Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बापरे, ८ पुऱ्या एकट्याने
बापरे, ८ पुऱ्या एकट्याने खाल्ल्या?
>>>
छे! त्या फक्त फोटोला प्लेटमध्ये मावतील तश्या ठेवलेल्या..... खाल्ल्या चौदा
बायको नेहमी असा गेम करते माझा. चहा पुरी दिली की जेवण झाले माझे.
>>>>>>>> खाल्ल्या चौदा
>>>>>>>> खाल्ल्या चौदा
बायको नेहमी असा गेम करते माझा. चहा पुरी दिली की जेवण झाले माझे.
हाहाहा
रवा उत्तपा
रवा उत्तपा
उत्तपा तोपासू दिसतोय अगदी..
उत्तपा तोपासू दिसतोय अगदी..
'तोयौत्तप्पाप्पप्प्तपत्तत्तयौ
'तोयौत्तप्पाप्पप्प्तपत्तत्तयौतोयौ' अर्थात उत्तप्पा छान दिसतोय
उत्तप्पा चटणी मस्त आणि तीन
उत्तप्पा चटणी मस्त आणि तीन खणांचं ताटही आवडीचं
आज ४ भाज्या बनवणार आहे.. ओळखा
आज ४ भाज्या बनवणार आहे.. ओळखा बरं कोणकोणत्या ते
पनीर जालफ्रेजी, बटाट्याची
पनीर जालफ्रेजी, बटाट्याची रस्साभाजी, मटर ग्रेव्हीवाले, एग्ज इन द नेस्ट ऑफ लीफी ग्रीन्स
भरत, छान प्रयत्न पण ह्यातलं
भरत, छान प्रयत्न पण ह्यातलं एकही नाही ओ..
तोंडली फ्राय
बीट रूट अंडा बुर्जी
Balsamic bell pepper paneer roast
पाव भाजीची भाजी
मस्त!
मस्त!
म्हाळसा,
म्हाळसा,
मस्त दिसतायत पदार्थ.
हौशी आणि सुगरण दिसता तुम्ही.
पण
पावभाजी बरोबर पाव खाणार
तोंडलीची भाजी - स्टार्टर?
बीट अंडं बुर्जी कशाबरोबर?
आणी ती पनीरची भाजी कशाबरोबर?
मला नीट जोड्या लावता येत नाहीयेत. आणि हे सर्व किती लोकांसाठी?
मला नीट जोड्या लावता येत
मला नीट जोड्या लावता येत नाहीयेत. आणि हे सर्व किती लोकांसाठी?>> हे सगळ एका दिवसासाठी नाहिए..... हो ना म्हाळसा.... मस्त दिसताहेत सगळ्या भाज्या. फक्त ती अंडाभुर्जीची चव कशी असेल हा प्रश्न पडलाय.
मस्त!
मस्त!
बीट रूट अंडा बुर्जी: अशी डिश ऑलरेडी प्रचलीत आहे की तुमचा प्रयोग?
मी गेले काही आठवडे असे भुर्जीवर प्रयोग करतोय.
काल मूग अंडा भुर्जी केली होती.
इथे फोनवरून फोटो कासा अपलोड
इथे फोनवरून फोटो कासा अपलोड करायचा? लॅपटाॅप वरून करेपरयंत पदारथ शीळा होऊन जातो
बीट रूट अंडा बुर्जी>>> हाईंग!
बीट रूट अंडा बुर्जी>>> हाईंग!!!!
मला नीट जोड्या लावता येत
मला नीट जोड्या लावता येत नाहीयेत. आणि हे सर्व किती लोकांसाठी>> हे एका वेळेसाठी नाहीए..दोन एक दिवसांचे जेवण मी एकत्रच बनवून ठेवते त्यामुळे जास्त वाटत असावं
बीट रूट अंडा बुर्जी: अशी डिश ऑलरेडी प्रचलीत आहे की तुमचा प्रयोग?>> माझा प्रयोग नव्हे.. आंध्रामधलीच डिश आहे मानव.. आमच्याकडे हिट आयटम आहे.
फक्त ती अंडाभुर्जीची चव कशी असेल हा प्रश्न पडलाय>> मस्त लागते.. साऊथ इंडियन स्टाईल फोडणी करायची- कडिपत्ता, हिंग, हिरव्या मिरच्या घालून( ह्या जरा जास्त घालायच्या).. नेहेमीच्या भुर्जीतल्या कांदा टोमॅटोला बीट रूट ने रिप्लेस करायचं.. ८-१० मि. शिजल्यावर अंडी फोडून टाकायची. (१ बीट रूट : ४ अंडी)
@ स्वप्नाली
@ स्वप्नाली
ॲप न वापरता ब्राऊसरमधून मायबोली ओपन करा. मग लॅपटॉपवरून करता तसेच. साईजचा प्रॉब्लेम असेल तर स्क्रीनशॉट घ्यावा.
