Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हाहाहा, वधचा वध झाला.
हाहाहा, वधचा वध झाला.
अवतार चे काय रिव्ह्युज?
अवतार चे काय रिव्ह्युज?
गिऱ्हाईकाने बोलायला तोंडाचा
गिऱ्हाईकाने बोलायला तोंडाचा चम्बु केलेला पाहुन "नाही, आमच्या कडे लुंगी नाहीये, टाय किंवा स्वेटर घ्या त्यापेक्षा" असे म्हटल्यासारखे वाटले ते.
खूप नवीन पोस्टी दिसल्या आज.
खूप नवीन पोस्टी दिसल्या आज. पण मजा आली वाचताना.
आत्ता यशोदा पाहून संपवला. सुरूवात पाहिल्यावर असं वाटलं कि हा मधूनच पाहिलेला आहे काही वर्षांपूर्वी. पण तो वेगळा होता. बराचसा असाच. पण तो बटबटीत होता. यशोदा थोडा डिसेंट वाटला. तरीही विषय गलबलून टाकणारा आहे. सस्पेन्स असं काही नाही. ती आता दक्षिणेकडची शैली झाली आहे. स्क्रीप्ट लिहीतानाच अशी लिहायची कि मधला भाग गाळायचा, तो शेवटी टाकायचा, सुरूवात आणि शेवटच्या प्लॅशबॅकला जोडून घ्यायचं. त्यामुळे धक्के बसतात. यशोदा एक छान थ्रिलर सस्पेन्स स्टोरी झाली असती. पण असाही चांगला आहे. एकदा पहाण्यासारखा. प्रेडिक्टेबल असला तरी खिळवून ठेवतो. खूप अपेक्षा ठेवून पाहण्यासारखा नाही. क्रिटिकल रिव्ह्यू वाल्यांनी न पहावा असा.
काल मेन्शन करायचा मोह झाला
काल मेन्शन करायचा मोह झाला होता. पण माझी कमेंट आली कि धागा बंद पडतो म्हणून आवरला. पठाण आला का ओटीटीवर ?
कुणाचा राहिला असेल तर म्हणून पठाणची स्टोरी लिहीलेली नाही. या तीन दिवसात बघून घ्या रे !
लाॅकडाऊन चित्रपटात मुंबई ते
लाॅकडाऊन चित्रपटात मुंबई ते बिहार पायी वाट मुंबई ते हैद्राबादच्या वाटेला अर्ध्या किंवा कोणत्याही अंतरावर कशी काय मिळते ते कळलं नाही..
हो मलाही तो प्रश्न पडला. पण
तो प्रकाश बेलवडी कन्नड आहे. त्याचे कॅरेक्टर "मि. राव", म्हणजे तेलुगू आहे पण त्याचे उच्चार तमिळ व्यक्तीचे हिंदी वाटतात
तेलुगू आहे पण त्याचे उच्चार
तेलुगू आहे पण त्याचे उच्चार तमिळ व्यक्तीचे हिंदी वाटतात
>>> दंडवत घ्या...
पठाण चित्रपटाबद्दल इथे वाचू
पठाण चित्रपटाबद्दल इथे वाचू शकता
https://www.maayboli.com/node/82771
यशोदा पाहताना ज्या चित्रपटाची
यशोदा पाहताना ज्या चित्रपटाची आठवण झाली तो शोधण्याचा प्रयत्न केला. मेडीकल क्राईमवरचे साऊथचे पाच सहा मूवीज पाहिलेले आहेत. एकाचे नाव खतरनाक पोलिसवाला, मसाला मार के, डेअरिंग पोलीसवाला नावाने बघितलेत. एक मार्शल म्हणून होता. पण यात तो नाही. शोधताना एक इजिप्शियन मूव्ही सापडला १२२.
मेडीकल क्राइम थ्रिलर आहे. हॉरर पण म्हणता येईल. शेवट थोडा ताणलेला वाटला.
