Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अर्थही
अर्थही सांगा, देवा..
'झिहाले
'झिहाले मिस्कीन मकुन्बरंजिश बहाल - ए-हिजरा बेचारा दिल है' >> अर्थ काय हो पण या ओळीचा?
याचा अर्थ,
याचा अर्थ, 'आपल्या वियोगामुळे अगोदरच दीन झालेल्या या हृदयाचा विचार केल्याने तुला वाईट का वाटते आहे'?
ही ऊर्दू
ही ऊर्दू भाषा आहे का चिनूक्स?
उर्दू
उर्दू नाही..फारसी आहे ही..
'झिहाले
'झिहाले मिस्कीन मकुन्बरंजिश बहाल - ए-हिजरा बेचारा दिल है' असं आहे ते..>>>>
हेच गाण गिरिराजच्या कानानी कस ऐकल हे त्याने जुन्या मायबोलीत लिहिल होत. ते वाचुन मी प्रचंड हसलो होतो.
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=644&post=709890#POST...
ह्या इथे लिहिल आहे त्याने.
धन्यवाद रे
धन्यवाद रे झकास.मीही खुप हसले. लोकांना काय ऐकु येईल काही भरवसा नसतो.
'झिहाले
'झिहाले मिस्कीन मकुन्बरंजिश बहाल - ए-हिजरा बेचारा दिल है' असं आहे ते.
आणि त्याचा अर्थ 'मस्किन जिल्ह्यातील मुकुंद रजनीश बहाल हा हिजडा आपले हृदय विकतो आहे' असा आहे.
'झिहाले
'झिहाले मिस्कीन मकुन्बरंजिश बहाल - ए-हिजरा बेचारा दिल है' असं आहे ते.. >>>>>> झिहाले मिस्कीन???? मी ते झिहाले मस्ती ऐकायचो..
त्या गाण्या आधीचे मिथून चे डायलॉग भारी आहेत.. "कोई शक?" वाले..
कोणीतरी या
कोणीतरी या गाण्याची लिन्क टाका ना तूनळी वर असेल तर, हे कुठले सुप्रसिद्ध गाणे आहे मला कसे अजिबात आठवत नाही.
रूनी हे घे..
रूनी हे घे..
http://www.youtube.com/watch?v=DbODpZM761g
हम साथ
हम साथ साथे है मधलं ते "मोरे हिवडा मे नाचे मोर" असं काहीतरी गाणं आहे त्यातल्या हिवडा चा अर्थे माहित्ये का कोणाला??? आम्ही खूप brain storm केलं होतं पण काही झेपलं नाही..
माझ्या एका मित्राच्या मते ते कुटूंब बंगाली आहे आणि तो हावडा चा regional उच्चार आहे... पण पिक्चर बघितल्यावर ते बंगाली नाहियेत असं लक्षात आलं..
शेवटी मग मोर नाचू शकतो त्यात.. म्हणजे नक्की काहितरी मोठं असंणार खूप असं conclusion काढून सोडून दिलं ते..
हिवडा
हिवडा म्हणजे घराचे छत/ गच्ची असावे का? की अंगण?
-प्रिन्सेस...
rajdeo हिजरा
rajdeo
हिजरा ह्या शब्दाचा झक्कींसारखाच अर्थ काढ्ला होता मी, नंतर त्याचा अर्थ वियोग आहे हे कळलं, हिवडा म्हणजे अंगण असावं असं वाटतं
runi: तूनळी प्रकरण पहिल्यांदा कळलं नाही, मग "ट्यूब" पेटली
बाय द वे,
बाय द वे, रजनीश बहल हे स्वर्गीय नूतनच्या स्वर्गीय नवर्याचं नाव होतं
मी लहानपणी
मी लहानपणी "या चला शारदेला वंदुया" हे गाणे चुकुन "च्यायला शारदेला" अस म्हणुन तुफान मार खाल्ल्याच्या रम्य आठवणी जाग्या झाल्या
झक्की..
झक्की..
हिवडा म्हणजे अंगणच.
