मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गळा दाबला.. Happy
( मग पुढच्या ओळी कोणी म्हटल्या ?)

shanky ते गाण अस् आहे
" परवशता पाश दैवी ज्यांच्या गळा लागला......"

माझ्या लहानपणी आमचा एक मित्र गाण्याचे शब्द कळले नाही की तो स्वताचेच काही शब्द घुसवून गायला मात्रा पूर्ण होतील अशा पद्धतीने गाने पूर्ण करी. कारन तेव्हा फक्त रेडिओवरूनच गाणी ऐकावी लागत त्यामुळे शब्दाचे नेहमीच कन्फ्यूजन असे. एक उदाहरण आठवते त्यावरून कल्पना येईल.

स्थानिक कार्यक्रमात एका विनोदी पात्राच्या तोंडी हिन्दी मराठी खिचडी भाषेतले गाणे होते.(खेड्यातले मुसलमान अशीच भाषा बोलतात...

ते होते

आ जाव मेरी टम टम
काय तुला झाले
तडपे हुए दिलको
क्यूं टोचतीस भाले...

त्यावर आमच्या मित्राने गाण्यासाठी अशी "सोय"-लावून घेतली होती

आ जाव मेरी टम टम
काय तुला झाले
दडपी हिंगाण
ब्याट क्याट
टोच्तीस भाले... Happy

-------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

>>>घुंगट की आड से बिरबलका - रूनी टू मच Happy

टोणगा - हे टमटम काय प्रकरण आहे ते कळलं नाही, घोडागाडी का? Happy पण मग घोडागाडी भाले कसे टोचेल, भारी कन्प्यूजन Happy

मला "बोले रे पपिहरा" हे गाणं ऐकताना पपिहरा म्हणजे "कोकीळ" माहीत असूनही दरवेळी "हिरवा कुत्रा" आठवतो Happy

आई शप्पथ....

मी पपीहरा ला पपई चं झाड समजायचो...
अत्तापर्यंत...

मला पपीहरा म्हटल की हिरवी (कच्ची ) पपई डोळ्यासमोर यायची Proud

'पपिता' आणि 'पतिता' या दोन शब्दांत माझा सॉलिड घोळ व्हायचा. 'पतिता' चित्रपटात लताचं 'पतिता' शब्द असलेलं गाणं होतं. आता पपई आणि मीनाकुमारी यांचा संबंध काय, हे मला कळलं नव्हतं.

बाप रे! बास आता, हसून हसून वाट लागली... Rofl

अजून एका शब्दाचा अर्थ सांगा रे !
हे "मिसरी की गली" काय प्रकरण आहे? मल वाटते जिथे मोठ्ठया प्रमाणावर मिश्री भाजली जाते ती गल्ली. म्हणजे आपल्या कडे नसते का भोरी आळी, बुरूड आळी, शिंपी आळी, धोबी घाट तसे.. Happy त्या गल्लीत त्या मिश्रीचा तो विशिष्ट वास दरवळत असेल. मला आवडत नाही अजिबात.. पण कुणाकुणाला आवडतही असेल Happy
पण मग त्या "हमारा दिल आपके पास है " मधल्या एका गाण्यात ते असे का म्हणतात.. Uhoh
"मिसरी की गली इट्स माय फॅमिली" ???????????
Proud

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!

मुळात मिसरी म्हणजे काय हे सांगा...

कारण असोका मधल्या गाण्यात पण 'मिसरी सी मीठी' वगैरे शब्द आहेत...

मिसरी म्हणजे मिश्री नसावे... कारण मिश्री गोड असेल असं वाटत नाही... (अनुभवी लोकांनी याचंही स्पष्टीकरण द्यावं)

मिसरी म्हणजे खडी साखर.

मिसरी म्हणजे खडी साखर.. ? ? ?

त्या रंग दे बसंती मधल्या गाण्यात पण आहे - मला वाटतं ते मिसरी की दली असं काहीस असाव Happy
****************************
Happy Blush Proud Lol Biggrin Rofl

दिपू, ते मिसरी की डली असेल. जसं गुड की डली...
डली म्हणजे... घातलेली. (युक्त)
त्या मुंगळा गाण्यात आहे ना? तु मुंगळा, मुंगळा मै गुड की डली.... Proud

मी गुल चा अर्थ विचारतीये.
>>>>> गुल म्हणजे फूल.. गुलबदन म्हणजे फूलासारख्या शरीराची!_________________________
-A hand that erases past can create a new begining.

दिल ये बेचैन वे, रस्ते पे नैन वे
जिन्दरी बेहाल है, सुर है न ताल है
आजा साँवरिया, आ, आ, आ
ताल से ताल मिला, हो ताल से ताल मिला

हे गाणं माझा चुलत भाउ लहान पणी असा गायचा.......

झिंगडे मे तेल है , रस्ते पे बेल है
झिंगडी बिमार है, सुर है ना ताल है...........