डॉक्टर जी पहिला. वन टाइम वॉच
डॉक्टर जी पहिला. वन टाइम वॉच आहे. पण मला असे वाटले की याचा शेवट आधी काहीतरी वेगळा असावा पण सध्याच्या परिस्थितीमुळे वेगळा केला केला असावा. आयुषमानचा काहीच प्रभाव वाटलं नाही.
अय्यो श्रद्धाच्या श्रद्धाला फारसे काहीच काम नाही तरी बऱ्याच इन्स्टा-यु ट्यूब वाल्यांना हल्ली सिनेमात छोटी मोठी कामे मिळतात. उदा. प्राजक्ता माली (जुग जुग जिओ ), कुशा कपिला, अजून एक दोन नावे आहेत जी आता आठवतही नाहीत. पण हे अगदीच किरकोळ रोल्स असतात. त्यांची लोकप्रियता कॅश करणे हाच हेतू.
बाराह आणा कुणी पाहीला का? एंड
बाराह आणा कुणी पाहीला का? एंड काय आहे?
>'गोविंदा नाम मेरा' बघितला.
>'गोविंदा नाम मेरा' बघितला. विकी कौशल, भूमी पेडणेकर, किआरा अडवानी, रेणुका शहाणे, सयाजी शिंदे तगडी स्टार कास्ट आहे. अचाट कॉमेडी, काईम.. सस्पेन्स... काही तरी वेगळाच आहे. पण भारी जमला आहे.
+१ मलाही आवडला. भट्टी जमली आहे !
अवतार-द वे ऑफ वॉटर बघून आलो.
अवतार-द वे ऑफ वॉटर बघून आलो. पहिल्या इतका चांगला वाटला नाही, फार ताणलायं. रनटाईम सव्वातीन तासांचा आहे. माझी फार चुळबुळ झाली, मनातल्या मनात त्याला 'पाण्यातला लगान'नाव दिलं. सुरवातीचा अर्धा तास काय चाललयं हेच कळत नाही. मग मात्र पकड घेतो. चांगला आहे. यावेळेस अजून एक वेगळी निळी प्रजात दाखवलीये. जी पाण्यात रहाते व स्वतःची ओळख 'रीफ पिपल' म्हणून सांगते.
पाण्यातला लगान
पाण्यातला लगान
मी अजून भाग 1 पण पाहिला नाहीये.
अनु, पहिला भाग कितीतरी सरस
अनु, पहिला भाग कितीतरी सरस आहे. नक्की बघ. यात मात्र युद्ध भरपूर आहे.
अवतार-२ बघायचाय मलाही. पहिला
अवतार-२ बघायचाय मलाही. पहिला भाग टीव्हीवर पाहिला होता, पण यावर्षी थिएटरमधे बघितला तेव्हा जास्त मजा आली आणि काही काही गोष्टी जास्त चांगल्या समजल्या.
हो का अस्मिता. अवतारचा ट्रेलर
हो का अस्मिता. अवतारचा ट्रेलर मी वाकांडा फॉरेवर च्या वेळी पाहीला. अशीच स्टोरी आहे जवळपास सेम. पाण्यात विश्व असणारी वेगळी प्रजाती. हीच तीन तासांची लांबी आणि अगदीच मोजके प्रसंग लक्षात राहतात बाकी बोर होता पूर्ण. लेट नाईट शो ला पण हाऊसफुल्ल होता आणि एवढा बोर निघाला. ब्लॅक पँथर च्या आईचं काम आवडलं फक्त.
भाग्यश्री ,
भाग्यश्री ,
तिथे जाताना घरी पसारा तसाच टाकून गेलो, त्यावरून बाहेर वाकांडा फोरेव्हर घरी उकांडा फोरेव्हर हा जोकही मारून घेतला. कुणीही हसले नाही, हेवेसांनल.
मला फार आवडला वाकांडा फोरेव्हर. हा त्यामानाने नाही आवडला. तेवढं निळ्या प्रजातींचे साम्य आहे पण वरवरचं. तोही अडीच तासांचा आहे. आमचे पॉपकॉर्न प्रिव्यू मधेच संपून जातात आणि...
