Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हत्ती आहेत, मोर आहेत, कुत्री
रमड
हत्ती आहेत, मोर आहेत, घोडे आहेत, कुत्री आहेत, मुंडेरपे कागा आहे, कबुतर आहे . हे गौतम बुद्धासारखे शांतीदूत असल्याने त्यांच्याजवळ सगळे प्राणीमात्रं येतात आणि 'जा-जा' म्हटले की जातातही, तेही पत्र घेऊन. बरजात्याचे 'सात्विक पेटिंग झू' आहे.
अवतार मध्ये मिथुन आहे?
अवतार मध्ये मिथुन आहे?
झॉम्बी जॉनरा मधला Dawn of the
झॉम्बी जॉनरा मधला Dawn of the Dead पाहिला. द वॉकिंग डेड सिरीज आधी पाहिल्याने त्यातलाच एक एपिसोड वाटतो. पण तशा टाइपचे पिक्चर्स आवडत असतील तर बघणेबल आहे.
rmd
rmd
काही सिनेमे काढण्यामागचा हेतू
काही सिनेमे काढण्यामागचा हेतू उदात्त असतो.
https://www.youtube.com/watch?v=mQDDk8ora4A&t=3632s
हा सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला बॉलिवूड, टॉलिवूड सोडा भोजवूड सुद्धा आवडू लागेल.
सगळे खाली बघत असताना कोणीतरी
सगळे खाली बघत असताना कोणीतरी "हे हत्ती आहेत" अशी मौलिक माहिती इतरांना पुरवते.
राजश्री कधी कुठे ambiguity ठेवत नाही बघ.
उदाहरणार्थ 'तुम लडकी हो मैं लडका हूं'
>>>>>>
कोटीवर सवाकोटी
कोटीवर सवाकोटी
rmd
rmd
बाराह आणा कुणी पाहीला का? एंड
बाराह आणा कुणी पाहीला का? एंड काय आहे?
बाराह आणा कुणी पाहीला का? एंड
बाराह आणा कुणी पाहीला का? एंड काय आहे? >>> पाहिला. सगळ्या सिनेमाभर बाराहला आणत असतात. एंडला बाराह येतो
चार, आठ आणि सोळा आणे पाहिलेत.
चार, आठ आणि सोळा आणे पाहिलेत. बारा जुन्या पिढीत असेल कदचित पाहिलेले.
पैसा वसूल नाही जीवन सार्थकी
पैसा वसूल नाही जीवन सार्थकी लागले.
https://youtu.be/mQDDk8ora4A?t=8485
अभिमान नव्हे गर्व वाटतो, पहिला आणि एकमेव प्रेक्षक असल्याचा.
पहिला आणि एकमेव.....
पहिला आणि एकमेव.....
असं एकटं बघत आहात तर परीक्षण येऊ द्या. आमच्यावरही जरा तीर्थ शिंपडावे आचार्य.
परीक्षणासाठी थोडासा तरी
परीक्षणासाठी थोडासा तरी सिरीयस असल्याचा आव आणायला पाहीजे होता
हे पहिल्यापासूनच इरादे स्पष्ट करत होते.
मती कुंठित होणे याचा अनुभव घेतला.
ग्लास अनियन. नाइव्स आउट सिरिज
ग्लास अनियन. नाइव्स आउट सिरिज मधला (मर्डर मिस्टरीज) दुसरा सिनेमा. मस्त आहे; पहिल्यापेक्षा हि सुंदर. नेफिवर आहे.
बघायचा आहेच. रेको साठी थँक्यू
बघायचा आहेच. रेको साठी थँक्यू, राज.
काल यशोदा पाहिला. कथा
काल यशोदा पाहिला. कथा नेहमीप्रमाणे थोडी stretched वाटली. पण बर्यापैकी engaging आहे. विशेषतः पहिला भाग . पहिल्या भागात कथेचा अंदाज लागत नाही. सगळे कलाकार मस्त आहेत.
समंथा , तिचे कपडे सगळेच सुंदर. जाम गोड दिसते ती.
ग्लास अनिअन पाहिला. आवडला.
ग्लास अनिअन पाहिला. आवडला.
यशोदा बद्दल इतक्यात कुणी तरी
यशोदा बद्दल इतक्यात कुणी तरी सांगितलं होतं...
बाराह आणा कुणी पाहीला का? एंड
बाराह आणा कुणी पाहीला का? एंड काय आहे? नीट सांगा कुणीतरी.
