Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ट्रेलर चांगला वाटलेलाच.
ट्रेलर चांगला वाटलेलाच.
बघायला हवा लवकरच..
डॉक्टर जी चांगला आहे.
डॉक्टर जी चांगला आहे.
पहिला पाऊण तास काही घडतच नाही. तेच तेच गायनी आणि ऑर्थो परत परत सांगत राहतात. तो भाग कमी करायला हवा होता.
आयुष्मान, शेफाली आणि इतर मुलींनी पण कामं चांगली केली आहेत. एकदा बघायला ठीक आहे.
डॉक्टरजी मलापण बघायचा आहे.
डॉक्टरजी मलापण बघायचा आहे. त्यात इन्स्टा/यूट्यूबर अय्यो श्रद्धाचेही काम असल्यामुळे अजून उत्सुकता.
मध्यंतरी 'चूप' नावाचा सिरीयल किलर असलेला सिनेमा पाहिला (का? का? बघितला?!) कैच्याकैच आहे. अशक्य रक्तपात व किळसवाणा.
पहिला पाऊण तास काही घडतच नाही
पहिला पाऊण तास काही घडतच नाही. तेच तेच गायनी आणि ऑर्थो परत परत सांगत राहतात. तो भाग कमी करायला हवा होता.
आयुष्मान, शेफाली आणि इतर मुलींनी पण कामं चांगली केली आहेत.>>> +१
नेहमीइतका एन्गेजिन्ग नाहि वाटला एरवी आयुष्यमान चे मुव्हिज सुरवात ते शेवट चान्गले पकड ठेवुन असतात.
फेरो ना नजर …. हाइलाइट वाटले.
फेरो ना नजर …. हाइलाइट वाटले. गीत व चाल दोन्ही.
कला फक्त डोळ्यांनाच सुखकारक. मी परत परत तुकडे पाहात बसले, अजुनही पाहिन.
कथा तीच ती.. काहीच नवे नाही उलट अ आणी आ जास्त. त्यातल्या फेमिनि़झमवर चर्चा झाली. कलाने त्याचा आवाज घालवल्याच्या मनातल्या अपराधी भावनेला एकदा ठणकाऊन सांगितले असते की हो, मी त्याची संधी पळवली पण पुढचा सगळा प्रवास मी माझामाझा केलेला आहे, त्याची किंमत मी चुकवलेली आहे. गोल्डन रेकॉर्डवर फक्त माझाच हक्क आहे, ती मी कमावलेली आहे तर चित्रपट मला फेमिनिस्ट वाटला असता…
युट्यूबवर नेपाळी ( साउथ डब्ड
युट्यूबवर नेपाळी ( साउथ डब्ड हिंदी) पाहिला. रोस्ट करण्यासाठी आदर्श सिनेमा आहे. -
नवीन Submitted by मिस्टर रघू on 12 December, 2022 - 11:42
संपादन (4 hours left)
असे सिनेमे हुडकणे हेच खरे टॅलेण्ट आहे. या टॅलेण्टबद्दल मला मि. रघू यांचा अभिमान वाटतो
नवीन Submitted by आचार्य on 12 December, 2022 - 11:42
संपादन (4 hours left)
Netflix वर Troll (२०२२)
Netflix वर Troll (२०२२) पाहिला. नॉर्वे मधील दंतकथेतल्या मॉनस्टरची ही कथा. हा मॉनस्टर आत्ताच्या जगात अवतरतो आणि त्याला नष्ट करण्याची धावपळ सुरू होते. नेहमीच्या टिपिकल हॉलिवूडपटांपेक्षा जरासा(च) वेगळा आहे पिक्चर. यातल्या मॉनस्टरला माणुसकीची झाक आहे. कुठे कुठे तर त्याच्याबद्दल अनुकंपासुद्धा वाटून जाते. शेवट थोडासा प्रेडिक्टेबल असला तरी बघायला मजा आली. Troll चे चित्रीकरण मस्त आहे. पिक्चर काही काही ठिकाणी थरारकही वाटतो.
बाराह आणा कुणी पाहीला का?
बाराह आणा कुणी पाहीला का?
