खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव काय झकास दिसतो आहे फोकाचिया .. कमाल!! आयडिया मस्त.
पनीर पण छान.
आज लंचला इथल्या रेसिपी ने चिकन रस्सा आणि भाकरी.

20200523_165235.jpg

@ मटर पनीर .. मस्त दिसतंय
आणि आमच्याकडे आज पालकपनीर होता. चव अप्रतिम.एखाद्या शाही लग्नात जेवतोय असे वाटत होते.

चिकन मटण थाळ्या टाकू नका रे.. लॉक डाऊन सुरू झाल्यापासून मांसाहार तोंडात पडला नाहीये Sad उगाच आठवण होत राहते..

सगळ्यांना धन्यवाद
मटण मसाला आणि फ्रायची रेसिपी द्या प्लीज.>>>>
मटण मसाला
कढईत तेल घेऊन आलं लसूण पेस्ट, एक मध्यम बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घेतलं. तांबूस रंग आल्यावर त्यात मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकला. त्यात अर्धी वाटी खोबरं, एक कांदा, 2 3 लसूण पाकळ्या टाकून तयार केलेलं वाटण टाकलं. हे सगळं व्यवस्थित एकजीव होईपर्यंत परतवून घेतलं. तेल सुटल्यावर त्यात चवीनुसार हळद, तिखट, मीठ, गरम मसाला,चिकन मसाला, धनिया पावडर टाकली आणि मिक्स केलं त्यात कच्च अर्धा किलो मटण टाकलं, थोडा वेळ शिजवून त्यात एक ग्लास पाणी टाकून, मिडीयम गॅसवर साधारण एक तास शिजवत ठेवलं.

मटण फ्राय
कढईत तेल घेऊन त्यात आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेले दोन कांदे परतवून घेतले, तांबूस रंग आल्यावर एका टोमॅटोची प्युरी टाकली. त्यात हळद, तिखट,मीठ,गरम मसाला,काळा मसाला, कांदा लसूण मसाला टाकला हे सगळं मिक्स करून घेतल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. हे सगळं परतवून घेतलं आणि नन्तर कुकरमध्ये शिजवलेले अर्धा किलो मटण टाकलं.आणि ते व्यवस्थित अर्धा तास मंद आचेवर परतवून घेतलं.

ShitalKrishna तुमचं सगळं करणं सुंदर असतं. >>+११११

येथे मी नेहमी चक्कर मारते
काय एकेकाचे पदार्थ आहेत!!
तों पा सु अगदी

मंजूताई ढोकळा मस्त ! चकली यम्मी ऋ . पण मला मऊ नाही आवडतं मी सोबत घेऊन खाल्ली असती. माझी मैत्रीण होती तुझ्या सारखी खाणारी Happy !

@ चंपा Thank you !
Tooti frutti kashapasun banwtat te mahit nahi hi recipe https://thatbakergal.com/tutti-frutti/ pahili ... You tube war pan search kele , sagalikade almost same recipe aahe .

@ ऋन्मेऽऽष .. kalingadacha pandhara bhag khatat he mahit navata mala , Mi pahilyanach try kela aahe . Tutti frutti mulani fast pan Keli .. ajun tari potdukhichi kahi complaint nahi ...

Balushali jhakas !!
Jewanache tat yummy aani dhokala pan !!

Pages