आम्ही बरेच वर्ष आकाश कंदील घरी करायचो . पारंपरिक कंदील च आवडतो आमच्या घरी सगळयांना. पण अलीकडे काही वर्षे मात्र वेळे अभावी विकतच आणतो. विकत चे कंदील दिवसेंदिवस खूपच बटबटीत होत चाललेत हे जाणवत होतं पण तरी ही बाजारातून रेडिमेड कंदिलच येतो घरी.
ह्या वर्षी मुलांनी कंदील घरीच करायचा घाट घातला. बाजारातून तयार कंदीला ऐवजी कंदीलाचे कागद घरी आले. मी खळ केली. तरुण मुलांना खळ माहीत नसेल कदाचित तर सांगते . खळ म्हणजे कणीक पाण्यात शिजवून केलेली घट्ट पेस्ट. कणकेतल्या ग्लुटेन मुळे ही कागद चिकटवण्याच काम झकास करते. सांगाडा होताच घरी. पूर्वानुभव ही होता गाठीशी. घरातले सगळेच उत्साहाने पुढे आले कंदील करायला. मी ही त्या करंज्या करायचा घाट पुढे ढकलून ह्या करंज्या ( वरच्या आणि खालच्या पट्टीला जे सजावटी साठी लावलं आहे त्या कंदिलाच्या करंज्या,☺ ) करायला सरसावले. ☺ गप्पा मारत, मागे कसा कंदील करायचो त्या आठवणींना उजाळा देत कंदील कधी झाला ते कळलं ही नाही. अक्षरशः चोवीस तासात कंदील तयार होऊन गॅलरीत टांगला ही गेला.
खूप मस्त वाटतंय आणि कौतुक भरली नजर सारखी तिकडेच वळतेय. दिवाळी संपली की कंदील काढला जाईल पण ह्या कंदील in making च्या आठवणी मनात कायम राहतील आणि मनाला उभारी ही देतील.
हा फोटो.
ते पान सार्वजनिक करा.>>> कसं
ते पान सार्वजनिक करा.>>> कसं करायचं? ते गुलमोहर प्रकाशचित्रण मध्ये प्रकाशित झालय, मला दिसलं नाही एडिट करायला
आता बहुतेक नाही करता येणार.
आता बहुतेक नाही करता येणार. लेखना च्या संपादनाला तीस दिवसांचीच मुदत असते. मी त्या ग्रुपचे सदस्यत्व घेऊन पाहिले तुमचे कंदिल, रांगोळी, पणत्या. छान आहेत.
प्राजक्ता आणि इतरांचेही कंदिल सुंदर आहेत.
मायबोलीवरच्या या आणखी कंदिल कृती
https://www.maayboli.com/node/46063
https://www.maayboli.com/node/46109
https://www.maayboli.com/node/38985
सीमा, प्रतिसादा साठी आभार.
सीमा, प्रतिसादा साठी आभार.
अनया नक्की दाखव एक तरी कशी चकली करायची ते.
भरत लिंक बघितल्या . मस्त आहेत ते पण कंदिल.
हो, अलीकडे माबो ने धागा संपादना ची मुदत एक महिनाच ठरवली आहे त्यामुळे आता तो धागा सार्वजनिक नाही करता येणार.
http://jennaabbot.fashiondiy
http://jennaabbot.fashiondiy.club/detail/1566136207023133070318941983138...
ही लिन्क बघा दिसतेय का?
अनया लिंक मध्ये फक्त फोटो
अनया लिंक मध्ये फक्त फोटो दिसतायत , व्हिडीओ ओपन होत नाहीये. पण यू ट्युब वर मिळाली मला लिंक . मस्त आहे.
ही ती लिंक
https://youtu.be/s8MztrRLOWU
व्हिडिओ छान आहे. कसं करायचं
व्हिडिओ छान आहे. कसं करायचं ते नीट कळतं आहे.
त्या चकल्या एकसारख्या आकाराच्या करणं महत्त्वाचं आहे. माझे थोडे लहान-मोठे झाले होते. तसंच ते जोडताना वर्तमानपत्राचा कागद फाटला. मग एक पारदर्शक लेस होती, ती वापरून आधार दिला.
तुम्ही सगळ्या गोष्टी खूप नेटक्या करता. तुम्हाला हे प्रश्न येणार नाहीत.
आत दिवा लावला की काही कळत
आत दिवा लावला की काही कळत नाही एवढं.
मस्त दिसतोय तुझा ही अनया.
पुढच्या वर्षी नातीला करून दाखवीन ह्यातला एक दिवाळीत तिकडे असले तर. तिला कागद कापायची आणि असल्या गोष्टींची खूप आवड आहे. कामट्या आणून करणं परदेशात अशक्य म्हणून
मस्त झालाय कंदील
सगळ्यांचे कंदील एकदम मस्त
घरी कंदील बनवण्याची मजा काही वेगळीच असते
परदेशात राहणाऱ्या मुलींसाठी .
