Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला पण 'मी.
मला पण 'मी. ईंडीयाच' काटे नही कटते दिने है रात'
हे काय गौडबंगाल आहे कळायचच नाही.. आता ही काटे कापायच्या का मागे लागली आहे.. गुलाबाचे काटे कापयचे असतिल तर घ्यावी सुरी आणि दाखवाव हिल हे फार सोप्प काम आहे म्हणुन.
नीन्दिया
नीन्दिया से जागी बहार,
ऐसा मौसम देखा पहली बार,
कोयल थूऽऽके, थूऽऽके गाए मल्हार!!
प्रीटी
प्रीटी वुमssन
मला कधी नीट ऐकूच यायचं नाही ....नवीन होतं तेव्हा... मला ते "कुडी..गुमान" का काहितरी वाटायचं .. त्यात पंजाबी संगीत, दारासिंग वगैरे होते...त्यामु़ळे वाटलं की असेल काहितरी पंजाबी शब्द... (तसे कितीतरी अर्थ न कळणारे शब्द हिंदी गाण्यात असतात..) .. मग एकदा एका चॅनल वर गाण्याचे नाव आले लिहून तेव्हा कळाले...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
कह दोके
कह दोके तुम होSSSमे रिSSSवर्ना!
कित्येक वर्षे मी हे गाणं असं म्हणत होतो. पण हे 'होमे' अन 'रिवर्ना' काय भानगड आहे, ते कळल्याशिवायच!
खुप वर्षांनी ते कळलं. आता आता Hyundai Verna गाडी घरात आल्यानंतर 'कह दो के तुम हो मेरी वरना' असं गाणं- ते या गाडीसाठीच तयार केलं असावं, असं वाटून गेलं!
कह दोके
कह दोके तुम होSSSमे रिSSSवर्ना! >>> अगदी अगदी!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रोके तुझे कोई क्यूँ भला
संग संग तेरे आकाश है
कुठ्लं
कुठ्लं गाणं मला नीट आठ्वत नाही पण त्यात 'जायेगी पीके घर गोरी' असं होतं, मला वाटायचं एक पेग वगैरे घेऊन घरी जाणारी ही कोण गोरी बाबा मग कळलं की "पी" म्हणजे "पिया", बहुतेक अमेरिकन्स कसा "हनी" चा शॉर्टफॉर्म "हन" करतात तसा काहीसा प्रकार असावा
तसंच, "तुझे
तसंच, "तुझे देख देख सोना" मला काही दिवस "तुझे देख देख रोना" असं ऐकू यायचं
अरे बाप रे!
अरे बाप रे! प्रेयसीकडे पाहून झोपाळणारा हा प्राणी पहीलाच...
आयला, ते
आयला, ते काटे नही कटतेचा अर्थ हा आहे होय.. मला आजच उमगला.. मला आजपर्यंत तो शब्द गुलाबाच्या काट्याशी संबंधीतच वाटायचा... म्हणजे गुलाबाला काटे असले तरी ते टोचत नाहीत कारण श्रीदेवी मिस्टर इंडीयाच्या प्रेमात पडली आहे असा काहीतरी अर्थ असावा असे मला वाटत होते..
फिझा मधल
फिझा मधल 'पिया हाजी अली ' गाण
यहां दिलसे मांगो............ये हाजी अली है!!!!!!!!
खुदाके .........................बली है!!!!!!!!!!!!!!
दक्शिना अग
दक्शिना अग "तुझे देख देख सोना, तुझे देखकर है जगना" असं काहीतरी होतं, बहुतेक माझे रात्र आणि दिवस तुझ्यापासून सुरू होऊन तुझ्यापाशी संपतात असं काहीतरी ह्या प्रेमवीराला सुचवायचं असावं
तसंच नवं "किंग इज सिंग" मला पहिलं "चेंगीजखान" आणि नंतर "फ्रेंन्किस्टिन" असं काहीतरी भयानक ऐकू आलं
चिन्या, हे
चिन्या, हे म्हणजे "प्रिया गोल्ड हकसे मांगो" असं काहीतरी वाट्लं एकदम पण पुढल्या वेळी हाजीअलीवरून जाईन तेव्हा लक्शात ठेवेन
हेहे..ते
हेहे..ते सिंग इस किंग आहे! म्हणजे परत चुकीचं ऐकलं!
खर गाण काय
खर गाण काय आहे???
