Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह मस्तच आहेत मोमोज !
वाह मस्तच आहेत मोमोज !
हे असे भाज्या भरुन केले की त्वरीत गिळावे लागतात नाहीतर नुस्ते पिठूळ लागतात
>>>
छे बिलकुल नाही. मी सकाळचे संध्याकाळीही गरम करून खाल्ले. तुम्ही काहीतरी वेगळा पदार्थ खाल्ला असावा. वा फोटोवरून जे तुमच्या डोक्यात येतेय त्यापेक्षा हा पदार्थ वेगळा आहे. बाकी भाज्या म्हणजे टमाटर गाजर सिमला वगैरेचे बारीक तुकडे आहेत.. बहुधा
वाह मस्तच आहेत मोमोज !
उडवला !
अस्मिता,
अस्मिता,
अजून आप्पे केले की रेसिपी टाकशील प्लीज
हो स्नेहा ,देईन.
हो स्नेहा ,देईन.
(No subject)
खानदेशी पद्धतीची घोटलेली
खानदेशी पद्धतीची घोटलेली वांगी भाजी, सोबत तुरीचे साधे वरण साजूक तूप टाकून , कळण्याची भाकरी आणि दाण्याची चटणी, गोड काहीतरी पानाला हवे म्हणून तूप गुळ भाकरीच्या चुरम्याचा लाडू
टीप - पाककृती सेक्शनमध्ये भाजीची पाककृती दिली आहे
- (रिक्षावाला) वांडो
मोमोज इज प्युअर लव्ह !
मोमोज इज प्युअर लव्ह !
मोमोज खावे ते पोर्क मोमोज इन हॉट गार्लिक सॉस, आजकाल पनीर मोमो, चीज मोमो वगैरे अभद्र दिल्लीकर इन्फेक्शन झालेले मोमो किंवा भयाण म्हणजे तंदुरी कोंबडीचा मसाला फासून चक्क तंदूर केलेले मोमोज मिळतात, ते टाळावे कटाक्षाने.
मोमोज म्हणलं का
१. व्हेज मोमोज - फक्त पानकोबी, गाजर, बारीक आलं लसूण, बारीक कापलेली हिरवी मिर्ची आणि मीठ, चवीला सोयासॉस इतकं (आणि इतकंच घालून) पातळ पारीच्या मोमोजमध्ये भरून उकडलेले मोमो, सोबतीला जाळ लाल चटणी किंवा तिबेटीयन शेंगदाणा तीळ चटणी, हिवाळा असेल तर ही सगळी आरास अन सोबत टोमॅटो गार्लिक ब्रॉथ.
२. चिकन/मटन/पोर्क मोमोज - बारीक वाटलेला खिमा त्यात फॅट टू मीट पेरसेन्टेज ६०-४० बाकी मिरेपूड, मीठ, हिरवी मिर्ची अन आलं लसूण घालून मळलेला खिमा कच्चाच पारीत भरून उकडलेले मोमोज, तो फॅट आतमध्ये वितळायला हवा अन त्यातच मीट शिजायला हवे.
हे अन असेच दोन प्रकार सोडून केलेले मोमोज म्हणजे मनाची समजूत घालणे होय. त्यामुळे सिक्कीम-दार्जिलिंग किंवा हिमाचल मध्ये असलो तरच मी मोमो खातो नाहीतर खातच नाही.
मोमोसाठी कोबी फुड प्रोसेसरमध्ये घालणे म्हणजे महापातक, ते करूची नये, मोठ्या ताटात कोबीचा गड्डा ठेवावा अन उभ्या कडा असलेल्या वाटीचे त्यावर कचाकचा वार करत सुटावे, अशी वाटीने कोचवलेली कोबी बेस्ट कट होते, हिमाचलात सकाळ सकाळ हॉटेल बाहेर शेगडीजवळ आजी लोक्स किंवा बच्चे कंपनी हाती एक एक वाटी घेऊन कोबी कोचवत बसलेले दिसणे कॉमन होय.
