Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मटण कटलेट आहेत लोकहो..
मटण कटलेट आहेत लोकहो..
उपवास भाजणीचे वॅाफल्स.
उपवास भाजणीचे वॅाफल्स.
किलर आहे हे , कृती दे प्लीज .
सोनाली, किलर आहे हे , कृती दे प्लीज . जेबॉंची दाण्याची चटणी व हे खाईन.
उपवास भाजणीचे वॅाफल्स. >> हे
उपवास भाजणीचे वॅाफल्स. >> हे फारच भारी आहे. नक्की कृती द्या
मशीन मॉडेल , किंमत
मशीन मॉडेल , किंमत
वोफेल यंत्रावर एक धागा काढा
काय मटन कटलेटस? मासा वाटतोय.
काय मटन कटलेटस? मासा वाटतोय.
काय मटन कटलेटस? मासा वाटतोय.
काय मटन कटलेटस? मासा वाटतोय.
>>>>
लोकांनी वांगे सुरण म्हटले म्हणून मी हळूहळू त्याला माश्याच्या जवळ आणले. म्हटले आधी मटण कटलेट बोलूया. मग हळूच सांगूया की मासा आहे. थेट सांगितले तर धक्का नको बसायला
हाहाहा वाटलेच मला. तोच कयास
हाहाहा वाटलेच मला. तोच कयास होता.
भाजणीचे वॉफल्स मस्त आहेत..
भाजणीचे वॉफल्स मस्त आहेत..
ईसी बात पे चला थोडे माश्याचे तुकडे अजून टाकतो..
पिठीभातासोबत फिशफ्राय.. एक
पिठीभातासोबत फिशफ्राय.. एक अत्यंत आवडीचा प्रकार
पण यासोबत सुकी मच्छी खायला जास्त मजा येते..
पिठीभात?
पिठीभात?
कोकणात खातात, कुळथाच्या
कोकणात खातात, कुळथाच्या पिठीचे सरसरीत पिठले टाईप अन सोबत भात, कम्फर्ट फूड असते. त्या पिठल्यास पिठी म्हणतात असे वाटते मला.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मशीन मॉडेल , किंमत>>> Toastmaster Mini Waffle Maker मला Thanksgiving ला सेल मधे $५ ला मिळाला.
पाककृती एकदम सोप्पी आहे. सोहम(ब्रॅंड)ची उपवास भाजणीत पाणी+१चमचा ते घालून ते इडलीपीठा पेक्षा जरा जास्त घट्ट भिजवून वॅाफलमेकर मधे भाजले. दुसऱ्या वेळी त्यात बा. चि. कोथिंबीर घातली.
पिठी घरची मस्त दळलेली असली की
पिठी घरची मस्त दळलेली असली की मजा येते. चिकट गरम भात. बरोबर सुक्का भाजलेला बोंबीलच हवा. नाहितर जवळ्याची चटणी. अगदीच ह्यातले नसेल काही तर चुलीत भाजलेला पापड. आणि बाहेर पडणारा धुव्वांधार पाउस. मग दुपारची झोप.
मला वरचेवर कधीच खायला आवडत नाही. पण केलाच तर असा आवडतो मेनु. नाहितर नाहीच आवडत.
झंपी अगदी तंतोतंत. पाऊस
झंपी अगदी तंतोतंत. पाऊस जोरदार असला की लगेच. सुके बोंबील भाजून वा त्याची चटणी केली जाते.
जेम्स, हो. भातासोबत खायला पातळ केले की पिठी. भाकरीसोबत खायचे असल्यास घट्ट पिठले.
पिठी घरची मस्त दळलेली असली की
पिठी घरची मस्त दळलेली असली की मजा येते. चिकट गरम भात. बरोबर सुक्का भाजलेला बोंबीलच हवा. नाहितर जवळ्याची चटणी. अगदीच ह्यातले नसेल काही तर चुलीत भाजलेला पापड. आणि बाहेर पडणारा धुव्वांधार पाउस. मग दुपारची झोप.
मला वरचेवर कधीच खायला आवडत नाही. पण केलाच तर असा आवडतो मेनु. नाहितर नाहीच आवडत.
नवीन Submitted by झंपी on 7 May, 2022 - 01:20
ऋन्मेषच्या डिशचा फोटो बघून जितके पाणी तोंडाला सुटले नसेल तेवढे तुम्ही लिहिलेले वर्णन वाचून आले
अच्छा. म्हणजे हुलग्याच्या
अच्छा. म्हणजे हुलग्याच्या पातळ पिठल्याला पिठी म्हणतात हे नव्हतं माहीत. एकीला तां पिठाच्या उकडीला पण पिठी म्हणताना ऐकलं.
आमच्याकडे जिरे खोबरे, तिखट
आमच्याकडे जिरे खोबरे, तिखट घालून केलेल्या कुलथाच्या आमटीला पिठी म्हणतात.
Panchgnichi माझी बाई, मैद्याला पिठी म्हणते.
आजचा नाष्टा. रवा मेदूवडा.
आजचा नाष्टा. रवा मेदूवडा. फक्त आकार तसा म्हणून मेदूवडा म्हणत असावेत. बाकी टेस्ट वेगळी पण मस्त. हेब्बारची रेसिपी.
रव्याचे काही केलें तरी
रव्याचे काही केलें तरी उप्पीटसारखेच लागते.
आमचे पुढचे एडिशन आम्हाला तोंडावर म्हणतात , ह्यांना उप्पीट आणि पोहेशिवाय काही येत नाही
रवा मेदूवडा. >>> एकदम मस्त
रवा मेदूवडा. >>> एकदम मस्त दिसतो आहे.
(No subject)
Sangli Bhel... Changli Bhel
किलर धागा आहे हा!
किलर धागा आहे हा!
रव्याचे काही केलें तरी
रव्याचे काही केलें तरी उप्पीटसारखेच लागते. >> हो ना. आणि गोडात केले तर शिऱ्यासारखे.
भेळ! तोंपासू!
भेळ! तोंपासू!
भेळ काय भलतीच किलर आणि
भेळ काय भलतीच किलर आणि तोंडपासू दिसतेय.
वाह मस्त.. भूक लागली रात्रीची
वाह मस्त.. भूक लागली रात्रीची.. आता एक चहा कॉफी ब्रेक घ्यायलाच हवा
जेवणाच्या आधी म्हणावयाचा
जेवणाच्या आधी म्हणावयाचा मंत्र -
अन्नम ब्रह्मा, रसम विष्णुं, भोक्ता देवो जनार्दन
एवम ध्यात्वा तथा ग्यात्वा ,अन्नदोषो न लिप्यते||
हर्रि दाता हर्रि भोक्ता हर्रि अन्नं प्रजापति |
हर्रि: सर्व शरीरस्थो भोक्ते भुज्यते हरी: ||
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥
जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरिचिंतने अन्न सेवित जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥
जयजय रघुवीर समर्थ ॥
इतकं सगळं म्हणत बसेपर्यंत
इतकं सगळं म्हणत बसेपर्यंत जेवण थंड होईल. त्यापेक्षा बिस्मिल्ला सुटसुटीत वाटतं.
(No subject)
Pages