"जय जय जया है" हाॅट स्टार वर
"जया जया जया जया है" हाॅट स्टार वर मल्याळम- हिंदी डब चित्रपट बघितला वुमेन एम्पावरमेंट बदल भाष्य करणारा पण वेगळ्या धाटणीचा सिनेमा. चित्रपटात कुठेही मोठ मोठे भाषणं नाही की नायिकीची रडापडी नाही तरीही विनोदी ढंगाने प्रेक्षकांचे शेवटपर्यंत मंनोरंजन करत आपला उद्देश साधतो ..तर जया ही टिपीकल मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. तु मुलगी आहेस तु हे करू नकोस ते करू नकोस असे राहु नकोस असे ऐकत व आपल्या मोठ्या भावाने वापरलेले पुस्तकं, कपडे वापरून जया लहानाची मोठी होते तिला पुढे काॅलेज करायचं असतं पण घरचे तिचं लग्न करून टाकतात.आपला होणारा नवरा आपली स्वप्ने पुर्ण करेल ह्या आशेने जया नवीन घरात प्रवेश करते व संसारात रमते पहिले काही दिवस गुडीगुडी चालु असतं पण काही दिवसांनी जयाच्या नवर्याच्या अंगातला पुरुष जागा होतो व वर्चस्व गाजवायचा पर्यंत करू लागतो ...जया त्याचा कसा सामना करते व नवर्याला
कसा धडा शिकवते हे चित्रपटात पाहण्यासारख आहे. चित्रपट तुम्हाला कुठेही बोर होऊ देत नाही उलट शेवटपर्यंत मंनोरंजन करत एक मेसेज देण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे .... प्रत्येक कलाकारांच कामे उत्तम झाली आहेत शेवटचा कोर्टातला सीन तर नेक्स्ट लेव्हल जमला आहे....एकदा आवर्जून पाहण्यासारखा
सत्यकथा आहे.
सत्यकथा आहे.
हे पहा - https://www.maayboli.com/node/78494 >>>>>>>>>>
फारच छान ,सकारात्मक .
सत्यकथा आहे.
सत्यकथा आहे.
हे पहा - https://www.maayboli.com/node/78494 >>>>>>>>>>
फारच छान ,सकारात्मक .
Best movie ... जय जय जय जय हे
Best movie ... जय जय जय जय हे.
मल्याळम आहे.
Mast movie Jaya jaya
Mast movie Jaya jaya
Glass onion पाहिला. फारच
Glass onion पाहिला. फारच engaging आहे.
पण अतिशय बेसिक query आहे , विचारलं तर spoilar होईल.
Glass Onion नाही आवडला.
Glass Onion नाही आवडला. कैच्या काय दाखवलं आहे.
बरेच दिवस पाहू पाहू करत
बरेच दिवस पाहू पाहू करत राहिलेला "ट्विस्टर" पाहिला (हुलू). एकदम खिळवून ठेवणारा आहे. २५ वर्षांपूर्वीचा असला तरी अजूनही इंटरेस्टिंग वाटतो. ज्यांनी पाहिलेला नाही त्यांनी जरूर पाहा.
रेच दिवस पाहू पाहू करत
रेच दिवस पाहू पाहू करत राहिलेला "ट्विस्टर" पाहिला (हुलू). एकदम खिळवून ठेवणारा आहे. २५ वर्षांपूर्वीचा असला तरी अजूनही इंटरेस्टिंग वाटतो. ज्यांनी पाहिलेला नाही त्यांनी जरूर पाहा.>> अरे वा हा माझा एक फेवरिट पिक्चर आहे. अनेक आवडीचे पॉइन्ट आहेत ह्यात. त्यात एक म्हातारी बाई राहात असते कुत्र्यासोबत. त्या घराभोवती अनेक शिल्पे बनवलेली आहेत मेटलची. ती फार सुरेख आहेत. हिरो हिरविणीची ग्यांग लै भारी व साहस
दृष्ये फार मस्त वाटायची त्यावेळी. तेव्हा सीजीआय इतके बेस्ट नव्हते. पण मोठी मोठी वाहने उडुन जातात हे तेव्हापरेन्त कल्पनेत सुद्धा कधी बघितली नव्हती. हिरो गोड आहे. त्याची फियॉन्सी पण. एक एक सीन पाठ आहेत मला. जरूर बघा.
अवतार २ पाहिलेला नसल्याने
अवतार २ पाहिलेला नसल्याने त्यावरच्या धाग्यावर जाणे केले नाही. काल युट्यूबवर अचानक अवतार टू दिसला. डिलीट व्हायच्या आत चटकन डालो करून घेतला. मग कामे आटोपून घरातल्या सर्वांना सरप्राईज आहे म्हणून पेन ड्राईव्ह प्रोजेक्टरला लावून होम थिएटरवर सुरू केला. सुरूवातीला पार्ट टू चे काही सीन्स हल्लीच्या युट्यूब व्हिडीओजप्रमाणे झटकन प्रोमोज प्रमाणे येतात. आता चित्रपटात सुद्धा सुरू झाले असावे असा विचार केला.
श्रेयनामावली आली. नावे सारखीच असणार ना ?
मग चित्रपट सुरू झाला. अरेच्चा ! मागच्या पार्ट मधे हिरो मेला त्याचा भाऊ आहे का यात ?
हळू हळू पुढे जायला लागला तसं मुलगी म्हणाली हा पहिलाच पार्ट आहे.
मुलगा आधीच उठून गेला होता. तिला म्हटलं "तुला तसं वाटतंय"
पण पँडोरा ग्रह ऐकल्यासारखा वाटत होता.
पहिलाच पार्ट की....
मग चेहरा पाडून झॉ हॉरर शो लावला. मुलगी उठून गेली. बायको आधीच झोपायला गेली होती.
प्रसंगावधान राखून सगळं बंद केलं.
बारह आणा पाहिला का ? एण्ड काय आहे ?
या प्रश्नाची वेळ झाली.
Pages