आकाश कंदिल

Submitted by मनीमोहोर on 30 October, 2019 - 12:41

आम्ही बरेच वर्ष आकाश कंदील घरी करायचो . पारंपरिक कंदील च आवडतो आमच्या घरी सगळयांना. पण अलीकडे काही वर्षे मात्र वेळे अभावी विकतच आणतो. विकत चे कंदील दिवसेंदिवस खूपच बटबटीत होत चाललेत हे जाणवत होतं पण तरी ही बाजारातून रेडिमेड कंदिलच येतो घरी.
ह्या वर्षी मुलांनी कंदील घरीच करायचा घाट घातला. बाजारातून तयार कंदीला ऐवजी कंदीलाचे कागद घरी आले. मी खळ केली. तरुण मुलांना खळ माहीत नसेल कदाचित तर सांगते . खळ म्हणजे कणीक पाण्यात शिजवून केलेली घट्ट पेस्ट. कणकेतल्या ग्लुटेन मुळे ही कागद चिकटवण्याच काम झकास करते. सांगाडा होताच घरी. पूर्वानुभव ही होता गाठीशी. घरातले सगळेच उत्साहाने पुढे आले कंदील करायला. मी ही त्या करंज्या करायचा घाट पुढे ढकलून ह्या करंज्या ( वरच्या आणि खालच्या पट्टीला जे सजावटी साठी लावलं आहे त्या कंदिलाच्या करंज्या,☺ ) करायला सरसावले. ☺ गप्पा मारत, मागे कसा कंदील करायचो त्या आठवणींना उजाळा देत कंदील कधी झाला ते कळलं ही नाही. अक्षरशः चोवीस तासात कंदील तयार होऊन गॅलरीत टांगला ही गेला.

खूप मस्त वाटतंय आणि कौतुक भरली नजर सारखी तिकडेच वळतेय. दिवाळी संपली की कंदील काढला जाईल पण ह्या कंदील in making च्या आठवणी मनात कायम राहतील आणि मनाला उभारी ही देतील.

हा फोटो.

IMG-20191025-WA0012~2_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या वर्षीचा हा आमचा ...

सांगाडा होताच , कागद ही होते घरात मागच्या वर्षीचे उरलेले. म्हणून ते वापरले. करंज्याच , खालच्या झिरमिळ्यांच, चंदेरी बॉर्डर च आणि बाकीची ही सगळी मापं मी लिहून ठेवली होती एका कागदावर. त्यामुळे खूप सोपं गेलं आणि फार पटकन झाला कंदील. मापाप्रमाणे कापत गेले आणि चिकटवत गेले.

माझ्या मुलीने ही असाच कंदील केला आहे तिच्या घरी ही . आम्ही दोघी ही एकदमच करत होतो. फक्त तिला नोकरी आहे, लहान मुलं सांभाळायची आहेत . मला नोकरी नाही आणि मुलं ही संभाळायची नाहीत एवढाच काय तो फरक Lol Lol Lol

20211101_214037.jpg

थॅंक्यु अमुपरी स्वस्ति.

अनया मस्त झालेत कंदिल. माझा ही गेल्या वर्षी तुझ्या सारखाच होता. सोपा आहे आणि दिसतो ही छान.
ह्या वर्षीचा ही छान झालाय. नक्षीची सावली सुंदर दिसतेय.

मागच्या वर्षी इथलाच बघून केला होता. एकदम सोपा पॅटर्न आहे.
मुलगा परदेशात असतो. त्याला फराळ पाठवला, त्या बरोबर हे गोल पाठवले. फोनवर कसे जोडायचे ते सांगितलं. त्याच्याकडे, शेतावर, भावाकडे आणि घरी सगळीकडे हाताने केलेले एकसारखे आकाशकंदील बघून जीव थंड झाला.

हा या वर्षीचा क्रोशाने विणलेला स्प्रिंग आकाशकंदील.
IMG_20211102_160627.jpg

मोठा असल्याने आसाभोवती तार वापरली; ती विणकामातच लपवली. दिव्याची माळ लावायलाही विणकामात सोय केली.
IMG_20211102_160916.jpg

अवल , अव्वल नंबर. काय भारी कंदील आहे.
ह्या वर्षीचा ही छान झालाय. नक्षीची सावली सुंदर दिसतेय >> +100000

हा माझा गेल्या वर्षीचा .
जवळजवळ एक दशक वापरून जीर्ण झालेला Georgette चा top केवळ त्यावरच्या print मुळे टाकवत नव्हता. गेल्या दिवाळीच्या सफाईत कचर्यात टाकायला दाराबाहेर ठेवला. दोन तासांनी परत आणला . आणि एक दोन दिवसानंतर ........