ब्बापरे !!
ब्बापरे !! ह्याचा काय अर्थ आहे ?
>>>'झिहाले
>>>'झिहाले मिस्कीन मकुन्बरंजिश बहाल - ए-हिजरा बेचारा दिल है' असं आ>>>>> या गाण्यावर जुन्या हितगुजवर बरीच चर्चा रंगली होती. वेळ मिळाला की जाऊन या. हसून लोळायला होईल.
दक्षिणा,
दक्षिणा, काल मी पण जुन्या हितगुजवर ह्या गाण्याबद्दलची चर्चा शोधायचा प्रयत्न केला पण सापड्याच नाही.. कुठल्या बाफवर झाली होती ती चर्चा? मला अजिबात आठवत नाहिये कुठला बाफ आणि कधी ते..
टण्या जरा
टण्या जरा वरच्या पोस्ट वाच की
टण्या मी
टण्या मी लिन्क दिली आहे रे वरती.
डोळ्यांची सुज अजुन उतरलेली दिसत नाहिये.
हिवडा
हिवडा म्हणजे हृदय...
म्हारे हिवडेमे लागीरे कटार रे..
खूप लहान्पणी या गाण्यावर ड्यान्स बसवला होता... त्या वेळच्या स्टेप करताना नेमके इथे अडकले होतो. मग कुणीतरी हा अर्थ सांगितला.
--------------
नंदिनी
--------------
हिवडा
हिवडा म्हणजे र्हुदय ? !!
अडम, ते 'कोई
अडम, ते 'कोई शक' वाल्या डायलॉगची लिंक :
http://www.youtube.com/watch?v=tsQMI2NzydM
अभिजित२०७
अभिजित२०७४ , फार हसले. मार खाणार नाही तर काय!!

आतापर्यन्त मी पण सर्वात जास्त गिरिराज च्या त्या गाण्याच्या पोस्टवर आणि त्यानंतरच्या चर्चेवरच प्रचंड हसले आहे.. झकासा, झकास काम केलेस ती लिंक दिल्याबद्दल .
थॅंक्स
थॅंक्स पन्ना.. मी उसगावात गाडी घेतल्यावर माझ्या एका मित्रानी कौतूकाने सीडी राईट करून दिली होती त्यात हे गाणं होतं,... ह्यावर अफाट चर्चा झाल्या होत्या तेव्हा..
e.g. "तुम्हारे पलखो से गिरके शबनम हामारे आखों मे उड रही है".. आता हे जर खार असेल तर ते नक्की कोणत्या पोझीशन मधे बसले असतील की त्याच्या डोळ्यातील शबनम हिच्या डोळ्यात गिरावी..
किंवा "तुम्हारे सिने से उठता धुवा हमारे दिल से गुजर रहा है" ह्याचा भावार्थ असा आहे की तो स्मोक करतोय आणि ती सांगत्ये बाबा ते बंद कर मला पॅसिव्ह स्मोकींग चा त्रा होतोय..
'होंटो में
'होंटो में ऐसी बात' या jewel thief मधल्या गाण्यात 'लट कहीं जाये घूंघट कहीं जाये .... ' अस काहीतरी वाक्य आहे. ते मला 'लटकही जाये घूंघट को ही जाके' असं काहीतरी ऐकू यायचं..... ही बाई प्रेमभंगाने निराश होउन आत्महत्या करेन असं म्हणतीये अशी मी गाण्याचा अर्थ लावताना स्वतःची समजूत घातली होती....
Santino
Santino
ट्ण्या,
ट्ण्या,
पर्टीक्युलरली या गाण्याची चर्चा ज्या लिंकमध्ये (आता) अर्काईव्ह झाली असेल ती शोधणं मुश्किल आहे, पण तो सगळाच बी बी मस्त आहे. हसू येईल याची १००% गॅरंटी....
अरे!! आत्ताच पाहीलं सगळ्यात पहीली आणि दुसरी अर्काईव्ह ची लिंक वाच त्यातच आहे ही चर्चा.
Pages