मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लागिर म्हणजे एक प्रकारची भूतबाधा टाईप्स... त्यात लोक बहकल्यासारखे नाचतात/वागतात म्हणून लागिर हा शब्द वापरलाय.

चेन्नई एक्सप्रेस मधले ते गाणं काय कळत नाही(चुकीची एकायला येणारी गाणी मध्ये लिवलं पायजेल),

वन, टू , थ्री, फोर... डेटॉल लगाले जोर... बीच मे मारे तू ठुमका...

मला वाटतेय, आता झंडू बाम नंतर डेटॉलची जाहिरात...

काय शब्द आहेत ते नक्की.

वन, टू , थ्री, फोर....गेट ऑन द डान्स फ्लोर.
बूटी शेक बूटी शेक..
दप्पन कुथु हार्ड कोर
शोल्डर हिचक मिचक
बॉडी हिचक मिचक .. ...
गिमी गिम्मी गिम्मी गिम्मी गिम्मी गिम्मी सम मोर...

(दप्पन कुथु हा एक नृत्यप्रकार आहे असं गुगलल्यावर कळले)

I was not close then, not bad.
पण खरेच ते डेटॉलच एकायला येते.

दप्पन कुथु हार्ड म्हणजे?

दप्पन कुतु म्हणजे तमिळी/कानडी लोकनृत्य आहे. पॉप्युलर कल्चरमधे त्यालाच लुंगीडान्स असेही म्हणतात. Happy खासकरून आपण ज्याला “साऊथ स्टाईल रावडी डान्सिंग म्हणतो”

ऐ मेरे दिल के चैन , या गाण्याच्या एका कडव्याचे शेवटच्या ओळी अशा आहेत ,

मांगा है तुम्हे ,दुनिया के लिए
अब तुम ही सनम फैसला किजिए ..................

मला अजूनपर्येंत त्या ओळीचा अर्थ समजला नाही
कदाचित

ती (त्याची प्रेयसी) जगाला खूप त्रास देत असेल, म्हणून जगाला वाचविण्यासाठी हा तिला मागत आहे अस असाव
Happy

त्याच्या आधीचे शब्द बघा
तुम जो पकड लो हाथ मेरा, दुनिया बदल सकता हू मै
मांगा है तुम्हे दुनिया के लिये
म्हणजे तू मला साथ दिलीस तर मी दुनियेचं भलं करू शकतो, म्हणून केवळ माझ्यासाठी नाही तर जगाच्या कल्याणासाठी तू माझा स्वीकार कर हा उच्च हेतू आहे Happy

"तू प्यार है किसी औरका तुझे चाहता कोई और है" ह्या गाण्यात पुढील ओळ आहे.

मेरा हमसफर बस एक तू
नही दुसरा कोई और है

जरा ऑर्डर चेन्ज केली तर

मेरा हमसफर बस एक तू नही
दुसरा कोई और है

Proud

म्हणजे तू मला साथ दिलीस तर मी दुनियेचं भलं करू शकतो, म्हणून केवळ माझ्यासाठी नाही तर जगाच्या कल्याणासाठी तू माझा स्वीकार कर हा उच्च हेतू आहे ,

तू साथ दिल्याने दुनियेच भल काय करणार - फार फार तर लोकसंख्याच वाढेल Rofl

>>फार फार तर लोकसंख्याच वाढेल<<

अहो त्याच्या (नायकाच्या) मतं तेच भलं असा समज असेल तर काय करणार....
शेवटी सोशल कंडिशनिंगचा पण भाग आहे ना... प्यार का अंत निशाणी मध्ये होणार... आणि भारत कृषीप्रधान असल्याने भरपूर लोकसंख्या हवीच. Proud

दूसर एक गाण

तेरे पास आके मेरा वक्त गुजर जाता है !

टीपी साठी चांगला उपाय आहे (झोप येत नाही असा एक धागा वाहतोय माबोवर त्यांनी हे गाण ऐकल नसाव )

चॉंद सी मेहेबूबा हो मेरी कब ऐसा मैने सोचा था

हॉं तुम बिलकुल वैसी हो जैसा मैने सोचा था

म्हणजे माझी प्रेयसी चंद्रासारखी सुंदर असावी असं काही मझं स्वप्न नव्हतं (माझी लायकी कुठेय तेवढी? )
तू तशीच आहेस जिचं मी स्वप्न पाहिलं होतं (म्हणजे बरी आहेस)
असा अर्थ मला वाटतो. बरोबरे का? Uhoh

सहेली इथे कब चा अर्थ कधी? अस नसून. कधी तरी..

