Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51
बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पॉटलक साठी, mac n cheese
पॉटलक साठी, mac n cheese बनवून न्यायचे आहे. साधारण १२-१३ लोकाना पुरेल इतके (बाकी पदार्थ पण आहेत, टोटल २० लोक आहेत). अंदाजे किती ग्रॅम्स/किलो पास्ता शेल्स घ्यावेत?
१ पाउंड पास्ता पुरेसा होईल.
१ पाउंड पास्ता पुरेसा होईल. त्यात नेहमीची ८ सर्विंग्ज होतात. पॉटलक साठी करणार आहात तर इतर कार्ब्जवाले पदार्थ असतील ते लक्षात घेता, नेहमीच्या एका सर्विंगमधे दोन व्यक्ती असे धरा.
एक किलो खव्यात दुकानात मिळतात
एक किलो खव्यात दुकानात मिळतात त्या आकाराचे किती गुलाबजाम होतात?
हे माझ प्रमाण -
हे माझ प्रमाण -
एका मेजरिंग कप मधे साधारण २२०-२४० ग्रॅम खवा बसतो
75 होतील असे वाटते. आमचे 1
75 होतील असे वाटते. आमचे 1 kg मध्ये अगदी लहान पण नाही आणि मोठा ही नाही बाहेर सारखा 95 100 hotat. मैदा अर्धी वाटी घालतो 1 kg la.
अक्षर कित्ती सुरेख आहे
अक्षर कित्ती सुरेख वळणदार आहे म्हाळसा.
अन्जू, माझं नाहीए ते..
अन्जू, माझं नाहीए ते.. मैत्रिणीचं आहे
थॅक्यु म्हाळसा अमपुरी
थॅक्यु म्हाळसा अमपुरी
सुके गुलाबजाम घरी करता येतात
बाजारसारखे सुके गुलाबजाम घरी करता येतात का? पाक निथळून मग साखरेत घोळवणं इतकंच असावं असं वाटतंय पण कोणालाच हे घरी करताना पाहिलं नसल्यामुळे अंदाज येत नाहीये.
होय मेधा
होय मेधा
मी करताना जनरली दोन्ही प्रकारचे एकाच वेळी करते.
सुके करण्याचे थोडे जास्त तळते, त्यांना थोडे गडद रंग यावा म्हणून.
ज्यांना देणार खायला, त्यांना 'सुके आहेत' असे सांगून द्या ( मला एकदा कुणीतरी "बुरशी लागल्ये " असं सांगितलं होतं)
बुरशी
बुरशी
नमस्कार, एक मदत हवी आहे.
नमस्कार, एक मदत हवी आहे. आमच्या इथे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला आहे. फक्त मराठी लोकांसाठी, सर्व काही मराठी अँड महाराष्ट्रीयन साजरं व्हावं हि अपेक्षा आहे. जिथे कार्यक्रम होणार तिथे खाद्यपदार्थांचा स्टॉल टाकता येईल पण जागेवर काही शिजवता किंवा गरम करता येणार नाही. मी ह्या कार्यक्रमासाठी वडापाव आणि दाण्याचे लाडू करून विकायचा विचार करते आहे. साधारण २०० उपस्थिती असेल. मी १५० वडे आणि ५० लाडू घरून करून विकायला नेईन असा विचार करते आहे. मला तुमची मदत वड्यांच्या आणि लाडूच्या साहित्याच्या प्रमाणासाठी हवी आहे. आणि ते कार्यक्रमाच्या जागी कसे न्यावे ह्या साठी काही क्लुप्त्या किंवा कोणी असा स्टॉल टाकला असेल तर काही टिप्स असतील तर हव्या आहेत.
50 बटाटेवडे साठी अमुपरी यांनी
50 बटाटेवडे साठी अमुपरी यांनी अंदाज दिला होता .
3 kg बटाटे , दीड किलो बेसन पीठ , पाव किलो लसूण , पाव किलो मिरच्या , 150 gm आले. . मी करून बघितले नाहीये पण लागले कधी तर प्रमाण लिहून ठेवले होते .
१५ adults आणि सहा kids.
१५ adults आणि सहा kids.
घरी brunch ला येणार आहेत
मिसळ करण्याचे योजिले आहे
कुणी प्रमाण सांगेल काय?
मटकी किती?
पाव किती?
योकू ह्यांची पाकृ follow करते मी नेहमी त्यानुसार सांगा
किंवा कसंही
१५ प्लस सहा प्लस घरचे
१५ प्लस सहा प्लस घरचे
एक किलो मटकी भिजवून मोड आणून घ्या. त्यातली एक बोल भर फ्रिज मध्ये ठेवा बॅक अप.
१२ लादी ऑफ पाव.
