खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे कोलंबी असली की मला (म्हणजेच चवीच्या बाप्पाला) पहिला असा नैवेद्य दाखवला जातो.

.

आणि मग मी त्याची चव बघून सर्व ठिकठाक आहे असे सांगितले की मग असे पुर्ण ताट येते Happy

बरेच दिवसानी आज या धाग्यावर आले आणि दुसरा धागा सुरु पण झाला याचा आनंद झाला..... Happy

मागच्या काही दिवसात बनवलेले पदार्थ :

१. होममेड पाव भाजी : पाव पण घरीच बनवले आहेत.

107631572_10222312147487951_4221735066748368184_n.jpg

२. चिज आलु शॉट्स :
107666598_10222312148767983_2684808654722866246_n.jpg

३. राजमा चावल आणि रोटी :
107824488_10222312150328022_971187255013820209_n.jpg107796522_10222312149448000_8194298182909956655_n.jpg

४. आम्रखंड पुरी :
107960616_10222312147927962_3314054108862241843_n.jpg

५. दाल खिचडी :
107627989_10222312151248045_7139836718439097527_n.jpg

Amruta .. cheez Pavbhaji mast..Dal Khichdi..Rajma Chaval.. Alu shots .. saglech padarth bhari..

Dhagyachi Survatch mast zhaliye.. क्रुन्मेश च्या कोलम्बि चपातिने..

सगळेच पदार्थ मस्त आहेत. मानसी , बीट कटलेट मधुरा रेसिपी प्रमाणे केले आहेत फक्त तळले नाहीत. शॅलो फ्राय केले थोड्या तेलावर.

@ऋन्मेष कोळंबी भारी.. आम्ही रस्सा वाली नाही करत.. फ्राय किंवा ब्लॅक पेपर वाली सुखी करते..

Btw.. u r founder of this thread, that doesn't mean first comment or photo should be urs only.. Proud Proud Proud

@अमृता पुरी आणि दालखिचडी एकदम हॉटेल सारखी दिसतेय...

@देविका मोदक सुरेखचं

दुधवाल्याने गाईचा चीक दिला...

IMG-20200710-WA0015.jpg

गूळ काळा वापरला आहे..

IMG-20200711-WA0004.jpg

दूध घातला 1वाटी 1 लिटर ला..

IMG20200710175349.jpg

अमृता, सगळे पदार्थ भारी
देविका, मोदक अन निवऱ्या दोन्ही मस्त
शितल खरवस तोपासू एकदम
या वर्षी गावावरून घरचा चीक अन खरवस आला होता जानेवारीत. त्यामुळे कधी नव्हे ते भरपूर खाल्ला तरी मन भरले नाही

अजून एक, असा खरवस भारी लागतोच पण कधीतरी तव्यावर भांडे ठेवून वरून रेती भाजून किंवा शेणी पेटवून करून बघा, भाजकी खमंग चव येते

मखाण्याची भाजी

Screenshot_2020-07-11-13-32-32-019_com.miui_.gallery.png

उकडीचे मोदक - डोळ्यात बदाम बदाम बदाम ! Happy

कोळंबी भारी.. आम्ही रस्सा वाली नाही करत.. फ्राय किंवा ब्लॅक पेपर वाली सुखी करते..
>>>>>
ओके आमच्याकडे कोलंबी फ्राय कोणाला आवडत नाही जास्त. फ्राय होण्याची जबाबदारी आम्ही हलवा सुरमई रावस पापलेटला देतो. बारीक करदी सुकी करतात. पण कोलंबीला थोडी ग्रेव्ही लागतेच आम्हाला तिच्यात चव ऊतरायला. नाहीतर मग ते तांबडे सार. पण त्यातल्या कोलंबीची चव सारात उतरल्याने मूळ कोलंबी फिकी वाटते. मात्र ते सार ! अहाहा.. मी गळ्याच्या वर आले तरी सारभात खाताना थांबत नाही.
शक्यतो आमच्याकडे मच्छीचे डोके शेपटी कापून ते सारात घालतात. बाकीची फ्राय करतात. आणि सोबत वरच्याप्रमाणे कोलंबी - स्टॅण्डर्ड बेत आहे आमचा. लॉकडाऊनमुळे जे उपल्ब्ध होईल तसे खातोय.

@ खरवस - काळा गूळवाला पहिल्यांदा पाहिला. म्हणजे आमच्याकडे नाही कधी केला. पण खरवस म्हणजे.. प्रश्नच नाही. ज्यांच्या नशिबी ते वरचेवर खाणे असते त्यांचा हेवा वाटतो मला Happy

>>>>>>
Btw.. u r founder of this thread, that doesn't mean first comment or photo should be urs only.. Proud Proud Proud
>>>>>>
ओके पुढचा धागा रात्रीच्या अंधारात काढतो. जो सकाळी पहिला उठेल त्याचा पहिला फोटो.. पण त्यासाठी ईथेही २००० करा पटापट Proud

Modak.. bhari ekdam.. mast pandhre subhra ahet..

sheetal kharvas pahun tondala pani sutle.. mazi aai karte ..mast. tondat virghaltat..

VB bhaji ekdam zhanzhnit distey.. aadhi mala ti chhoti kolambi vaatli

धागा २०००+ होउन दुसरा निघाला, इतके दिवस स्वतः ला रोखून ठेवलं होतं पण आज संयमाचा बांध तुटला फुटला आणि इथले फोटो बघून एकच गाणं गावं लागणार,
जीव जळला, जळला, जळला
(एवढे पदार्थ लोक घरी करतात) खरं वाटना वाटना वाटना!
Jokes apart सगळेच पदार्थ एकसेएक आहेत. आणि धाग्याची सुरवात पण फर्मास केलीये ऋन्मेष ने

“जो मै केहेती हूं, वो मै करती हूं.. और जो मै नही केहती उसे मार्गरिटा पीके भूल जाती हूं“
.
ग्रील्ड पायनॅपल हॅलापिनियोज् मार्गरिटा- फोटो बघून फोडणीचं वरण ग्लासात ओतल्या सारखं वाटेल Happy पण चव एकदम भारी.

मटन खीमा पुलाव
>>>
काय सजवलाय तो. एकदम प्रोफेशनल लूक. तुम्ही ऑर्डर घेऊ शकता गटारी पार्टीच्या Happy

मार्गारेटा सुद्धा एक नंबर दिसतेय

Pages