डली म्हणजे गुळाची ढेप का ? Proud
मुंगळा नाय का गुळाच्या ढेपी कडे आकॄष्ट होतो तसा काहीसा अर्थ असेल (आता गुळाची ढेप अस आम्ही प्रदीप कुमार किंवा भारत भूषण अश्या ठोकळ्यांना म्हणायचो. हेलन बाईंना कश्या पाई म्हणून राहीले हो गुळाची ढेप )
.
दिल ये बेचैन वे, रस्ते पे नैन वे
वे म्हणजे वो च अनेकवचन का किंवा ते कारवारीत म्हणतात ना हेल्ल काढून
तूवे फाल्याक येतल्लेवे तस काहीस असेल Happy
.
कोणी शकीरा बाईंच 'XX खोट बोलत नाहीत' गाण ऐकलय का ?
त्यात मध्येच अश्या काहीश्या ओळी येतात ' you move according to size of your body ' त्या नक्की काय आहेत ? Happy

मिसरी म्हणजे खडीसाखर असं मला वाटतं. "वे" म्हणजे बहुतेक आपल्याकडे कसं "ग" किंवा "रे" म्हणतात तसं असावं बहुतेक - जसं "सजना वे" Happy

नूरी पिक्चरमध्ये ते गाणं आहे ना "आ जा रे" त्यात ओळी आहेत "उजला उजला नर्म सवेरा रूहमे मेरी झाके", मी ते बरेच दिवस "उजला उजला नर्म सवेरा रूममे मेरी झाके" असं ऐकायची Happy

केदार, त्या शकिराच्या गाण्यात you move according to size of your body अश्या काही ओळी नाहियेत..

ते मुंगडा मुंगडा मला कधी कळलच नाही.. ते गाणं मला,
'मुंगळा मुंगळा मै गुडगुडगुडी.. मंगता है तो आजा रसिया नही तो मै मैके चली'
असच ऐकायला यायचं नेहेमी..

you move according to size of your bod >> You make a woman go mad, So be wise and keep on reading the signs of my body असे आहे हो ते. Lol

माये नि माये ( हम आपके है कौन) गाण्यात कोरसची ओळ कोणती आहे.. ? चिनमारिया चिन्मारिया मेरे दोन सिपैया.. ? म्हणजे काय?

Mungda, mungda main gud ki dali,
mangta hai to aaja rasiya na hi to main le chali’
Mungda means ant, so the English translation would be somewhat like this.
‘Ant (y) o ant (y) I am the sugar lump
You want me, come get me, o rasia (syrupy seeker) or else I will take it with me’

असो. हे एका ब्लॉग वरून उचललेले आहे. दली म्हनजे ढेप.

स्वप्ना राज आ जाओ मेरी टम टम असे तो त्याच्या प्रेमपात्राला उद्देशून म्हणत आहे.

मिसरी म्हनजे खडीसाखर.
मिसरी म्हनजे मिश्री असे मलाही बरेच दिवस वाटे Happy

साध्वी शाकीरामाता यांच्या मुखकमलातून आलेल्या पृष्ठभाग असत्य बोलत नाहीत या संग्रहातील शब्द पुढील प्रमाणे आहेत त्यावरून साध्वी शाकीरामातासह कोणाच्याही साईझचा त्यात काही संबंध नाही असे दृग्गोचर होईल...
So be wise and keep on
Reading the signs of my body
माये नि माये मध्ये कोरस असा आहे.

चन माहिया, चन माहिया, मेरे डोल सिपहिया...

ही सगळी प्रियकराची प्रेमळ विशेषणे आहेत जसे मेरे बांके सिपहिया किंवा तुम्ही माझे बाजीराव... तसे.-

या मुंगळ्याची गम्मतच आहे. उत्तर भारतीय भाषांत ळ हे अक्षर नाही म्हणून जिथे ळ येथे तेथे ते ड अक्षर वापरतात. आपल्याकडे खानदेशात ही ळ आणि ड ची उलटापालट सारखी चालते. किंवा ळच्या ऐवजी य ही वापरतात. वास्तविक ळ ला ल अधिक जवळ अआहे..

--------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

चिनमारिया चिन्मारिया मेरे दोन सिपैया >>>> दोन शिपायांनी मिळुन चिमण्या मारल्या Wink

मग जिंदमारीये असं पण म्हणतात ना काही गाण्यांत? ते काय असतं?

टोणगा... Rofl
चिनूक्स........ जिंदमारिए नाही... "जिंद माहीया...."
म्हणजे आपण मराठीत म्हणतो ना.. 'प्राणप्रिया...' वगैरे... तसं... Proud

मंड्ळी, आता लगे हाथ माझ्या पण काही शंकांचं निरसन करा - हे "लोंग वाचा" किंवा "लोंग गवाचा" हा प्रकार काय आहे? लोंग म्हणजे बहुतेक "नाकातली चमकी' असावी असा मला संशय आहे.

तसंच दुसरं "लोंगदा लष्कारा"- आधी हे ऐकून मला भारतीय लष्कर आठवायचं आता "लष्कर-ए-तोयबा" आठवतं Happy

लष्कारा हा बिंदिया चा पण असतो....
त्यामुळे त्याचा अर्थ चमक / चकाकी असेल असं वाटतय...
_______
फिल्लमबाजाच्या मनात थिएटर
आणि
खवैय्याच्या मनात रेस्टॉरंट

>>>त्याचा अर्थ चमक / चकाकी असेल असं वाटतय...>>> किंवा हेलकावा..

दक्स...

नाकातली चमकी हेलकावेल कशी?

_______
फिल्लमबाजाच्या मनात थिएटर
आणि
खवैय्याच्या मनात रेस्टॉरंट

"जाने तु या जाने ना" यातील पप्पु च्या गाण्यातले शब्द कळत नाहीत.
"पैरो की घडी हाथो मे पर्फयुम कुलचीवाला" असं ऐकु येतं मला.

Pages