चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलेयं महेशकुमार !

प्राईमवर रामसेतू व थँक गॉड बघितला.
थँक गॉड फार साधारण वाटला आणि त्यातला विनोद डेटेड वाटला. आता हसू येत नाही अशावर.सिद्धार्थ मलहोत्रा हा फारच मर्यादित acting skills असलेला अभिनेता आहे. ह्याला विनोदाचे टायमिंगच जमत नाही. अजय देवगनचा कंटाळा आलायं. कथा दमदार नाही. शेवटी तर कंटाळवाणा आहे.नाही बघितला तरी चालतो. नोरा फतेहीचे एक उथळ गाणं आहे.

रामसेतू बरा आहे. मला अजिबात अपेक्षा नव्हती म्हणून बरा वाटला असेल. अक्षय म्हातारा दिसतोय. ते मिरवतोयही, पण जरठ कुमारी विवाह पार्ट कितवातरी नुसार नुशरत बरूचा याची बायको आहे. यांचे काही सिन एकत्र आहेत. ते फार विचित्र वाटतात. जॅकलिन एनवॉयर्नमेंटल रिसर्च करते. फारच डम्ब भाव होते चेहऱ्यावर. ही हुशार दिसतचं नाही उलट फिट इनची केविलवाणी धडपड करतेयं असं वाटत रहातं. हिला 'चिट्टीया कलैया वे' च ठीक आहे. ओके आहे सिनेमा. सगळ्यांनी वरवर काम केलयं. कुणालाच आस्था नसताना हा विषय का निवडला कुणास ठाऊक. अक्षयचे तर रामाबद्दलचे भाव, गहिवरून येणं वगैरे नकली वाटले. याचे केस तर उलटा फडा लावल्यासारखे वाटले. हा कामात मग्न दाखवायचे असल्याने केस विंचरलेले नाहीत, पण विग विचकटलेल्या केसांचा होता. दाढीचे पांढरे खुंट व गबाळे कपडे. गेला हंकोत्तम कुणीकडे !!

Kochaal मल्याळम zee5वर.
पोलिस ड्युटीवर असताना वडिल वारल्यानंतर नायकाला पोलीस डिपार्टमेंट मधे नोकरी मिळते पण कमी उंचीमुळे सगळे सारखे अपमानित करत असतात.कलिग्ज आणि सीनियर्स, गाववाले वगैरे.
मग एका मिडल एज कपलचा मर्डर होतो..मग इनवेस्टीगेशन सुरू...
सस्पेन्स, क्राईम..चांगला आहे.

Nanny पाहिला प्राईमवर.
सस्पेन्स, सॉफ्ट हॉरर..ठिक आहे.

Trikona कन्नड पाहिला.प्राईमवर.
मनुष्य इमोशन्स, पेशन्स, इगो, पावर आणि राग.
सेम परिस्थिती त अडकलेली आणि ह्या इमोशन्स नी जखडलेली लोकं कशी वागतात.तीन सेम गोष्टी सुरू असतात..रस्त्यावर गाड्यांचा पाठलाग आणि थ्रीलींग. चांगला आहे सिनेमा.

गार्गी- हिंदी डब्ड युट्युब वर.
नऊ वर्षाच्या मुलीवर गैंगरेप.. त्यातले चार आरोपी पकडले जातात..पाचवा आरोपी साठ वर्षाचा वॉचमन..नायिकेचे वडिल पण पकडले जातात.. त्यांना सोडवायची नायिकेची धडपड.. समोर येणारे फैक्ट्स...विक्टिम मुलीच्या वडिलांचे काम हलवून सोडणारे आहे. सिरीयस सिनेमा.. साई पल्लवी चे काम मस्त आहे..खिळवून ठेवणारा आहे.

गरूड गमना व्रिषभ वाहना- कन्नड झीफाईववर.
मंगलुरू चे दोन गैंगस्टर, क्राईम, वायोलंस सिनेमा.
सिनेमाटोग्राफी, बैकग्राऊंड म्युझिक ऐक्टिंग जबरदस्त.

Kooman मल्याळम प्राईमवर.
मिस्ट्री, थ्रीलर चांगला आहे.

रन स्वीटहार्ट रन-इंग्रजी प्राईमवर
वैम्पायर, थ्रीलर सिनेमा.. ठिक आहे

यशोदा पाहिला..चांगला आहे..

इंडिया लॉकडॉऊन.. ठिक वाटला.

कांतारा... जंगल सफारी अनुभव आहे खरं.. नायकाची मेहनत दिसून येते..अंधश्रद्धेला खतपाणी देणारा वाटला... ठिक आहे.

इथे सुचवल्याप्रमाणे यशोदा आणि ग्लास ओनीयन पाहिले.

यशोदा पहिला अर्धा भाग मस्त आहे पण नंतर सरधोपट मार्गाने जातो सिनेमा. एकदा बघायला नक्कीच चांगला आहे.

