चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

१० कलोवरफिल्ड लेन

क्लोवरफील्ड हा राक्षस - हल्ला सिनेमा होता. एक भला मोठा परग्रहवासी राक्षस न्यूयॉर्क वर आदळतो आणि शहर नष्ट करतो. हातात धरलेल्या कॅमेऱ्यात शूटिंग असते - शेवट शूटिंग करणाऱ्या हिरोचे नक्की काय झाले समजत नाही. असा पहिला सिनेमा आहे.

१० क्लोव्हरफ्लिड लेन हा सिनेमाचा पुढचा भाग आहे. पण हा सिनेमा पूर्णपणे वेगळा आहे, पहिल्या सिनेमाशी थेट संबंध फार कमी आहे. पहिल्या भागापेक्षा भारी आहे हा सिनेमा.

वर दादा कोंडके यांच्या चित्रपटांचा उल्लेख आला आहे. पांडू हवालदार आणि एकटा जीव सदाशिव पाहिले आहेत, दोन्हीही आवडले. सोंगाड्याही लहानपणी पाहिल्याचे पुसटसे आठवते. त्यांचे सुरवातीचे कृष्णधवल चित्रपट चांगले होते. द्वयर्थी विनोद, संवाद कमी होते, निर्भेळ विनोदावर जास्त भर होता.

आम्ही ३१ डिसेंबरला 'चलती का नाम गाडी' बघितला. जिओ सिनेमावर आहे.
मस्त आहे. खूप आवडला. किशोरकुमारचं काम धमाल आहेच, पण बाकीच्यांचीही मस्त आहेत. एकदम प्रसन्न आहे सिनेमा.

मिली बघितला.
प्रेडिक्टेबल आहे. पण ठीक आहे एकदा बघायला. बॉलिवुड क्रिंज पेक्षा बरा आहे.

Ticket to paradise पिकॉकवर बघितला.
ज्युलिया रॉबर्ट्स व जॉर्ज क्लूनी. चांगला आहे, रॉमकॉम, हलकाफुलका. टिपिकल डिव्होर्सड् पेरेंट्स व मुलीचे लग्न.
इंडोनेशियात सीवीडचा शेतकरी असलेला चिकना-प्रेमळ जावई, जो राहूनराहून अमेरिकनच वाटतो. बाली फार सुंदर दाखवलंय. बाकी कुठल्याही रॉमकॉम पेक्षा सरस वगैरे नाही, एकदा बघा आणि विसरून जा कॅटॅगरीत.

>>नेटफ्लिक्स इतक बारिक लक्ष ठेवुन असत एकदम गुजराथी माणसासारख...त्याउलट प्राइम एक्दम पुणेरी दुकानादारासारखे...

अगदीच पटले Happy

नेटफ्लिक्स इतक बारिक लक्ष ठेवुन असत एकदम गुजराथी माणसासारख...त्याउलट प्राइम एक्दम पुणेरी दुकानादारासारखे... >>> Lol हे भारी आहे.

नेफिनेही मला बेनझिर भुट्टोंवरची डॉक्युमेण्टरी पाहिल्यावर "हे ही आवडेल" म्हणून हिम्मतवाला रेकमेण्ड केला होता. नवा. नंतर एकदा अनिल-माधुरीचा 'बेटा' हा फॅमिली मूव्ही का अशा काहीतरी कॅटेगरीत दाखवला होता Happy

नेटफ्लिक्स इतक बारिक लक्ष ठेवुन असत एकदम गुजराथी माणसासारख...त्याउलट प्राइम एक्दम पुणेरी दुकानादारासारखे... >>> हाहाहा .

फोनभूत भूतदया म्हणून पाहिला. वाईट रित्या आपटलेल्या चित्रपटांबद्दल दयाभाव असतोच. पण पाहिल्यानंतर अशी दया दाखवणे महागात पडल्याची जाणीव झाली. कॅटरिना कैफ आणि जॅकी श्रॉफ हीच ओळखीची नावं आहेत. जॅकीला हल्ली व्हिलन म्हणून घेतात आणि चित्रविचित्र गेट अप मधे गुलशन ग्रोव्हर ला मागे टाकेल असा पोफडे उडालेल्या भिंतीला न घासता रंगवावा तसा रंगवतात. ईशान खट्टर नाव कुठेतरी वाचल्यासारखं झालं तर हे कार्टं सैराटची वाट लावलेल्या धडक मधे होतं. धडक जसा कन्फ्युज्ड मूवी होता ( सैराट सारखा थेट भिडणारा काढावा कि बॉलिवूडी बेगडी संघर्ष जोहर स्टाईल मधे दाखवावा यात) त्याहीपेक्षा कन्फ्युज्ड फोनभूत आहे.

