खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Amruta, एकदम wow veg puff!

IMG-20200521-WA0032.jpg
केरला veg stew आणि अप्पम ( फोटो हलला आहे )

मसाले - वेलदोडा, लवंग, दालचिनी, काळी मिरी - कुटून, तमालपत्र, चक्री फूल, कढीलिंब, हिरव्या मिरच्या -2 - उभ्या कापून, आलं - julienne
भाज्या- कांदा, बटाटा, फ्लॉवर, फ्रेंचबिंस (आज माझ्याकडे नव्हते), गाजर, कॉर्न, मटार
2 पॅकेट dabur coconut milk
तेलात मसाले परतून-भाज्या परतून- मीठ- एक ते दोन वाट्या पाणी- झाकण- भाज्या शिजल्या की नारळ दूध घालून किंचित गरम ( जास्त गरम केलं तर दूध फाटू शकतं)
वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे मसाले आहेत, मी ज्या हॉटेलमध्ये खाऊन घरी try केलं, त्यांनी जे मसाले घातले ते मी घालते.

@अमृता व्हेज पफ खूप छान दिसताहेत

राजसी व्हेज स्ट्यु साधारण कसे लागते चवीला?
करुन पहायचे आहे.

राजसी व्हेज स्ट्यु साधारण कसे लागते चवीला --- नारळाच्या दुधाची चव असते, नारळाचे दूध आवडत असेल तर आवडेल.
अनामिका, केक एकदम प्रोफेशनल दिसतोय.

फोकाचिया ब्रे ड
434D8858-38E4-4533-A5D6-2CF6775A40FB.jpeg9F31FFF1-D8C9-4AB1-BE9C-BCF2BC3C5BC3.jpeg

Pages