म्हणजे मी कधीतरी असा विचार केला होता की चाँद सी मेहबूबा हो मेरी
आणि तु अगदी तशीच आहेस. असा..

तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार गाण्याच्या दुसर्‍या कडव्यातल्या ओळी मला अशा ऐकू येत असत : प्यार लिये, प्यार का quota लिये, यूँ ही जुगनू लिए, चमके तुम्हारी रातें ... Uhoh

ते प्यार का quota लिये नसून चांद का टीका लिये आहे हे आत्ताच गुगलून पाहिलं तेव्हा कळलं. Happy

'धुंडो धुंडो रे साजना' मध्ये 'मोरा बाला चंदाका जैसे हाला रे' अशी एक ओळ आहे. ह्या चित्रपटात भोजपुरी भाषेचा उपयोग झाला होता म्हणे. हा भोजपुरी शब्द आहे का? काय अर्थ कोणाला माहित आहे का?

मी तर आत्तापर्यंत "चॉंद सी मेहेबूबा हो मेरी कब ऐसा मैने सोचा था" हे गाण "चॉंद सी मेहेबूब बाहो मेरी कब अस ऐकत होते"

'मोरा बाला चंदाका जैसे हाला रे' <<<, स्वप्ना, शब्द भोजपुरी आहे की ते माहित नाही. पण हाला म्हणजे तुकडा. माझ्या कानातला दागिना म्हणजे जणू चंद्राचा तुकडा. (अर्धचंद्रकृती कानाअलं आहे ते!)

चाँद सी महबूबा.. मधे मनोजकुमारची प्रेयसी माला सिन्हा अगदी साधीसुधी असते. तो डॉक्टर असतो. त्यामूळे तिला थोडा संकोच वाटत असतो म्हणून ते तसे गाणे आहे. त्याची डॉक्टर सहकारी शशिकला असते.

हिमालय कि गोदमे मधली बाकीची गाणी पण छान आहेत.. ईक तू जो मिला / एक तू ना मिला / कंकरीया मार के जगाया (तिन्ही लता ) नि मै रात खडी थी छतपे ( रफी / उषा तिमोथी ).

ते लव आज कल मधले पण गाणं कधीच कळत नाही, इतक्या वेळा मी गाडीत सीडी लावते...
(गूगलून कष्ट केले नाहीत अजून )..
पन मला असेच एकायला येते... ते सैफने म्हटले काय असे वाटते..

रौंदे चक रौंदे चक.... ने बडा लोग ने....
तु मेरा, मै तेरा... भाय...
let's have some raunak shaunak... let' s have some party.

तरी जुन्या गाण्यांमधे कमी वाद्यवृंदामुळे जरा शब्द ऐकु येत होते, पण आताची गाणी ऐकायची असतील तर दोन स्पर्धा जाहीर कराव्या वाटतात....
१. "गाण्याचे शब्द सांगा आणि १०० रुपये मिळवा"
२. "गाण्याचा अर्थ आणि गाण्यातील पहिल्या ओळिचा दुसर्‍या ओळिशी लागणारा संबंध स्पष्ट करुन सांगा व १००० रुपये मिळवा"

जिहाल ए मस्ती मु़कंद बरंदीश ,बेहाल ए हिझडा बेचारा दिल है
सुनाई देती है जिसकी धडकन तुम्हारा दिल या हमारा दिल है .............

पहिली ओळ तर डोक्यावरुन रॉकेट गेल्यासारखी

किकु, भारी आहात..... :हहपुवा:
जिहाल ए मस्ती मु़कंद बरंदीश ,बेहाल ए हिझडा बेचारा दिल है>>>> हिझडा नसेल दुसर काहितरी असेल..

पहिली ओळ तर डोक्यावरुन रॉकेट गेल्यासारखी>>>> +१००००

हिजडा नाही हिज्र -
हिज्र म्हणजे विरह (उर्दु भाषेत)

बेहाल ए हिजरा बेचारा दिल है
म्हणजे तुझ्या विरहात हे माझं हृदय बेहाल झालंय.

Pages