(१ बीट रूट : ४ अंडी)
(१ बीट रूट : ४ अंडी)
<<
वरून गोडाची चव घालायची गरज नाही
ईथे मी कधी लिहित नाही की फोटो
ईथे मी कधी लिहित नाही की फोटो टाकत नाही. फक्त मस्त फोटो बघते आणि खुश होते. पण बीट अंडाबुर्जी हजम नही हुई.
म्हाळसा, चव कशी असते. गोडुस?
बीट रूट अंडा बुर्जी: अशी डिश
बीट रूट अंडा बुर्जी: अशी डिश ऑलरेडी प्रचलीत आहे की तुमचा प्रयोग?>> माझा प्रयोग नव्हे.. आंध्रामधलीच डिश आहे मानव.. आमच्याकडे हिट आयटम आहे.>>>>> म्हाळसे तू म्हणतेयस म्हणून मी विचार करीन करण्याचा. बाकी दोन्ही फोटो लै लै मस्त आलेत. सुपर डूपर
मला नेहमीची भुर्जी पण गोडूसच
मला नेहमीची भुर्जी पण गोडूसच वाटते.. कांदा आणि टोमॅटोमुळे.. ह्या भुर्जीलाही हलकासा गोडूसपणा असतो.. पण फोडणीत ५-६ तिखट हिरव्या मिरच्या घालून बीट दहा एक मिनिट परतला की गोडूसपण फार कमी होतो. चेन्नईत असताना सत्यमच्या कॅंटिनमधे ही डिश मिळायची.. एकदा खाण्याचं धाडस केलं आणि फार आवडली.. तेव्हापासून अधूनमधून बनवते.. तुम्हीही ट्राय करा
ओके. स्वतःपुरती बनवुन बघेन.
ओके. स्वतःपुरती बनवुन बघेन.
आज व्हेज मोमो आणि कॉर्न,चीझ,
आज व्हेज मोमो आणि कॉर्न,चीझ, कॅप्सिकम मोमो...

या खायला..
वाह कसले पदार्थ पडतात ईथे ..
वाह कसले पदार्थ पडतात ईथे .. मोमो मस्त.. ती चटणी कसली आहे नक्की..
मला नेहमीची भुर्जी पण गोडूसच वाटते.. कांदा आणि टोमॅटोमुळे
>>>>
कांद्याला पर्याय नसतो. पण टमाटर बघितले की माझा फार संताप होतो. मला मिरचीच्या भुर्जीपेक्षा मसाल्याची आवडते. ऑमलेट सुद्धा तसेच.. त्यात गोडूस चव पुर्ण मारली जाते.
मी वाचत आणी बघत असते पोस्ट्स
मी वाचत आणी बघत असते पोस्ट्स खाऊ गल्लीच्या, सगळेच पदार्थ खूप छान असतात ईथे .
म्हाळसा, तुमच्या रेसिपीस छान असतात पण २-३ दिवस केलेले पदार्थ टिकतात का? अंड्याचा वास नाही येत? तुम्ही २-३ दिवसासाठी एकदा बनवून फ्रेश राहण्यासाठी कसे स्टोर करता पदार्थ?
हे मोमोज तळलेले आहेत काय?
हे मोमोज तळलेले आहेत काय?
थंड झाल्यावर ते कसे लागतात?
मोमोज झकास.
मोमोज झकास.
वॅाव.. तळलेले मोमोज मस्त..
वॅाव.. तळलेले मोमोज मस्त.. शेजवान चटणी पण एकदम “जाळ” दिसतेय
२-३ दिवस केलेले पदार्थ टिकतात का? अंड्याचा वास नाही येत? >> मी जीथे सध्या आहे तीथे थंडी आहे म्हणून अन्न टिकतं, अंड्यांना वास लागत नाही. .इथे बरेच जण पाच दिवसांचं जेवण एकत्रच बनवून ठेवतात... हेच मी मुंबईत राहून नाही करू शकत.. तीथे सकाळचं जेवण बाहेर राहीलं तरी खराब होण्याचे चान्सेस असतात
हे मोमोज तळलेले आहेत काय?
हे मोमोज तळलेले आहेत काय?
थंड झाल्यावर ते कसे लागतात?>> हो तळलेले आहेत.. थंड कसे लागतात माहीत नाही.. गरम गरमच फस्त केले सगळ्यांनी.
ती चटणी कसली आहे नक्की..>>> टोमॅटो चटणी आहे .. मायबोली वरच वाचलेली..
मोमोज वरून हे आठवले. जरूर
मोमोज वरून हे आठवले. जरूर वाचा. आवडल्यास प्रतिसाद देऊन वर काढा. मोमोजचा लाभ सर्वांना...
बोधकथा - ५ चिकन आणि १ वेज, मोमोज!
https://www.maayboli.com/node/55943
Pages