खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच Gru.
आणि किती जाळीदार घावन.

मी नेटवर बघितले

ते वरचे नूडल्स म्हणजे जोलम्युन

खालची भात गुंडाळी म्हणजे किम्बप

ते अळू वापरून करीन

कालची मराठवाडा पद्धतीची पालकची पातळ भाजी.. वरुन शेंगदाणे, तिखट व लसणाची चरचरीत फोडणी घालून
Screenshot_20220218-170424_Gallery_0.jpg
हा आजचा नाश्ता , कांदेपोहे
Screenshot_20220219-085151_Gallery.jpg

वीकेंड मेनू - संज्योत कीर च्या रेसिपीने अंडा बिर्याणी

IMG-20220219-WA0020_0.jpg

बिर्याणी दम ला लावण्या आधी

IMG_20220219_221332.jpg

आज जोधपूरी थाळी बनवली आहे.. भाऊ येणार म्हणून खास
- गुलाबजामची मसालेदार भाजी
- दही कांदा रायता तडका मारके
- गुळाची लाप्शी
- तिक्कड
- गट्टे पुलाव
E761690A-428F-49B1-95F8-1605B0CEEF98.jpeg133046EF-0CCC-4148-AF06-9E69C662C5D3.jpeg

वाह म्हाळसा , भावाची खातीरदारी जोरात आहे !! गुळाची लापशी म्हणजे काय ? शिरा का ?

बापरे ईथे तर नुसता माहौल होतोय आज..

बाई दवे,
हे गुलाबजामची भाजी काय असते? की हा पण जोक आहे? म्हाळसा यांचे काय कळत नाही..

असो, हे आमच्या गरीबखान्यातील..
बैंगण भालू तुम रख लो
बटाटा आलू मुझे दे दो

IMG_20220219_223913.jpg

बटाट्याची मजा बोंबील बटाट्यानंतर वांग्यासोबतच..

गुळाची लापशी म्हणजे काय ? >> लाप्शीचा रवा मिळतो दुकानात.. दलियापेक्षा बारिक असतो

गुलाबजामची भाजी काय असते?>> हे फार फेमस आहे .. गुलाबजाम बनवून पाकात न टाकता ग्रेव्हीत टाकायचे.. जसा मोदक रस्सा तसाच गुलाबजाम मसाला

जबरदस्त म्हाळसा, ह्यातला एकही पदार्थ मला येत नाही. गुलाबजाम म्हणजे कोफ्तेच झाले की....
रेसिपी लिही ना...
देते मोरोबा आणि मानवदादा. Happy

Pages