Screenshot_2021-11-01-19-49-40-224_com.miui_.gallery.jpg

मुलगा परदेशात असतो. त्याला फराळ पाठवला, त्या बरोबर हे गोल पाठवले. फोनवर कसे जोडायचे ते सांगितलं. त्याच्याकडे, शेतावर, भावाकडे आणि घरी सगळीकडे हाताने केलेले एकसारखे आकाशकंदील बघून जीव थंड झाला. >> अनया , फारच मस्त आयडिया . माझा जीव नुसता कल्पना करून ही थंडावला.

अवल काय कल्पक आहेस तू. फारच सुंदर दिसतोय.

स्वस्ति , कमाल आहे. आयडिया भारीच. आणि दिसतोय ही किती सुरेख.

तुम्ही सगळे जण कंदील घरी करता हेच मनाला किती सुखावणार आहे. विकत आणण काही कठीण नाहीये तुमच्या साठी तरी घर नोकरी सांभाळून ह्या साठी ही वेळ काढता हे खूप appreciate करते मी.

Thnk you ममोताई , अवल.

तुम्ही सगळे जण कंदील घरी करता हेच मनाला किती सुखावणार आहे. विकत आणण काही कठीण नाहीये तुमच्या साठी तरी घर नोकरी सांभाळून ह्या साठी ही वेळ काढता हे खूप appreciate करते मी. >> लग्नानंतर एक दोन वर्षे विकत आणला कंदिल . नंतर एक वर्ष मी एकटीनेच केला . नंतर मग प्रत्येक वर्षी नवरा सोबतीला असतो. आम्ही सहसा best out waste मोडमध्ये। असतो Happy
एक वर्ष तो onsite होता , मी video call करून सल्ले घेतले . मला वाटतं , प्रत्येक वर्षी हा आमच्यासाठी bonding time असतो. आणि काहीतरी कलात्मक केल्याचे समाधान . (भले finishing कसेही असू दे Happy )

माझा लेक लहान असताना त्याला नेहमी प्रश्न पडायचा , दुकानात कंदील विकायला का असतात ? त्याचा समजूतीप्रमाणे कंदिल घरी बनवायची गोष्ट आहे.

या वर्षी खणाच्या कापडाचे , मॅक्रेम चे कंदील पॉप्युलर आहेत का?
काल एका छोट्याशा दुकानात कागदाचे पारंपारीक पण जरा वेगळ्या डिझाईनचे आकाश्कंदिल बघितले , निऑन कलर मध्ये .
पतंगाच्या कागदाचे नाहीत थोड्या जाड कागदाचे .

सगळ्यांचे आकाशकंदील मस्तच!!! मी केलेली काही मोत्याची आणि कागदी कलाकारी !!!

kagdi akashkandil.jpg

हे आकाशकंदील वापरून केलेले तोरण

toran_0.jpg
दारावर लावायला कागदी पणत्या

kagdi panati.jpg

रांगोळी साठी वापरायला मोत्याच्या पणत्या

moti panati.jpg

गौरीची पाऊले

moti paule.jpg

धन्यवाद अनु , फोटो ची size काहीतरी चुकतेय . छोटेच येत आहेत . Paint मध्ये किती size ठेवायची सांगू शकाल का ? मला आकाशकंदील चा पण फोटो टाकायचा आहे ? Resize to किती pixel करायचे ?

अश्विनी काय सुंदर दिसतायेत सगळ्याच वस्तू .
मस्त धागा आहे हा.
हा या वर्षी लेकीने बनवलेला, एका दिवाळी कॅम्प ला गेली होती तिथे त्यांच्या कडून बनवून घेतला. IMG_20211102_092057__01__01__01.jpg

चिन्मय 1 फारच सुंदर कलरफुल दिसतोय तुमचा कंदील.
अश्विनी मणी पावले , कंदील , पणत्या सगळंच गोड दिसतंय.
श्रद्धा 1 मस्त केलाय कंदिल मुलीने.
भरत, तुमचा कंदील फारच पॉप्युलर झालाय. गेल्या वर्षी मी पण केला होता. मस्तच आणि सोपी आहे कृती.

फोटो एकदम हाय फाय मोबाईल चे असतील तर एच डी प्रिंट प्रतीचे मोठे फोटो असतील.
पेंट मध्ये रिसाइज (लॉक अस्पेक्ट रेशो) करुन परसेंटेज १०० % चे ७०% वगैरे करुन बरोबर होईल बहुतेक.

Pages