मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'प्रादो की घडी हाथों में, पर्फ्युम गुच्चीवाला'
prado, gucci हे ब्रॅन्डस आहेत..

चिनूक्स....

प्राडो नाही रे.... RADO... ही खूप प्रसिद्ध स्विस घड्याळ कंपनी आहे...

TOYOTA PRADO ही SUV आहे....

आणि PRADA डिझाइनर चं नाव आहे... ज्याचा त्याच नावाचा brand आहे...
_______
फिल्लमबाजाच्या मनात थिएटर
आणि
खवैय्याच्या मनात रेस्टॉरंट

अरे हो, बरोबर्..रादो..

लौन्ग म्हणजे नाकातली मोरणी. गवाचा. म्हणजे हरवली.

ते सगळे गाणे नाकातली मोरनी हरवली त्याबद्दल तकरार करणारं आहे. आपल्या बुगडी माझी सांडली गं जाता सातार्‍याला
बुगडी म्हनजे कानातला दागिना अन सांडली म्हणजे हरवली. तसलाच प्रकार.

लौन्गदा लशकारा किंवा लिष्कारा म्हन्जे चमक अथवा परावर्तित तिरिप. मोरणीच्या खड्यावरून परावर्तित होऊन नायकाचे डोळे दिपण्याचा रोम्यान्टिक प्रकार तो महाराजा...

लौंग दा लश्कारा नावाचा पंजाबी चित्रपट होऊन गेला.

गम्मत म्हनजे मागच्या पिढीत एक फुगडीचे लोकगीत आपल्या कडे होते.

काय बाई पुण्याची तारीफ.
लवंगा निघाल्या बारीक.

यातल्या लवंगा म्हनजे नाकात घालायच्या लवंगा (मोरणी). फ्याशन बदलून टपोर्‍या लवंगा ऐवजी बारीक लवंगांची फ्याशन आल्यावर खेड्यातल्या तरुणी कुत्सितपणे पुण्याच्या बायांना उद्देशून म्हणताहेत.(पुणेकरांचा दुस्वास करण्याची पद्धत तेव्हाही होती म्हणायची.)

हा अर्थ म. म. द. वा. पोतदारांनी स्पष्ट केला होता असे कुणीतरी सिनियर मायबोली कराने इथे पूर्वी पोस्ट केल्याचे मी वाचले आहे.....

तसेच जिंद मारिये नसून जिंद मेरिये असे आहे. म्हनजे मेरी जानच.

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

टोणगा, छान माहीती सांगितलीत.
मी अजून एका वाक्याने भर घालते. 'बुगडी सांडणं' म्हणजे काहीतरी विचित्र घडणं. (विशेष करून तरूण मुलिच्या आयुष्यात) Proud

टोणगा, नेणत्याला जाणते केल्याबद्द्ल धन्यवाद Happy

'मै हूंSSSSSSS खुशरंग हीना..
प्याSSS रीSSS खुशरंग हीना..!!

हे गाणे मी बरेच दिवस -
'मै हूंSSSSSSS कुछ नही कहना!
प्याSSरीSSSS कुछ नही कहना!!

असे म्हणत होतो. मी कशी आहे ते सांगायला सुरूवात केल्यानंतर ती हीना यू टर्न घेऊन 'कुछ नही कहना' अशी का म्हणते, ते जाम कळत नव्हते.

साजिरा.. Lol
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!

माझी मुलगी
" बडी woman
देखो देखोना"

रेशम,
ती बहुदा तुला उद्देशुन म्हणत असेल ते गाणे Proud Light 1

श्रीरंगा कमलाकांता, हरी पदराते सोड रे... [नाटक : होनाजी बाळा]
असं वाटायचं
श्रीरंगा कमलाकांता धरी पदराते ओढ रे...

-बापू

runi
हे हे हे Proud
कृपया एकदा माझा फोटो बघणे

भले भले बापूराव...!!!

बिटवा तोहार कोई जवाब नाही!

(ह्या भले भले चेच प.ंजाबात जाऊन बल्ले बल्ले झाले आणि शाबासचे शावा शावा... )

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

सुट्टीनंतर बरीच मुले सीडीज भारतातुन घेउन आले. मला काही नविन चित्रपट्,त्यांच्यातील गाणी वगैरे माहीत नव्हत.गणपतीत त्याच्याकडे बघायलाही वेळ नव्हता.तर एक गाण असच मुले लावत. ते गाण छान होत. परवापर्यंत मला ते गाणे 'लव्ह कीSSSSSबोर्ड यु आर माय्.....लव्ह कीबोर्ड' अस ऐकु येत होत.मला वाटल इंटरनेट प्रेम वगैरे असेल त्यामुळे असे गाणे असेल वगैरे.मागे नाही का 'प्यार के लिये.... है इंटरनेट' अस रेहमानच गाण आल होत.त्याच धर्तीवर 'लव्ह कीबोर्ड' असेल अस वाटत होत पण परवा बघितल तर ते बचना ए हसीनो मधल 'लकी बॉय्.......यु आर माय लकी बॉय' अस गाण होत.

