मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंडळी , कॄपया विषयांतर करू नका.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!

लहान असताना मला "सजना है मुझे, सजना के लिए" हे गाणं कळायचंच नाही. दोन्ही सजना मी साजण ह्या अर्थाने घ्यायचे. म्हणजे बाईला एक साजण आहे आणि त्याच्यासाठीच दुसरा पण येऊ घातलाय असे काहीसे वाटायचे Wink काय कळ्ळायचेच नाही Uhoh

आईशप्पथ cinderella, परवाच हे गाणं ऐकलं, आता तू म्हट्ल्यावर मला कळलं की पहिला सजना म्हणजे नटणे हया अर्थी आणि दुसरा साजण ह्या अर्थी आहे, मलाही असच वाटायचं की ती सांगतेय की मला साजण आहे म्हणून मी सजतेय, मला सात्त्विक संताप यायचा की ज्यांना साजण नाही त्यांनी सजूच नाही की काय Happy

ते गाणं आहे ना "सैया झूटोंका बडा सरताज निकला" मला बरेच दिवस "सैया जूतोंका बडा सरताज निकला"असं वाटायचं आणि "बाटा" आठवायचं Happy किंवा वाटायचं की त्याला कमी लेखायला ही त्याला जोड्यांची उपमा देतेय.

त्याला कमी लेखायला ही त्याला जोड्यांची उपमा देतेय. >>
कै च्या कैच Proud
****************************
छोटीसी दिल की ऊलझन है , ये सुलझा दो तुम ....
जीना तो सीखा है , मरके ... मरना सीखा दो तुम ...

ज्यांना साजण नाही त्यांनी सजूच नाही की काय
<<<<<<<<<<<<<< हिहिहिहि

>>>"सैया जूतोंका बडा सरताज नि>>>>> स्वप्ना... टू मच... Lol

कुणाला सनी देओल चा ' द हीरो ' स्टोरी ऑफ अ स्पाय हा चित्रपट आठवतोय का ? त्यात सनी बरोबर, प्रियांका चोप्रा आणि प्रीती झींटा होत्या (चित्रपट होता त्या दोही अजून आहेत )
.
त्या चित्रपटात जेंव्हा चोप्रीणी बरोबर सनीच लग्न ठरत तेंव्हा झींटीण 'एक था गूल एक थी बुलबुल बुलबुल बोले सून बाबूल' हे गाण गाते आणि वर तोंड वर करून नाचते.
.
त्याच गाण्यात चोप्रीणीच्या तोंडी (तोफेच्या तोंडी सारख वाटतय ना Proud ) 'जल्दी मेरी डोली मंगवादे आ गये मेरे चाहने वाले ' अश्या ओळी आहेत.
.
ही ओळ इतक्या कर्कश्य पणे म्हटली गेलीये की भर थेटरात मी वैतागून मित्राला म्हटल ' डोली नाही मिळाली तर टोपली आणा आणि हीला घेऊन जा रे लवकर'.
.
मित्र चेहरा वेडा-वाकडा करून हसत होता संपूर्ण चित्रपट भर Happy

केदार चोप्रीण , झिंटीन Proud
****************************
छोटीसी दिल की ऊलझन है , ये सुलझा दो तुम ....
जीना तो सीखा है , मरके ... मरना सीखा दो तुम ...

बरं झाले केदार , तू हे गाणे आठवून दिलेस. 'एक था गूल एक थी बुलबुल बुलबुल बोले सून बाबूल' मला 'एक था बूल एक थी बुलबुल बुलबुल बोले सून बाबूल' असं वाटायचं.. आणि जर बुलबुल पक्ष्यातल्या मादी ला बुलबुल म्हणतात तर नर पक्ष्याला बुल म्हणत असावेत अशी मी समजूत घातली होती स्वतःची. Proud म्हणजे चिमणा-चिमणी तसे बुल-बुलबुल Lol
पण गुल म्हणजे तरी काय हो?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!

आशू Happy
.
अर्थ शोधला की मिळतो ग Happy
.
म्हन्जी अस बघ झींटीण म्हणजे बुल.
म्हन्जी सनी -पाजीच अर्धांग
म्हन्जी सनी पाजी दोनदा बुल अर्थात बुलबुल
आता दोघ जण रहणार कुठे तर बबूल (मराठीत बाभूळ) वर
(बबूल बबूल पैसे वसूल वाला बबूल नाही )
सनी पाजी होणार घरजावई/ बबुलजावई
त्यासाठीच नाय का ती चोप्रीण आरडत असते
जल्दी मेरी डोली मंगवादे
म्हणजे लवकर माझी बबुल वरची ढोली तयार ठेवा
सनी पाजी रहायला येणारै Proud

म्हन्जी सनी पाजी दोनदा बुल अर्थात बुलबुल >>

कैच्या कैच लॉजिक रे केदारा Happy
****************************
छोटीसी दिल की ऊलझन है , ये सुलझा दो तुम ....
जीना तो सीखा है , मरके ... मरना सीखा दो तुम ...

