खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sukat puri..mi khalli nahi kadhi..pan mast laget asel na..kombadi vade sarkhe..

हाहा .. जाई.. अगदीच या.. मला खूप आवडेल!! Happy
Thanks for the compliments..छान वाटतं ईथे फोटो शेअर करायला आणि पहायला सुद्धा.

रवा वड्याची आयडिया मस्त आहे. चाट तर यम्म्म.. अॉ.टा.फे.
थट्टै ईडली अण्णा ईडलीकडे (पुणे, बाणेर) मध्ये खाल्ली होती. सही दिसतीये ही.

आज तांदूळ सालपापडी ..वाफेवरची.
PicsArt_06-09-11.55.55.jpg

एकेक फोटो वेड्यासारखे खतरनाक आहेत. ऋन्मेष पाणीपुरी दणक्यात. किल्ली काय यमी दिसतोय ढोकळा. केसर आंआबर्फी, सालपापडी काय, जॅम, लोणची, मुरंब्बे. मस्त मस्त. रवा-बटाटा-वडा माहीत नव्हता. पॅटीस मस्त आहेत. थट्टे ईडली हा प्रकारही माहीत नव्हता.

@ रवा बटाटा वडा आमच्याकडेही पहिल्यांदाच केलेला हा प्रकार.
घरी रवा + दही + पाणी असे काहीतरी मिश्रण करून रोजच मुलांना डोसे खाऊ घातले जातात. तेच मिश्रण जाडसर करून त्यात हा प्रकार केला. बायकोने युट्यूबला कुठेतरी पाहिले.
साधारण मसाला उत्तपाच्या जवळ जाणारी चव वाटली. पण तो मी क्वचित खातो, हे फार आवडले. ते देखील सोबत चटणी नसून हे विशेष.

आज तांदूळ सालपापडी ..वाफेवरची.>>>>> गावाला लग्न असलं कि फेण्या तळायचे त्याची आठवण आली. तळण्याआधी त्या फेण्या अशाच दिसायच्या.

रवा बटाटा वडा >> आयड्या आवडली . कधीतरी डोस्याला पर्याय म्हणून चांगली आहे .
नाहीतरी डोसे नीट नाही निघाले की मोडून गोळाच होतो Happy

हा व्हिडिओ आधी पाहिला होता.पण नंतर लक्षात राहिले नव्हते.चला उद्या करते ब्रेफासाठी.बाकी बायको अगदी हौशी, कामसू आहे.नशीबवान आहेस.

Thanks TI..
तळण्याआधी त्या फेण्या अशाच दिसायच्या. ~ येस.. फेण्या प्रकारे करून वाळवायच्या असतात.

तांदूळ कांडून मिश्रण तयार करतात , ते एका ताटात घेतात व गोल गोल फिरवतात
ते पीठ पूर्ण ताटात अगदी पातळ थरात पसरते
मग ते वाफवतात
मग थोड्या वेळाने सुरीने काढून उन्हात वाळवतात
अगदी पातळ साल पापड तयार होते

https://youtu.be/6m1-bGEl7eU

चिकन बिर्याणी!
0C191D29-5631-4A78-88A8-4BEF41A6D8F1.jpegC09C0016-4607-46FF-876D-DF024D453572.jpeg

आज केला रवा बटाटा वडा.बटाटवड्याच्या सारणापेक्षा कॉर्न्+चीझ्+चिलीफ्लेक्स जास्त चांगले लागले असते.पुढच्या वेळी ते करणार.पण बॅटर नेहमीच्या डोश्याचे असेल तरच.
IMG_20200611_103233~2.jpgIMG_20200611_103319~2.jpg

छान झालाय रवा बटाटा ..
कॉर्न्+चीझ्+चिलीफ्लेक्स.. हे आम्हलाही ट्राय करता येईल नेक्स्ट टाईम

चिकन बिर्याणी पटकन भेलपुरी शेवपुरीच वाटली.. डोक्यात तेच चालू आहे गेले काही दिवस सपाटा लावल्याने Proud

@kshubha धन्यवाद
@Piku धन्यवाद, साखरांबा छान दिसतोय
@अनामिका धन्यवाद
@रश्मी धन्यवाद, लिहते रेसिपी
@जाई धन्यवाद, या घरी नक्की.. करूयात बेत..
@ऋन्मेष चाट काउंटर भारीच, रवा बटाटा वडा try करायला हवा..
@Piku सालmपापडी मस्त, उन्हाळी वाळवनात करतात तीच आहे का?
@सामो धन्यवाद
@प्राजक्ता चिकन बिर्याणी मस्त.. लाळ गाळू
@देवकी, तुमच्या रवा बटाटा वड्याचा फोटो छान दिसतोय.. yum yum
@चंपा donut भारीचं..

@रश्मी
<<शीतलने बाफाला रामराम ठोकलेला दिसतोय. Uhoh अंबा बर्फीची रेसेपी दे म्हणले तर गायबच झाली. Uhoh >>

इथे पाहून रोजच काहीकाही करायची खुमखुमी येते.. म्हणून कधीतरी उघडते धागा.

Mango barfi recipe

2 वाटी मँगो पल्प
2 वाटी साखर (पैकी एक वाटी पिठी साखर)
1 वाटी दूध पावडर
2चमचे तूप

कढई मध्ये 2चमचे तूप वितळवून त्यात एक वाटी साखर घाला, हलवून घ्या, लगेचच मँगो पल्प घाला..
हे मिश्रण घट्टसर आणि जेली सारखा होई पर्यंत शिजवून घ्या, हलवत राहा. या प्रोसेस ला जवळजवळ 35-40 मिनिट लागतात. मेडीयम flame वर करायचा आहे.
घट्टसर वाटलं, कि flame बंद करा आणि यात थोडी थोडी करत पिठी साखर आणि दूध पावडर मिक्स करा.. (गॅस बंद करायला विसरू नका, नाहीतर पुन्हा साखर वितळू लागेल)
एक ताटाला तुपाचा हात पुसून घ्या, त्यावर हे मिश्रण थापून घ्या. थापताना पिठीसाखर वरती पेरा म्हणजे थापताना बरं पडेल आणि दिसायला हि छान दिसत... थंड होऊ द्या..

Pages