ग्लास ओनीयन मस्तच आहे. कलाकार, सूडाची कल्पना, सेट्स सगळेच जमून आले आहे. नाइव्ज आउट इतका खास वाटला नव्हता पण ग्लास ओनीयन मस्तच आहे.

@अस्मिता, थँक गॉड बद्दल शब्दागणिक अनुमोदन.

रामसेतू..याचे केस तर उलटा फडा लावल्यासारखे वाटले.>> प्लिजच एलॅबोरेट अस्मिता.

ब्लर चित्रपट पाहिला. उत्कंठावर्धक आहे आणि वेग ही आहे. पण अगदीच काळोख आहे, असह्य होतं ते, स्त्री चित्रपटातही मला अगदी हेच खटकलं. मग त्या पेक्षा पुर्वी राकू च्या सिनेम्यात रात्र म्हणुन ढळढळीत दुपार का दाखवायचे, ते कळालं Sad ते बरं निदान.

ब्लर मधे गुलशन देव्रा सारख्या कसलेल्या अभिनेत्या ला अगदी वाया घालवलय.. सायको थ्रिलर आवडत असतिल तर १ टाईम वॉच आहे.

'गोविंदा नाम मेरा' बघितला >>> पहिला एक तास , हा काय वाह्यातपणा चालू आहे , असं वाटत राहतं. पण शेवटचा दीड तास सिनेमा जो जोर पकडतो , मजा आली. त्या "पप्पी "गाण्याच्या नंतर खरी धमाल चालू होते. असे no brainer movies बघावेत कधीतरी. मला तर तो लूटकेस पण आवडला होता.

Glass onion : जर अपराध्याने अपराध केलेला असतो मग त्याला सुरुवातीलाच धक्का का बसतं नाही. पूर्ण वेळ अपराधी इतका कूल कसा काय ??

तद्दन भिकार आहे.

पैसे वाया घालवू नका आणि कॉमेडी ऑफ एरर्स ची अडाप्टेशन पाहायचीच असल्यास त्या ऐवजी संजीव कुमार / देवेन वर्मा चा अंगूर पहा.

मलाही आवडला ‘गोविंदा नाम मेरा’.. सगळे कॅरेक्टर्स चांगले घेतलेत.. बऱयाच मराठी कलाकारांना बघुनही बरं वाटलं. कियाराने पहिल्यांदाच चांगली ॲक्टिंग केली आहे. पप्पी गाणं फुल्ल धम्माल

कुणी rorschach बघितलं की नाही अजून? बघितला नसेल तर नक्की बघा. मल्याळम आहे, हिंदी डब hotstar वर.
क्षणक्षणाला धक्के देत नाही, पण जेव्हा धक्का देतो तेव्हा अचाट आहे.
यावर्षीचा मी बघितलेला साऊथचा सर्वात आवडता चित्रपट... कुणीतरी लिहाच यावर.

प्राईमवर The Illegal बघितला.
दिल्लीवरून अमेरिकेत स्टुडंट विसावर फिल्म डायरेक्शन शिकायला येणार्‍या हसनची कथा आहे. तशी स्टोरीलाईन नवीन नाही.
लॉस एंजिलिसमधे आल्यावर त्याचा स्ट्रगल, आयत्यावेळी नातेवाईकांनी पाठ फिरवणे, त्याने हॉटेलमधे काम करायला लागणे, तिथे अनुभवास येणारा रेसिझम, कष्ट, शिकायला पुरेसा वेळच न मिळणे, कोणीतरी भारतीय गॉडफादर मिळणे वगैरे वगैरे.
पण त्या सुरज शर्माचं काम खूप आवडलं म्हणून पूर्ण बघितला मुव्ही. तो बहुधा लाईफ ऑफ पाय मधला अ‍ॅक्टर आहे.

रामसेतू..याचे केस तर उलटा फडा लावल्यासारखे वाटले.>> प्लिजच एलॅबोरेट अस्मिता.

लहर सेव्हन अप ची पंचवीस तीस वर्षांपूर्वीची जाहिरात पाहिली होती का?

https://www.youtube.com/watch?v=Yk07hwUMxOw

https://www.youtube.com/watch?v=K_7TF5xChRs

https://www.youtube.com/watch?v=hJIPF29ta3A

त्या कार्टून च्या डोक्यावरचे केस बघा.

Banshees of Inisherin पाहिला. विचित्र सिनेमा आहे, पण मला आवडला.

आयर्लंड जवळच्या बेटावर घडणारी गोष्ट आहे. छोटेसे बेट असते, सगळे रहिवासी एकमेकांना ओळखत असतात. बेटावर रहस्य म्हणून काही राहत नसते. Mainland वर आयरिश सिव्हील वॉर चालू असते.

