चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

गाणाऱ्या व्यक्तीचा आवाज घालवायला पारा आणि कुंकू वापरणे हे खूप कॉमन आणि क्लिशे आहे. पाऱ्यामध्ये काही रुपक लपलेले आहे असे वाटत नाही.

मला तिचे कपडे कळले नाही . थंड प्रदेशात असे कपडे घालतात का भारतात ? मला तिला बघून लिझीकीच (फेमस युट्युबर ) आठवत राहिली .

कला बघताना सायबेरियात चित्रपट घडतोय असे वाटत राहिले.

पहिल्याच दृश्यात आई दुसर्या मुलासाठी हात पुढे करते. तेव्हा तो गेल्याचे डोक्टर सांगतात. म्हणजे तो जन्मत: जिवंत होता व काही तासात गेला असावा हा समज मी करुन घेतला, तेव्हा सोनोग्राफी कुठे होती आधीच कळायला.

तिची आई सतत इतके चांदीचे दागिने घालुन का वावरत होती तेही कळले नाही. तिथली पद्धत म्हणावे तर मुलीला एकही दागिना नाही, विवाहिताच घालतात म्हणावे तर हिचे वैवाहीक स्टेटस काय हेही कळले नाही. दोघिंचे कपडे पण वेगळे वाटले. कदाचित काश्मिरात असे कपडे घालत असावेत असे वाटले. एका दृश्यात मुलगी पत्ता देविस्थान, हिमाचल असे म्हणते पण आइच्या घरचा नोकर काश्मिरी वाटला. मुलीवर फारसे प्रेम नसले तरी बाहेरुन आणुन घरी ठेवलेल्या अनाथ मुलावर इतके प्रेम की त्याला गाण्याची संधी मिळावी म्हणुन शय्यासोबतीचीही तयारी हे जरा जास्तच वाटले. त्याच्यात खरेच गुणवत्ता असेल तर संधी मिळेलच की, तो ही भेटायच्या आधीही प्रसिद्ध होताच. असो, शेवटी चित्रपट आहे.

कला थोडावेळ पाहिला पण उदास करणारा असेल हे लक्षात आल्याने २० मिनिटेच पाहुन बंद केलाय. आणि जरा जास्तच हळु वाटला म्हणुनही. उन्हाळ्यात पहावा झालं.

पुणे ५२ च का अशा अर्थाची माबोवरची पोस्ट तात्पुरती पटवून घेतली तरीही मन अशांतच होते. किल्ल्याच्या आत खदखद शिल्लक राहिली ती पुणे ५२ मधल्या त्या अध्यात्मिक दृश्यांची आणि ५२ या आकड्याची..
अशातच मग साध्वी पूनमताई पांडेजींचे प्रवचन रील्स द्वारे पुढ्यात आले आणि युरेका युरेका व्हावे तसं कुणी तरी कानात कुजबुजले......
बावनखणी !
सगळाच अर्थ उलगडला.
बावनखणी अध्यात्मिक प्रपंच आणि तो ही अंतर्मुख करणारा. या अंतर्मुख साठीच पुणे हा पर्यायवाची शब्द म्हणून वापरलाय...... बहुतेक म्हणायचे जिवावर आलेय पण मायबोली आहे. सेफ साईडला राहणे ठीकच.

कला पाहिला. सिनेमा दिसायला खूप छान आहे. दृश्य सुरेख चित्रित केली आहेत.

पण एकूण गोष्टीचा अभाव आहे. गोष्टीत फार दम नाय. पात्र निर्मितीवर फार प्रयत्न नाहीयेत. भारी व्हिज्युअल मुळे सिनेमा बोअर होत नाही इतकेच काय ते. आणि संगीत चांगले आहे सिनेमात, पण माझी अपेक्षा होती की बरीच भारी गाणी ऐकायला मिळतील. एकतर गाणी फार नाहीत आणि काही गाणी मिळमिळीत आहेत त्यामुळे तिथे निराशा झाली.

वरुण ग्रोव्हर मस्त वाटला सिनेमात. बाबिल खानने सुध्दा छान काम केले आहे. एकदा बघायला हरकत नाही.

कांतारा नेटफ्लिक्सवर हिंदीत बघितला.
जेवढे कौतुक ऐकले, तेवढा खास नाही वाटला. रिषभ शेट्टी शिवाचे पात्र जगलायं. खरोखरचं शिवा वाटतो तो. रासवट, तामसी, मागचा-पुढचा विचार न करता पुढ्यात आलेले काम पैलवानी डोक्याने करून टाकणारा. त्याची तरूण आई व कोला-नर्तक बाबा आवडले. नंतरची आई वयाने त्याच्याएवढीच केस पांढरे केलेली बाई वाटली. काम तिचेही आवडले. वैताग खरा वाटतो तिचा. मित्रांचे काही काही विनोद आवडले. सर्वात उत्तम काम वन अधिकाऱ्याचे आहे. त्याची देहबोली सुद्धा फार apt आहे. त्याचं पात्र फार व्यवस्थित विकसित केलेले वाटले. त्यामानाने मित्रांचे व जमीनदाराचे तितके व्यवस्थित वाटले नाही. गुरवाचा चेहरा व वावर फार शांत आहे. छान वाटला. त्याला मारल्यावर खरोखरचं वाईट वाटले. जमीनदार आपापल्या भूमिकेत ठीक. त्याला शेवटी प्रवचन देताना शिवा म्हणतो 'आम्ही गरीब लोक कभी कभी तो हमें सुखी रोटी खाके गुजारा करना पडता है' माझ्या मनात आले सतत तर मटन, चिकन , डुक्कर, फिशकरी खाताना व स्कॉच पिताना दाखवलाय. उलट ओव्हरइटिंग झालेयं

