अंदाज किती घ्यावा?

Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51

बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतकं सगळं करताय तर एक पेडिग्री आणि एक प्युरीनाचं पाकीट पण आणून ठेवा.
'टॉमी फक्त पेडिग्रीच खातो गं' Happy

धमाल चालू आहे इथे Lol

किंडर एग खरंच नको. त्यापेक्षा घरी केलेला केक/कपकेक मुलांना सर्व्ह करा. मोठेही खातीलच मग अर्थात. रसमलाई फ्लेवर सध्या हिट जातो आहे.

खूप धन्यवाद अश्विनी मावशी
Note करुन ठेवते सर्व Happy
Guests तृप्त होतील हा menu खाऊन
टीप : दोन्ही बाळांना सांभाळायची जबाबदारी guests ला देणार आहे, साबा साबू देखरेख करतील, बाळांचा बाबा मला मदत करणार आहे.
मिसळ सर्व्ह करणे, वाढून घेणे, पाव भाजून हवे असतील कुणाला ते भाजणे आणि पोरांना खाऊ घालणे इत्यादी Happy

उद्या चैत्रगौरीचं गटग करणार आहे
शेजारपजार च्या लोकांना बोलवणार
मदतीला आणि भेटायला सुनेला बोलवतेय Happy
(Not kidding, मला खरंच सून आहे, चुलत जावेच्या मुलाची बायको )
Menu
विकतच्या कचोऱ्या, घरच कैरीच पन्ह किंवा सरबत , वाटली डाळ
बाकी अजून उद्याच्या परिस्थिती वर अवलंबून आहे

किल्ली आंब्याची (कैरीची) डाळ कर, वाटली डाळ कशाला. पन्हे बरोबर.

Blackcat यांनी करेक्ट लिहिलंय.

सोबत भिजवलेले हरबरे असतात.

हो. नांदेड ला भिजवलेले चणे किंवा चणाडाळ, मुरमुरे आणि पन्ह, असा fix menu असतो.
कैरीची डाळ नसते तिकडे शक्यतो.
पण मला ती आवडते yummy yummy

16 जणांसाठी व्हेज बिर्याणी करायची आहे . किती वाट्या तांदूळ लागेल ? जोडीला दहिवडे , स्वीट , आईस्क्रीम आहे .

बिर्याणी जास्त उरवायची नसेल तर 4 वाट्या तांदूळ भरपूर झाला.कारण भाज्या वगैरे प्रकार त्यात असतीलच.

एकदा 18 माणसांसाठी साधा भात केला होता,tyveli मला 3.5 वाट्या तांदूळ लागले होते.अर्थात पोळीभाजी होतीच.

धन्यवाद मनीमोहोर आणि देवकी . दोघींच्या अंदाजाचा सुवर्ण मध्य साडे चार वाट्या घेते . म्हणजे उरलीच तर थोडीशी उरेल . पुरेल का अशी धास्ती नको. वाटीचे माप नेहमीची आमटीची वाटी ना ? कार्यक्रम पुढच्या आठवड्यात आहे , झाला की अपडेट देईन.

फारच कच्चा आहे माझा अंदाज...... अग मीही त्याच बोटीत आहे.एकदा सासरी गेल्यावर जेवणाचे अकस्मात अंगावर पडल्यावर भात किती लावायचा विचार केल्यावर ,घरी 1 वाटीत 3 जण जेवतो, मग इतक्या लोकांचे किती हा फक्त गुणाकार केला होता.उरलेले शिळे खायला नको म्हणून कट टू कट केला.
बाकी अंदाज आनंद आहे.

वीकेंड ला लहान मोठे धरून ७५ लोकांना पार्टी साठी बोलावले आहे. मला किती जेवण ऑर्डर करायचे याचा अंदाज हवा आहे -
सध्या चा मेनू
१ फुल् ट्रे - खमण
१ फुल् ट्रे - व्हाईट ढोकळा
७० सामोसा
१ फुल् ट्रे काकडी आणि चटणी sandwitch
वॉटरमेलॉन & grapes ट्रे
चिप्स
१ फुल् ट्रे मन्चुरिअन
१ फुल् ट्रे hakka नूडल्स
१ फुल ट्रे फ्राईड rice
Brownie विथ ice cream
Cookies
Cake
पाणी & lemonade
हा मेनू आहे सध्या चा. जास्त होईल का? पार्टी बाहेर शेल्टर मध्ये आहे

लोक ७५ आणि सामोसे ७० ? बहुत नाईन्साफी है... ;-);-);-)
मस्त मेनु आहे हा.. पार्टी ला येणार्‍यांची मज्जा आहे....

हरचंद पालव , मनातले वाक्य लिहिलेत !!
मी बिर्याणी चा अंदाज विचारला होता , पण काही कारणाने आमचा कार्यक्रम कॅन्सल झाला , त्यामुळे मला अपडेट देता येत नाहीये .परत करायची असेल तर अंदाज लक्षात ठेवीन

Pages