आकाश कंदिल

Submitted by मनीमोहोर on 30 October, 2019 - 12:41

आम्ही बरेच वर्ष आकाश कंदील घरी करायचो . पारंपरिक कंदील च आवडतो आमच्या घरी सगळयांना. पण अलीकडे काही वर्षे मात्र वेळे अभावी विकतच आणतो. विकत चे कंदील दिवसेंदिवस खूपच बटबटीत होत चाललेत हे जाणवत होतं पण तरी ही बाजारातून रेडिमेड कंदिलच येतो घरी.
ह्या वर्षी मुलांनी कंदील घरीच करायचा घाट घातला. बाजारातून तयार कंदीला ऐवजी कंदीलाचे कागद घरी आले. मी खळ केली. तरुण मुलांना खळ माहीत नसेल कदाचित तर सांगते . खळ म्हणजे कणीक पाण्यात शिजवून केलेली घट्ट पेस्ट. कणकेतल्या ग्लुटेन मुळे ही कागद चिकटवण्याच काम झकास करते. सांगाडा होताच घरी. पूर्वानुभव ही होता गाठीशी. घरातले सगळेच उत्साहाने पुढे आले कंदील करायला. मी ही त्या करंज्या करायचा घाट पुढे ढकलून ह्या करंज्या ( वरच्या आणि खालच्या पट्टीला जे सजावटी साठी लावलं आहे त्या कंदिलाच्या करंज्या,☺ ) करायला सरसावले. ☺ गप्पा मारत, मागे कसा कंदील करायचो त्या आठवणींना उजाळा देत कंदील कधी झाला ते कळलं ही नाही. अक्षरशः चोवीस तासात कंदील तयार होऊन गॅलरीत टांगला ही गेला.

खूप मस्त वाटतंय आणि कौतुक भरली नजर सारखी तिकडेच वळतेय. दिवाळी संपली की कंदील काढला जाईल पण ह्या कंदील in making च्या आठवणी मनात कायम राहतील आणि मनाला उभारी ही देतील.

हा फोटो.

IMG-20191025-WA0012~2_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनामिका , छान दिसतायत पणत्या.
तेजो, ग्रेट ..600 आकडा वाचून अबब च झालं एकदम. आणि रंगवल्या ही छान आहेस.
आ_रती, मस्त दिसतोय कंदिल , अनु म्हणलीय तस दिवा लावलेला फोटो ही दाखव असेल तर.
अमितव, मस्तच झालाय कंदिल , छान दिसतोय. आणि टिकला चांगला म्हणून ही छान वाटतय. नाहीतर वाऱ्याने एवढी मेहनत वाऱ्यावर Happy

आज बाहेर गेले होते तेव्हा विक्री साठीचे कंदिल आलेले दिसले बाजारात, म्हणून धागा वर काढतेय.
अजून आहेत दिवस हातात, वेळात वेळ काढून करा घरीच कंदिल आणि इथे फोटो दाखवा.

अरे छान केले धागा वर काढला..
यावेळी घरीच कंदील ट्राय करायला हवे..
मुलांनाही मजा येईल..
अजून कोण काय करणार असेल तर नक्की शेअर करा..

होळी आली की - रव्याची पुरण्पोळी, उन्हाळा आला की -- गारेगार बर्फ आणि नॅचरल आईस्क्रीम घरच्या घरी , गोडाधोडाचे दिवस आले की - मलई बर्फी , गणपती आले की HH किन्वा ममो चा उकडीच्या मोदकाचा धागा आणि दिवाळी जवळ आली की ममोताईचा हा आकाशकंदिलाचा धागा .

हे धागे वर यायलाच हवेत , शास्त्र असतं ते Happy Wink

यावर्शी आमच्याकडे नो घरगुती कंदील . एक नणंदेने ओरिसावरून आण्लेला कापडी कंदील आणि तो घरात आहे हे विसरल्यामुळे एक आम्ही गेल्यावर्शी ग्राहक पेठेतून घेतलेला कागदी घडीचा कंदील असे दोन अगोदरच घरात आहेत आणि यावेळी फारसा वेळही नाही . त्यामुळे बाकिच्यांचे कंदील बघायला आवडतील .

मस्तच दिसतोय अनया . दिव्याच्या प्रकाशात नक्षी अप्रतिम दिसतेय. लिंक दे ना.

मस्त!
पुठ्ठ्याचा कापून केला का? छानच दिसतोय.

अरे मस्त आहे हा..
डिजाइन आणि आतल्या पेपराचा रंग आपल्या आवडीने हवा तो घेता येईल.. हा ही छान दिसतोय

घरात रंगीत कागद, चांदी, खळ, कागद कापल्याचे कपटे , खळीचे हात पुसायची फडकी असा सगळा पसारा झाला की दिवाळीचा खरा फील येतो.
हा आमचा ह्या वर्षीचा ...
IMG-20231108-WA0016.jpg

असा सगळा पसारा झाला की दिवाळीचा खरा फील येतो.
,>>>>
+786
कंदील सुद्धा मस्त आहे. कलर हटके आहे.

खालचा डिस्को लाईट सारखा कंदील देखील मस्त आहे. घराच्या आत सुद्धा छान वाटेल.

ममो खूप सुंदर कंदील..!

अनया तुमचा कंदील पण खूप छान..बराच वेळ गेला असेल बनवायला..

धन्यवाद सर्वांना.. अनया मस्तच दिसतोय कंदिल , आणि लिंक साठी ही धन्यवाद , बघते. थोडा वेळ खाऊ आहे का ग पण? अर्थात कंदिल करायचा म्हणजे वेळ लागतोच.

कंदील आवडले.
तो रुबिक क्यूबवाला भारी आहे. कसे चिकटवले सारे पिरामिड?

हा ओरीगामी आकाश कंदील करायला वेळ लागला. पण फार छान दिसतो आहे. अगदी श्रमसाफल्य!
Srd, ते क्यूब चिकटवले नाहीत. एकात एक अडकवले आहेत. ही लिंक बघा.
https://www.youtube.com/watch?v=iP6gnGETKFg

अनया बघितली ग लिंक... मस्तच आहे, मजा आली असेल ना करायला वेळ लागला तरी .
Btw त्या लिंक पेक्षा तुझी रंग संगती खुप म्हंजे खूपच सुंदर दिसतेय.

अनया, तुम्ही दिलेल्या लिंकमधे बघून हा आकाशकंदील केलाय. पण मी शिवाय पारंपरिक कंदिलासारख्या झिरमिळ्या वगैरे लावल्या.
IMG-20231113-WA0010.jpg

धन्यवाद सर्वांना...
वावे, छान दिसतोय कंदिल मला ही झिरमिळ्यांची आयडिया आवडली.
अमितव, छान झालाय कंदिल, रंग आवडले कागदाचे. सांगाडा लगेल्या वर्षीचा टिकला की नवा करावा लागला ?

छान आहे कंदील
मला हे लाल भगवे पिवळे रंगच आवडतात. तरच तो दिवाळी फिल येतो असे वाटते.

Pages