खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिलाच प्रयोग होता बायकोचा. पण एक नंबर झालेली भाजी. मी जेवायला बेडरूममध्ये ताट घेऊन गेलो. पण पहिला घास तोंडात टाकताच तसाच मागे फिरून पुन्हा किचनमध्ये गेलो. भाजी मस्त झालीय हे तिला सांगायला Happy

IMG_20220209_234132.jpg

भरली शिमला मिरची छान खरपूस भाजली आहेत.. चव छानच असणार .. मला मसाला, सारण हलकंस जळालेलं आवडतं .. समोसा, ब्रेड, चपाती आणि पिझ्झा पण जळालेला आवडतो

काय जबरदस्त कट आलाय.. असला कट माझा विक पॅाईंट आहे ..
पण मिसळ बरोबर ब्रेड खाऊन अन्याय करताय.. पाव नसतील तर मी कांदा, कोथिंबीर टाकून चमच्याने नुसतीच मिसळ खाईन

पुण्यात तुळशीबागेत असे म्हणू नका कधीच >> मी नाही गेले कधी तुळशीबागेत.. तीथे पाव नाही मिळत का?
एनिवेज, कधी डोंबिवलीत आलात तर मुनमूनची मिसळ नक्की खा, ठाण्यात आलात तर मामलेदारची मिसळ ट्राय करा.. मुंबईवरून माळशेजमार्गे आळेफाट्याकडे जाणार असाल तर बनकर फाट्यावरची वायकर्सची मिसळ खाल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका..ही तीन्ही ठिकाणं आवडीची आहेत

हाहा
मला कसांको भागात 20 वर्षे राहिल्यावर डोळ्यांना सवय झाली मिसळीबरोबर ब्रेड बघायची आणि खायची सुद्धा. खटकलं पण नाही डोळ्यांना. मलाच गम्मत वाटली एक सेकंद. एके काळी मलाही हे आवडायचं नाही. वड्याबरोबर पण जम्बो ब्रेड चे स्लाइस. तरी आता बरीच वर्षे झाली बोंबे वडापाव पण मिळतो म्हणजे पावात वडा घालून. बरेच ठिकाणी वडा आणि स्लाइस.

मी नाही गेले कधी तुळशीबागेत.. तीथे पाव नाही मिळत का?>>>> पाव सगळीकडे मिळतो. पण तिथे मिसळ बरोबर पाव देत नाहीत. ब्रेडच देतात.

ठाण्यात आलात तर मामलेदारची मिसळ ट्राय करा>> हा प्रचंड ओव्हर हाईप्ड आणि घाणेरडा आहे. त्या पेक्षा ऋची घरची मिसळ छान आहे.

त्या पेक्षा ऋची घरची मिसळ छान आहे.>> ते तर मिसळीच्या कटाकडे बघूनच कळतंय.. त्यांचं कौतूक केलंच आहे पण म्हणून ऋ कडे जाऊन ट्राय करा असं नाही म्हणू शकत ना
ठाण्यात आलात तर मामलेदारची मिसळ ट्राय करा>> हा प्रचंड ओव्हर हाईप्ड आणि घाणेरडा आहे.>> मला नाही वाटत ओव्हर हाईप्ड.. जेव्हा कोणी आपल्याला सांगतं अमुकअमुक ठिकाणची गोष्ट मस्त आहे तेव्हा आपोआपच आपण एक्स्पेक्टेशन्स हाय सेटअप करतो आणि मग मूड ॲाफ होतो .. एनिवेज, पसंत अपनी अपनी

चेंबूर मामलेदार मिसळ अजिबात आवडली नाही

ठाण्याबद्दल कल्पना नाही

4 वाटाणे , लाल पाणी आणि आठ फरसाण असतात

सोबत 2 पाव

तरीदेखील दोन वेळा खाल्ली आहे .

स्विगीवरून मागवलेली मी दोनेक वेळा मामलेदार मिसळ. पण ती तीच मामलेदार का हे माहीत नाही. ब्रांच आहेत का त्यांच्या? मिसळ तशी वाईट नव्हती. पण काही स्पेशलही नव्हती. सोबत बटाट्याच्या भाजी होती. दुसर्‍यांदा मागवताना तर्री सेपरेट मागवलली आणि मिक्स केली.


नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 12 February, 2022 - 00:08
<<

हमे तो अपनो ने लूटा, गैरों मे कहाँ दम था,
मैने जहाँ मिसळ खायी, वहाँ फरसाण कम था... Sad

IMG_20220212_003053.jpg
Submitted by तुमचा अभिषेक on 12 February, 2022 - 00:32
<<
हज्जार टक्के सहमत.

बहुतेकदा एक्स्पायरी डेटच्या पुढचे विकतात आपल्याकडे. फ्लेकी अन भंकस लागतात मग.

लोकल बेकरीतलाच पाव हवा त्यासाठी.

