खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्थात बायकोचे काम आहे. पुरी/चपाती लाटून त्यावर चाकूने कापून तयार करते. आणि मग पुरी असेल तर तळते वा चपाती असेल तर भाजते. अशी चित्रे आणि डिजाईनही तयार करते ती.. जसे की मासे, पक्षी, प्राणी, फुले, बॅटबॉल, टेनिस, डॉल, स्टार, फ्लॉवर, हार्ट वगैरे... एफबीवर फोटो असतील तर शोधून टाकतो दोनचार फोटोंचे कोलाज बनवून Happy

IMG_20220227_215850.jpg बदाम शेक पार्टी
यात आईस्क्रीम शोधू नये निम्मी संपल्यावर फोटो काढलाय

सामो वरच्या फोटोत आईचाच हात आहे..
आता पोरगीही स्वत: शेप बनवते आणि आईला चपात्या भाजायला देते.
दोन्ही पोरांचे खाण्यापिण्याचे नखरे आहेत त्यामुळे हे असे करावे लागते.

ओह ओके. Happy अस्मिता बनवतात. मला वाटलेलं परी व ऋन्मेष मिळून लाटतात असे शेप्स व मग त्या भाजतात - असे काहीसे दृष्य Happy

हाच प्रकार आमच्याकडेही चालतो... प्लॅनेट शेप किंवा स्क्वेयर, रेकटांगल, ट्रँगल वगैरे बनवून खायला द्यावे लागतात.. मगच मुले खातात...

या अस्मिताकडून त्या अस्मिताला दंडवत.
मी एकदा चांदणीच्या आकाराची पोळी केली तर लेक आता जिराफ कर म्हणे , मगं हिप्पो, आता पोळीचा जिराफ ,हिप्पो कसा करणार , मगं सगळे लाड बंद केले. Happy

Wow, ऋन्मेष, माऊलीचा स्टॅमिना वाखाणण्यासारखा आहे. कौतुक त्यांचे . मी एकदाच माझी हौस म्हणून मुलाच्या मुंजीच्या वेळेस त्याच्या क्ले तले साचे वापरून शँकरपाळ्या केल्या होत्या.

Screenshot_20220224-102733_Gallery.jpg

अरे याला 'खार वांगे' म्हणतात होय!! कालच आमच्या पटेल मध्ये लहान लहान खार वांगी होती. काही वैशिष्ट्य? मला वाटतं कॄष्णाकाठची वांगी प्रसिद्ध आहेत ना? तीच का ही?

कॄष्णाकाठची वांगी प्रसिद्ध आहेत ना? तीच का ही? >>>>>नाही माहीत त्या YOUTUBE वाल्या बाईने रेसिपी चे नाव खार वांग सांगितले होते। मला बघून करावेसे वाटले एवढेच। (लाफिंग ईमोजी)

काल माझा उपवास नसूनही घरच्यांनी तीन वेळा (सकाळ दुपार संध्याकाळ) मिळून चार प्लेट साबुदाणा खिचडीच खाऊ घातली Sad

Pages