मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जब वी मेट मध्ये मौज्जा हि मौज्जा गाण्यात काहीतरी भयंकर lyrics आहेत. ते मधेच जो chorus आहे ते मला अजूनही 'तात्या तुम्ही पोहे खाऽऽ /घ्याऽऽ' असाच ऐकू येतं ,
सेम movie मध्ये ये इश्क हाये गाण्यात त्या बायका जे काही म्हणतात ते 'केळे भाजी वाला रे ऽऽऽऽ' असं ऐकू येतं,
नवीन पैकी खलिबली गाण्यात 'भरदिया गॅस भला, भरदिया गॅस भलाऽऽऽऽ' एकूणच माझं lyrics शी फारच सख्य वाटतंय! Lol

मला तर त्या गाण्याचे शब्द काही वेळा "मोर्चा रे मोर्चा, तर काही वेळा भोज्या रे भोज्या" असे वाटायचे.: फिदी :

राजेश खन्नाच्या दुष्मन मधलं गाणं आहे बहुधा. लहानपणी नेहमी रेडिओवर लावायचे.
वा दाते रवा दा ! मी विचार करून करून अक्षरशः भंजाळलो होतो कि काय अर्थ असावा याचा !!

गली बॉय सिनेमात मेरे गली में या गाण्यात सुरुवातीला 'बॉम्बे 17 में भाय तुम किदर हो?' नंतर 'पाद नाय' असं ऐकू येतं.
गुगल केल्यावर कळलं ते 5 9 असं आहे. तुम्हाला काय ऐकू येतंय सांगा

>>>वा दाते रवा दा ! मी विचार करून करून अक्षरशः भंजाळलो होतो कि काय अर्थ असावा याचा !!<<<<

सेम पिंच पशुपत...

वा दाते रवा दा ! मी विचार करून करून अक्षरशः भंजाळलो होतो कि काय अर्थ असावा याचा >>>
मी ही लहानपणी हे असंच ऐकलं होतं.
पण यात भंजाळण्या सारखं का वाटावं?
आपल्या दादाने सुचवलेल्या दातेंच्या रव्याचा शिरा, उपमा आवडणारे दादा पुढे त्याची तारीफ करू शकत नाहीत का?

सूचना: २००० पेक्षा जास्त पोष्टी झाल्याने हा धागा बंद केलेला आहे. पुढिल चर्चा याठिकाणी चालू आहे...
https://www.maayboli.com/node/52599 >>>>> इथे करा पुढची चर्चा

बन्द ...बन्द ...बन्द ...बन्द ...बन्द ...बन्द ...बन्द ...बन्द ...बन्द ...बन्द ...बन्द ...बन्द .. - हे म्हणून पाहिलं तर मित्राला ते दबंग...दबंग...दबंग - असं ऐकू आलं.

सॉरी हा प्रतिसाद नवीन धाग्यावर नाही लिहिला, कारण संदर्भ इथेच वरती आहे.

Pages