खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीही हाताने मळले.एक स्टेप गाळली असावी.पीठ फुगून आल्यावर मळून गोळे ट्रेमधे ठेवून परत १० मिनिटे थांबायचे आहे (मी पाहिलेल्या व्हिडियोनुसार).ते थांबले नाही आणि पावाचा ट्रे अव्हनमधे ठेवला.कणकेचे पाव बरेचसे फुलले,पण त्याला एक वेगळा वास आला.मिसळपावाचा बेत केला होता.जीवावर येऊन सर्वांनी खाल्ले. अजून ४ पाव शिल्लक आहेत.ते टाकून द्यायला जीव होत नाही कारण कणीक वाया जाईल म्हणून.

देवकी ताई कणकेच्या पावाची लिंक किंवा रेसिपी द्या ना.
अंड घातलं होत का? मला शक्यतो बिन अंडा अन बिना यीस्टचे पाव करायचे आहेत, असे होऊ शकते की नाही माहीत नाही.

VB,
Mi Nisha Madhulika chi pakru.ne बनवले.त्यात अंडे नाही yeast hote.pan tichya yeastvina pakru asatilhi.Mi refer केलेली लिंक शोधून देते.

https://m.youtube.com/watch?v=OUwCPCMWPBg&t=40s

त्या उरलेल्या पावांचे तुकडे करून कांदे पोह्यां सारखे फोडणीवर परतून छान लागतील.
कडक असतील तर पाण्यातून काढायचे.

दुसर्‍या प्रुव्हिंगसाठी बेक करायच्या आधी गोळे अर्धा तास ठेवायला हवेत बहुतेक.

2 pavacha ladu kara n 2 pavche garlick bread kara..finish..taste karnytach sampun jatil....mi hech kele....

Garlic bread lalach kela.

नेहमीचे जेवण आणि हा उद्योग भारी पडतो.अर्थात संध्याकाळी फारसे करायचे नसते म्हणून ठीक आहे.

Me pan lockdown aslyamule kela..khup time consuming ahe....nahitar office madhun alyanantar pavasathi evdha vel kon kadhnar..

Rofl व्हाईट कोकोनट केक

@sonalisl - तळणीच्या मिरच्या पाकृ- लहान आकाराच्या फुगीर मिरच्या (या कमी तिखट असतात) , धने १ वाटी, मेथी दाणे १.५ चमचा, मोहरीची दाळ- २ चमचे,हिंग - पाव ते अर्धा चमचा (चवीनुसार म्हणजे हिंगाचा स्वाद किती आवडतो तसे बघून), हळद -पाव ते अर्धा चमचा,मीठ अंदाजे आणि लिंबाचा रस - मिश्रण मिळून येण्यापुरता.
धने, मेथीदाणे व मो दाळ भाजून पूड करावी.त्यात इतर साहित्य मिसळावे.
मिरच्यांची देठं व बिया काढून त्यात तयार सारण भरावे. मिरच्या उन्हात सुकवाव्या.

ढोकळा, मटार पॅटिस A1

Todays special.. first attempt "आंबा बर्फी "

IMG20200606161842.jpg

आंब्याचा सिझन संपत आलाय.. आता एक एक सुचतंय Proud Proud

IMG20200606161847 (1).jpg

उद्या लेकी साठी mango jam try करणारे..

Shitalkrishna as usual mango barfi..yummy.. n subak...rajapuri aamba use kela ka ? Tyacha colour thoda yellow asto..n ras pan bharpur nighto..

धन्यवाद श्रवु, आंबाच्या प्रकार कि नावचं केशरी आहे (नवरा) Proud
थोडा पिवळसर होता. मी मिल्क पावडर वापरली म्हणून कलर फिका झाला असेल

Pages