Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
परवा उजळणी म्हणून अवतार-१
परवा उजळणी म्हणून अवतार-१ डिस्नीवर बघितला >> तू पहिल्यांदा पाहिलास तेंव्हा काय नोटीस केले होतेस ? " अॅनिमेशनच नाही तर कथा, स्टोरी- टेलिंक, डीटेलिंग" ह्यापेक्षाही काहितरी भव्य दिव्य लार्जर दॅन लाईफ आहे जे मोठ्या पडद्यावरच जाणवते. मी जॉर्डन मधल्या आय मॅक्स मधे ८० बाय ६० च्या पडयावर बघितलाय. त्यात जे भावलेले ते नंतर नक्कीच भावलेले नाहि. " पहिल्यांदा ओटीटी वर पाहण्यापेक्षा पाहू नका. नॉट वर्थ इट " असे सांगातोय असे समज हवे तर.
नजरअंदाज मलाही पहायचा आहे.
नजरअंदाज मलाही पहायचा आहे. कुमुद मिश्राचं काम आवडतं.
या वीकांताला थँक गॉड आणि रामसेतू पाहिले.
'थँक गॉड' टिपिकल इंद्रकुमार मूव्ही आहे. त्यात आपण जेवढा फालतूपणा आणि टाइमपास अपेक्षिलेला असतो तेवढा तो समोर येतो. त्यामुळे पिक्चर बरा वाटला. थोडा इमोशनल जास्त आहे. पण ते ही इंद्रकुमार फिचर आहे (काही अपवाद वगळता). सिद्धार्थ आता जरा बरं काम करायला लागलाय असं वाटलं. गेमची आयडिया आवडली. देवगण नेहमीच्या सहजतेने काम करतो. शेवटाकडे पिक्चर जास्तच मेलोड्रामॅटिक होतो पण समहाऊ ते अपेक्षितच होतं. स्टोरी प्रेडिक्टेबल आहे. नोरा फतेहीचं गाणं ऐकायला मस्त आहे ( बघायलाही आवडायला हरकत नाही ) हे गाणं मूळ सिंहली आहे. 'दिल दे दिया है' पण यात वापरलं आहे. बाकी गाणी प्रचंड कंटाळवाणी वाटली.
'रामसेतू' सुरू होतो तेव्हा आता इंडियाना जोन्स सारखं काहीतरी पहायला मिळेल असं वाटलं. पण पुढच्या १० मिनीटांतच आपला हा भ्रम तुटतो आणि पिक्चर धार्मिक + इमोशनल अंगाने जाणार याचा अंदाज येतो. पिक्चर ओके आहे. अक्षयचा तो पाण्यात घालायचा सूट कमालीचा बोजड आणि खोटा वाटतो. व्हिएफएक्स काहीतरीच आहेत आणि काहीकाही ठिकाणी उगाच वापरलेले आहेत. स्टोरी बर्यापैकी प्रेडिक्टेबल आहे. सगळ्यात भाव खाऊन जातो तो ए.पी.! हा माणूस पडद्यावर आल्यावर सिनेमात थोडीशी जान येते. छान वाटला त्याचा वावर. चित्रपटात एकच गाणं आहे , थोडंसं चेन्नई एक्स्प्रेसच्या १ २ ३ ४ गाण्यासारखं . ते बरं आहे. माझी सगळ्यात मोठी निराशा झाली ती लंका पाहून. औषधाला म्हणून तरी, गुंजभर तरी सोनं दाखवायचं ना? पण रावणाचा महाल म्हणून एक गुहा दाखवली आहे ज्यात नुसते दगड आहेत आणि इलुमिनातीचं कोरलेलं शिल्प. ही कसली लंका? जाऊद्या झालं!
पण रावणाचा महाल म्हणून एक
पण रावणाचा महाल म्हणून एक गुहा दाखवली आहे खरेच की काय.. मागे एका चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रावणाला सैफ अली खान दाखवला होता. आणि आता हे. सगळेच काय मागे लागलेत त्या रावणाच्या
कुमुद मिश्राचं काम आवडतं.>>>>
कुमुद मिश्राचं काम आवडतं.>>>> ओह त्या अॅकटरचं नाव माहित नव्हतं.
मला खरंच कोणी अंध व्यक्तीच आहे काम करणारा वाटलं. इतक्या परफेक्ट लकबी उचलल्या आहेत.
केवळ स्पेशल इफेक्ट्स, भव्य
केवळ स्पेशल इफेक्ट्स, भव्य व्हिज्युअल, सेट्स पण सोबत चांगले कथानक अथवा विषय, संवाद यांचे कॉम्बिनेशन खिळवून ठेवणारे नसेल तर ३ तास केवळ स्पेशल इफेक्ट्स साठी जाण्यास मी कचरत आहे. व्हिज्युअल्स व्यतिरीक्त अजून पाहण्यासारखे काय आहे हे पण लिहा कोणीतरी.
