटके मारून आऊट व्हायची वाईट खोड पण.
Pages