खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवात मी करतो,
कोकण जत्रा किंवा आग्री कोळी मेळावा, मुंबईच्या पाठीवर कुठेही लागला असेल तिथे मी वेळात वेळ काढून पोहोचतोच. आज तर थेट नवी मुंबईला पोहोचलो. आणि तिथूनच हे ताजे ताजे पारंपारीक मटण मासोळीचे फोटो ज्यावरूनच हा धागा सुचला Happy

mase 1.jpgmase 2.jpg

आई ग्गं! काय जळवतोस रे.

मी आपली माझा मेनु सांगायला आले होते वरण-भात, चपाती आणी मटार+फ्लॉवर+बटाटा भाजी. विचार केला की जेवण तर झाले आहे त्यामुळे फोटो नाहीये तर मस्त रसभरीत भाजीचे वर्णन करु पण तुझे हे फोटो बघितले आणि जेवण पोटातल्या पोटात फिरु लागले (घास तोंडातल्या तोंडात फिरतो त्या चालीवर)
आता संध्याकाळी काहीतरी नॉनव्हेज खाऊन आग विझवावी लागेल Happy

आज कोबी+ बटाटा भाजी + चपाती.

काल रात्री पर्शियन दरबार मधे चिकन गार्लिक टिक्का, चिकन तंदूरी, प्रॉन्स बिर्याणी खाल्ली.

वाह टीना मस्तच. मी आता यातलेच काही खाल्ले नसते तर माझ्याही ढवळले असते Proud
बाकी ते दोन तळलेल्या मिरच्यांसारखे आहे ते काय आहे?

निल्सन,
मी आपली माझा मेनु सांगायला आले होते वरण-भात, चपाती आणी मटार+फ्लॉवर+बटाटा भाजी.
>>>
देव न करो मला कधी ईथे असा मेनू टाकायची वेळ यावी Wink
बाकी मी तर आता चार दिवस हेच वरचेच खाणार आहे. काल तिथे खाल्ले. आजच्याला पार्सल आणलेले. आणि उद्या एका व्हॉटसप्ग्रूपवरच्या पोरांना प्रभावित करून पुन्हा तिथे जायला कंपनी मिळवलीय. सोमवारसाठी पुन्हा पार्सल घेऊन येणार Happy

सस्मित, झिंगा बाजूला सुका आहे.
भाजल्या मासोळ्यांचा रस्सा आहे आणि त्यातल्याच दोन बाजूला काढल्या आहेत.
बहुतेक.

आत्ता एक मोठा मग भरून चहा होईल. थोड्या वेळाने व्हेज समोसे बनवायचा प्लान आहे. मुलांना विचारून बनवणार.

सस्मित, झिंगा बाजूला सुका आहे.
भाजल्या मासोळ्यांचा रस्सा आहे आणि त्यातल्याच दोन बाजूला काढल्या आहेत.
बहुतेक.>> +१
लय हुशारे ऋम्नेष तू Proud

लय म्हणजे लय भारी दिसतोय आगरी कोळी मेन्यू. आठवड्याचे पहिले चार दिवस मुंबई नागपूरमध्ये भरघोस खादाडी केल्याने आता तीन दिवसांचा संयम ब्रेक घ्यायची योजना होती, पण असे फोटो बघून विश्वामित्र होणार माझा. उद्या रविवार साजरा करायलाच हवा.

टीना रस्सा जोरदार दिसतोय.

अरे व्वा निरु...
मस्त दिसतय..
आय वंडर कस लागत असेल हे चवीला प्रकरण-ए-क्रोकोडाईल?

त्या मगरमच्छच्या डिशला गूगल इमेजले, असले यम्मी रिझल्ट आले,
https://www.google.com/search?q=Crocodile+Steak&espv=2&biw=1366&bih=662&...

कुठल्या देशात खायला जावे लागेल हे?

This is in Mauritius...
You can also get it in Carnivore Hotel, Nairobi, Kenya..

ओके धन्यवाद, अर्थात चवीला खायला जमेल की नाही प्रश्नच आहे. भारतीय टेस्टबडसना झेपणारे मांस कोणते याचीही एकदा लिस्ट बनत चर्चा झाली पाहिजे. म्हणजे कधी असे वेगळे खायचा योग आलाच तर रिस्क तरी घेता येईल Happy

आठवडाभरापूर्वी यावेळी चार-सहा तासांसाठी मुंबईत होतो. एअरपोर्टपासून पंधरा मिनिटांवर असलेल्या पार्ल्यातील मालवणी आस्वादची आठवण आली, सोबतीला मासे खाण्यासाठी नित्य आतुर असणारा बंगाली मित्रही होता. मस्त पाप्लेट थाळी खाऊन दोघांचेही आत्मूराव थंड केले.

k1.jpg

नागपुरात पोचलो तर हॉटेलवाल्याने त्याच्या रेस्तरांमध्ये लय भारी मटण मिळते म्हणून गळ घातली. त्याचे मन मोडवले नाही

k2.jpg

सलग दोन जेवणे हेवी झाल्याने सकाळी ब्रेफा एकदम सात्विक घेतला, बाकी मजेमजेशीर पदार्थ नजरअंदाज करून अशी प्लेट भरताना आंघोळ करून तेलपाणी लावून चप्पट भांग पाडल्यासारखा फील आला होता

k3.jpg

दुपारी काही मित्रांना सावजीची ओळख करुन द्यायची होती. तेल बघून सगळे हडबडले खरे पण तेल बाजूला करत मसाल्याची चव घेतल्यावर मात्र वाह वाह झाली. चपात्या मात्र अगदीच खानावळ क्लास, त्यामानाने नंतर आलेला राईस मस्त होता.

k4.jpg

ॠन्मेषला हा धागा काढल्याबद्दल धरुन झोडपलं पाहिजे :रागः Proud
कसले जीवघेणे फोटो टाकतायत सगळे.

अमेयरावांची खादाडी तर भारीच झाली आहे. Happy माझा रात्रीचा मेनु ठरला 'सावजी मटण' Happy

@टीना, फोटु नाय दिसत (दिसल्यावर जळफळाट होईल माहित आहे तरीही खुमखुमी Proud )

तेल बघून सगळे हडबडले खरे पण तेल बाजूला करत मसाल्याची चव घेतल्यावर मात्र वाह वाह झाली.>> अमेय, विदर्भात तर्री शिवाय भाजी बनवणे म्हणजे पाप हाय पाप.. Proud

मला वाटले ऋन्मेष इथे रोज वेगवेगळ्या भटक्या प्राण्यांची नावे लिहिणार असतील.

Pages