पाद्रेक (कोलिन फॅरल) आणि त्याची बहिण, त्यांच्या गाढव, घोडा, गाईंसोबत राहत असतात. पाड्रेकचा एक अनेक वर्षांपासूनचा संगीतकार मित्र Colm असतो. एके दिवशी Colm अचानक पाद्रेकसोबत मैत्री संपवतो. त्याचे परिणाम काय होतात ह्यावर सिनेमा आहे.
विनोदी आणि दुःखी दोन्ही आहे.

जुन्या काळातील फड, लावण्या कलेवर आधारीत, केला इशारा जाता जाता हा जुना (१९६५) चित्रपट बघण्याची इच्छा होती. सात आठ महिन्यांपूर्वी शोधला पण कुठे सापडला नव्हता. आता महिन्यापूर्वी हा युट्युबवर कुणी अपलोड केलाय. गेल्या रविवारी बघितला.

कथानक अगदी साधेसे आहे. एका फडातून एका ढोलकीवाल्याला (अरुण सरनाईक) अपमानीत करुन बाहेर काढले जाते. तो मग त्या फडवालीला (उषा चव्हाण ?) धडा शिकवण्याचे ठरवतो. डोंबारीच्या दोन मुलींना (लीला गांधी आणि?, उषा चव्हाण) घेउन, त्यांना तालीम देउन तो स्वत:चा फड उभा करतो आणि जुन्या फडाला जुगलबंदीचे आव्हान देतो. दरम्यान त्या दोन्ही मुली त्याच्या प्रेमात पडतात त्यावरुन भांडतात आणि एक दुस~या फडात जाउन मिळते असा मसाला आहे. चित्रपट लावण्यांसाठी प्रसिद्ध आहे, त्यासाठीच पाहिला.

टायटल सॉंग चांगले वाटले. पहीलीच लावणी सख्या तुम्ही बांधा एक डोरलं छान आहे, पण त्यात कडव्यांच्या मध्येही असलेला कोरस टाळला असता तर चांगले झाले असते असे मला वाटले.
दोन तीन लावण्या कंटाळवाण्या वाटल्या. उदा. “कसा खर्चला पैका", लावणी सुरु झाल्यावर अशीच एकुण पंधरा कडवी असणार हे लक्षात आले आणि पाच कडव्या नंतर स्किप केली. पण बहुतेक लावण्या चांगल्या ते ठीक वाटल्या.

शेवटली सवाल जबाब जुगलबंदी छान आहे, छान चित्रीत केलेली आहे.

सगळ्यात जास्त आवडली ती राम राम पाव्हणं ही लावणी, ऐकायला आणि बघायला सुद्धा.

उषा चव्हाण आणि लीला गांधी या दोघी डोंबार्‍याच्या मुली झाल्या आहेत.
शेमारूने अपलोड केलाय चित्रपट. त्यांनी हक्क घेतले असावेत.
बांधा एक डोरलं गाण्याला सुलोचना चव्हाण यांनी काय आवाज लावलाय!

मी हा चित्रपट ओकबाबूंचा तमाशा पट आलेला तेव्हांच पाहिला. त्यातल्या दोन तीन गाण्यांचा आवाज म्युट होता. ती दुसरी हिरवीण साऊथच्या एका हिरविणीसारखी दिसते. तिचा नवरा पण साऊथचा सुपरस्टार होता.

ती अभिनेत्री माहीत नाही.
त्याच काळातला असाच गाजलेला एक चित्रपट रंगल्या रात्री अशा मी लहानपणी दूरदर्शनवर पाहिला असेल. आठवत नाही. छोटा गंधर्वांची गाणी आहेत हे माहीत होतं. श्रेय नामावलीत तबला - अल्लारख्खा. तीन संगीतकार आहेत. गायिका सुलोचना चव्हाण आणि आशा भोसले.

लीला गांधी आणि उषा चव्हाण यांचा एकत्र चित्रपट पुढारी. त्यात आला आला गं चावट भुंगा हे गाणं आहे. केला इशारा शी तुलना करतं ती लावणी किती फिल्मी वाटतेय. कॅमेर्‍यासाठी नाच केलाय.

ती अभिनेत्री माहीत नाही. ओके.
मी जुन्या मराठी चित्रपट सृष्टीतले बहुतेक चांगले चित्रपट मिस केलेय. दादा कोंडकेंचा एकच चित्रपट पाहिला तो ही खास नाही : मुका घ्या मुका तो नव्हता आवडला.

दादांचे सुरुवातीचे चित्रपट छान होते. एकटा जीव सदाशिव , सोंगाड्या , आंधळा मारतो डोळा.

लावणी + देशभक्ती + किंचित थ्रिलर असा चित्रपट सुगंधी कट्टा. जयश्री गडकर , डॉ लागू, यशवंत दत्त

>मुका घ्या मुका तो नव्हता आवडला.
त्यांचा सगळ्यात वाईट सिनेमा निवडलात Happy पण सुरुवातीचे चांगले होते.

Pages