Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो, थोडा वा जास्त. आवडीनुसार.
हो, थोडा वा जास्त. आवडीनुसार. पण भात हवाच.
भातासोबत खेकडा भाजीसारखा खाल्ला जात नाही. म्हणजे दर घासाला थोडा थोडा लाऊन खाल्ला जात नाही. तर एखादा खेकडा खाल्ला. चार घास कालवण भात खाल्ला. मग परत एखादा खेकडा खाल्ला. दोन घास कालवण भात खाल्ला. हाच पॅटर्न टोप खाली होईपर्यँत फॉलो केला जातो.
रप्पारप खेकडे खाताना नाकाला पाण्याची धार लागते. त्यामुळे कालवण भाताचा ब्रेक मला तरी कंपलसरी लागतो. तसेच खेकडा दातात धरून चावल्यावर जो रस गळतो तो सुद्धा तूपाच्या धारेसारखा भातावर पडेल हे बघतो. खेकड्याच्या कालवणाला एक वेगळीच चव असते. नुसते पिण्यात ती मजा नाही जे भातासोबत खाण्यात असते
खेकडे खाताना कसलाही
खेकडे खाताना कसलाही डिस्टर्बन्स नाही आवडत मनसोक्त खेकडे खात नावाला भाताचा घास>> अगदी अगदी! पण थोडासा भात हवाच सोबत.
खेकडे आणि त्यानंतरची ती थाळी... दोन्ही एकदम कातिल फोटोज आहेत.
कसले भारी दिसतायत खेकडे.
कसले भारी दिसतायत खेकडे. आमच्याकडे त्यांना कुर्ली / कुर्ल्या म्हणतात. त्यासोबत भाकरी, चपाती असले प्रकार नकोतच. फक्त भात. पण मी सुरूवातीला भात खाऊन घेते मग पुढचे १-१.५ तास कुर्ली महात्म्य. कसलाच डिस्टर्बंस नाही.
आमच्याकडे त्यांना कुर्ली /
आमच्याकडे त्यांना कुर्ली / कुर्ल्या म्हणतात.
>>>
आमच्याकडेही
हा आजचा मेनू
मछलीफ्राय विथ लसूण तडका मारके आणि कोलंबी मसाला..
भारी!! ऋ, पुढच्या वेळी भारतात
भारी!! ऋ, पुढच्या वेळी भारतात आल्यावर तुझ्याकडे जेवायला यायला हवं
कोळंबी मसाला पण जबरी दिसतोय
कोळंबी मसाला पण जबरी दिसतोय
आमच्याकडे त्यांना कुर्ली /
आमच्याकडे त्यांना कुर्ली / कुर्ल्या म्हणतात........आमच्याकडेही.
चावल्यावर जो रस गळतो तो सुद्धा तूपाच्या धारेसारखा भातावर पडेल........अरे देवा!
रमड, हो बिलकुल, एअरपोर्टवरून
रमड, हो बिलकुल, एअरपोर्टवरून थेट आलात तरी चालेल
"कातील रंग आहे रश्श्याचा
"कातील रंग आहे रश्श्याचा सुनील"
धन्यु. @ShitalKrishna 🙏
ओला मसाला आणि चटणी विकतची आहे. त्यामुळी श्रेय त्यांचे ! झटपट चिकन करायचे होते म्हणून मंगळवार पेठेतून तयार ओला मसाला आणी चटणी आणली होती. स्थळः अर्थात कोल्हापूर. 🙂
@म्हाळसा @sonalisl @rmd
थॅंक्स 🙏
.
ही कालची थाळी.
.
तिखलं, सोलकढी, फ्राय मासा आणि भात. 😋
चपाती फक्त फोटोपुरती.
मासे, खेकडे नका ना टाकू
मासे, खेकडे नका ना टाकू त्रास होतो.
कुर्ला हे नाव कुर्ली आणि
कुर्ला हे नाव कुर्ली आणि चेंबूर हे चिंबोरीवरून आले म्हणे
त्यापुढचे गोवंडी हे नाव
त्यापुढचे गोवंडी हे नाव सुद्धा कोलंबीच्या अपभ्रंशातून आले असावे
@ सुनिल,
आधीच्या पोस्टमधील कोल्हापूरचा उल्लेख ऐकून मला पटकन ते तांबडा रस्सा पांढरा रस्साच वाटले
पण तिखलं आणि सोलकढी तर त्याहून भारी
अवांतर - सुनिल नाव ऐकून मला कभी हा कभी ना चा शाहरूख खान आठवतो
(तुम्हाला तो आवडत नसल्यास सॉरी ईन अॅडवान्स..)
