आकाश कंदिल

Submitted by मनीमोहोर on 30 October, 2019 - 12:41

आम्ही बरेच वर्ष आकाश कंदील घरी करायचो . पारंपरिक कंदील च आवडतो आमच्या घरी सगळयांना. पण अलीकडे काही वर्षे मात्र वेळे अभावी विकतच आणतो. विकत चे कंदील दिवसेंदिवस खूपच बटबटीत होत चाललेत हे जाणवत होतं पण तरी ही बाजारातून रेडिमेड कंदिलच येतो घरी.
ह्या वर्षी मुलांनी कंदील घरीच करायचा घाट घातला. बाजारातून तयार कंदीला ऐवजी कंदीलाचे कागद घरी आले. मी खळ केली. तरुण मुलांना खळ माहीत नसेल कदाचित तर सांगते . खळ म्हणजे कणीक पाण्यात शिजवून केलेली घट्ट पेस्ट. कणकेतल्या ग्लुटेन मुळे ही कागद चिकटवण्याच काम झकास करते. सांगाडा होताच घरी. पूर्वानुभव ही होता गाठीशी. घरातले सगळेच उत्साहाने पुढे आले कंदील करायला. मी ही त्या करंज्या करायचा घाट पुढे ढकलून ह्या करंज्या ( वरच्या आणि खालच्या पट्टीला जे सजावटी साठी लावलं आहे त्या कंदिलाच्या करंज्या,☺ ) करायला सरसावले. ☺ गप्पा मारत, मागे कसा कंदील करायचो त्या आठवणींना उजाळा देत कंदील कधी झाला ते कळलं ही नाही. अक्षरशः चोवीस तासात कंदील तयार होऊन गॅलरीत टांगला ही गेला.

खूप मस्त वाटतंय आणि कौतुक भरली नजर सारखी तिकडेच वळतेय. दिवाळी संपली की कंदील काढला जाईल पण ह्या कंदील in making च्या आठवणी मनात कायम राहतील आणि मनाला उभारी ही देतील.

हा फोटो.

IMG-20191025-WA0012~2_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते पान सार्वजनिक करा.>>> कसं करायचं? ते गुलमोहर प्रकाशचित्रण मध्ये प्रकाशित झालय, मला दिसलं नाही एडिट करायला

आता बहुतेक नाही करता येणार. लेखना च्या संपादनाला तीस दिवसांचीच मुदत असते. मी त्या ग्रुपचे सदस्यत्व घेऊन पाहिले तुमचे कंदिल, रांगोळी, पणत्या. छान आहेत.
प्राजक्ता आणि इतरांचेही कंदिल सुंदर आहेत.

मायबोलीवरच्या या आणखी कंदिल कृती
https://www.maayboli.com/node/46063
https://www.maayboli.com/node/46109
https://www.maayboli.com/node/38985

सीमा, प्रतिसादा साठी आभार.

अनया नक्की दाखव एक तरी कशी चकली करायची ते.

भरत लिंक बघितल्या . मस्त आहेत ते पण कंदिल.

हो, अलीकडे माबो ने धागा संपादना ची मुदत एक महिनाच ठरवली आहे त्यामुळे आता तो धागा सार्वजनिक नाही करता येणार.

व्हिडिओ छान आहे. कसं करायचं ते नीट कळतं आहे.
त्या चकल्या एकसारख्या आकाराच्या करणं महत्त्वाचं आहे. माझे थोडे लहान-मोठे झाले होते. तसंच ते जोडताना वर्तमानपत्राचा कागद फाटला. मग एक पारदर्शक लेस होती, ती वापरून आधार दिला.
तुम्ही सगळ्या गोष्टी खूप नेटक्या करता. तुम्हाला हे प्रश्न येणार नाहीत.

आत दिवा लावला की काही कळत नाही एवढं.

मस्त दिसतोय तुझा ही अनया.

पुढच्या वर्षी नातीला करून दाखवीन ह्यातला एक दिवाळीत तिकडे असले तर. तिला कागद कापायची आणि असल्या गोष्टींची खूप आवड आहे. कामट्या आणून करणं परदेशात अशक्य म्हणून

सगळ्यांचे कंदील एकदम मस्त Happy
घरी कंदील बनवण्याची मजा काही वेगळीच असते Happy

परदेशात राहणाऱ्या मुलींसाठी एक उपयुक्त माहिती ... माझ्या मुलीने ह्या वर्षी बार्बेक्यू च्या काड्या वापरून सांगाडा बनवला आणि उत्तम पारंपारिक कंदिल तयार केला आहे.

धन्यवाद . तुमच्या ही घरी केलेल्या आकाशकंदील चे फोटो टाका . पुढच्या वर्षी नवीन कल्पना मिळायला .

वाह मस्त.. छान धागा.. छान कंदील.. आठवणी जाग्या झाल्या
लहानपणी आम्ही दादरावर कंदील बनवून सर्व बिल्डींगमध्ये ना नफा ना तोटा तत्वावर वाटायचो त्याची आठवण झाली.. मजा यायची त्या दोन तीन रात्री दादरावर गप्पा मारत मित्रासोबत जागायला .
कालच आकाश कंदील विकत आणला. नंतर डोक्यात आले की घरीच पोरीसोबत बनवायला हवे होते. मजा घालवली विकतचे आणून. Sad
अर्थात अजूनही दिवाळी गेलेली नाही, किंबहुना आलेलीच नाही.. असा साधासा पारंपारीक नक्की ट्राय मारू शकतो

सर्वांचे आकाशकंदील सुरेख!!

यावर्षी आमच्या महाराष्ट्र मंडळाने आकाशकंदील तयार करण्याची कार्यशाळा घेतली. डोंबिवलीच्या श्री. मयुरेश गद्रे यांच्या दुकानातून आकाशकंदिलाची किट्स कुरियरने मागवली आणि मग एक दिवशी झूमवर गद्रेकाकांनीच तो आकाशकंदील कसा तयार करायचा ते दाखवलं Happy एकदम परफेक्ट काम झालं. किट अगदी छान होतं. आकाशकंदील करायला एकदम सोपा.

IMG_20201112_084215~2.jpg

गेली अनेक वर्षे ते दुकानात प्लास्टिक अजिबात न वापरलेले आकाशकंदील विकतात. कागदही कमीत कमी वाया जावा असा त्यांचा प्रयत्न असतो.

IMG_20201113_121809.jpg

दरवाज्याच्या इथे लावण्यासाठी घरीच तयार केलेला आकाशकंदील

मी फोटो काढेपर्यंत आमच्या माऊने एक शेपटी उडवली

सगळेच कंदिल खूप मस्त झालेत.

माझ्या सारखे कंदिल घरी करणारे बरेच जण आहेत म्हणून छान ही वाटतय. वावे ,तुझा ही छान झालाय. मयुरेश गद्रे यांचा उपक्रम फारच छान. मुलांना तर किती मजा आली असेल.

ह्या वर्षी मला पारंपारिक कंदिल करणं शक्य नव्हतं आणि गेल्या वर्षी भरत ह्यांनी दाखवलेला कंदिल ही करावासा वाटत होता मागच्या वर्षी बघितल्या पासूनच. म्हणून मी तसा केलाय ह्या वर्षी. मजा आली करताना. भरत, मनापासून धन्यवाद त्यासाठी . छान झालाय कंदील . सोपा सुटसुटीत तरी ही सुंदर दिसणारा.

हा फोटो
20201113_134235_2.jpg

मस्त वाटतोय
कसा बनवला त्याची कृती सांगा ना

Pages

Back to top