खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमरस शिरा आडवा पडलाय. ऐकलेय याबद्दल पण कधी खाल्ला नाही हा.
आमच्याकडे आमरस सर्वात शेवटी आंबे खाऊन मन तृप्त झाल्यावर काहीतरी वेगळे करूया या स्टेजला आल्यावर करतात.
यावेळी आंबे तीनचार डझनच आणले. रस काढायच्या आधीच संपून गेले Sad

IMG-20200601-WA0000.jpg
आंब्याचा मावा वापरून केलेला केक.

@अनामिका, शेंगदाणे आणि डाळिंब दाणे व्यतिरिक्त काय घातले आहे? (खजूरा सारखे दिसते आहे) आम्ही जोडीने लिंबू लोणचे फोडी आणि खार घालतो.

@अनामिका नेहेमीसारखा मैद्याचा केक, फक्त आंब्याचा मावा घालून फेटून घेतले मिश्रण. आंब्याचा मावा देसाईंचा, पावसहून आणलेला Happy
तुमच्या साबा घरी करतात मिरच्या म्हणजे मस्तच. मुगाच्या खिचडीबरोबर तर फारच छान लागतात.

या चहा वडे खायला..

हे बाहेरच्या रेडीमेड पीठाचे आहेत.
आई घरात बनवते त्या पीठाचे फेव्हरेट.. चिकन मटणासोबत तेच. त्यात कॉम्प्रोमाईज नाही.

वॉव मस्त फोटो.. ईडली सांबार ताटातल्ंं कलर कॉंबिनेशन.. वा वा..
कौल चिकन यम्म्म् एकदम. आयडिया भारी..
दडपे पोहे, नानकटाई, केक मँगो शिरा.. टू गुड!!
तळणीची मिरची.. तों.पा.सु.

माझ्या साबा खूप छान करतात या मिरच्या.
या त्यांनीच केल्यात. Happy

Submitted by अनामिका. on 1 June, 2020 - 08:55>>> कृपया मला या मिर्चीची पाककृती द्याल का?

हल्ली मला लादी पाव बनवायचे वेड लागलेय.पहिला प्रय्त्न ठीक होता.दुसरा कणकेच्या पावाचा प्रयत्न साफ फसला.पण मी करणारच परत.सॉफ्ट जमले की माझे वेड थांबणार.

Devkitai..Maza pan pavacha pahila pryatna phasala..dusra pryatna karayacha vichar kartey..pan..6..pavasathi evdha gas use karayacha jivavar yete..

Mi hatanech karte..maze batter thodese less sticky hote ...mhanun soft nahi zhale pav..

Pages