तूने मुझे पेहेचाना नहि....
दिवाना हुं मै दिवाना नहि
म्हणजे काय? म्हणजे मी येडा आहे.. खुळा नाहि असं काहिसं असावं का?

aashu_D, kedar123 - बस करा आता, हसून हसून जीव गेला माझा Happy

सनी पाजी होणार >> Biggrin
अर्थ शोधला की मिळतो ग ..म्हन्जी अस बघ झींटीण म्हणजे बुल. >> अरे , मी गुल चा अर्थ विचारतीये.
आणि जर झींटीण बुल असती तर गाण्यात "एक थी बुल एक था बुल्बुल" (कसा बुलबुळीत झालाय ना हा बाफ? :फिदी:) असं नसतं का रे ?

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!

कै च्या कैच >> दीपुर्झा सारखं काय लावलंय हे कैच्या कै? का शाहरूख सारखं तुला पुढचे शब्द बोलताना अडखळल्यासारखं होतंय? Proud डॉक्टरांना दाखव हो लवकर नाय तर काय म्हणता कै च्या कै च होऊन जायचं Lol

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!

अग आशु विंग्रजी कच्च आहे तुझ...... बुल म्हनजे बैल व्हय (तोच तो गाई चा नवरा)
तर ती झिंटीण बैला सारखी आहे म्हणून बुल आणी पाजी(:फिदी:) दोन दा बैल म्हणजे बुलबुल
कळल आता?
Happy

का शाहरूख सारखं तुला पुढचे शब्द बोलताना अडखळल्यासारखं होतंय? >> हो गं आशु ताय ... डॉक्टरां कडे जावं लागणार , आहेत का कोणी तुझ्य माहीतीतले ? Wink .. कै च्या कैच ...
****************************
छोटीसी दिल की ऊलझन है , ये सुलझा दो तुम ....
जीना तो सीखा है , मरके ... मरना सीखा दो तुम ...

दीपु काय हे आशु ताईं ना चांगला अनुभव आहे त्या डॉ.चा. त्या बघ कश्या भरभर बोलया लगल्या....(दिवे घे हो आशु)
Happy
शाहरुख चा डॉ आला
आशुताई बोलाया लागल्या
टिंग टिंग
शाहरुख चा डॉ आला
आशुताई बोलाया लागल्या
Happy
(चाल : बिलान ची नागीन )

रेशम Biggrin
****************************
छोटीसी दिल की ऊलझन है , ये सुलझा दो तुम ....
जीना तो सीखा है , मरके ... मरना सीखा दो तुम ...

कृपया वरिल मेसेज लिहिताना आधी Warning द्या की, "ऑफिसात वाचण्यासाठी नाही".... हसल्यामुळे माझी मोठी पंचाईत झाली.

ए माझं गाणं काय ते पण लिहा ना माहित असलेल्यांनी.

मला 'विकल मन आज' गाण्यातील 'नववधू अधिर मन जाहल्या' ही ओळ 'नववधू बधिर मन जाहल्या' अशी ऐकू यायची. लग्नाला उभं राहिल्यावर कुणीही बधिर होणारच नाही का?

झाले युवती मना दारुण चे शब्द हवे आहेत.. त्याचा अर्थही हवा आहे....

झाले युवती मना दारुण रण अतीव ठेंगणे... असे काही तरी मी रोज ऐकतो आहे.... ( किती दारुण अवस्था..!) युवती, रण, दारुण, रण भजना, हंसानन.. असे काही शब्द समजतात.........

aashu29, तुम्ही गाणं बरोबर ऐकलं आहे, हे बघा लिरिक्सः

http://www.hindilyrix.com/songs/get_song_Tune%20Mujhe%20Pehchaana%20Nahi...

मला वाटतं की ह्याचा अर्थ असा आहे की मी फक्त तुझ्यासाठी वेडा झालोय पण मी तसा बाकी शहाणा आहे Happy तेरे नामका दिवाना हू मै, दिवाना नही

आई गं! हसून हसून डोळ्यातून पाणी आलं. मस्त आहे हा धागा.

एक गाणं आहे - काले काले बादरा जारे जारे बादरा मेरी अटरिया ना शोर मचा, लहानपणी मी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा "बादरा" आणि "बंदर" ह्यात घोटाळा झाल्यामुळे खिडकीत येऊन एक माकड ह्या बाईला त्रास देतंय असा माझा समज झाला होता Happy राष्ट्र्भाषेचं अगाध ज्ञान, दुसरं काय!

तसंच, घुंगटकी आडमे दिलबरका ऐकताना मला गाण्याचा अर्थ माहीत असूनही एकतर आपण मराठीत कसं "छान झालंय बरं का" म्हणतो तसं काहीतरी वाटायचं किंवा फणसातला बरका फणस आठवायचा Happy

मला खूप दिवस ते गाणे घुंगट की आड से बिरबलका असे वाटायचे आणि मग विचारांचा अजुनच गोंधळ बिरबल काय करतोय इथे Happy

मी ऐकलेले नाट्यगीत.. पर वशता तात ऐसे त्याचा गळा दाबला.. Sad

Pages