आत्ता अवतार १ ची उजळणी केली.
कुणीही हसले नाही>>> मी हसले
कुणीही हसले नाही>>> मी हसले गं
अवतार २ ओटीटी वर यायची वाट बघेन मग!
कॉन एअर नावाचा जुना सिनेमा
कॉन एअर नावाचा जुना सिनेमा हॉट स्टार वर आहे. जरुर बघा. करमणूक प्रधान अॅक्षन पट. लॉट्स ओफ स्टुपिड टेस्टोस्टेरॉन ऑन डिस्प्ले. एकदम मजेशीर आहे.
अवतार-२ पाहिला. पहिल्या
अवतार-२ पाहिला. पहिल्या पिक्चरशी कम्पेअर करणं इनएव्हिटेबल आहे. अवतार-१ आयमॅक्स ३डी मध्ये पहाणं हा माझ्यासाठी आयुष्यातला एक बेस्ट सिनेमॅटिक एक्सपीरियन्स होता. (तुम्ही अवतार-१ २डी मध्ये पाहिला असेल तर लेट मी ब्रेक इट टू यू... तुम्ही अवतार पाहिलेलाच नाही) बर्याच लोकांनी तो नंतर टीव्हीवर वगैरे पाहिला आणि मग 'इश्श, यात काय एवढं खास होतं' वगैरे म्हटलं. हे म्हणजे आंधळ्याने मोराला हात लावून 'शहामृगासारखा तर आहे' म्हणण्यासारखं आहे. तर ते एक असो.
'वे ऑफ वॉटर' ची स्टोरी पहिल्याइतकी खास नाही. ऑन द अदर हॅण्ड, व्हिजुअल आय कॅन्डी पहिल्यापेक्षा जास्त आहे. ती सुद्धा क्वांटिटेटिव्हली. पिक्चर सव्वातीन तास म्हणजे फारच लांब आहे. स्टोरी थोडक्यात सांगायची म्हणजे स्काय पीपल वर्सेस निळे पीपल, अधिक त्यांच्या जोडीला मोरपिशी पीपल आणि माणसांपेक्षा इंटेलिजन्ट असणारे मत्स्य-पीपल. हे मत्स्य-पीपल माणसांशी कम्युनिकेट वगैरे करू शकतात. कसं ते नीटसं कळलं नाही. अवतार-१ चा क्लायमॅक्स एपिक होता. -२ चा थोडा कंटाळवाणा होतो. मला वाटतं पहिल्यापेक्षा भव्यदिव्य बनवण्याच्या नादात स्टोरीकडे दुर्लक्ष झालं असावं. तरी ओव्हरऑल सिक्वेल्स जितके वाईट निघतात तितका नक्कीच नाही. कॅमेरॉन हॅज ट्रायड टू गिव्ह यू युअर मनी'ज वर्थ. मात्र बघायचाच झाला तर आयमॅक्स किंवा गेलाबाजार ३डीत तरी पहा.
अवतार २ हा ब्रह्मास्त्र सारखा
अवतार २ हा ब्रह्मास्त्र सारखा आहे. दिसायला छान छान पण पटकथेत तितका दम नाही.
मनातल्या मनात त्याला
मनातल्या मनात त्याला 'पाण्यातला लगान'नाव दिलं >>> ब्ल्यू लगान फिट्ट बसेल.
यावरून मला ब्लु लगून आठवला
यावरून मला ब्लु लगून आठवला
कसला भारी सिनेमा होता तो
अवतार २ हा ब्रह्मास्त्र सारखा
अवतार २ हा ब्रह्मास्त्र सारखा आहे. दिसायला छान छान पण पटकथेत तितका दम नाही.>>>
अवतार २ तितकाही वाईट नाही सर
सिक्वेल नुसता कॅश-ग्रॅब म्हणून काढलेला नाही. प्रेक्षकांना काहीतरी देण्याची कॅमेरॉनची इच्छा दिसून येते.