मी सांगत होतो तेव्हा कोणी
मी सांगत होतो तेव्हा कोणी विश्वास ठवला नाही.
The Golden Globes nominations were announced on Monday with much excitement for India; RRR scored two nominations - Best Non-English Language Film and Best Original Song for Naatu Naatu
अरे देवा!
अरे देवा!
अजून काय काय बघावं लागणारे
अजून काय काय बघावं लागणारे ह्या म्हातारीला !!!
@बाहुबली, 'बाराह आणा' नाही बघितला अजून!!!
बाहुबली मस्त आहे. आमच्याकडे
बाहुबली मस्त आहे. आमच्याकडे पारायणे होतात.
अस्मिता @ बद्दल धन्यवाद.
अस्मिता @ बद्दल धन्यवाद.
सुस्कारा
तरीच मी विचार करत होतो
तरीच मी विचार करत होतो बाहुबली कसा कोणी पाहिला नाही अजून
तू पण
तू पण
बाहुबली टोटली फिट्ट आहे. तो
बाहुबली टोटली फिट्ट आहे. तो जॉनराच त्या प्रकारचा आहे. आरआरआर म्हणजे ग्लोरिफाइड "मर्द" आहे. फॉर द रेकॉर्ड मर्द बकवास होता. अमिताभच्या इमेजची कांडी चिपाड होईपर्यंत चरकातून काढलेली होती.
हे हॉलीवूड वाले, ऑस्कर वाले, गोग्लो वाले वगैरे कधीतरी उपकार केल्यासारखे "रेकग्नाइज" किंवा "कल्चर सेलिब्रेट" करायचे म्हणून तत्कालीन एखादा लोकप्रिय चित्रपट निवडतात. त्यामागे महा कॉण्डिसेन्डिंग टोन असतो. काहीतरी एक्झॉटिक गोष्ट पहिल्यांदा पाहिल्यासारखा. त्यांना आपल्या इंडस्ट्रीची फारशी माहिती नाही. त्यातही हिंदी, मल्लू, तेलुगु, तमिळ, बंगाली वगैरे चित्रपटसृष्टींमधले सूक्ष्म फरक तर सोडाच. पूर्वी जसे भारतातील रस्त्यांवर हत्ती चालतात छाप ढोबळ माहिती असे, तसाच प्रकार आहे.
ए आर रहमान ला स्लमडॉग मिलियनेअर बद्दल रेकग्नाइज केले होते. हे म्हणजे अमिताभला मर्द बद्दल पारितोषिक देण्यासारखे आहे.
ते म्हणताहेत , Beautiful lady
ते म्हणताहेत , Beautiful lady all the way from India.
मी म्हटलं, I from Texas >>> त्यांना एकदा ब्युटिफुल लेडी शब्द म्हंटले की ऐकणारे पुढे काही लक्ष देऊन ऐकतील याची सवय नसेल.
विशिष्ठ शहरात आले नसतील अजून तेटुरीस्ट ट्रॅप होता तो ,
टुरीस्ट ट्रॅप होता तो , ज्याला हीट व्हेव मुळे बळी पडलो.
नुसते कॉन्डेसेंडिंग नाही फा, मला तर पेट्रनायझिंगही वाटते. त्यांना जसं आपल्याला बघायला आवडेल तसं ते दाखवायला निवडतात. नेमके तेच सिनेमे यशस्वीही होतात. काल इथल्या डिस्नेवर ब्रह्मास्त्र आलाय. केजो ईज अ ग्रेट बिझनसमन !!! पूर्ण इंग्लिशमधे आहे, गाणी सोडून. आधीचे अनैसर्गिक संवाद इंग्रजीत म्हणजे... आधीच मर्कटा त्यात ...! पण डिस्नेने घेतलाच. काही संबंध नाही पण मला मीच डम्ब वाटायला लागले. पहिला भारतीय सुपरहिरो हा आहे आता!!
हे म्हणजे धुमधडाकातल्या शरद तळवलकरला अशोकमामा व्याख्याविख्खिवुख्खु करत सतत 'अतिसामान्य अतिसामान्य' करतात त्याचं फँसी व्हर्जन आहे.