भोपळ्याचे घारगे/भोपळघाऱया
भोपळ्याचे घारगे/भोपळघाऱया
वाह.. या सोबत चहा घ्यावी.. हे
वाह.. या सोबत चहा घ्यावी.. हे एकेक घास खातच राहावेत. त्यावर एक एक घोट. चहा पितच राहावी
आहा घार्या, मस्त दिसतायत.
आहा घार्या, मस्त दिसतायत. चहा करतेच
ह्यावेळेस खास प्रवासासाठी
ह्यावेळेस खास प्रवासासाठी बनवलेल्या.. पण हे चहा बरोबर खायच्या असतात का? मी शेंगदाण्याच्या किंवा कांद्याच्या झणझणीत चटणी बरोबर खाते.. चहा आणि घाऱया ट्राय केल्या नाहीत कधी
माहीत नाही. तिखट मीठाच्या
माहीत नाही. तिखट मीठाच्या पुर्या चहाबरोबर छान लागतात. घार्या माहीत नाहीत.
कोणतीही तिखट गोष्ट चहाबरोबर
कोणतीही तिखट गोष्ट चहाबरोबर छान लागते... म्हणजे अगदी चहात बुडवून असा अर्थ घेऊ नका.. एक बाईट पुरीचा एक सिप चहाचा... जन्नत...
पण हे चहा बरोबर खायच्या असतात
पण हे चहा बरोबर खायच्या असतात का?
>>>>
बिलकुल. मी तरी खातो. गरमागरम असेच जातात. तरीही चहाचा घोट सोबत असल्यास आणखी मजा येते.
मालवणी कोंबडीवड्याचे वडे सुद्धा मला फार आवडतात चहासोबत.
चहा चपाती - गरमागरम तव्यावरची थेट ताटात आणि त्यावर अमूल बटर. हा कॉलेज काळात नेहमीचा नाश्ता होता.
रविवार असेल तर चहापुरी किंवा वर उल्लेखलेले वडे. तेच वडे दुपारच्या जेवणात मटणासोबत. अर्थात तेव्हा गरमागरम ताजे केले जायचे.
चहासोबत घावणे वा आंबोळ्या या देखील बेस्ट. त्यासाठी बीडाचा तवा किचनमध्ये तयारच असायचा. सोबत हिरवी तिखट चटणी. ती चटणी घावण्याला लाऊन तो चहात बुडवून खायचा. म्हणजे त्यातील तिखट रस झिरपून चहात उतरत राहतो. घावणे खाऊन झाल्यावर ती तिखट चहा प्यायचे सुख.. अहाहा ..
घारगे मस्तच
घारगे मस्तच.
जेम्स बॉंंड ,ताट छान दिसते आहे.
मी पण चहा - पुरी/घावणे/आंबोळी/वडे/खाकरा फॅन . श्रीखंड पुरी पेक्षा चहा पुरी जास्त आवडते.
श्या, ऋन्मेषsss ने तर नाराज
श्या, ऋन्मेषsss ने तर नाराज केले,
मला वाटलं होतं मस्त काहीतरी सांगेल टीपीकल एक हात लाकूड चार हात ढलपी टाईप,
"मला तर गोडमिट्ट चहा सोबत लाल मिर्ची पूड , कोल्हापुरी तिखट, मालवणी मसाला पूड फारच आवडते, कधी ट्राय करून बघा"
"एक सिप चहा एक बकणा लाल मिर्ची पूड, निव्वळ स्वर्गसुख"
असे काहीसे
कृपया हलके घेणे
सामी , थँक्स
सामी , थँक्स
अहो बॉंड, हलके घ्या असे
अहो बॉंड, हलके घ्या असे मुद्दाम लिहू नका ओ मला काही म्हणत असाल तर..