बीएसके,
बीएसके, ह्या वेळी ऐकलं होतं बरोबर, पण ही टाईपिंग मिस्टेक होती चिन्या, खरं गाणं "सिंग इज किंग" असंच आहे
टप टप टप टप
टप टप टप टप टाकीत टापा चाले माझा घोडा
पाठीवरती झी मराठी पायी रुपेरी तोडा
- माझी २ १/२ वर्षाची मुलगी
माझ्या ५ वर्षाच्या मुलीनी तिची चूक दुरुस्त केली -
अग, पाठीवरती झी मराठी नाही, पाठीवरती झी मखमली
तस खूपच
तस खूपच जुनं नाहीये हे गाण: (मिशन काश्मीर) बुंब्मरो...बुंब्मरो हे मी काही तरी फारच वेगळ ऐकल होत आणी तसच गुणगुणायचो: डुब मरो डुब मरो.... >> आणी वाईट म्हणजे अंताक्षरी स्पर्धेतही मी ^असच^ म्हटल्याने (मी गात नाही>> निदान लोकांना त स वाट त नाही!) आम्ही हरलो आणी मग मला प्रचंड शिव्या पडल्या
दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"
पाठीवरती
पाठीवरती झी मखमली >> :D.
पाठीवरती
पाठीवरती जीन मखमली....
=================
सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband!
मुझे कुछ
मुझे कुछ केहेना है मधल ते करीना च गाण आहे ना ' अगर कहे दिल तेरा तो रंगदे दुपट्टा मेरा'
हे गाण मला बरेच दिवस ' आगरकर है दिल तेरा ' अस काहीस ऐकू यायच
(आपला आगरकर कसा सारखा टीम च्या आत-बाहेर करत असतो तस प्रेयसीच्या हॄदयातही प्रियकर आत बाहेर करत आहे असा काहीसा अर्थ अभिप्रेत असेल अस वाटायच. )
डुब मरो
डुब मरो डुब मरो.... >>>>
आगरकर है दिल तेरा >>>> काय्च्याकै
केदार
केदार सेमपींच (चित्कारत जोरात खांद्याला चिमटा काढणारी बाहुली :)).....
मला सेम अगदी सेम हेच ऐकु यायच ....'अगरकर है दिल तेरा'
बाकरवडी,
बाकरवडी, कुलदीप - टू मच केदार, अगदी अगदी, मला पण हे असंच ऐकू यायचं
अजूनही, ओम शांती ओम मध्ये ते गाणं "अब तो होश नमी दानम" असं शाहरूख काय म्हणतो ते कळलं नाहीये, कोणाला अर्थबोध झालाय का? नेणत्यास जाणते करा....
अब तो होश
अब तो होश नही जानम, असं असावं.. म्हणजे मला तरी असंच ऐकू येतं..
केदार
केदार सेमपींच (चित्कारत जोरात खांद्याला चिमटा काढणारी बाहुली ).....
मला सेम अगदी सेम हेच ऐकु यायच ....'अगरकर है दिल तेरा'
पाहिलंत ? ग्रेट पीपल नॉट ऑन्ली थिन्क अलाईक , बट आल्सो हीअर अलाईक!!
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
हनुमान या
हनुमान या अनिमेटेड चित्रपटातल गाणं माझी ५ वर्षाची मुलगी असं म्हणायची
"अकडम - बकडम जादुकी तिकडम .. हवासे तेज बिजलीसे कम ... छुकर देखे आसमा सनम"
Its the time to Disco
Its the time to Disco हे गाणं माझ्या नवर्याला 'इश्क जादू डिस्को' असं ऐकू यायचं आणि त्याचा अर्थ त्याला, 'इश्क झाला की जादू होऊन आपल्याला डिस्को करता यायला लागतो' असा वाटायचा.
'इश्क जादू
'इश्क जादू डिस्को' ,डुब मरो डुब मरो ,आगरकर है दिल तेरा .... >>>>
काय रे हे!! धम्माल चालू आहे इथे नुसती!!
ते दानम चं बघा बुवा... मला पण हवंय
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जीवन जगण्यात धाडस आहे.. मृत्यूला शरण जाण्यात नाही.
रुनी,
रुनी, टोणगा
एक जुनं
एक जुनं गाणं आहे, धर्मेंन्द्र, रेहमान आणि नूतन ह्यांचा एक पिक्चर होता त्यातलं, त्यात एक ओळ होती "दिलने फिर याद किया, बर्फसी लेहरायी है", नंतर कळलं की ते "बर्फ" नाहीये "बर्क" आहे, म्हणजे मला वाटतं उर्दूमधे वीज
Pages