फरसाण दोन मोठे पुडे टोटल मिळून एक किलो. बरोबरीने साधे वेफर्स एक दोन पुडे घेउन या हलवाया कडून. बच्चे कंपनी खाते.
अर्धा किलो दह्याचे ताक/ मठ्ठा. गार करत ठेवा
साधा भात दोन वाटी व अर्धा किलो उरलेले दही तयार ठेवा. आयत्या वेळी लागल्यास दहि बुत्ती किंवा मुलांना दूध भात बनवता येइल
भात लावताना एक बारका टोप साधे वरण करून घ्या कोणी तरी बाळ माय कपल निघतेच की तो फक्त वरण भातच खातो ग. तेव्हा तुम्ही स्वयंपाक व गेस्ट बघायच्या हाय स्पीड मध्ये असाल. साउथ स्टाइल दही भात. तळीव दाणे सुकी लाल मिरची, मोहरी हिंग कढिपत्ता फोड णी द्यायची. पळी वाढा करायचा.
मोठ्या कुकर मध्ये मटकी उकडतानाच तुम्ही टोमाटो थोडे कांदे घालता का? आमच्या सासरी ही पद्धत आहे.
एक किलो कांदा कापून अर्धा किलो बारीक कापून व निदान २०० ग्राम लांबट कापून खेकडा भजी तयारी ठेवा. मिसळीत मस्त लागतात.
दोन मोठ्य जुड्या कोथिंबीर ताजी. ही आता महाग मिळेल. ८ - १२ लिंबे. ही ही आता महाग मिळतात
अर्धा किलो टोमाटो. मिसळीत घालायला व वरून घालायला लागल्यास
बरोबर बटाटा भाजी करणार् का सुकी. तर एक किलो बटाटे.
गोडास काय? आम्रखंड प्रत्येकी एक वाटी व गुलाबजामू न प्रत्येकी दोन लागतील.
पाव्हणे आल्या आल्या त्यांना उक् डलेल्या कैरीचे पन्हे गूळ घालून किंवा कलिंगडाचा ज्युस देता येइल किंवा कापलेली कलिंगडे, द्राक्षाचे घोस तयार ठेवा. फ्रिज मध्ये गार केलेली द्राक्षे मस्त लागतात.
प्लेटा बोल चमचे इको फ्रेंडली केळीच्या सोपटाचे किंवा तत्सम मिळतात ते आधी आणून ठेवा . म्हणजे पाव्हणे गेल्यावर तुम्ही जास्त दमणार नाही.
आले लसूण पेस्ट एक वाटी. लाल
आले लसूण पेस्ट एक वाटी. लाल तिखट मिसळ मसाला. कोल्हापुरी तिखट हवे असल्यास.
एवढे करणार तर मिसळस्पेशल
एवढे करणार तर मिसळस्पेशल हॉटेलच काढा म्हणजे आम्हीपण येतो
अमा, तुम्ही करा ना ब्रंच प्लन
अमा, तुम्ही करा ना ब्रंच प्लन. मलाही बोलवा.
एवढं वाचुनच दमले मी.
पाव्हणे गेल्यावर तुम्ही जास्त
पाव्हणे गेल्यावर तुम्ही जास्त दमणार नाही.>>>
अमा, भारी आयडिया
अमा, भारी आयडिया
Deva, वाचूनच दमले
Deva, वाचूनच दमले.करण्यापेक्षा वाढणे महाकर्मकठीण.
पाव्हणे गेल्यावर तुम्ही जास्त
पाव्हणे गेल्यावर तुम्ही जास्त दमणार नाही.>> अगं हो अरे हो. काय हवे ते घ्या. मी हैद्राबादेत नवगृहिणी होते तेव्हा अनेकानेक पाव्हणॅ यायचे त्यांना बाहेर फिरवा मग घरी आल्यावर पंधरा मिनिटात खाणे समोर ठेवा व नंतर भांडी साफ करा असे व्हायचे अनेक दा ती आठवण आली. नंतरचे आवरताना कंबरडे मोडते म्हणून खास लिहिले.
भजी तळायला येते की.
काय हवे ते घ्या.>>> खेकडा भजी
काय हवे ते घ्या.>>> खेकडा भजी चालतील
मी स्त्री आहे हो अमा
पाहुण्यांना खुश करायचे
पाहुण्यांना खुश करायचे असल्यास प्रत्येकी 5 मोठी ताजी लिंबे विकत घेऊन गिफ्ट बास्केट मध्ये घालून द्या.सध्या 10 ते 15 रु ला एक नग आहे.