लीला बहुतेकवेळा गोंधळलेली वाटते, फार लो एनर्जी आहे, तिच्या गोडव्याचीही छाप पडत नाही. लव्ह स्टोरी गोड आहे पण कथेला खीळ बसवते, फक्त शेवटी कथेशी संलग्न वाटली. तोपर्यंत हे समांतर कथानक वाटत रहाते. गाणी आवडली नाहीत. हे कमी करून त्यांनी मूळ दंतकथेला अधिक फुटेज द्यायचे असते. कारण मी सतत दागिने घातलेल्या रानडुकराची वाट बघतेयं असं वाटू लागलं. जेव्हा जेव्हा पंजुर्लीची व राजाची गोष्टं, राजाची शांतीसाठीची तगमग, वराहरूपम् , कोला व ते कथकली सारखे नृत्यं होते, सिनेमा फार उच्च होऊन जातो. पण शिवा व वराहरूपम् हे कनेक्ट व्हायला फार वेळ लागला. मधेमधे तर पकड सुटली व संथही झाला. त्याने आधीच्या उच्च अनुभूतीचा प्रभाव टिकत नव्हता. मूळ कथा आध्यात्मिक वाटली. प्रत्येकाचा देव, श्रद्धास्थानं व पाळमुळं वेगवेगळी असतात. आपण तर प्राणीमात्रांत व निसर्गातही परमेश्वराचे अस्तित्व मानतो. त्यामुळे वराहरूपम् काय किंवा मच्छकच्छरूपम् काय दोन्ही तितकेच भावले असते. पण त्यावर फोकस ठेवायचा असता. 'वराहरूपम्' च्या प्रभावाबाहेरचा शिवा फक्त एक रँडम दाक्षिणात्य नायक म्हणूनच उरतो. उलट वनअधिकारी त्यापेक्षा कितीतरी स्वतंत्र व स्थिरबुद्धी वाटतो. शेवटचे सगळेच उच्च आहे, त्या आरोळ्या वगैरे निसर्गातल्या 'त्या'शी जोडणारा अनुभव !!! सुरवातीची व शेवटची वीस मिनिटे , मधले काही तुकडे व म्हशींची शर्यत आवडली. अगदी सुरूवातीच्या राजाच्या गोष्टीने 'चांदोबा'तल्या गोष्टी आठवल्या.

विलक्षण सुंदर परीक्षण.
कांताराचा युएसपी क्लायमॅक्स आहे. त्याबद्दल पाटी कोरी असेल तर चित्रपटभर पसरलेली मरगळ झ्हटकून ४४० व्होल्ट्सचा झटका देण्याची ताकद त्यात आहे. आता तो अनुभव येण्याची शक्यता कमी असल्याने जेव्हढे ऐकलेय तसा अनुभव येत नाही ही प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. तुंबाडचे दुसरे दिग्दर्शक (बर्वे नसलेले) म्हणतात त्या प्रमाणे हा आदीम मानवी संस्कृती आणि परंपरांचा सत्कार / उत्सव साजरा करणारा सिनेमा आहे.
त्याबद्दल नंतर..

आता तो अनुभव येण्याची शक्यता कमी असल्याने जेव्हढे ऐकलेय तसा अनुभव येत नाही ही प्रतिक्रिया स्वाभाविक आहे
>>> आणि मी ओटीटीवर , हिंदी डब आणि शेवटचे गाणे नसलेला बघितलायं, त्यामुळेही असेल कदाचित.

मानवी संस्कृती आणि परंपरांचा सत्कार / उत्सव साजरा करणारा सिनेमा आहे.>>>+१

थँक्स रघ्वाचार्य Happy

छान परिक्षण.
कारण मी सतत दागिने घातलेल्या रानडुकराची वाट बघतेयं असं वाटू लागलं. जेव्हा जेव्हा पंजुर्लीची व राजाची गोष्टं, राजाची शांतीसाठीची तगमग, वराहरूपम् , कोला व ते कथकली सारखे नृत्यं होते, सिनेमा फार उच्च होऊन जातो. >>+१

आम्ही गरीब लोक कभी कभी तो हमें सुखी रोटी खाके गुजारा करना पडता है' माझ्या मनात आले सतत तर मटन, चिकन , डुक्कर, फिशकरी खाताना व स्कॉच पिताना दाखवलाय. >>तो इतर सगळ्या गरीब लोकांबद्दल बोलतो. तो आणि त्याचे मित्र काम करायचे सोडून जंगलात शिकार करतात, मासेमारी करतात, दुसऱ्याची कोंबडी पळवतात व जमीनदाराला खूष करून स्कॅाच मिळवत असतात. जे इतर गरीब लोक नाही करत.