इंग्रजी संवाद ऐकलेस का? मला
इंग्रजी संवाद ऐकलेस का? मला वाटतं चांगले वाटतील इंग्रजी. स्क्रिप्ट मला वाटतं मूळ इंग्रजीच असावं. त्याचं लोकसत्ता ट्रान्सलेटर वापरुन मराठीकरण आणि मग हिंदीकरण करण जोहरने केलं असावं.
दिपिका च पठाण मधल गाण भयानक
दिपिका च पठाण मधल गाण भयानक आहे, पद्मावत नतर एकही हिट नसला तरी एवढ्या डेस्परेशनची गरज नव्हती. काय ती कोरिग्राफी ....अर्रर्र !!
पूर्ण इंग्लिशमधे आहे, गाणी
पूर्ण इंग्लिशमधे आहे, गाणी सोडून. आधीचे अनैसर्गिक संवाद इंग्रजीत म्हणजे... आधीच मर्कटा त्यात ...! पण डिस्नेने घेतलाच. काही संबंध नाही पण मला मीच डम्ब वाटायला लागले. पहिला भारतीय सुपरहिरो हा आहे आता!! >>>>
डिस्ने / स्टार / फॉक्स स्वतः प्रोड्युसर आहेत. त्यामुळे तो डिस्ने प्लस वर येणारच होता.
ओके अक, म्हणजे आधीच ठरलेलं
ओके अक, म्हणजे आधीच ठरलेलं होतं. मला डिस्ने हॉटस्टार व डिस्ने प्लस मधला फरक कळत नाही. सोनम कपूरचा खूबसुरतही डिस्ने/फॉक्सचा होता पण इथे नेटफ्लिक्सवर आहे बहुतेक. मला वाटलं हे तसं असेल !
ते फार कॉप्लिकेटेड आहे.
ते फार कॉप्लिकेटेड आहे. डिस्ने हळू हळू आपले सगळे प्रॉपर्टी इतर OTT प्लॅटफॉर्म वरून काढून टाकत आहेत.
“अमिताभच्या इमेजची कांडी
“अमिताभच्या इमेजची कांडी चिपाड होईपर्यंत चरकातून काढलेली होती.” -
नेहमीइतका एन्गेजिन्ग नाहि
नेहमीइतका एन्गेजिन्ग नाहि वाटला एरवी आयुष्यमान चे मुव्हिज सुरवात ते शेवट चान्गले पकड ठेवुन असतात. >> +१ एकदमच गंडलाय पटकथेबाबत. आयुषमान विचित्र दिसायला लागलाय आता. बाकी नफिसा हे राम बोलते ह्यावर एक बाफ येउ शकतो
गुडबाय मध्ये अमिताभ ची बायको
गुडबाय मध्ये अमिताभ ची बायको नीना गुप्ता!! तो ऐशीचा ती साठीची. जरठ कुमारी विवाह वाटते. पैशासाठी काहीही रोल घेतात बिचारे. हे कोणी तरी वारल्यानंतरचे सिनेमे पण आता एक क्लिशेड जॉनर झालेली आहे. अवॉइड.
अमा - अग्निपथ मधे रोहिणी
अमा - अग्निपथ मधे रोहिणी हट्टंगडी आई होती. ती त्याच्यापेक्षा १५-१६ वर्षांनी लहान आहे
दिपिका च पठाण मधल गाण भयानक
दिपिका च पठाण मधल गाण भयानक आहे>> कोणतं?
अग्निपथ मधे रोहिणी हट्टंगडी
अग्निपथ मधे रोहिणी हट्टंगडी आई होती. ती त्याच्यापेक्षा १५-१६ वर्षांनी लहान आहे
>>>
अग्नीपथमध्ये अमिताभ लहान दाखवलेला तेव्हाही रोहीणीच आई होती.
जर हिरोच्या आईच्या भुमिकेत हिरोपेक्षा वीस वर्षे मोठी बाई घेतली तर हिरोच्या लहानपणीचे सीन दाखवताना त्याच वयस्कर बाईला कसे बाळाला जन्म देताना दाखवावे
Pages