हॉरर कॉमेडी कि हलकी फुलकी कॉमेडी, कि साऊथ स्टाईल इल्लॉजिकल चीप कॉमेडी कि पुणेरी चिमटे काढणारी कॉमेडी यात शेवटपर्यंत दिग्दर्शक कन्फ्युड झाला आहे. कॅतरीनाचा पहिलाच लूक भयाण आहे. बिपाशा बासूच्या गेट अप मधे दिसल्याने चेहर्याची साईडपट्टी पहिल्यांदाच ठळक पाहिली. नेहमी केस सोडलेले असल्याने चेहर्याचा फ्रंट व्ह्यू तेव्हढा दिसतो. तो लोखंडाच्या सामानाची शोरूम जेव्हढी चकाचक असावी तसा आहे. पूर्ण चेहरा पाहणे हे गोडाऊन चा भंगार माल पाहिल्यावर जसे वाटावे तसे वाटते. (आधीही कदाचित दाखवला असावा चेहरा पण त्यात काही खटकले नसावे म्हणून मुद्दाम लक्ष गेले नसावे. काही जणांचे लक्ष खटकणार्या गोष्टीकडे प्रथम जाते. अशा लोकांना समाजात स्थान नसते. पण त्यांचे निरीक्षण सहजासहजी इग्नोर करता येत नाही). बहुतेक प्लास्टिक सर्जरी केली असावी आणि ती फेल झाली असावी म्हणून लक्षात राहिले. नंतर च्या पूर्ण सिनेमात दोन्हीकडून नेहमीप्रमाणे केस सोडलेले आहेत. पण म्हणतात ना मुलगी बघायला जाण्याआधीच तिला बिना मेक अप ची पाहिलेली असावी आणि मग पाच किलो मेक अप थापला तरी उपयोग होऊ नये तसा प्रकार झाला आहे. (कदाचित महिलांना आवडेलही. मला न आवडणार्या अनेक हिरविनी महिलांना आवडतात).
शेवट पाहू शकलो नाही. फसलेली कॉमेडी प्रकार.

नेफिनेही मला बेनझिर भुट्टोंवरची डॉक्युमेण्टरी पाहिल्यावर "हे ही आवडेल" म्हणून हिम्मतवाला रेकमेण्ड केला होता. नवा.>>> आई ग्गं..हसून हसून डोळ्यात पाणी..देवा काय हे अल्गॉरिदम Uhoh

लोखंडाच्या सामानाची शोरूम जेव्हढी चकाचक असावी तसा आहे. पूर्ण चेहरा पाहणे हे गोडाऊन चा भंगार माल पाहिल्यावर जसे वाटावे तसे वाटते. >>> बापरे.. हिच कतरीना वेलकम आणि त्या दरम्यान च्या चित्रपटांत खूप गोड दिसली आहे. अ‍ॅक्टींग ची बोंब तशी कायम च पण चेहरा आकर्षक होता आता तो पण लोखंड शोरूम Sad
रन्बीर सोबतच्या एका कॉमेडी चित्रपटांत ती खूप छान दिसलीये.. अजब प्रेम की गजब कहानी!

वाणी कपूर आधी साधी पण खूप गोड, मग सर्जरी नंतर घोड्या सारखे तोंड, मग आताशा पुन्हा सुरेख दिसू लागलिये. हे कसे काय. पोस्ट सर्जरी पण करतात की काय डॅमेज कन्ट्रोल सारखे?