व्हिज्युअल्स व्यतिरीक्त अजून
व्हिज्युअल्स व्यतिरीक्त अजून पाहण्यासारखे >>> :डोळे विस्गेफारलेली बाहुली:
कुणीही ब्लर पाहिला नाहिये.
कुणीही ब्लर पाहिला नाहिये..नवल वाटले. तापसी पन्नू चा. वेगवान थ्रिलर आहे. अजून अर्धा तास च पाहिलाय. मी ऑनलाईन साईट वर बघत आहे.
कधी आला होता हा?
कधी आला होता हा?
ब्लर पुर्ण बग्जितल्यावर लिहा
ब्लर पुर्ण बग्जितल्यावर लिहा कसा आहे.
या विकेंडला आहे तो लिस्टवर
डॉक्टर जी पाहिला.आवडला.बऱ्याच
डॉक्टर जी पाहिला.आवडला.बऱ्याच विषयांना हात घालण्याचा प्रयत्न केल्याने प्रत्येक विषयाला फुटेज कमी मिळालंय.पण एकंदर सर्व विषय फ्रेश आणि चांगला हाताळला आहे.
श्रद्धा ला अगदी छोटा रोल आहे, पण सुरुवात म्हणून ठिके.
ब्लर पुर्ण बग्जितल्यावर लिहा
ब्लर पुर्ण बग्जितल्यावर लिहा कसा आहे. >> ब्लर चा मूळ सिनेमा मस्त होता. तोही नेफ्ली वरच होता.
मूळ ईंग्लिश होता की साऊथचा?
मूळ ईंग्लिश होता की साऊथचा?
तापसी आहे तर हा देखील चांगला असेल..
तिचा तो दोबारा आमच्याकडे आतापर्यंत चौबारा बघितला गेला आहे.. सगळं कळलंय असे वाटूनही दरवेळी काही नव्याने शोध लागतात
तापसी ने घाऊक रित्या स्पॅनिश
तापसी ने घाऊक रित्या स्पॅनिश थ्रिलर च्या रिमेक चे राईट घेतलेले आहेत.
आधी बदला, मग दोबारा आणि आता ब्लर.
स्पिनॅच क्वीन
स्पिनॅच क्वीन
अवतार २ हा ब्रह्मास्त्र सारखा
अवतार २ हा ब्रह्मास्त्र सारखा आहे. दिसायला छान छान पण पटकथेत तितका दम नाही.
>>>>+१११.
सुंदर पॅकेज मध्ये कमकुवत कथा.
चित्रपट असावा तर जय जय जय जय
चित्रपट असावा तर जय जय जय जय है सारखा! या mallu लोकांना एवढी creativity येते कुठून!
खऱ्या अर्थाने पोट धरून हसलोय.. काय नाहीये यात?? कॉमेडी आहे, फॅमिली draamaa आहे.. आणि सगळ्यात तुफान action!
नक्की बघा, वेळ सत्कारणी लागेल. Hotstar वर आहे
कुठे पाहायचा?
कुठे पाहायचा?
जे पिक्चर(स) सध्या पाहू
जे पिक्चर(स) सध्या पाहू शकतोय ते साऊथ चे डाय हार्ड भक्त सुद्धा पाहू शकणार नाहीत.
रात्री नावाचा सयाजी शिंदे चा पिक्चर पाहिला. ७ डेज नावाचा एक पाहिला. आता कुणीच नाव ऐकलेले नसेल असा आंच नावाचा नाना पाटेकरचा पिक्चर बघतोय.
ऑस्कर विजेते पिक्चर तर कुणीही बघतंय.
मी पण 'हम साथ साथ है' बघितला.
मी पण 'हम साथ साथ है' बघितला. तो धरता येईल का यात ? इतकं प्रसन्न वाटलं बघून. चांगुलपणावर नव्याने विश्वास बसला. 'म्हारे हिवडामें नाचें मोर ततथैया थैया' गुणगुणत भांडी घासली , बघा केवढी सकारात्मकता आली.
------
नजरअंदाज मलाही पहायचा आहे. कुमुद मिश्राचं काम आवडतं.+१ रमड
या वीकांताला थँक गॉड आणि रामसेतू पाहिले.>>>>कुठे बघितले? ट्रेलरबघून थँक गॉडचं काहीही आवडलं नव्हतं.
