खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईडली अतिशय आवडल्याने आणि ती व्हर्च्युअल असल्याने, मिळत नसल्याने वारले किल्ली!! मस्त फोटो आहे. मलाही इडली वडा सांबार चटणी बेफाम आवडते.

हो ना, गरम गरम वाफाळती इडली त्यावर संबर चटणी म्हणजे सुख असतं.. खासकरून जेव्हा ती आयती मिळते तेव्हा Happy

ईडली पाहूनच वारले.--- का हो? मला तर खूप आवडते>>>> इडली चालते.पण सांबारमधे बुडलेली इडली बघून मीही वारले होते.किल्ले, दिव्यांची माळ घे ग!

देवकी, किल्ली, आर्च धन्यवाद.
रेसिपी - for dough - add 1tsp salt, 1tsp sugar, 1tsp oil, 1 table spoon of curd in 1cup of wheat flour. Kneed little tight dough than chapati. Use water if required. Keep aside for 20min with covered wet cloth. After 20min, knead dough. Roll little thick than chapati.Brush oil on medium heated pan, add rolled bread, cover with lead. flip after 1 min. Apply few drops of butter/ghee, pizza sauce. Add thin layer of grated cheese, layer of boiled corns, some crushed red chilies, oregano. Again some cheese. Then covered for 5-10 mins on low to medium flame. Thin crush fresh pan pizza is ready. Happy

 

केळवणासाठी पाहुणे बोलवले होते.
डावीकडे काकडी कोशिंबीर, मेथी पातळ भाजी, भेंडी सुकी भाजी, उडीद पापड आणि तांदळाचे पापड तळले होते आणि गोडात शेवई खीर.
मला रांगोळी जमत नाही म्हणून फुल ठेवली डेकोरेशन ला Happy

अरे वा असे केळव णात भेंडीची भाजी मिळ णार असेल तर मी परत लग्न करायला तयार आहे. माझी लैच फेवरिट. बरोबर काको. झिंदाबाद.

me_rucha ,
मस्त.पोळ्या तर एकदम छान.

अमा Happy
अमा, देवकी, स्वाती तुमच्या सगळ्यांचं कौतुक वाचून छान वाटलं.
देवकी पोळ्या मीच केल्या होत्या.
धन्यवाद सगळ्यांना.

छान होता बेत
केळवण म्हणजे ते लग्नाआधी जेऊ घालतात तेच का?

काकडी दही शेंगदाणा कूट मिरची वगैरे कोशिंबीर आमच्याकडे वरचेवर रोजच्या जेवणात होते आणि वाडगा वाडगाभर खाल्ली जाते Happy

हा गुरुवारच्या जेवणाचा फोटो. साधासाच मसालेभात, पापड गॅंग आणि या जेवणाची शोभा वाढवत ताटभर पसरलेली कोशिंबीर...

केळवण म्हणजे ते लग्नाआधी जेऊ घालतात तेच का?>>ऋन्मेष, हो त्यालाच केळवण म्हणतात.
माझ्या चुलत भावाला बोलावलेले.
कनिका धन्यवाद.

ओके रुचा, आमच्यातही हे असते. पण माझे आंतरजातीय राड्यालफड्याचे लग्न असल्याने केळवण वगैरे गुंडाळावे लागलेले. पाचपर्तावनही नव्हते झालेले. त्यामुळे स्वानुभव नाही ईतकेच.

पाचपर्तावन स्पेलिंग चुकली असेल तर कोणी कर्रेक्ट करा.
आमच्यात लग्नानंतर नवरा बायकोच्या घरी किमान पाच लोकांना घेऊन जेवायला जातो. त्यांचे पोट भरून तृप्त करून परतावून लावणे म्हणून पाचपर्तावन नाव असावे.
ते जेवण शुद्ध मांसाहारी असते. पण माझी सासुरवाडी पडली शुद्ध शाकाहारी. आणि तसेही त्यांच्यात असे नव्हतेच. त्यामुळे हे राहिलेच.
ते नवरयामुलाचे बूट लपवायचा खेळ जुते दो पैसे लो याच दिवशी होतो.

रुचा तो चहा माझा स्पेशल असतो घरच्यांपेक्षा. तळाचा बुक्कीवाला चहा घेत त्यात भरपूर दूध टाकून पांढरा करतो आणि एक मोठ्या गॅसवर उकळी घेत त्याला असा स्पेशल बनवतो.

आमच्यात लग्नानंतर नवरा बायकोच्या घरी किमान पाच लोकांना घेऊन जेवायला जातो. >>>> आमच्याकडे याला व्याही भोजन म्हणतात. मुलीकडचे जवळचे नातेवाईक लग्नाआधी मुलाच्या घरी जेवायला जातात. उद्देश एकमेकांशी ओळख होणे.

केळवणात असला मेनू? म्हणजे अदर वाईज मेथी ची भाजी, भेंडीची भाजी असले काँबिनेशन ठीके.
पण कुणाला खास बोलाविले असल्यास... जरा स्पेशल नको का? ! भाताचा प्रकार नाही, उसळ-डाळ नाही, काही कढी किंवा सार नाही !!

Pages