नेफिनेही मला बेनझिर भुट्टोंवरची डॉक्युमेण्टरी पाहिल्यावर "हे ही आवडेल" म्हणून हिम्मतवाला रेकमेण्ड केला होता. >>>>> देवाSssss

नेफिनेही मला बेनझिर भुट्टोंवरची डॉक्युमेण्टरी पाहिल्यावर "हे ही आवडेल" म्हणून हिम्मतवाला रेकमेण्ड केला होता. नवा.
>>> Rofl

नेफिनेही मला बेनझिर भुट्टोंवरची डॉक्युमेण्टरी पाहिल्यावर "हे ही आवडेल" म्हणून हिम्मतवाला रेकमेण्ड केला होता. नवा. >>
लोखंडाच्या सामानाची शोरूम >>
Rofl Rofl

रघू आचार्य मी पण बघितला हो. Proud

फोन भूत फारच टुकार आहे. विनोद आचरट आहेत, भितीदायक नाही. 'स्कूबी डू व्हेअर आर यूचा' विनोद व रहस्यही बरे म्हणावे अशी गत आहे. कुणालाही अभिनय करावा असं वाटलं नाही. सेट तर गणेश मंडळातल्यासारखे 'भव्यदिव्य' वाटले. कॉमेडीच्या नावाखाली वेगवेगळ्या सिनेमातले संदर्भ घेतलेत, त्याचं टायमिंग गडबडलेयं . त्यामुळे अर्ध्या वेळा हसू येत नाही व उरलेल्या अर्ध्या वेळा फक्त राग येत नाही. जॅकी श्रॉफ लहरी सुताराची देहबोली घेऊन वावरतो. त्याची व्यक्तिरेखेवर अजिबात नियंत्रण वा पकड नसते . मनाला आलं तेव्हा नाचतो , अगम्य हातवारे करतो, नाहीतर पुंऊूूंऊूूंऊंऊंऊं चालीतली हिरो सिनेमातली पुंगी वाजवतो. एकच पुंगी किती वेळा वाजवणार हे पितापुत्रं , जुना प्रेक्षक नवी बासरी हा नियम असायला हवा. पहिल्या गाण्यात ताडपत्री सारख्या लालड्रेसमधे कटरिना फार वाईट दिसली आहे. नंतर सुसह्य आहे.
प्राईमवर बघू नका.

पॉनियन सेल्व्हन हिंदीतून आलेला दिसतोयं, प्राईमवर.

नेटफ्लिक्सवर एमी अॅडम्सचा 'लीप ईयर' पुन्हा दिसतोयं. हलकाफुलका रोमँटिक कॉमेडी आहे. जरूर बघा. मी अनेकवेळा बघितलायं.

द टेक - नेफ्ली.
तरुण पाकीटमार ( रॉब स्टार्क ( रिचर्ड मॅडन)) आणि कुणाला फारसा न जुमानणारा सीआयए एजंट (इड्रिस एल्बा) पॅरि मध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात एकत्र येतात.
टिपिकल हॉलिवूड ऍक्शन/ थ्रिलर/ मसाला चित्रपट आहे. हे दोघे दिसले म्हणून लावला. ठीक आहे. दीड तास बरा गेला. हे दोघे दिसल्यावर ब्रिटिश बोलतील वाटलं पण दोघे अमेरिकन आहेत.

HIT - the second cases तेलुगू .प्राईमवर.
वेगवान कथानक...कुठलाही सीन वाया घालवलेला वाटला नाही.. चांगला आहे.

हिल्या गाण्यात ताडपत्री सारख्या लालड्रेसमधे कटरिना फार वाईट दिसली आहे. >>> Lol
पाहिला संपूर्ण. कॉन्फिडन्स असावा तर असा. सिक्वेलची तयारी केलीय मर्दांनी. शेवट झाल्यानंतर पुन्हा सेकंड पार्टची दृश्ये दाखवण्यात जी मेहनत घेतलीय ती चित्रपटावर घेतली असती तर दुसर्‍या भागाची शक्यता होती. पीएस १ गेल्या जन्मी पाहिलाय असे वाटावे इतके दिवस झालेत. खूप गोंधळ आहे पात्रांचा.

काल रामसेतू पाहिला. परफेक्ट प्रपोगंडा मूव्ही. याच्यावर धागा निघू शकतो. सलग बैठक मारायला वेळ मिळायला पाहीजे फक्त. उडत उडत येऊन प्रतिसाद देण्याइतकं सोपं काम नाही ते.

