Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51
बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाप्पांना आत्तराचे फाये!
बाप्यांना अत्तराचे फाये!
कित्ती कित्ती छान!
तेच मी विचारणार होतो
तेच मी विचारणार होतो
किन्डर एग चॉकोलेट नका देवु
किन्डर एग चॉकोलेट नका देवु मुलाना
https://www.insider.com/kinder-chocolate-salmonella-in-kids-2022-4
हे सगळं न करता एसटीच्या संपक
हे सगळं न करता एसटीच्या संपक-यांना पैसे द्यायला हवेत.
आणि डोक्यावर घुंगट घेऊन सर्व
आणि डोक्यावर घुंगट घेऊन सर्व करा पाहुण्यांना. मुस्लिम असाल तर हिजाब मस्ट! तसाही रमदान चालू आहे.

(No subject)
इतकं सगळं करताय तर एक
इतकं सगळं करताय तर एक पेडिग्री आणि एक प्युरीनाचं पाकीट पण आणून ठेवा.
'टॉमी फक्त पेडिग्रीच खातो गं'
धमाल चालू आहे इथे
धमाल चालू आहे इथे
किंडर एग खरंच नको. त्यापेक्षा घरी केलेला केक/कपकेक मुलांना सर्व्ह करा. मोठेही खातीलच मग अर्थात. रसमलाई फ्लेवर सध्या हिट जातो आहे.
अॅडमिन/ वेमा : असंबद्ध
अॅडमिन/ वेमा : असंबद्ध प्रतिसाद डिलीट करा.
खूप धन्यवाद अश्विनी मावशी
खूप धन्यवाद अश्विनी मावशी

Note करुन ठेवते सर्व
Guests तृप्त होतील हा menu खाऊन
टीप : दोन्ही बाळांना सांभाळायची जबाबदारी guests ला देणार आहे, साबा साबू देखरेख करतील, बाळांचा बाबा मला मदत करणार आहे.
मिसळ सर्व्ह करणे, वाढून घेणे, पाव भाजून हवे असतील कुणाला ते भाजणे आणि पोरांना खाऊ घालणे इत्यादी
उद्या चैत्रगौरीचं गटग करणार
उद्या चैत्रगौरीचं गटग करणार आहे
शेजारपजार च्या लोकांना बोलवणार
मदतीला आणि भेटायला सुनेला बोलवतेय
(Not kidding, मला खरंच सून आहे, चुलत जावेच्या मुलाची बायको )
Menu
विकतच्या कचोऱ्या, घरच कैरीच पन्ह किंवा सरबत , वाटली डाळ
बाकी अजून उद्याच्या परिस्थिती वर अवलंबून आहे
चैत्रा गौरीला पन्हे आणि कैरी
चैत्रा गौरीला पन्हे आणि कैरी डाळ फिक्स असते
मस्त मस्त चैत्रगौरीचा फोटो
मस्त मस्त चैत्रगौरीचा फोटो योजाटा
किल्ली आंब्याची (कैरीची) डाळ
किल्ली आंब्याची (कैरीची) डाळ कर, वाटली डाळ कशाला. पन्हे बरोबर.
Blackcat यांनी करेक्ट लिहिलंय.
सोबत भिजवलेले हरबरे असतात.
हो. नांदेड ला भिजवलेले चणे
हो. नांदेड ला भिजवलेले चणे किंवा चणाडाळ, मुरमुरे आणि पन्ह, असा fix menu असतो.
कैरीची डाळ नसते तिकडे शक्यतो.
पण मला ती आवडते yummy yummy
16 जणांसाठी व्हेज बिर्याणी
16 जणांसाठी व्हेज बिर्याणी करायची आहे . किती वाट्या तांदूळ लागेल ? जोडीला दहिवडे , स्वीट , आईस्क्रीम आहे .
पाच वाट्या तांदूळ पुरतील
पाच वाट्या तांदूळ पुरतील वाटतय.