डॉ जी साठी अनुला मम. शेवटचा अर्धा तास खूप चांगला आहे. आधी भरपूर रेंगाळला आहे. शेफाली छाया नेहमीप्रमाणे कडक. आयुष्मान आवडतोच. पण सिनेमा लक्षात रहाण्यासारखा वाटला नाही. नेमका मुलांसोबत शेवटचा एक तास बघितल्या गेला. त्यांनी इतकी चर्चा केली की ज्याचं नाव ते. मुलाला आवडला सिनेमा. म्हणजे त्याचे त्याच्या आईचे संवाद व डेटींगवरुन भांडणं व त्यानी त्या मुलीला कसा सपोर्ट केला वगैरे ते सगळे आवडले. आपल्याकडे अजूनही काही गोष्टींचा टॅबू का आहे , त्याआडून वाईट लोक कसा गैरफायदा घेतात व चांगल्या लोकांना उगाच चोरट्यासारखे जगावे लागते हे बघून वगैरेने कितव्यांदातरी कमालीचे आश्चर्य वाटले.
हम साथ साथ है >>मोहनीश बहल
हम साथ साथ है >>मोहनीश बहल आला कि हात जोडले का ?
३० / ४० सेकंदस असतील ना
३० / ४० सेकंदस असतील ना ?
https://www.youtube.com/shorts/UxdFAeNDVNs
नजरंदाज परत एकदा बघायचा
नजरंदाज परत एकदा बघायचा प्रयत्न केला. पण स्टोरी अगदीच ढिसाळ आहे.
तो सुधीर करतो काय? म्युझिक कंपोझर का काही आहे तर त्याचं काहीच कुठे संबंध नाही. चोराला मदतीला बोलावतो ते ही अत्यंत कन्विनिअंट होतं. अशा कन्विनिअंट आणि बॅक स्टोरी अजिबातच न फुलवता आम्ही दाखवतो म्हणजे अस्सचं आहे व्यक्तिरेखा आणि त्यांची उथळ आणि कन्विनिअंट केमिस्ट्री ... असो.
हा मांडवीला बकेट लिस्ट पूर्ण करायला जातो त्यात ही किती मेलोड्रमॅटिक सिच्युएशन्स. अंध व्यक्ती स्कूटर चालवते ते तर कंटाळवाणं होतं अजिबातच फनी वाटलं नाही. अंध शब्दावरुन म्हणी आणि वाक्र्पचाराच्या अगदी गरिबातील गरीब कोट्या आणि टंग इन चिक मिझरेबली फेल गेलेले दारिद्र्यरेषेखालील विनोद. त्यांना आपण अंतर्मुख वगैरे व्ह्यायला हवंय. मला तर कीव आली लेखकाची आणि अभिनेत्यांची.
कुमुद मिश्राचा अंध अभिनय आवडला, अभिषेक बॅनर्जी, दिव्या दत्ता, राजेश्वरी - कुमुद केमिस्ट्रीही चांगली आहे. पण कथा- पटकथा function at() { [native code] }यंत रटाळ आणि पाट्याटाकू आहे. त्यामुळे पिक्चर पूर्ण ही करवला नाही.
थँक गॉड आणि रामसेतू >>>
थँक गॉड आणि रामसेतू >>> एनथुसान वर पाहिले , अस्मिता.
हसासाहै मधले दोन सीन माझ्या
हसासाहै मधले दोन सीन माझ्या लक्षात राहिलेत. मोहनीश व सलमान कोठेतरी जाउन बोलत असतात व सलमान तेथे जरा काकणभर जास्तच लाजतो. नंतर एका सीन मधे हे लोक गच्चीवर असतात व खाली हत्ती की मोर काहीतरी आलेले असतात. सगळे खाली बघत असताना कोणीतरी "हे हत्ती आहेत" अशी मौलिक माहिती इतरांना पुरवते.
हत्ती की मोर लक्षात नाही पण जे काय असेल ते.
राजश्री कधी कुठे ambiguity
राजश्री कधी कुठे ambiguity ठेवत नाही बघ.
उदाहरणार्थ 'तुम लडकी हो मैं लडका हूं' गाणं. कसं नीट नीट स्पष्ट केलंय पहा. उगाच लोकांना वेगळं नको वाटायला
(No subject)
र्म्द
र्म्द
“ हे हत्ती आहेत" अशी मौलिक
“ हे हत्ती आहेत" अशी मौलिक माहिती इतरांना पुरवते.” - तूच लिहिलेल्या बॉलिवूड नियमांना (नियम क्रमांक आठवत नाही) धरून आहे कि रे.
तुम लडकी हो मैं लडका हूं'
तुम लडकी हो मैं लडका हूं'
अवतार हा मिथुन चक्रवर्तीचा
अवतार हा मिथुन चक्रवर्तीचा सिनेमा आहे. मिथुनच्या सिनेमात व्हिलन लोकांना गरिबांची बस्ती तोडून फाईव्ह स्टार हॉटेल बांधायचे असायचे. अवतार मध्ये पँडोरा वरचे खनिज लुटायचे असते. त्याच गोष्टीला जरा वेगळा पोशाख चढवलाय झालं.
Pages