वारंवार जेल मधे जाऊन जेलमधेही मन रमवण्याचं तंत्र अवगत झालेल्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे प्रपोगंडा असला तरी करमणूक करून घेण्याचं स्कील सराईत प्रेक्षक म्हणून विकसित झालेल आहे. पण त्याही पातळीवर चित्रपट निराशा करतो. अक्षयकुमारला पांढरा दाढीवाला दाखवलाय, त्याला एक पात्र बेटा बेटा म्हणत असतं.. बाकी ट्रेजर हंट मूव्हीतले सीन्स ढापलेले आहेत. इंडीया टीव्ही ला सापडावेत तसे पुरावे टीमला सापडत जातात. इंडीया टीव्हीच्या "देखिए, हनुमान यहा उतरे थे, इंडीया टीव्ही के हाथ लगे सबूत " या एपिसोडमधे गाणी बिणी टाकून चित्रपट बनवावा तसला प्रकार आहे.

चित्रपट मनोरंजन करू शकतील असे काही वर्षांनी वाटणार नाही. हॉलीवूड काय आणि बॉलीवूड काय, चरकातून ऊस पिळून काढावा तसे सिक्वेलवाले चिप्पाड चित्रपट असोत कि अचाट ताकदीचे नायक असलेले खोटे खोटे चित्रपट पाहण्यापेक्षा असे चित्रपट पाहून मनोरंजन करून घेण्यातच खरी करमणूक आहे.

फोन भूत बघायचा प्रयत्न फसला.. अर्ध्या तासात च कंटाळा आला. स्कीम सांगायला लागते तेंव्हा बोर होऊन बंद केला.
पहिल्या गाण्यात ताडपत्री सारख्या लालड्रेसमधे कटरिना फार वाईट दिसली आहे. >>> भयंकर सहमत Rofl भडक मेकप ची व्याख्या म्हणता येईल.

यशोदा बघितला. चांगला विषय आहे, सॅमंथा फॅ. मॅन पासूनच आवडते .
कहाणी सादरीकरण लूप होल्स सोडल्यासारखे आहे..जरा ढिसाळ.
सोउंदिडियन काय च्या कै पणा पण आहेच. व्यक्तिरेखा एक तर पांढर्‍या धोक सफेद नाहीतर मग डार्क ब्लॅक. अधला मधला ग्रे वगैरे प्रकार च नाही Happy
मधेच गरोदर असून ३-४ लोकांना फाईट करून लोळवणे, पोटावर प्रहार सहन करून मिस कॅरेज न होणे वगैरे अद्वितिय प्रकार आहेतच.
तरीही विषय एंगेजिंग असल्याने बघवला जातो. नॉट बॅड!

थाय मसाज - नेफ्लि - गजराज राव, दिव्येंदू शर्मा
सत्तरी गाठलेल्या दुबेजींना (गजराज राव) इरेक्टाईल डिसफग्शन होत असल्याची जाणीव होते. त्यांची बायको अर्धांगवाताने गेली २० वर्षे पलंगावर पडून होती तिचा मृत्यू गेल्याच वर्षी झालेला आहे. थोडक्यात गेल्या २०-२२ वर्षांपासून दुबेजीं कामक्रिडेचा आनंद घेतलेला नाही. आणि आता आयुष्याच्या उतरणीवर त्यांना ते दार पूर्ण बंद होण्यापूर्वी एकदा तरी सेक्स करायचं आहे, आणि त्यात दिव्येंदू शर्मा त्याना मदत करतो. हा थोडक्यात विषय आहे. विषयाची निवड, आपल्या समाजातील त्याबद्दलचे स्टिरिओटाईप्स, मुख्यत्त्वे अपत्यांचा पालक पिढीवर असलेला वचक इ. मुद्दे चांगलेच आहेत. पण ते मांडताना काही तरी गल्लत होऊन चित्रपट जरा कंटाळवाणाच झाला मला बघायला. वेगळा विषय हिंदीत म्हणून बघायला ठीक आहे.
मंगेश हाडवले (टिंग्या) दिग्दर्शक आहे.

The menu बघितला. एकंदर आवडला, पण फर्स्ट हाफ सुपर्ब आहे, एकदम भारी उपहास विनोदांनी भरलेला आहे. सेकंड हाफ त्यामानाने फिका वाटला. पण सिनेमा बघण्यासारखा आहे.

आना टेलर जॉय, निक हॉल्ट, राल्फ फिनेस तिघांनी मस्त काम केलय. आना टे. जॉ. ज्या सिनेमात असते तो नेहमी चांगलाच असतो असे निरीक्षण नोंदवतो. द विच, द नॉर्थमन, स्प्लिट, क्वीन्स gambit- ट्रॅक रेकॉर्ड जबर आहे तिचे.

Pages