असो,
आज पोरांना डब्यात आलू पराठे द्यायचे होते, पण ते त्यांना नकोसे झाल्याने बायकोने त्याच्याच पुर्या तळल्या. त्यातील एक आलूपुरी शिल्लक राहिली. नेहमीच्या पुरीपेक्षा मोठाल्या आकाराची होती. मला चव बघायला म्हणून दिली तर पहिल्याच घासाला समजले की हा चहासोबत खायचा प्रकार आहे. लगेच कपभर चहा गरम करून घेतला तेवढी शिल्लक पुरी संपवायला
आज पोरांना डब्यात आलू पराठे
आज पोरांना डब्यात आलू पराठे द्यायचे होते, पण ते त्यांना नकोसे झाल्याने बायकोने त्याच्याच पुर्या तळल्या. >>>>>>>>> मी आज सकाळी मधुराची रेसिपी फॉलो करून पोटॅटो स्मायली बनवायला गेले पण कुठेतरी साहित्य गंडलं म्हणून स्मायली ऐवजी पोटॅटो चीज बोल बनविले मुलींच्या टिफिन साठी।
राईस शेवया -न्याहारी
राईस शेवया -न्याहारी
चहा-बटर-चपाती आमच्याकडेही
चहा-बटर-चपाती आमच्याकडेही फेव्ह नाश्ता असे. पण आता वाटते किती कार्बस, किती बटर
ऋ , चहाच्या पूर्ण पोस्टीला
ऋ , चहाच्या पूर्ण पोस्टीला mmmmwwwwaaaahhhhhhh .
अक्षर न अक्षर माझ्या मनातले
भोपळ्याचे घारगे ... simply
भोपळ्याचे घारगे ... simply delightful
मुलांना लहानपणी लंचबॉक्समध्ये द्यायचे, त्याबरोबर मास्कारपोने + किंचित पंपकीन पाय स्पाईस... मस्त लागतात.
घारगे भारी दिसताहेत.
घारगे भारी दिसताहेत.
मोमोची पारी मैद्याची का?
मीही आदल्या दिवशीच्या पुर्या, मालवणी वडे वगैरे दुसर्या दिवशी कुरकुरीत गरम करुन चहात बुडवुन खाते. भारी लागतात.
बाकी एकजण चहाबरोबर एकेक चमचा श्रीखंड खाताना पाहिलेय. असला गाढवपणा का करतोयस? तर म्हणे, चहा मागवल्यानंतर खावेसे वाटले, मागवले, दोन्ही एकत्र आले, म्हणुन… मी गुपचुप बाजुच्या टेबलावर शिफ्ट केले स्वतःला.. अजुन काय काय बघावे लागेल या भितीने.
दोन्ही एकत्र आले, म्हणुन >
दोन्ही एकत्र आले, म्हणुन >
मुलांना लहानपणी लंचबॉक्समध्ये
मुलांना लहानपणी लंचबॉक्समध्ये द्यायचे, त्याबरोबर मास्कारपोने + किंचित पंपकीन पाय स्पाईस >> हे कॅाम्बो हटके वाटतंय.. पूर्वी घरी तिरामिसू बनवताना मास्करपोने वापरलेलं.. छोटा डबा मिळत असेल तर ट्राय करेन
आज अप्पे पात्राचं उद्घाटन झालं -
पहिलाच प्रकार रव्याचे गोड अप्पे .. हळूहळू इतरही करून बघेन
छान दिस्तायेत आप्पे. रेसिपी
छान दिस्तायेत आप्पे. रेसिपी प्लिज.
साधना, हो , पूर्ण मैद्याचे
साधना, हो , पूर्ण मैद्याचे आहेत . मुलीने तिच्या मनाने केले , त्यामुळे उगाच मैद्या ऐवजी वगैरे काय असा गिल्ट न आणता फस्त केले.
अहाहा, काय खरपूस दिसताहेत
अहाहा, काय खरपूस दिसताहेत आप्पे, म्हाळसा !... तू सुगरण आहेस एकदम.
>>>>>अहाहा, काय खरपूस
>>>>>अहाहा, काय खरपूस दिसताहेत आप्पे, म्हाळसा !... तू सुगरण आहेस एकदम.
+१११
Pages