खुप दिवसांनी स्वत:च्या गाण्यातली चूक कळली, रादर बर्‍याच दिवसांनी ऐकल्यामुळे, गाण काय म्हणायचो ते आठवलं
लाल दुपट्टा लाल दुपट्टा
खो गया रे मेरा हवा के झोकें से
मुझको पिया ने बेच दिया हाय रे धोके से
माना के मुझे दिल देगा वो
मगर अपनी जान लेगा वो :))

 
 
==============
बजे सरगम हर तरफ से | ताल कदमो पे छाये जाये |
लब पे जागे गीत ऐसा | गूंजे बनकर देश राग||

दीमडू..
मुझको पिया ने बेच दिया हाय रे धोके से Happy

दीमडू , टोणगा Proud
.
ते जब प्यार किसी से होता है (सलमान खान , टी खन्ना/भाटीया आणि नम्रता शिरोडकर फेम) मधल 'मदहोश दिलकी धडकन' गाण आहे ना ते गाण मी अस ऐकायचो Happy
.
मदहोश दिलकी धडकन चूपसी तनहाईसी
छुप गया चांद क्यू क्या तेरी मम्मी इधर आयी Proud
.
अश्या टेरर मम्मीला बघून जीथे चंद्र सुद्धा लपून बसतो तीथे बापड्या सलमान चा काय पाड Happy

दिमडू आणि केदार....

अशक्य कान आहेत तुमचे... काहीही ऐकता.... Lol Rofl

ते नवं काय गाणं आलं आहे? मला "तंदुरी नाईट्स" असं काहीतरी ऐकायला येतंय्.....आता गाणं पंजाबी म्हणून काय लगेच तंदुरी घुसवायची त्यात?

मराठी गाणं - पुरणपोळी नाईट्स
साऊथ इंडियन - इडली नाईट्स
गुजराती - ढोकळा नाईट्स
बंगाली - रोशोगुल्ला नाईट्स
सिंधी - पापड नाईट्स

भारतमाताकी जय हो Happy

स्वप्ना... Lol

पुरणपोळी म्हणजे अगदीच मिळमिळीत, झुणका नाईटस, किंवा रस्सा नाईटस... अजूनच झणझणीत.... Proud

dakshina Happy खरं तर वडापाव म्हणणार होते पण उगाच त्याला राजकीय रंग नको म्हणून पुरणपोळी म्हटलं ग......

राम राम मंडळी,

माझ्या लहानपणी सांगली आकाशवाणीवर गीत रामायणामधील एक गाणे मी असे ऐकत होतो -

"दशरथा घे हे पाय सदा"

दशरथाला त्याच्याच यज्ञात येउन आपले पाय (किंवा जयपूर फूट) देणारा हा दानवीर कोण असा प्रश्न मला पडत असे. नंतर कळले की ते गाणे होते -

"दशरथा घे हे पायस दान" (म्हणजे पाय नव्हे तर खीर)

अगं मग लिहायचं की.. त्यात काय? फक्त एक तळटिप देऊन टाकायची म्हणजे झालं Happy
पण बाकी तुझं लॉजिक एकदम लाजवाब आहे बरं Happy

लता च एक गाण आहे, सुनाइ देति है जिसकि धडकन तुम्हारा दिल या हमारा दिल है, तयात पुढे फारच विचित्र काहितरि आहे !! बहारे हिज्दामुकुन्बरन्जन्शिश बेचार दिल है अस कहितरि.....अजुनहि मला ते काय आहे ते महित नाहि.

लता च एक गाण आहे, सुनाइ देति है जिसकि धडकन तुम्हारा दिल या हमारा दिल है, तयात पुढे फारच विचित्र काहितरि आहे !! बहारे हिज्दामुकुन्बरन्जन्शिश बेचार दिल है अस कहितरि.....अजुनहि मला ते काय आहे ते महित नाहि.

मलाच पडलेला प्रश्न..
सांगा, सांगा, कुणीतरी.

'झिहाले मिस्कीन मकुन्बरंजिश बहाल - ए-हिजरा बेचारा दिल है' असं आहे ते..

Pages