मला एकदा नारळी भात करून
मला एकदा नारळी भात करून त्यावर आमरस घालून खायचा आहे
थायलंड की मलेशियाची डिश आहे
https://en.m.wikipedia.org/wiki/Mango_sticky_rice
मला एकदा नारळी भात करून
मला एकदा नारळी भात करून त्यावर आमरस .... दोघांचीही वाट! अर्थात हे माझे मत.
मिसळ हाच ब्रंचचा मेन्यु आहे
मिसळ हाच ब्रंचचा मेन्यु आहे हे स्पष्ट लिहीलेले असतानाही ईतका मोठा घाट घालायची कल्पना अमांनी का बरे मांडली असेल?
तेच जर कोणी ईतका मोठा घाट घालायचा आहे तर प्रमाण सुचवा म्हणुन विचारले असते तर अमांनी घरच्या बाईने आता ईतके कष्ट न घेता सगळे आऊटसोर्स कसे करायचे याची कल्पना मांडली असती व बाईला ईतकी कामे लावणाऱया पॅट्रीआर्कीला चार नावेही ठेवली असती.
पॅट्रीआर्कीला चार नावेही
पॅट्रीआर्कीला चार नावेही ठेवली असती.>> त्यांनी इतकी लांबलचक पोस्ट टाकून नेमकं काय केलं आहे असं वाटतं?
अरे किती गोड मंडळी. हे बघा
अरे किती गोड मंडळी. हे बघा खालील प्रमाणे:
करायचे असे पदार्थः मिसळीची मटकी उसळ व कट, दही बुत्ती( ऑप्शनल) वरण भात ( ऑप्शनल) भजी( व्हॅल्यु अॅडिशन) व बटाटा भाजी काही लोक्स मिसळीत घालतात म्हणून सुचिवले. भजी पण काही लोक्स वरून घेतात व तर्रीत भिजवून खातात.
सर्व्ह करताना पाव्हणे बाहेरुन आले व सेटल झाले की: कोणते तरी सरबत( रसना टँग लिंबू सरबत नाही तर फँटा कोक काहीतरी)
व बरोबरीने आपण गूळ पाणी देतो तसे कापलेले कलींगड तुकडे. दोन कलिंगडे कापून बोल मध्ये क्लिंग फिल्म लावुन ठेवता येतील.
एक कुकर बटाट्यांचा, एक उसळीचा एक भात व इटुकले वरण. तीन वेळा कुकर लावावा लागेल. त्यातला बटाटा आदल्या दिवशी चालेल
व भाताचा हा उसळीचा करून मुरल्यावर मिसळीला लागलो की परत लावता येइल.
मिसळी वरून पेरायला कांदा कोथिंबीर लिंबू आठ तुकडे प्रत्येकी( लिंबाचे!! ) हे तर ठेवणारच.
विकत आणायचे:
१) तीन चार दिवस आधी. इको फ्रेंडली प्लेट्स बोल्स चमचे ग्लासेस प्लास्टिक चे डिस्पोजेबल. पार्टी झाली की दोन वेग वेगळ्ञाआ गार्बे ज ब्यागांमध्ये भरून बाहेर ठेवुन दिले की झाले सुका कचरा किस्सा खलास. बोलस डबल क्वांटिटी लागतील. मिसळ व तर्रीला एक. गुलाबजांबूला एक.
२) लादी पाव
३) फरसाण पुडे
४) साधे वेफर्स
५) गोडाचे. - हवे असल्यास ऑप्शनल - पाकातले गुलाब जांबू. नाही तर आम्रखंड. हे ही नको असल्यास चांगले आइसक्रीम कोणी ही नाही नको
करणार नाही.
६) दही एक किलो - दही बुत्ती व मठ्ठा अर्धा अर्धा किलो पुरेसे होईल प्रत्येकी.
हे सर्व सामान एकाच हलवाया कडे मिळेल.
दही बुत्तीची फोडणी आदल्या रात्री बनवून ठेवता येइल. आयत्या वेळी मिसळायची
उसळ केली की तिखट घालायच्या आधी सहा लहान मुले आहेत त्यांच्या साठी वेगली काढून ठेवायची. व एक मुलांची पंगत घेता येइल त्यांची जेवणे झाली की एका खोलीत पंख्या खाली कार्टू न नेट वर्क लावून द्यायचे म्हण जे मोठे व आया नीट जेवू शकतील.
सर्व झाले की पाच वाजता मस्त चहा.
रात्री असेल तर चहा नाही कॉफी हवी असल्यास.
ह्याला एक व्यक्ती करणारी व एक मदतनीस गरजेचे आहे.
बारक्यांना किंडर एग ची
बारक्यांना किंडर एग ची चॉकोलेट ची अंडी देता येतील सरप्राइज म्हणून. बायकांना गजरे मोगर्याचे.
Pages