नंतरची आई वयाने त्याच्याएवढीच केस पांढरे केलेली बाई वाटली. >>> Lol

जे इतर गरीब लोक नाही करत. >>> हो बरोबर आहे पण त्यांचा प्रतिनिधी म्हणून जो दाखवलाय त्याच्या या संवादात खरेपणा वाटत नाही मग.

जेव्हा जेव्हा पंजुर्लीची व राजाची गोष्टं, राजाची शांतीसाठीची तगमग, वराहरूपम् , कोला व ते कथकली सारखे नृत्यं होते, सिनेमा फार उच्च होऊन जातो. >>> हो तिकडे त्या धाग्यांवर मानव, मी व इतर काहींनी असेच म्हंटले आहे. उर्वरित पिक्चर तद्दन साउथ मसाला आहे.

प्रतिनिधी म्हणून जो दाखवलाय त्याच्या या संवादात खरेपणा वाटत नाही मग.>> तो आधी बेफिकीर दाखवला आहे. स्वत: खाऊन पिऊन मजा करायची. ज्याचा राग येईल त्याला मारायचे मग तो कोणीही असो. लोकांचा कैवारी नाहीच. जमीनदाराकडे तो धमकी द्यायला जातो तेव्हा गावातले लोक तो तिकडे जमीनदाराकडे दारू पिऊन पडला असेल असे समजतात.

हम्म्म... सोनाली व फा, Happy
तो प्रतिनिधी न वाटता गावगुंड वाटलायं. मगं एकदम अंगात आल्यावर साक्षात्कार होऊन त्याला इतरांबद्दल तळमळ वाटायला लागते. तरीही त्या आधी तो त्यांच्यासारखे जीवन जगताना दाखवायला हवा होता. म्हणजे ही तळमळ खरी वाटली असती व भिडली असती हेही खरंय. त्याची प्रतिक्रिया ही तळमळ कमी व गुरवाच्या जाण्याचा धक्का व विश्वासघाताने अचानक झालेली उपरती जास्त वाटली. गुरव मेला नसता तर तो दिशाहीनच राहिला असता का असं वाटण्याइतकी.

थॅंक्स सोनाली Happy

दिलिप कुमार जयंतीचे सिनेमे पाहीले का शेवटी? आन दाखव्णार होते ना? मला आवडतो तो सिनेमा.

मान मेरा एहसान - हे गाणे आहे बहु तेक त्यात.
नादिरा हिरॉइन म्हणुन फारशी कधीच पु ढे नाही आली. तिचे एक गाणे मला फार आवड ते-
कुछ और जमाना केहेता है
कुछ और है जिद मेरे दि लकी

दिलीप कुमार जयंती- बुकमायशो वर दिसलंच नाही. पीव्हीआरच्या वेबसाईटवरही दिसलं नाही. काल आणि आज होणार होते.
चेन्नईतल्या चक्रीवादळामुळे इथेही ढगाळ वातावरण, थंडी आणि रिपरिप पाऊस आहे परवापासून. त्यामुळे तसंही उठून बाहेर पिक्चरला जायचा उत्साह नाहीये. आम्ही घरीच अपोलो 13 बघितला. Proud

आजकाल मायबोलीवर चित्रपटांचे एवढे कीस काढले जातायत की त्या दिग्दर्शकांनीपण हे धागे वाचले तर 'व्वा!, काही गोष्टी नव्याने कळल्या' म्हणतील Happy त्या कलाच्या धाग्यावर गेल्यावर तर न-नाट्य प्रेक्षकांच्या क्राउडमध्ये सापडून भांबावून गेलेल्या पुलंसारखा फील येतोय.
एनीहाऊ, कला बघा किंवा बघू नका, पण अमित त्रिवेदींचं संगीत मिस करू नका लोक्स. युट्युबवर आहे. 'फेरो ना नजर से नजरिया' तर रिपीट मोडवर ऐकतोय.

कला पाहिला.
गाणी आणि चित्रीकरण सुंदर.बाबील खान ला अजून मोठी भूमिका मिळायला हवी.
मुख्य नायिका सुंदर, अभिनय पण सुंदर.

>>>>काल आणि आज होणार होते.
चेन्नईतल्या चक्रीवादळामुळे इथेही ढगाळ वातावरण, थंडी आणि रिपरिप पाऊस आहे परवापासून. त्यामुळे तसंही उठून बाहेर पिक्चरला जायचा उत्साह नाहीये. आम्ही घरीच अपोलो 13 बघितला. Proud

अर्रे ओके ओके. Happy

आयुषमान खुरानाचा डॅाक्टरजी बघितला ..त्याचं काम नेहमीप्रमाणेच छान .. शेफाली छायाचेही काम तितकेच दमदार.. स्टोरीही हटके..बऱयाच दिवसांनी एक चांगला पिच्चर बघायला मिळाला.

Pages