बिर्याणी जास्त उरवायची नसेल
बिर्याणी जास्त उरवायची नसेल तर 4 वाट्या तांदूळ भरपूर झाला.कारण भाज्या वगैरे प्रकार त्यात असतीलच.
एकदा 18 माणसांसाठी साधा भात केला होता,tyveli मला 3.5 वाट्या तांदूळ लागले होते.अर्थात पोळीभाजी होतीच.
धन्यवाद मनीमोहोर आणि देवकी .
धन्यवाद मनीमोहोर आणि देवकी . दोघींच्या अंदाजाचा सुवर्ण मध्य साडे चार वाट्या घेते . म्हणजे उरलीच तर थोडीशी उरेल . पुरेल का अशी धास्ती नको. वाटीचे माप नेहमीची आमटीची वाटी ना ? कार्यक्रम पुढच्या आठवड्यात आहे , झाला की अपडेट देईन.
नेहमीची आमटीची वाटी ना ?...
नेहमीची आमटीची वाटी ना ?... हो.शिग भरून.
फारच कच्चा आहे माझा अंदाज.
फारच कच्चा आहे माझा अंदाज. मला आठ वाट्या तरी लागेल असं वाटलं होतं.
फारच कच्चा आहे माझा अंदाज....
फारच कच्चा आहे माझा अंदाज...... अग मीही त्याच बोटीत आहे.एकदा सासरी गेल्यावर जेवणाचे अकस्मात अंगावर पडल्यावर भात किती लावायचा विचार केल्यावर ,घरी 1 वाटीत 3 जण जेवतो, मग इतक्या लोकांचे किती हा फक्त गुणाकार केला होता.उरलेले शिळे खायला नको म्हणून कट टू कट केला.
बाकी अंदाज आनंद आहे.
२ वाटित चार . 1kg मध्ये 10 ते
२ वाटित चार . 1kg मध्ये 10 ते १२ माणस प्रमाण फक्त पुलाव . . माझे असे गणित .
वीकेंड ला लहान मोठे धरून ७५
वीकेंड ला लहान मोठे धरून ७५ लोकांना पार्टी साठी बोलावले आहे. मला किती जेवण ऑर्डर करायचे याचा अंदाज हवा आहे -
सध्या चा मेनू
१ फुल् ट्रे - खमण
१ फुल् ट्रे - व्हाईट ढोकळा
७० सामोसा
१ फुल् ट्रे काकडी आणि चटणी sandwitch
वॉटरमेलॉन & grapes ट्रे
चिप्स
१ फुल् ट्रे मन्चुरिअन
१ फुल् ट्रे hakka नूडल्स
१ फुल ट्रे फ्राईड rice
Brownie विथ ice cream
Cookies
Cake
पाणी & lemonade
हा मेनू आहे सध्या चा. जास्त होईल का? पार्टी बाहेर शेल्टर मध्ये आहे
इतकं पूरे होईल
इतकं पूरे होईल
सामोसे पर पर्सन किती घेणार.
सामोसे पर पर्सन किती घेणार. कमी आहेत. ट्रे किती साइज
लोक ७५ आणि सामोसे ७० ? बहुत
लोक ७५ आणि सामोसे ७० ? बहुत नाईन्साफी है... ;-);-);-)
मस्त मेनु आहे हा.. पार्टी ला येणार्यांची मज्जा आहे....
व्हाइट ढोकळा आणि खमण एकाच
व्हाइट ढोकळा आणि खमण एकाच बिरादरीतले आहेत...
इतका भारी मेनू असलेल्या
इतका भारी मेनू असलेल्या ठिकाणी आपल्याला जाता येईल का - ह्याचा 'अंदाज कसा घ्यावा'?
हरचंद पालव , मनातले वाक्य
हरचंद पालव , मनातले वाक्य लिहिलेत !!
मी बिर्याणी चा अंदाज विचारला होता , पण काही कारणाने आमचा कार्यक्रम कॅन्सल झाला , त्यामुळे मला अपडेट देता येत नाहीये .परत करायची असेल तर अंदाज लक्षात ठेवीन
Pages