परदेशात राहणाऱ्या मुलींसाठी एक उपयुक्त माहिती ... माझ्या मुलीने ह्या वर्षी बार्बेक्यू च्या काड्या वापरून सांगाडा बनवला आणि उत्तम पारंपारिक कंदिल तयार केला आहे.
अरे वा! यावर्षी जमवतो.
अरे वा! यावर्षी जमवतो.
धागा वर काढलात ते बरं केलंत.
मी या वर्षी केलेला आकाशकंदील
मी या वर्षी केलेले आकाशकंदील आणि पणती
अगदी सुरेख !!
अगदी सुरेख !!
खूपच सुन्दर अश्विनी
खूपच सुन्दर अश्विनी
सुरेख जमलेत.
सुरेख जमलेत.
धन्यवाद . तुमच्या ही घरी
धन्यवाद . तुमच्या ही घरी केलेल्या आकाशकंदील चे फोटो टाका . पुढच्या वर्षी नवीन कल्पना मिळायला .
रंगबेरंगी छोटे आकाशकंदील
रंगबेरंगी छोटे आकाशकंदील
(No subject)
किती सुंदर बनवले आहेत
किती सुंदर बनवले आहेत सर्वांनी आकाशकंदील. बघून प्रसन्न वाटतं आहे.
काय सुंदर आहेत एकेक आकाशकंदील
काय सुंदर आहेत एकेक आकाशकंदील. वा!! अगदी दिवाळी वातावरण तयार होतय.
वाह मस्त.. छान धागा.. छान
वाह मस्त.. छान धागा.. छान कंदील.. आठवणी जाग्या झाल्या
लहानपणी आम्ही दादरावर कंदील बनवून सर्व बिल्डींगमध्ये ना नफा ना तोटा तत्वावर वाटायचो त्याची आठवण झाली.. मजा यायची त्या दोन तीन रात्री दादरावर गप्पा मारत मित्रासोबत जागायला .
कालच आकाश कंदील विकत आणला. नंतर डोक्यात आले की घरीच पोरीसोबत बनवायला हवे होते. मजा घालवली विकतचे आणून.
अर्थात अजूनही दिवाळी गेलेली नाही, किंबहुना आलेलीच नाही.. असा साधासा पारंपारीक नक्की ट्राय मारू शकतो
सर्वच आकाशकंदील एकसे एक सुरेख
सर्वच आकाशकंदील एकसे एक सुरेख.
यावर्षी आमच्या महाराष्ट्र
सर्वांचे आकाशकंदील सुरेख!!
यावर्षी आमच्या महाराष्ट्र मंडळाने आकाशकंदील तयार करण्याची कार्यशाळा घेतली. डोंबिवलीच्या श्री. मयुरेश गद्रे यांच्या दुकानातून आकाशकंदिलाची किट्स कुरियरने मागवली आणि मग एक दिवशी झूमवर गद्रेकाकांनीच तो आकाशकंदील कसा तयार करायचा ते दाखवलं एकदम परफेक्ट काम झालं. किट अगदी छान होतं. आकाशकंदील करायला एकदम सोपा.
गेली अनेक वर्षे ते दुकानात प्लास्टिक अजिबात न वापरलेले आकाशकंदील विकतात. कागदही कमीत कमी वाया जावा असा त्यांचा प्रयत्न असतो.
(No subject)
दरवाज्याच्या इथे लावण्यासाठी घरीच तयार केलेला आकाशकंदील
मी फोटो काढेपर्यंत आमच्या माऊने एक शेपटी उडवली
सगळेच कंदिल खूप मस्त झालेत.
सगळेच कंदिल खूप मस्त झालेत.
माझ्या सारखे कंदिल घरी करणारे बरेच जण आहेत म्हणून छान ही वाटतय. वावे ,तुझा ही छान झालाय. मयुरेश गद्रे यांचा उपक्रम फारच छान. मुलांना तर किती मजा आली असेल.
ह्या वर्षी मला पारंपारिक कंदिल करणं शक्य नव्हतं आणि गेल्या वर्षी भरत ह्यांनी दाखवलेला कंदिल ही करावासा वाटत होता मागच्या वर्षी बघितल्या पासूनच. म्हणून मी तसा केलाय ह्या वर्षी. मजा आली करताना. भरत, मनापासून धन्यवाद त्यासाठी . छान झालाय कंदील . सोपा सुटसुटीत तरी ही सुंदर दिसणारा.
हा फोटो
मस्त वाटतोय
मस्त वाटतोय
कसा बनवला त्याची कृती सांगा ना
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/19693 ही घे लिंक भरत ह्यांची
धन्यवाद
धन्यवाद
कोण कोण करतय घरी कंदील ह्या
कोण कोण करतय घरी कंदील ह्या वर्षी?
आमचा होतोय, झाला की दाखवते इथे.
ममो ताई यंदाही घरी करत नाहीये
ममो ताई यंदाही घरी करत नाहीये.
(घरी करून जमाना झालाय).
पुढल्या वर्षी नक्की करणार.
सर्वांचे आकाशकंदील सुरेख!! >>
सर्वांचे आकाशकंदील सुरेख!! >>>+९९९
Pages