हो ना, त्यात मी मूळचा माझगावचा. तिथे पारशी लोकांच्या बेकऱ्या होत्या. आजही काही चांगल्या आहेत. त्यामुळे पाव खारी बेकरीतले केक वा एकूणच बेकरी प्रॉडक्ट्सचा बेंच मार्क हाय आहे. मिसळसोबत पाव सोडून स्लाईस ब्रेड खावा लागला यातच आले की तो पाव कसा असावा..

आमच्याकडे लहानपणापासून मटणासोबत पाव खायची सवय. कधी वडे, घावणे वा आंबोळ्या असायच्या पण चपाती कधीच नाही. मोठे झाल्यावरच मला समजले की मटणासोबत चपातीसुद्धा खाता येते Happy

असो, तर रविवारचे हे पाव घ्यायला बेकरीवर केव्हा जायचे याचा टाईम फिक्स होता. आमचाच नाही तर सगळ्यांचा. बेकरीवर पाव निघाले की ही गर्दी व्हायची. असे हाताला चटके बसणारे गरम गरम पाव. पहिला पाव तर नुसता मटणाच्या रश्यासोबत जायचा. तोंडात टाकला की विरघळायचा. हाईहुई करत खायचा.

मैने जहाँ मिसळ खायी, वहाँ फरसाण कम था...
>>>
ते फोटोपुरता होते. मी सुद्धा जास्त फरसाण खाणारा प्राणी आहे. ऑफिसमध्येही सकाळी नाश्त्याला मिसळ असली की मी हेच सांगतो. फरसाण ज्यादा उसल कम. त्यानंतर अर्धे खाऊन झाले की पुन्हा थोडा गरमागरम रस्सा टाकायचा..

मुंबईत पाव खूप खातात, अगदी कशा सोबतही. मी एकदा एकजण केळी सोबत पाव खातानाही पाहिलं.
पुण्यात त्या मानाने कमी. (किमान 2000-2005 साला पर्यंत तरी.)
आणि नागपुरात त्याहूनही कमी. नागपुरात पाव फक्त पाव भाजी, भुर्जी पाव, बाकी मग चहा, दुधा सोबत.
तिथली मिसळ जरा वेगळी ती झणझणीत रश्शा सोबत नुसतीच, किंवा दही घालुन. उसळ नुसतीच किंवा चपाती सोबत.
मिसळ पाव, वडा पाव आता आलेत १५ वर्षांपासून पण पुणे - मुंबई एवढे नाही चालत. त्यात मिसळ पाव पेक्षा वडा पाव जास्त चालतो.
नागपूरी मिसळ मध्ये फरसाण भरपूर असते.

पावभाजी पेक्षा अजून एक अफलातून प्रकार मुंबईत मिळतो.. मसाला पाव ..चव साधारण पावभाजीसारखी पण जास्त तिखट आणि स्वस्त.

अगदी कशा सोबतही. मी एकदा एकजण केळी सोबत पाव खातानाही पाहिलं. >>> आई ग्ग .. हा आमच्या मुंबईला बदनाम करायचा डाव आहे Lol
पण शक्य आहे. मुंबई बदलतेय. हल्ली मुंबई ऊपनगरात आणि ईथे नवी मुंबईत ते बिकानेरवाले घुसलेत ते वडापावसोबत गोड चटणी देतात. मूळ मुंबईकर तोच जो चुकूनही वडापावसोबत ती चटणी खाणार नाही.

@ च्रप्स, खिम्यासोबत पावाव्यतिरीक्त काही खाणे हा फाऊल समजला जातो. एकवेळ भुर्जीसोबत चपाती चालते जेवणाला. पण खीमा केला की पाव कंपलसरी. आमच्याकडे वजरी पाव सुद्धा हिट आहे. डोंगरावर स्टडी नाईट मारायला जायचो तेव्हा रात्री बारा एक वाजता खाली येऊन गाडीवर हादडायच्या पदार्थात खीमापाव माझा फेव्हरेट होता.

@ म्हाळसा, मसाला पाव आमच्याकडे फेव्हरेट. हा मुंबईबाहेर फार नसतो हे आपल्या पोस्टने समजले. आम्ही पावभाजीसोबत हा घेतोच. एक्स्ट्रा झणझणीत असल्याने पावभाजी तशी नसल्यास बॅलन्स करतो.
पण प्रत्येक ठिकाणची पाकृ थोड्याफार फरकाने वेगळी असते.

वडापाव आता हैद्राबादलाही चाटच्या ठेल्यांवर मिळु लागला आहे. पण गड्यांना त्या डिशची काहीही माहिती नाही. एकतर त्यातला वडा हा मूळ बटाटावडा नसतो, विदर्भात बटाटेवड्यालाच आलूबोंडा म्हणतात, इथे आलूबोंडा मिळतो त्याला बटाटावड्याची चव नसते. आणि मग तो पाव बटर लावून भाजून वगैरे, ज्यांच्याकडे जी कुठलीही चटणी इतर चाट पदार्थांसोबत जाते ती असेल ती टाकून देतात.

हैद्राबादला आलात बरेच दिवस झाले वडापाव खाऊन चला खाऊ या इथला वडापाव असे म्हणत चुकूनही खाऊ नका.

Pages