खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त एक व्हिडीओ पाहून जर अभिनव अशा पन्नासेक डीशेस माहीत झाल्या तर मला काय फीस द्याल ? (आपल्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे म्हणून करार न करता देतोय हा बहुमूल्य व्हिडीओ).
किम जोंग ला आवडणारे दाणे, बराक ओबामा भारतात आल्यावर बांधून नेतात तो मुखवास, बिना पावाचे सँडविच, ओरॉओ के पकौडे, फँटा आम्लेट , बाहुबली सँडविच आणि काय काय ...
https://www.youtube.com/watch?v=CAx-KbeFPwQ

अक्षयतृतीयेला केलेला मेन्यू

IMG-20220503-WA0004.jpg

हा आजचा मेन्यू
घरी केलेली व्हेज बिर्याणी , टोमॅटो सार , अननस आणि डाळिंब रायता , मसाला पापड आणि सॅलड

IMG-20210522-WA0008.jpg

अरे काय फुल्ल फाईव्हस्टार हॉटेलचा मेनू आहे आईची लेक.. मी ब्रेक घेतो आता.. घरी साधेसेच जेवण असेल तर ईथले वरचे फोटो बघून घश्याखाली ऊतरणे अवघड आहे..

आजचा लंच
छोले पूरी श्रिखंड, दही वडे, दाबेली
9A8D4086-3ED9-4BDB-B851-712344F260C2.jpeg

दाबेली खतरनाक दिसतेय.. माझा वीक पॉईण्ट आहे. अर्थात मला आवडते तशी असेल तरच.. आणि ती मोजक्याच ठिकाणी मिळते..

म्हाळसा तुमच्या प्लेटचं डिझाईन नॉन-कॉम्प्लायंट आहे. अमेरिकेतल्या सगळ्या देसींनी ह्या एकाच डिझाईनची प्लेट घ्यायची असते एवढंपण माहीत नाही? व्हिसा रिव्होक होईल अशाने.

वाह वर्णिता, ते गरे बघून तर अ‍ॅक्चुअली तोंडाला पाणी सुटले... काम करता करता लॅपटॉपवर हा धागा उघडला की आणखी भारी वाटतात फोटो. ताटही अख्खे समोर वाढलेय असे वाटतेय, मोबाईलमध्ये बघण्यात ती मजा नाही..

बाई दवे,
ती तांदळाची भाकरी आहे का?

अमेरिकेतल्या सगळ्या देसींनी ह्या एकाच डिझाईनची प्लेट घ्यायची असते एवढंपण माहीत नाही? >> हायला, हे खरच नव्हतं माहित .. कोणी जेवायलाच बोलवत नाहीत घरी.. एखाद्याकडे पार्टीसाठी जावं तर पेपर प्लेट्समधेच जेवल्याचं आठवतंय

वर्णिता, थाळी मस्तच दिसतेय
मुर्ग मुस्सलम तर अगदीच कर्चीतोड

हे आम्हा गरीबाचं ताट -
वरण भात आणि लसणाची चटणी
22B137B3-5E74-47BF-A7C1-F6D3A4307ABB.jpeg

ऋन्मेष, रेसिपी कदाचित सेम असेल पण ते मुर्ग मुसल्लम नाही मुंबईकर असल्यामुळे जनरीतीप्रमाणे जर नाक्यावरच्या शेट्टीकडून आणलं असशील तर अजिबातच नाही.

मुसल्लमचा अर्थच मुळात शाबूत असा आहे , तंदुरीप्रमाणे शाबूत कोंबडीच्या आत उकडलेली अंडी, मसाला, मटणाचा/चिकनचा खिमा भरून तो सील करून (धाग्याने बांधून) पूर्ण कोंबडा ग्रेव्हीत शिजवणे, ह्याला मुसल्लम म्हणतात.

जेम्स वांड हो ते तसेच करतात पण नंतर प्लेटच्या हिशोबाने विकताना त्याचे तुकडे करतात. त्यातील अंडा कलेजी वगैरेचेही तुकडे केले होते.

Pages