आकाश कंदिल

Submitted by मनीमोहोर on 30 October, 2019 - 12:41

आम्ही बरेच वर्ष आकाश कंदील घरी करायचो . पारंपरिक कंदील च आवडतो आमच्या घरी सगळयांना. पण अलीकडे काही वर्षे मात्र वेळे अभावी विकतच आणतो. विकत चे कंदील दिवसेंदिवस खूपच बटबटीत होत चाललेत हे जाणवत होतं पण तरी ही बाजारातून रेडिमेड कंदिलच येतो घरी.
ह्या वर्षी मुलांनी कंदील घरीच करायचा घाट घातला. बाजारातून तयार कंदीला ऐवजी कंदीलाचे कागद घरी आले. मी खळ केली. तरुण मुलांना खळ माहीत नसेल कदाचित तर सांगते . खळ म्हणजे कणीक पाण्यात शिजवून केलेली घट्ट पेस्ट. कणकेतल्या ग्लुटेन मुळे ही कागद चिकटवण्याच काम झकास करते. सांगाडा होताच घरी. पूर्वानुभव ही होता गाठीशी. घरातले सगळेच उत्साहाने पुढे आले कंदील करायला. मी ही त्या करंज्या करायचा घाट पुढे ढकलून ह्या करंज्या ( वरच्या आणि खालच्या पट्टीला जे सजावटी साठी लावलं आहे त्या कंदिलाच्या करंज्या,☺ ) करायला सरसावले. ☺ गप्पा मारत, मागे कसा कंदील करायचो त्या आठवणींना उजाळा देत कंदील कधी झाला ते कळलं ही नाही. अक्षरशः चोवीस तासात कंदील तयार होऊन गॅलरीत टांगला ही गेला.

खूप मस्त वाटतंय आणि कौतुक भरली नजर सारखी तिकडेच वळतेय. दिवाळी संपली की कंदील काढला जाईल पण ह्या कंदील in making च्या आठवणी मनात कायम राहतील आणि मनाला उभारी ही देतील.

हा फोटो.

IMG-20191025-WA0012~2_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनया, खूपच सुन्दर झालाय क्रोशेचा कंदिल. रंग संगती ही छान दिसतेय. दिवा लावल्यावर सावलीत डिझाईन अप्रतिम दिसते आहे.
हा फोल्ड करून ठेवता येणार आहे ना ? नेट वर पॅटर्न आहेत का तूच मनाने केलास ?

अनया लिंक साठी धन्यवाद.. उशीर झालाय प्रतिसादासाठी, अमेरिकेत हा कंदिल दिवाळीत उजळला ही गेला असेल.

ह्या वर्षी चटई चा केलाय.
20241030_235833.jpg

Pages