Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरुवात मी करतो, कोकण जत्रा
सुरुवात मी करतो,
कोकण जत्रा किंवा आग्री कोळी मेळावा, मुंबईच्या पाठीवर कुठेही लागला असेल तिथे मी वेळात वेळ काढून पोहोचतोच. आज तर थेट नवी मुंबईला पोहोचलो. आणि तिथूनच हे ताजे ताजे पारंपारीक मटण मासोळीचे फोटो ज्यावरूनच हा धागा सुचला
मग कसा होता अनुभव??? एवढं
मग कसा होता अनुभव???
एवढं खाल्लं ?
छप्पन भोग थाळी .
छप्पन भोग थाळी .
मस्त धागा! कल्पना आवडली
मस्त धागा!
कल्पना आवडली
मटाराची उसळ आणि शिकरण
आई ग्गं! काय जळवतोस रे. मी
आई ग्गं! काय जळवतोस रे.
मी आपली माझा मेनु सांगायला आले होते वरण-भात, चपाती आणी मटार+फ्लॉवर+बटाटा भाजी. विचार केला की जेवण तर झाले आहे त्यामुळे फोटो नाहीये तर मस्त रसभरीत भाजीचे वर्णन करु पण तुझे हे फोटो बघितले आणि जेवण पोटातल्या पोटात फिरु लागले (घास तोंडातल्या तोंडात फिरतो त्या चालीवर)
आता संध्याकाळी काहीतरी नॉनव्हेज खाऊन आग विझवावी लागेल
आज कोबी+ बटाटा भाजी +
आज कोबी+ बटाटा भाजी + चपाती.
काल रात्री पर्शियन दरबार मधे चिकन गार्लिक टिक्का, चिकन तंदूरी, प्रॉन्स बिर्याणी खाल्ली.
माझ्याकडे काल भाजल्या
माझ्याकडे काल भाजल्या मासोळ्या अन झिंगे
टीना स्लर्प!!! रस्सा खतर्नाक
टीना स्लर्प!!! रस्सा खतर्नाक दिसतोय. मस्त रंग आलाय. तर्र तरी.
रस्सा कसला आहे? झिंगा नाही
रस्सा कसला आहे? झिंगा नाही दिसत. चिकन?
टीना फोटो दिसत नाहीये मला
टीना
फोटो दिसत नाहीये मला
वाह टीना मस्तच. मी आता
वाह टीना मस्तच. मी आता यातलेच काही खाल्ले नसते तर माझ्याही ढवळले असते
बाकी ते दोन तळलेल्या मिरच्यांसारखे आहे ते काय आहे?
निल्सन,
मी आपली माझा मेनु सांगायला आले होते वरण-भात, चपाती आणी मटार+फ्लॉवर+बटाटा भाजी.
>>>
देव न करो मला कधी ईथे असा मेनू टाकायची वेळ यावी
बाकी मी तर आता चार दिवस हेच वरचेच खाणार आहे. काल तिथे खाल्ले. आजच्याला पार्सल आणलेले. आणि उद्या एका व्हॉटसप्ग्रूपवरच्या पोरांना प्रभावित करून पुन्हा तिथे जायला कंपनी मिळवलीय. सोमवारसाठी पुन्हा पार्सल घेऊन येणार
सस्मित, झिंगा बाजूला सुका
सस्मित, झिंगा बाजूला सुका आहे.
भाजल्या मासोळ्यांचा रस्सा आहे आणि त्यातल्याच दोन बाजूला काढल्या आहेत.
बहुतेक.
आत्ता एक मोठा मग भरून चहा
आत्ता एक मोठा मग भरून चहा होईल. थोड्या वेळाने व्हेज समोसे बनवायचा प्लान आहे. मुलांना विचारून बनवणार.
तुम्हाला रेस्पी माहित नाही?
तुम्हाला रेस्पी माहित नाही? आणि मुलांना माहितीये?
असा पण अर्थ निघतो तर !!
असा पण अर्थ निघतो तर !!
Crocodile Steak with Potato
Crocodile Steak with Potato Chips n Home Grown Vegetables....
सस्मित, झिंगा बाजूला सुका
सस्मित, झिंगा बाजूला सुका आहे.
भाजल्या मासोळ्यांचा रस्सा आहे आणि त्यातल्याच दोन बाजूला काढल्या आहेत.