ब्रह्मास्त्र हा पूर्वी विन्डोज ९५ च्या जमान्यात लालपिवळे रंग उधळणारे स्क्रीनसेव्हर असायचे तसला नुसताच स्क्रीनसेव्हर आहे.
त्या सिगोर्नी विव्हरला म्हातारपणी मुलगी कशी होते (तेसुद्धा तिच्या अवतार ला) ते कळलं नाही. अर्थात इतक्या ॲडव्हान्स्ड फ्युचर मध्ये सेक्ससारख्या मागास प्रकारांनी पुनरुत्पादन करण्यापेक्षा इतरही वेगवेगळे मार्ग असतील. ती खुद्द ऐवा चीच मुलगी आहे अशी एक थिअरी ऐकली.
व्हिलनचा मुलगा चांगल्या बाजूला असणे याने स्टार वॉरची आठवण होते. एकूण बर्याच गोष्टी पुढच्या भागांसाठी सोडल्या आहेत.
तुम्ही अवतार-१ २डी मध्ये
तुम्ही अवतार-१ २डी मध्ये पाहिला असेल तर लेट मी ब्रेक इट टू यू... तुम्ही अवतार पाहिलेलाच नाही >> +१. दोन्ही फक्त मोठ्या नि मोठ्या स्क्रीनवरच पाहायच्या लायकीचे सिनेमे आहेत. ओटीटी वर पाहण्यापेक्षा पाहू नका. नॉट वर्थ इट.
कालच बघून आलो अवतार आयमॅक्स
दोन्ही फक्त मोठ्या नि मोठ्या स्क्रीनवरच पाहायच्या लायकीचे सिनेमे आहेत. ओटीटी वर पाहण्यापेक्षा पाहू नका. नॉट वर्थ इट.>>>>>>>>> +++१०००
कालच बघून आलो अवतार आयमॅक्स ३ड मधे.
जबरी विजुअल्स आहेत. त्यासाठी १००% मार्क.
शेवटी शेवटी बोर झाला थोडा. बॉलिवूड स्टाईल मारामारी वगैरे.
थोडी कमी लांबी चालली असती.
डॉक्टर जी.. ठिक आहे.
आयुष्मानच वेगळे विषय निवडणं आवडतं. त्याचं काम नेहेमीप्रमाणेच आवडलंय.
गोविंदा मेरा नाम सुरू केला होता पण अर्धाच बघितला. सयाजी शिंदे आणि त्याच्या मुलाच्या एंट्रीपर्यंत. मग जरा बोर झाला. माहित नाही पूर्ण करेन का?
नजरअंदाज पण बघितला. छान आहे वेगळा थोडा.
एक अंध व्यक्तीने जग डोळस लोकांच्या नजरेतून बघणे. डोळ्स लोकं स्वार्थासाठी त्या माणसाबरोबर असतात पण नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. दिव्या दत्ताचा अॅक्सेंट सोडला तर आवडला मुव्ही. काही काही पंचेस फार मस्त आहेत. एकदा दिव्या दत्ता त्या अंध माणसाची दृष्ट काढत असते तर तो म्हणतो जिसको कुछभी नजर नही आता उसकी नजर उतार रही हो
एकूणातच विकेंडला खूप टीव्ही बघितले.
ओटीटी वर पाहण्यापेक्षा पाहू
ओटीटी वर पाहण्यापेक्षा पाहू नका. नॉट वर्थ इट. >> हे काय पटलं नाही असामी. अवतार जेव्हा आला तेव्हा थ्रीडी मध्येच बघितलेला आणि हा पण नक्की थेटर मध्येच बघणार आहे.
पण... परवा उजळणी म्हणून अवतार-१ डिस्नीवर बघितला आणि स्पेशल इफेक्ट इ. हवे तसे दिसले नसले, तो भव्य कॅन्वास छोट्या पडद्यावर दिसला असला तरी जे काही बघितलं, अॅनिमेशनच नाही तर कथा, स्टोरी- टेलिंक, डीटेलिंग... इ.इ. जे टू डीत दिसतं ते ही वर्थ इटच वाटलं बघायला.
Pages