रमड, हो बिलकुल, एअरपोर्टवरून
रमड, हो बिलकुल, एअरपोर्टवरून थेट आलात तरी चालेल >>> थँक्यू!
नारळी भात आणि इडली फ्राय
नारळी भात आणि इडली फ्राय
वॅाफल बाईट्स
अंडाआलू काठी रोल, बटाटा भजी
डबे मस्तच म्हाळसा!!!
डबे मस्तच म्हाळसा!!!
हा आठवड्याचा मेनू...
पास्ता
शिंगाडा व राजगिरा थालीपीठ
ओटची खिचड़ी
हे चिकन आणि कोबीची भाजी
बॉम्बे टोस्ट सँडविच
पालक पराठे
आलू पराठे
पिटा रॅप(ब्लॅक बिन्सची उसळ आणि स्क्रॅम्बल्ड एग्ज घालून) आणि बो टाय पास्ता
कैरी घालून केलेली वाटली डाळ
अस्मे, यू आर ॲान फायर.. पिटा
अस्मे, यू आर ॲान फायर.. पिटा रॅप ट्राय करेन
कर , अति सोपा व सुटसुटीत आहे,
कर , अति सोपा व सुटसुटीत आहे, ग्रिल मधे मस्तच होतो.
स्वयंपाक रोजच करते, फोटो आठवणीने काढले यावेळी
अस्मिता तुम तो छाह गये!! एकसे
अस्मिता तुम तो छाह गये!! एकसे एक आईटम!
आई ग्ग कसले कचकचीत पदार्थ
आई ग्ग कसले कचकचीत पदार्थ आलेत ईथे... ते ही एकाच सुगरणीकडून..
त्यात आजच मी बेक्कार ओठ चावून बसल्याने उपाशी आहे दिवसभर.. त्यामुळे आणखी खड्डा पडलाय पोटात
म्हाळसाचे रोजचेच स्कूल टिफिन पाहून वाटतेय की तपस्या करून खंडोबाला प्रसन्न करावे आणि पुढचा जन्म म्हाळसाच्या पोटी घ्यावा
जोक होता हं, आमच्या मातोश्रीही छान डबा द्यायच्या.. एक धागा शिल्लक आहे तो काढायचा. बघूया कधी जमते...
म्हाळसाचे रोजचेच स्कूल टिफिन
म्हाळसाचे रोजचेच स्कूल टिफिन पाहून वाटतेय की तपस्या करून खंडोबाला प्रसन्न करावे आणि पुढचा जन्म म्हाळसाच्या पोटी घ्यावा>> डब्बा संपला नाही की फटकेही पडतात
जोक नव्हता हं तो
असे डब्बे संपवत नाहीत...
असे डब्बे संपवत नाहीत...
दोन माझ्याकडूनही मार
अस्मिता, म्हाळसा मस्त फोटो!
अस्मिता, म्हाळसा मस्त फोटो! तोंपासू!
पण तो डबा कसला आहे
पण तो डबा कसला आहे
सांडत नाही का ?
नाही सांडत
नाही सांडत
https://thermos.com/collections/lunchboxes/products/thermos-r-kids-frees...
म्हाळ्सा व अस्मिता पुरे करा
म्हाळ्सा व अस्मिता पुरे करा इतरांन न्युनगंड देणे
ताई माई अक्का
ताई माई अक्का
फोटु टाकु नक्का
पोटात पडतोय खड्डा
बोलवा झोडायला पुख्खा
सर्वांना धन्यवाद. सामो
सर्वांना धन्यवाद.
सामो
कधीही ये गं....तुला आवडेल ते करेन.
>>>>>>सामो Lol
>>>>>>सामो Lol
कधीही ये गं....तुला आवडेल ते करेन.
थँक यु डियर!!!
आज काहीतरी brunch करण्याचे मन
आज काहीतरी brunch करण्याचे मन झाले पण साग्रसंगीत रांधवडा करण्याचा आळस येत होता त्यामुळे केले सिलबीर उर्फ टर्किश एग्स
रेसिपी लवकरच शेअरतोय.
दिसतंय मस्त. हाफ फ्रायचं
दिसतंय मस्त. हाफ फ्रायचं भावंडं आहे का?
Pages