खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्लॅपे चिकनची रेसिपी पाहून जीव व्याकुळला. कारण आमच्या भागात पांडा एक्स्प्रेसने हा आयटेम बंद केला आहे.
मग काय, आपला हात जगन्नाथ..

आमच्या भागात पांडा एक्स्प्रेसने हा आयटेम बंद केला आहे.>> अरे बापरे.. घोर अन्याय होतोय

म्हाळसा भारी भारी रेस्टॉरंट्स मधुन ऑर्डर करतात.
आणि पार्सल आले की ते कढई>> Proud

पालक ब्लांच करून त्यात लसूण,मिरची (१,२ च. जास्त नको),थोडा पुदिना असं घालून वाटून घ्यायचं. ऑ'ऑ घालून मध्ये एक लसूण पाकळी बारीक चिरून,ओरेगॅनो,हेर्ब्स घालून हे वाटलेलं चांगल परतून घ्यायचं. थोडं पाणी घालायचं. उकळी आली कि त्यात थोडाच (५०% )शिजलेला पास्ता,क्रीम आणि चीज किसून घालणे.थोडं पाणी घालून उकळू द्यायचं . पास्ता ९५ % शिजला कि डन. पास्ता ह्या सॉस मध्ये शिजला गेला कि छान चव उतरते. सॉस अंगापेक्षा जास्त ठेवलाय.

गेला आठवडाभर नुसतं हादडलंय म्हणून पुढचे चार पाच दिवस जरा साधंच खायचा प्रयत्न असेल
साधा रेसिन व्हेज पुलाव, बाल्सॅमिक व्हिनेगरमधे परतलेल्या साध्या लाल पिवळ्या ढोबळ्या मिरच्या आणि जोडीला साधंसं उकडलेलं अंड
E562AB3D-D597-469A-B6E9-9BAAEBC523E9.jpeg

सध्या गेटिंग रेडी फॉर समर बॉडी असल्याने नुसते उकडलेले खातो आहे.. या धाग्यावर येऊन तृप्त होतो फोटोज बघून... एकसे एक रेसिपी...एकदम ऑर्गझम फिलिंग Wink

अगदीच.. गेल्या काही महिन्यांपासून नवऱयाने नॅानवेज खायचं थांबवलंय म्हणून पनीर बनवावं लागतंय Sad

मिक्सर मध्ये भरडलेला गहू , तांदूळ , डाळ सगळे भिजवून शिजवले , गूळ घातला , खीर झाली , दूध तूप अजिबात नाही

संध्याकाळी सेम असेच केले , फक्त मीठ , जिरे , कांदा , लसूण घातला , मस्त सूप बनले

दोन्ही कम्फर्ट फूड आहेत
gandhi land.jpg

साधा रेसिन व्हेज पुलाव, बाल्सॅमिक व्हिनेगरमधे परतलेल्या साध्या लाल पिवळ्या ढोबळ्या मिरच्या आणि जोडीला साधंसं उकडलेलं अंड>> वा वा! ताट छान दिसत आहे. मी पण आज साधाच चिकन रस्सा आणि साधाच भात आणि साध्याच चपात्या केल्या. : )

फक्त मीठ , जिरे , कांदा , लसूण घातला , मस्त सूप बनले>>मस्त! मला हे असेच गव्हाऐवजी बार्ली वापरून करायचे आहे.

उरल्या तर नाही. मी मुद्दाम ऊरवतो ईडल्या दुसऱ्या दिवशी फ्राय करायला. तडका द्यावासा वाटला तर बायकोची मदत घेतो थोडीफार. नाहीतर आडव्या कापून तव्यावर अमूल बटर टाकून खरपूस भाजून घेतो. सोबत चटणी आणि चहा..

आई शप्पथ!
'किचन वर दरोडा' टोळी स्थापन करण्यात येत आहे.
इच्छुकांनी अर्ज करावा.

किचन वर दरोडा' टोळी स्थापन करण्यात येत आहे>> दोन महिन्यांनंतर टोळी स्थापन करा.. काही दिवसांत मीच येणार आहे मुंबईतल्या हॅाटेल्सवर दरोडे टाकायला Happy

आई शप्पथ!
'किचन वर दरोडा' टोळी स्थापन करण्यात येत आहे.
इच्छुकांनी अर्ज करावा.///१st माझा

मला तीथे जाऊन महिनाभर भांडी घासायची आहेत.. त्यात जो मदत करायला येईल तोच खरा फॅन/// फक्त भांडी अंडर व्यालू

Pages