बहुतेक.>> +१
लय हुशारे ऋम्नेष तू
लय म्हणजे लय भारी दिसतोय आगरी
लय म्हणजे लय भारी दिसतोय आगरी कोळी मेन्यू. आठवड्याचे पहिले चार दिवस मुंबई नागपूरमध्ये भरघोस खादाडी केल्याने आता तीन दिवसांचा संयम ब्रेक घ्यायची योजना होती, पण असे फोटो बघून विश्वामित्र होणार माझा. उद्या रविवार साजरा करायलाच हवा.
टीना रस्सा जोरदार दिसतोय.
अरे व्वा निरु... मस्त
अरे व्वा निरु...
मस्त दिसतय..
आय वंडर कस लागत असेल हे चवीला प्रकरण-ए-क्रोकोडाईल?
त्या मगरमच्छच्या डिशला गूगल
त्या मगरमच्छच्या डिशला गूगल इमेजले, असले यम्मी रिझल्ट आले,
https://www.google.com/search?q=Crocodile+Steak&espv=2&biw=1366&bih=662&...
कुठल्या देशात खायला जावे लागेल हे?
This is in Mauritius... You
This is in Mauritius...
You can also get it in Carnivore Hotel, Nairobi, Kenya..
Updated Chrome n so can not
Updated Chrome n so can not type in Marathi.
ओके धन्यवाद, अर्थात चवीला
ओके धन्यवाद, अर्थात चवीला खायला जमेल की नाही प्रश्नच आहे. भारतीय टेस्टबडसना झेपणारे मांस कोणते याचीही एकदा लिस्ट बनत चर्चा झाली पाहिजे. म्हणजे कधी असे वेगळे खायचा योग आलाच तर रिस्क तरी घेता येईल
आठवडाभरापूर्वी यावेळी चार-सहा
आठवडाभरापूर्वी यावेळी चार-सहा तासांसाठी मुंबईत होतो. एअरपोर्टपासून पंधरा मिनिटांवर असलेल्या पार्ल्यातील मालवणी आस्वादची आठवण आली, सोबतीला मासे खाण्यासाठी नित्य आतुर असणारा बंगाली मित्रही होता. मस्त पाप्लेट थाळी खाऊन दोघांचेही आत्मूराव थंड केले.
नागपुरात पोचलो तर हॉटेलवाल्याने त्याच्या रेस्तरांमध्ये लय भारी मटण मिळते म्हणून गळ घातली. त्याचे मन मोडवले नाही
सलग दोन जेवणे हेवी झाल्याने सकाळी ब्रेफा एकदम सात्विक घेतला, बाकी मजेमजेशीर पदार्थ नजरअंदाज करून अशी प्लेट भरताना आंघोळ करून तेलपाणी लावून चप्पट भांग पाडल्यासारखा फील आला होता
दुपारी काही मित्रांना सावजीची ओळख करुन द्यायची होती. तेल बघून सगळे हडबडले खरे पण तेल बाजूला करत मसाल्याची चव घेतल्यावर मात्र वाह वाह झाली. चपात्या मात्र अगदीच खानावळ क्लास, त्यामानाने नंतर आलेला राईस मस्त होता.
ॠन्मेषला हा धागा काढल्याबद्दल
ॠन्मेषला हा धागा काढल्याबद्दल धरुन झोडपलं पाहिजे :रागः
कसले जीवघेणे फोटो टाकतायत सगळे.
अमेयरावांची खादाडी तर भारीच झाली आहे. माझा रात्रीचा मेनु ठरला 'सावजी मटण'
@टीना, फोटु नाय दिसत (दिसल्यावर जळफळाट होईल माहित आहे तरीही खुमखुमी )
फक्त नॉन व्हेजच लिहायचंय का ?
फक्त नॉन व्हेजच लिहायचंय का ?
अमेयदा, पार्ल्यातलं हॉटेल
अमेयदा, पार्ल्यातलं हॉटेल म्हणजे आपलं गटग झालं होतं तेच का ? बाकीचे फोटो भारी आलेत
व्हय तेच
व्हय तेच
तेल बघून सगळे हडबडले खरे पण
तेल बघून सगळे हडबडले खरे पण तेल बाजूला करत मसाल्याची चव घेतल्यावर मात्र वाह वाह झाली.>> अमेय, विदर्भात तर्री शिवाय भाजी बनवणे म्हणजे पाप हाय पाप..
मला वाटले ऋन्मेष इथे रोज
मला वाटले ऋन्मेष इथे रोज वेगवेगळ्या भटक्या प्राण्यांची नावे लिहिणार असतील.
Pages